10 वी, 12 वी परीक्षा Offline होणार ! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची विधानसभेत माहिती

मुंबई | दहावी व बारावीच्या परीक्षा आँनलाईन होणार की आँफलाईन? या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. विधानसभा सदस्यांनी या संदर्भात आज सभागृहात प्रश्न उपस्थीत केला होता. यावेळी विधानसभेत सभागृहात शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या परीक्षा आँफलाईन होणार आहेत असे जाहीर केले.

Covid-19 च्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होतील की ऑफलाईन यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. दरम्यान राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा देखील जाहीर केल्या आहेत. दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे या कालावधीत. तर, बारावीची परीक्षा 23 एप्रिल 29 मे या कालावधीत होणार आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही ऑफलाईन पद्धतीनेच ही परीक्षा होईल असे शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले. करोणाच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती काळजी घेऊन परीक्षा घेण्यात येतील असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होतील हे जवळपास निश्चित झालेले असताना, दुसरीकडे विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्यातील विद्यापीठांच्या प्रथम सत्रातील परीक्षा 15 मार्च पासून घेण्याच्या सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. मात्र निविदा प्रक्रिया रखडल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा सुरू व्हायला एप्रिल उजाडतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या सत्रातील परीक्षा कधी होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.