Home Blog Page 778

NIRDPR Recruitment 2021| राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती

NIRDPR Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारानी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून,अर्ज करण्याची वाढवून दिलेली शेवटची तारीख 9 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nirdpr.org.in/    NIRDPR Recruitment 2021

एकूण जागा – 510

पदाचे नाव & जागा
1.राज्य कार्यक्रम समन्वयक – 10

2.यंग फेलो – 250

3.क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन – 250

शैक्षणिक पात्रता –

1. राज्य कार्यक्रम समन्वयक – i) अर्थशास्त्र / ग्रामीण विकास / ग्रामीण व्यवस्थापन / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / मानववंशशास्त्र / सामाजिक कार्य / विकास अभ्यास / इतिहास यासह सामाजिक विज्ञान पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

2. यंग फेलो – अर्थशास्त्र / ग्रामीण विकास / ग्रामीण व्यवस्थापन / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / मानववंशशास्त्र / सामाजिक कार्य / विकास अभ्यास / इतिहास यासह सामाजिक विज्ञान पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा (ii) 0 ते 05 वर्षे अनुभव

3. क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन – 12वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट –
1. राज्य कार्यक्रम समन्वयक – 30 ते 50 वर्षे

2. यंग फेलो – 21 ते 30 वर्षे

3.क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन – 25 ते 40 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.  NIRDPR Recruitment 2021

शुल्क – फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2021

EWS & PWD उमेदवारांकरिता 09 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.nirdpr.org.in/

मूळ जाहिरात- PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Prelims 2021 | परीक्षेला अवघा आठवडा बाकी; अभ्यासाचे नियोजन कसे करावे?

MPSC Exam Date 2021

CSE फंडा |  नितिन बऱ्हाटे

“स्पर्धापरीक्षा अभ्यास” आणि “स्पर्धापरिक्षा तयारी” यात मुलभूत फरक आहे, अभ्यास कधीच संपत नाही पण “तयारी” योग्य नियोजनाने संपु शकते.

MPSC पुर्व परीक्षेला एक आठवडा राहीला आहे. “माझा संपुर्ण अभ्यास झालांय का …..??” हा प्रश्र्न स्वतःला विचारायची ही वेळ नक्कीच नाही. पण आता पर्यंत झालेल्या अभ्यासावर पुर्व साठी क्वालिफाय होण्याची ‘तयारी’ उरलेल्या दिवसात करता येऊ शकते हा आत्मविश्वास तुमच्यात हवा. सदर लेखात आपण एक आठवडा पुर्वीचे नियोजन पाहु. MPSC Prelims 2021

1. सर्वप्रथम पुर्व परिक्षेचे हाॅल टिकीट डाउनलोड करून प्रींट करुन घ्या. परिक्षा केंद्र तपासुन घ्या, तुमच्या ठिकाणापासून चे अंतर, कसे जाणार आहात(बस,बाईक), कोणासोबत जाणार आहात ते निश्र्चित करुन घ्या. मास्क, सॅनीटायझर, न्यायची बॅग, आधारकार्ड (अनलाॅक) ची फोटो काॅपी यांची तयारी, पेन,पेन्सिल इत्यादी ची तयारी करुन ठेवावी. ऐनवेळी धावपळ नको. कोव्हीड विषयी संपूर्ण काळजी घ्या.

2. “पुढील संपुर्ण आठवडा मागील दोन वर्षांच्या अभ्यासाचे 2 तासांत उपयोजन कसे करायचे यासाठी वापरा.” आठवडाभर आधीपासून दररोज वेळ(10-12 & 3-5) लावुन पेपर 1 & 2 सोडविल्यास दोन तासांच्या नियोजनाची परिणामकारक तयारी प्रत्यक्ष परिक्षेसाठी होईल. संपुर्ण दिवस सहा सत्रामध्ये विभागुन घेता येईल. MPSC Prelims 2021

उदाहरणार्थ.
सकाळी ६.३०-९.३० – GS-1 घटकांची उजळणी
१०-१२ – GS1 प्रश्नपत्रिका सोडविणे
१२-०१ – विश्लेषण
३-५ – CSAT प्रश्नपत्रिका सोडविणे
५.३० – ८.००- विश्लेषण आणि बुध्दिमत्ता चाचणी, गणित, उतारे सराव
९.३०- १०.३० – चालु घडामोडी उजळणी, अभ्यास आणि स्वतःचे आकलन, नियोजन, विचारमंथन इ.
तुमचा स्वतःचे काही नियोजन असेल तर त्याप्रमाणे करा.

3.सकाळचे 3 तास GS एका विषयाची जलद उजळणी करण्यासाठी ठेवा.
सामान्य अध्ययन 1 – प्रत्येक विषयाच्या शार्ट नोट्सची उजळणी करा, विसरणार्या संकल्पना आणि तथ्यात्मक बाबी नजरेखालून घाला. उदाहरणार्थ राज्यशास्त्रातील कलमे,कायदे घटनादुरुस्ती सुची, प्राधान्य क्रम इ. भुगोलाचे नकाशे, विज्ञानाचे गणित, शास्त्रीय नावे, तक्ते, , इतिहासातील बाबी, अर्थशास्त्र निर्देशांक, तुम्ही तयार केलेल्या ‌शार्टट्रिक्स इत्यादी प्रकारचा विसरणारा भाग उजळणी करून घ्या. आयोगचे 2013 पासुन 2019 पर्यंतंचे पेपर वेळ लावुन सोडविण्यास किंवा विश्लेषण करण्यास प्राधान्यक्रम द्यावा, ज्यातुन प्रश्न विचारण्याची पद्धती, आपल्याला सवयी, पेपर हाताळण्याचे कौशल्य, अचुक उत्तरापर्यंत पोहचणे इत्यादी गोष्टी लक्षात येतील. MPSC Prelims 2021

4.आयोगाच्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास प्रश्न विचारण्याचे स्वरुप लक्षात येईल त्यानुसार प्रश्न हाताळणे सोपे जाईल. विज्ञानावर जास्त प्रश्न असतात त्यांची अधिक उजळणी करावी मागील दोन वर्षीच्या पेपर मध्ये विज्ञान विषयातील गणितं विचारली होती त्या गणिताचा सराव करुन घ्यावा, उलटपक्षी अर्थव्यवस्था, राज्यघटना , भुगोल हे विषय सहज गुण देणारे आहेत त्यांची उजळणी करावी. शेवटी तुमच्या आवाक्यानुसार उजळणीचे विषय निवडावेत तसेच चालु घडामोडी मधील चर्चेतील व्यक्ती, पुरस्कार, योजना, घटना इत्यादी घटकांची उजळणी करुन घ्यावी.

5.या आठवड्यामध्ये महत्वाच्या पुस्तकांमध्ये तुम्ही केलेल्या Imp मार्किंग, अधोरेखित, शार्ट नोट्स, आकृत्या, नकाशे नजरेखालून घालता येतील. तसेच महत्तवाच्या संदर्भ ग्रंथामधील रेडी रेफरन्स डेटा, सारांश/समरी, आपण काय शिकलो, व्हाट वी लर्न, डु यु नो.?(NCERTS), वनलाईनर, तक्ते इत्यादी गोष्टी वाचुन घेता येतील.

6. CAST – 2016 ते 2019 च्या‌ प्रश्नपत्रिका 8 मार्च ते 11 मार्च दुपारी 3 ते 5 या वेळेत सोडवा, त्यातील प्रश्नांचे प्रकार मूळ पुस्तकांतुन सराव करा. गणिताचे जे प्रकार विचारले‌ जातात त्यांचा सराव करा, विविध सुत्रे, पद्धती लक्षात घ्या, आयोगाने विचारलेले उतारे आणि त्यांचे प्रश्न यातील क्लुप्त्या शोधण्याचा प्रयत्न करा, पेपर सोडविण्यासाठी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अचुक उत्तर येण्यासाठी विविध प्रयोग पडताळुन पहा. सीसॅटचे‌ सर्व प्रकारासाठी आत्मविश्वासाने तयार रहा स्वतःची एक रणनीती बनवुन ठेवा. MPSC Prelims 2021

7.खाजगी क्लासेसच्या नमुना प्रश्नपत्रिकांच्या प्रश्न स्तर, प्रकार, गुणांचा तुमच्या मानसिकतेवर काही एक फरक पडु देऊ नका. सोडविलेल्या प्रश्नपत्रिकांची उजळणी करा. सर्वांचे सर्वच घटक कधीच पुर्ण होत नाहीत त्यामुळे जेवढा अभ्यास झालाय त्यावर विश्वास ठेवा. सराव‌ चाचणी मधील गुणांवरुन अभ्यासाचा अंदाज लावता येणार नाही. आयोगाचे प्रश्र्न आणि क्लासेच्या प्रश्नपत्रिकांचे प्रश्न यांचा स्तर बर्याचदा भिन्न असतात.

8.आता वाचलेलं आणि परिक्षेला विचारले‌ जाणारे प्रश्र्न यांत भली मोठी तफावत असणार आहे, प्रश्र्न समोर आल्यावर तुम्हाला कळेल की मागच्या आठवड्यात वाचलेलं काहीच पेपर मध्ये नसुन आतापर्यंत केलेल्या संपुर्ण अभ्यासाचे आकलन आणि सदसद्विवेकबुद्धी याआधारे सुटणारे प्रश्र्न असतील. त्यामुळे उरलेल्या आठवड्यात ‌तशी मानसिकता तयार करणे अपेक्षित आहे.

9.मागील 1-2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुर्व परिक्षेची परिक्षा जवळ आल्यानंतर भीती वाटणं, चिंता करणं किंवा नर्व्हस होणे स्वाभाविक आहे, नैसर्गिक राहण्याचा प्रयत्न करा. पेपरच्या प्रश्र्नांबद्दल आतुरता असली तरी संय्यम ठेवा.

10.पुढील पुर्ण आठवडा शांत राहण्याचा प्रयत्न करा, कोणाशीही वाद-विवाद घालत बसु नका उलट स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. दररोज सात-आठ तास पुरेशी झोप घ्या, जंक फुड टाळा,आहार संतुलित ठेवा.

पुर्व परिक्षा तुमच्या आत्मविश्वासाची परिक्षा आहे, तुमचे सर्वात्तम द्या, अभ्यास झालाय…,??मी उत्तीर्ण होईल का…? यावर्षी प्रिलिमच नाही निघाली तर…?? अशा नकारात्मक प्रश्नांनी अस्वस्थ होऊ नका 14 मार्च 2021 च्या 5 वाजेपर्यंत give up करु नका, पुढील एक आठवडा तुमची स्वतःची रणनीती तयार असेल तर ती वापरा, नाहीतर वरील प्रमाणे नियोजन करा, अट्टाहास फक्त पुर्व परिक्षा उत्तीर्ण व्हावी हाच आहे. MPSC Prelims 2021

सप्रेम सदिच्छा कायम !!

नितिन बऱ्हाटे
Telegram – T.me/nitinbarhate
लेखक ‘लोकनिती IAS’ या संस्थेचे संस्थापक आहेत

Next article on Friday – “MPSC पुर्व परिक्षेच्या दिवशीचे(14 मार्च 2021) नियोजन….??”

UPSC Civil Services Recruitment 2021| 712 जागांसाठी भरती

UPSC Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2021 ही 712 जागा भरण्यासाठी घेण्यात येत असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in/   UPSC Civil Services Recruitment 2021

एकूण जागा – 712

परीक्षेचे नाव – नागरी सेवा परीक्षा 2021
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट – 01 ऑगस्ट 2021 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत. UPSC Civil Services Recruitment 2021

परीक्षा शुल्क – General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

परीक्षा-
पूर्व परीक्षा – 27 जून 2021

मुख्य परीक्षा – 17-22 सप्टेंबर 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2020 (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था अंतर्गत संगमनेर मर्चंट्स कोऑपरेटिव बँक लि.मध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था पुणे अंतर्गत संगमनेर मर्चंट्स कोऑपरेटिव बँक लि. मध्ये विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – vamnicom.gov.in

एकूण जागा – 13

शैक्षणिक पात्रता- पदवी, पदव्युत्तर पदवी, एमबीए

शुल्क – 1092

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – vamnicom.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

(NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 256 जागांसाठी भरती

NHM Nashik Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – (NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 256 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे असून,अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/   NHM Nashik Recruitment 2021

एकूण जागा – 256

पदाचे नाव – स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, प्रोग्राम को-ऑर्डिनेटर & इतर पदे.

शैक्षणिक पात्रता – GNM/B.Sc (नर्सिंग), 10वी/12वी उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/MSW/BAMS/B.Pharm./ D.Pharm

वयाची अट – 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – नाशिक.  NHM Nashik Recruitment 2021

परीक्षा शुल्क – फी नाही.

अर्ज करण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2021 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

रोगी कल्याण समिती अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – रोगी कल्याण समिती येथे “मॅनेजर, स्टाफ नर्स, आय बँक टेक्निशियन, फार्मासिस्ट, एलडीसी, नर्सिंग ऑर्डली, मल्टीटास्किंग स्टाफ, डायलिसिस टेक्निशियन” इत्यादी पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dnh.gov.in/ Rogi Kalyan Samiti Daman Recruitment 2021

एकूण जागा – 11

पदाचे नाव आणि एकूण जागा –
1.मॅनेजर – 03
2.स्टाफ नर्स – 01
3.आय बँक टेक्निशियन -01
4.फार्मासिस्ट – 01
5.एलडीसी – 01
6. नर्सिंग ऑर्डली – 02
7. मल्टीटास्किंग स्टाफ – 01
8. डायलिसिस टेक्निशियन – 01

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.  Rogi Kalyan Samiti Daman Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव (आरकेएस), श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल, सिल्वासा-396230

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मार्च 2021 आहे.

मूळ जाहीरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://dnh.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

West Central Railway Recruitment 2021 | 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; 165 जागांसाठी भरती

Konkan Railway Recruitment 2020

करिअरनामा ऑनलाईन – (WCR) पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 165 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. West Central Railway Recruitment 2021 पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://wcr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 165

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण,  संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट – 15 to 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – भोपाळ West Central Railway Recruitment 2021

परीक्षा शुल्क – General/OBc-₹100+₹70+18% GST [SC/ST/PWD/महिला- ₹70+18% GST]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – https://wcr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा- Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लि.अंतर्गत विविध पदांच्या 329 जागांसाठी भरती; ३० ते ५० हजार पगार

SECL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 329 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट- www.secl-cil.in SECL Recruitment 2021

एकूण जागा – 329

पदाचे नाव – सहाय्यक फोरमॅन (प्रशिक्षणार्थी) (मेच) ग्रेड सी, स्टोअर इश्यू लिपिक, सहाय्यक लोडिंग लिपिक श्रेणी – III

शैक्षणिक पात्रता –
1.सहाय्यक फोरमॅन (प्रशिक्षणार्थी) (मेच) ग्रेड सी – diploma in mechanical engineering
2.स्टोअर इश्यू लिपिक -10 वी
3.सहाय्यक लोडिंग लिपिक श्रेणी – 10 वी पास

वयाची अट –18 to 30 वर्ष

पगार – 30000-/ to 50000

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)  SECL Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.secl-cil.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

10 वी, 12 वी परीक्षा Offline होणार ! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची विधानसभेत माहिती

मुंबई | दहावी व बारावीच्या परीक्षा आँनलाईन होणार की आँफलाईन? या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. विधानसभा सदस्यांनी या संदर्भात आज सभागृहात प्रश्न उपस्थीत केला होता. यावेळी विधानसभेत सभागृहात शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या परीक्षा आँफलाईन होणार आहेत असे जाहीर केले.

Covid-19 च्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होतील की ऑफलाईन यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. दरम्यान राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा देखील जाहीर केल्या आहेत. दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे या कालावधीत. तर, बारावीची परीक्षा 23 एप्रिल 29 मे या कालावधीत होणार आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही ऑफलाईन पद्धतीनेच ही परीक्षा होईल असे शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले. करोणाच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती काळजी घेऊन परीक्षा घेण्यात येतील असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होतील हे जवळपास निश्चित झालेले असताना, दुसरीकडे विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्यातील विद्यापीठांच्या प्रथम सत्रातील परीक्षा 15 मार्च पासून घेण्याच्या सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. मात्र निविदा प्रक्रिया रखडल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा सुरू व्हायला एप्रिल उजाडतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या सत्रातील परीक्षा कधी होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी पदांसाठी भरती

National Institute for Research in Reproductive Health

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या 3 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 आणि 7 मार्च 2021 आहे. अधिकृत संकेतस्थळ – www.nirrh.res.in      NIRRH Recruitment 2021

एकूण जागा – 03

पदांचे नाव –
1.कनिष्ठ संशोधन सहकारी
शैक्षणिक पात्रता – 1. लाइफ सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, प्राणीशास्त्र, मायक्रोबायोलॉजी, ऍनिमल सायन्स मध्ये पीजी, बेसिक सायन्स मध्ये पीजी 2.अनुभव

वयाची अट – 28 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03वर्षे सूट, PWD – 10वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही
वेतन – 31000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.  NIRRH Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 आणि 7 मार्च 2021

अधिकृत संकेतस्थळ – www.nirrh.res.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाइन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com