Home Blog Page 5

Central Bank Of India Recruitment 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज

Central Bank Of India Recruitment 2025
Central Bank Of India Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। (Central Bank Of India Recruitment 2025) सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारा नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत झोन-आधारित अधिकारी (ZBO – Zonal Based Officer) या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. तसेच या भरती अंतर्गत एकूण 266 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे. या पदासाठी ऑनलाइन परीक्षा मार्च 2025 मध्ये होणे अपेक्षित आहे. तर, मुलाखतीची तारीख नंतर जाहीर केली जाईल. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार झोन-आधारित अधिकारी (ZBO – Zonal Based Officer) या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (Central Bank Of India Recruitment 2025)

या पदासाठी एकूण 266 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमार्यादा –

उमेदवारांसाठी 21 ते 32 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतन –

या पदासाठी रु. 48,480/- ते रु. 85,920/- दरमहिना वेतन असणार आहे.

अर्ज शुल्क –

  • सर्वसाधारण उमेदवार – रु 850 + GST
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/PWBD/महिला उमेदवार: रु 175 + GST

निवड प्रक्रिया –

निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखत असते. लेखी परीक्षेत 120 प्रश्न असतील, प्रत्येकाला 1 गुण असेल. परीक्षेचा कालावधी 80 मिनिटांचा असेल.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Central Bank Of India Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 फेब्रुवारी 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण पहा – Pavitra Portal Registration 2025: शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरु

Artificial Intelligence Course : बँकिंग ते आरोग्य; AI चे हे कोर्सेस करून कमवा लाखात पगार

करियरनामा ऑनलाईन। आपण आता डिजिटल युगात वावरत आहोत, या डिजिटल युगात प्रत्येकाला सामील होण्यासाठी आधी स्वतः डिजिटल युगाशी एकसंघ होण जास्त गरजेच आहे. (Artificial Intelligence Course) रोजच्या जीवनात अनेक नवे डिजिटल बदल पाहायला मिळत आहेत. सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजेच कुत्रीम बुद्धिमत्ता. जेव्हा एखादे यंत्र मनुष्यासारखा विचार करुन कोणतेही काम करू लागते, तेव्हा त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात.

AI हे आता सर्वच क्षेत्रात पदार्पण करत आहे. यामध्ये व्यवसाय, नोकरी, शाळा, टेक्नॉलॉजी, विज्ञान, आरोग्य, बँकिंग, ऑटोमेशन, इत्यादी विविध क्षेत्रात AI चा वापर वाढला आहे. AI चा वापर समस्यांचे निराकरण, नवीन योजना, नवीन कल्पना शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे मनुष्यबळ कमी करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग केला जात आहे. मग या सागळ्यांमध्ये आपण आपला उदरनिर्वाह कसा करू शकतो? (Artificial Intelligence Course)

करियर च्या दृष्टिकोनातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ही एक उत्तम संधी आहे. यामुळे अनेक मोठ्या कंपन्या देखील AI ची समज आणि तंत्रज्ञान असलेल्या लोकांच्या शोधात आहेत.

AI च्या क्षेत्रातील करिअर संधी

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे क्षेत्र नवनवीन संधी आणि प्रगतीच्या दृष्टीने एक मोठी दिशा आपल्याला दाखवत आहे. AI इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, मशीन लर्निंग इंजिनियर, आर्टिफिशियल इंटेलिजेंस रिसर्चर, रोबोटिक्स इंजिनियर यांसारख्या विविध उच्च पगाराच्या पदांवर नोकऱ्या उपलब्ध होतात. AI च्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञ व्यक्तींना लाखो रुपयांचा पगार देखील मिळत आहे. (Artificial Intelligence Course)

AI क्षेत्रात तंत्रज्ञानाची गती खूप वेगाने वाढत आहे, त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाशी निगडीत ज्ञान मिळवणाऱ्यांसाठी जास्त मानधनाची नोकरी आणि करिअर घडवण्याची संधी आहे. ज्या विद्यार्थ्यांना गणित, सांख्यिकी, संगणक विज्ञान आणि डेटा विश्लेषणाची आवड व माहिती आहे, त्यांना AI क्षेत्रात उत्तम संधी मिळू शकते.

AI कोर्सेस आणि त्याचे फायदे (Artificial Intelligence Course)

AI क्षेत्रात करिअर करण्यासाठी कौशल्यांची आणि सर्टिफिकेटची आवश्यकता असते. अनेक मोठ्या संस्था आणि ऑनलाइन शिक्षण प्लॅटफॉर्म देखील AI कोर्सेस ऑफर करतात. यामध्ये प्रमुख विषयांचा समावेश असतो. (AI Courses)

  • मशीन लर्निंग
  • डीप लर्निंग
  • नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP)
  • डेटा सायन्स
  • आर्टिफिशियल इंटेलिजेंस अँड रोबोटिक्स
  • ऑटोमेशन टेक्नॉलॉजी

तुम्ही एक AI कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला प्रमुख कंपन्यांमध्ये जॉब ऑफर मिळू शकतात. या कोर्सेसमध्ये तुमच्या तांत्रिक कौशल्यांचा विकास होईल, ज्यामुळे तुम्हाला AI क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळवणे सोपे होईल.

AI कोर्स करणाऱ्यांना उच्च पगार

AI मध्ये शिक्षण घेतल्यानंतर, सुरुवातीचे पॅकेज 70 हजार ते 1 लाख रुपये प्रति महिना असू शकते. वरिष्ठ AI व्यावसायिक, विशेषत: ज्यांना पाच वर्षांपेक्षा जास्त अनुभव किंवा नेतृत्व आहे, त्यांना वार्षिक INR 20 लाख ते INR 30 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो. त्याचप्रमाणे, (Artificial Intelligence) AI च्या तज्ज्ञांना विदेशातही जास्त पगार मिळू शकतो. अमेरिकेसारख्या देशांमध्ये AI संबंधित तज्ज्ञांना $100,000 पेक्षा जास्त वार्षिक पगार मिळू शकतो. (AI Specialist Salary)

AI च्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी आजच्या युवांसाठी एक सुवर्णसंधी आहे. योग्य प्रशिक्षण, कौशल्य आणि प्रमाणपत्रांसह, तुम्ही या क्षेत्रात उच्च पगाराच्या नोकऱ्या मिळवू शकता. कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील तंत्रज्ञानाचे एक महत्त्वाचे अंग आहे, ज्यामुळे त्यात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी अपार संधी उपलब्ध आहेत. AI क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्राचे महत्व ओळखून, योग्य मार्गदर्शन घेऊन त्याचा लाभ घ्यावा.

हे पण पहा – Pavitra Portal Registration 2025: शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरु

Pavitra Portal Registration 2025: शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरु

Pavitra Portal Registration 2025
Pavitra Portal Registration 2025

करियरनामा ऑनलाईन। (Pavitra Portal Registration 2025) राज्यातील बीएड धारक आणि शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला २० जानेवारीपासून अधिकृतपणे सुरुवात केली आहे. यासाठी पवित्र पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे, शिक्षक पदांसाठी लांबणीवर पडलेल्या उमेदवारांना एक सुवर्णसंधी मिळाली आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठी भरती

जिल्हा परिषदांच्या शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून येणाऱ्या काळात सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची संख्या आवश्यक आहे. (Pavitra Portal Registration 2025) यासाठी शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दल अनेक तक्रारी होत्या, त्या अडचणी दूर केल्यानंतर आता राज्यात शिक्षकांची भरती लवकरच होईल.

“शालेय शिक्षण हे आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण मिळावे, यासाठी आमचा कायम आग्रह आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी राज्यातील शाळांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल”, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुंबईत दिली.

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सक्रिय

शिक्षण विभागाने शासनाकडे 14 ते 15 हजार शिक्षकांची भरती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, शासनाने संबंधित संस्थांकडून जाहिरात मागवली असून, शिक्षक पदांवर अर्ज सादर करण्यासाठी पवित्र पोर्टलवर 20 जानेवारीपासून जाहिराती सुरू होणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना शिक्षक पदांसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती.पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 21 हजार 678 जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. (Pavitra Portal Registration 2025) आता दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही सुरू होणार आहे. या पदभरती करीता शासन निर्णय दि. 10 नोव्हेंबर 2022 नुसार कार्यवाही करावयाचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी 14 जानेवारी 2025 पासून पवित्र पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया चालवण्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. यामुळे शिक्षण संस्थांना त्यांच्या रिक्त शिक्षक पदांसाठी जाहिरात नोंदवण्यासाठी पोर्टलची सुविधा 20 जानेवारीपासून उपलब्ध झाली आहे.

अपात्र, गैरहजर आणि रुजू न झालेल्या उमेदवारांच्या जागा भरल्या जातील. (Pavitra Portal Registration 2025)

दुसऱ्या टप्प्यात, जिल्हा परिषदेकडे उर्वरित 10 टक्के रिक्त पदे, पहिल्या टप्यातील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्या उमेदवारांची जागा आणि इतर रिक्त जागा भरण्यासाठी देखील जाहिराती दिल्या जातील. यासंबंधी सर्व जिल्हा परिषदांना 13 सप्टेंबर 2024 रोजी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, जिल्हा परिषदांकडील बिंदुनामावली विषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करुन देण्याचेही कळविण्यात आले आहे. सदर माहिती तात्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र राज्य शिक्षण आयुक्तालयाकडून विभागीय शिक्षणाधिकारी, जिल्हा व तालुकास्तरावरील शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे.

शिक्षक पदभरतीच्या या दुसऱ्या टप्प्यामुळे राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर भरती होईल, अशी अपेक्षा आहे. उमेदवारांनी वेळेवर आणि योग्य प्रकारे अर्ज भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हे पण वाचा NHM Pune Recruitment 2025: NHM पुणे अंतर्गत 68 पदांची भरती; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Success story of IAS Nagarjun Gowda : डॉक्टर असतानाच केली UPSC ची तयारी, आता झाला IAS अधिकारी

Success Story Of IAS Nagarjun Gowda
Success Story Of IAS Nagarjun Gowda

करियरनामा ऑनलाईन। आजकालचे अनेक तरुण/तरुणी आपले वैयक्तिक शिक्षण घेत असताना UPSC, MPSC सारख्या अवघड परीक्षांचा अभ्यास करत असतात. (Success story of IAS Nagarjun Gowda) प्रत्येकालाच यश मिळेलच असं नाही. बोटावर मोजता येतील एवढेच तरुण हे शक्य करू शकले आहेत. परंतु ध्येय स्पष्ट असेल तर आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी ध्येय मागे राहत नाही. आज आपण अशाच एका ध्येयवेड्या तरुणाची कहाणी पाहणार आहोत. सगळ्यांना माहीत असलेल नाव म्हणजे आयएएस नागार्जून गौडा (IAS Nagarjun Gowda).

हॉस्पिटलमध्ये रेजिडंट पदावर नोकरी करत दिली यूपीएससी (Success story of IAS Nagarjun Gowda)

आयएएस डॉक्टर नागार्जून गौडा (IAS Nagarjun Gowda) कर्नाटकातील एका छोट्या गावात जन्म झाला. गावातील कमुनिस्ट शाळेतून शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी कर्नाटकात मंड्या मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची पदवी पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळवली. घरात वडिलांचे निधन झाले असल्यामुळे घरातील जबाबदारी त्यांना घेण गरजेच होत. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाले आणि त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये रेजिडंट पदावर नोकरी करण्यास सुरुवात केली.

नोकरी करत असतांना त्यांनी यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. घरातील आर्थिक परिस्थिति सांभाळत त्यांनी कोणतीही कोचिंग न लावता परीक्षेचा अभ्यास केला. आणि 2018 मध्ये 418 रॅंक मिळवत आयएएस ऑफिसर झाले. यूपीएससी सारख्या परीक्षेचा अभ्यास नोकरी करत करणं खूप अवघड असत पण नागार्जून गौडा यांनी अतिशय स्मार्ट पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण केला आणि परीक्षा उत्तीर्ण होवून दाखवली. मणिपूर केडरच्या 2019 च्या बॅचमध्ये ते आयएएस अधिकारी झाले. पुढे ते मध्य प्रदेश केडरमध्ये रुजू झाले. सध्या ते मध्य प्रदेश कॅडरमध्ये वचनबद्ध IAS म्हणून कार्यरत आहेत. (Success story of IAS Nagarjun Gowda)

आयएएस नागार्जून गौडा यांनी आयएएस सृष्टी देशमुख (IAS Srushti Deshmukh) यांच्याशी लग्न केले आहे. दोघांचाही आयएएस होण्याचा प्रवास अनेक तरुणांना प्रभावित करतो. तसेच आयएएस झाल्यानंतरही दोघांचेही नाव त्यांच्या कामांमुळे नेहमीच चर्चेत असते.

तुम्ही देखील तुमचे ध्येय नक्की पूर्ण करू शकता फक्त ध्येय स्पष्ट असायला हव आणि ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी जिद्दीने पर्यटन करत राहावे.

अशाच करियर क्षेत्रातील विविध संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.

हे पण पहा – Top 3 MBA Colleges: भारतातील 3 सर्वोत्तम MBA कॉलेज; अर्जप्रक्रियासह संपूर्ण माहिती

Top 3 MBA Colleges: भारतातील 3 सर्वोत्तम MBA कॉलेज; अर्जप्रक्रियासह संपूर्ण माहिती

Top 3 MBA Colleges

करियरनामा ऑनलाईन। सध्याच्या काळात तरूणांपूढे करियरच्या अनेक वाटा मोकळ्या झाल्या आहेत. स्वतःची आवड, स्वतःचे कौशल्य यांसारख्या अनेक गोष्टी मनात असतात त्याचबरोबर एक्सपोसर मिळायला हव. चांगल्या पगाराची नोकरी मिळायला हवी अशा अनेक इच्छा असतात. यासाठी तुमच्यासाठी MBA (Master in Bussiness Administration) हा देखील एक उत्तम पर्याय असू शकतो. (Top 3 MBA Colleges) त्याचबरोबर MBA मधून तुम्हाला व्यवसायाचे सखोल ज्ञान मिळतं, वेगवेगळे कौशल्य अवगत होतात, आणि तुम्हाला चांगल्या करिअर च्या संधी देखील उपलब्ध होतात. जर तुम्हांला कंपनीत उच्च पदावर पोहोचायचे आहे, तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा उच्च पगार मिळवायचा असेल, तर MBA हा एक प्रभावी मार्ग आहे. यासाठी तुम्हांला चांगल्या विद्यापीठातून पदवी घेण गरजेच आहे. MBA साठी टॉप 5 विद्यापीठ कोणते? तिथे प्रवेश कसा मिळवायचा याची माहिती आपण जाणून घेवूयात.

भारतातील टॉप 3 MBA कॉलेज (Top 3 MBA Colleges)

1) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबाद

प्रवेश प्रक्रिया:

1) पात्रता:

  • किमान 50% गुणांसह बॅचलर डिग्री (SC/ST/PWD श्रेणीसाठी 45%).
  • वैध CAT (कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट) स्कोअर.
  • अंतिम वर्षातील विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.

2) CAT परीक्षा:

  • CAT ही भारतभर घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा आहे.
  • या परीक्षेत गणित (QA), वर्बल क्षमता (VARC), आणि डेटा विश्लेषण व तार्किक विचार (DILR) अशा विषयांचे मूल्यांकन केले जाते.

2) WAT आणि PI साठी शॉर्टलिस्टिंग:

  • CAT स्कोअर आणि इतर निकषांवर आधारित विद्यार्थ्यांना लिखित क्षमता चाचणी (WAT) आणि वैयक्तिक मुलाखत (PI) साठी शॉर्टलिस्ट केले जाते. (Top 3 MBA Colleges)

3) अंतिम निवड:

  • CAT स्कोअर
  • WAT आणि PI चा परफॉर्मन्स
  • शैक्षणिक पार्श्वभूमी
  • कार्यानुभव
  • विविधता घटक (लिंग, शैक्षणिक विषय, इत्यादी)

4) अर्ज प्रक्रिया:

  • विद्यार्थ्यांनी IIM अहमदाबादच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा आणि शैक्षणिक माहिती, कार्यानुभव, इत्यादी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

2) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) बंगलोर

प्रवेश प्रक्रिया:

1) पात्रता:

  • किमान 50% गुणांसह बॅचलर डिग्री (SC/ST/PWD श्रेणीसाठी 45%).
  • वैध CAT स्कोअर.
  • अंतिम वर्षातील विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.

2) CAT परीक्षा:

  • विद्यार्थ्यांनी CAT परीक्षा द्यावी, ज्यामध्ये QA, VARC आणि DILR विषयांचा समावेश असतो.

3) WAT आणि PI साठी शॉर्टलिस्टिंग:

  • CAT स्कोअर आणि इतर निकषांवर आधारित विद्यार्थ्यांना WAT आणि PI साठी शॉर्टलिस्ट केले जाते.

4) अंतिम निवड:

  • CAT स्कोअर
  • WAT आणि PI चा परफॉर्मन्स
  • शैक्षणिक पार्श्वभूमी
  • कार्यानुभव
  • विविधता घटक

5) अर्ज प्रक्रिया:

  • विद्यार्थ्यांनी IIM बंगलोरच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा आणि शैक्षणिक माहिती, CAT स्कोअर, कार्यानुभव इत्यादी सादर करावीत.

3) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) कोलकत्ता

प्रवेश प्रक्रिया:

1) पात्रता:

  • किमान 50% गुणांसह बॅचलर डिग्री (SC/ST/PWD श्रेणीसाठी 45%).
  • वैध CAT स्कोअर.
  • अंतिम वर्षातील विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.

2) CAT परीक्षा:

  • विद्यार्थ्यांनी CAT परीक्षा द्यावी, ज्यामध्ये QA, VARC आणि DILR विषयांचा समावेश असतो. (CAT 2025)

3) WAT आणि PI साठी शॉर्टलिस्टिंग:

  • CAT स्कोअर आणि इतर निकषांवर आधारित विद्यार्थ्यांना WAT आणि PI साठी शॉर्टलिस्ट केले जाते.

4) अंतिम निवड:

  • CAT स्कोअर
  • WAT आणि PI चा परफॉर्मन्स
  • शैक्षणिक पार्श्वभूमी
  • कार्यानुभव
  • विविधता घटक

5) अर्ज प्रक्रिया:

  • विद्यार्थ्यांनी IIM कोलकत्ताच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा आणि शैक्षणिक माहिती, कार्यानुभव इत्यादी सादर करावीत. (Top 3 MBA Colleges)

MBA ची पदवी तुम्हांला इतर अनेक करियरच्या संधीबरोबर व्यक्तिगत विकास आणि आत्मविश्वास हा सर्वात महत्वाचा बदल घडवण्यासाठी उपयोगी ठरते.

अशाच करियरविषयक वेगवेगळ्या संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण पहा – NHM Pune Recruitment 2025: NHM पुणे अंतर्गत 68 पदांची भरती; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

NHM Pune Recruitment 2025: NHM पुणे अंतर्गत 68 पदांची भरती; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

करियरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे (National Health Mission, Pune) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (NHM Pune Recruitment 2025) या जाहिराती अंतर्गत बालरोगतज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, चिकित्सक, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ईएनटी तज्ञ इत्यादी पदांसाठी एकूण 68 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार बालरोगतज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, चिकित्सक, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ईएनटी तज्ञ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (NHM Pune Recruitment 2025) –

या पदांसाठी एकूण 68 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन (NHM Pune Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2025

आवश्यक कागदपत्रे –

• फोटो आयडी

• जन्म दाखला

• रहिवासी दाखला

• शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र

• जातीचे प्रमाणपत्र

• अतिरिक्त शैक्षणिक अहर्तेची MMC नोंदणी प्रमाणपत्र

• नोंदणी नुतनीकरण प्रमाणपत्र

• अनुभव प्रमाणपत्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नविन इमारत (कोव्हीड वॉर रूम), ४ था मजला, पुणे महानगरपालिका, पुणे 411005

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण पहा – IOCL Apprentice Recruitment 2025: IOCL अंतर्गत मोठी भरती जाहीर; जाणून घ्या अर्जप्रक्रियासह संपूर्ण माहिती

Competitive Exams: UPSC देत आहात ? मग या 5 परीक्षांची ही तयारी करू शकता!

करियरनामा ऑनलाईन। आपल्या भारतात तरुणांना सगळ्यात जास्त आकर्षित करणारी परीक्षा म्हणजे यूपीएससी. यूपीएससी ही परीक्षा सगळ्यात जास्त कठीण पण आयुष्य बदलून टाकणारी आहे. (Competitive Exams) त्यामुळेच लाखोंच्या संख्येत तरुण यूपीएससी परीक्षेसाठी दिवस रात्र मेहनत घेतात. काहीवेळेस अगदी कमी फरकाने परीक्षा हातातून निसटते आणि मग पुनः नवीन सुरुवात करावी लागते. पण कधी तुम्ही त्या परीक्षेसोबत PCS, CDS, SSC-CGL यांसारख्या परीक्षांचा विचार केला आहे? या परीक्षा देखील तुम्हांला एका महत्वाच्या प्रशासकीय पोस्ट वर काम करण्याची संधी देतात. या परीक्षा तुम्ही यूपीएससी सोबत दिल्या तर तुमच्या हातात एक चांगला पर्याय राहतो. ज्यामुळे तुमची मेहनत फक्त एका गुणांमुळे वाया जाण्यापासून वाचू शकते. चला तर मग त्या 5 परीक्षा कोणत्या आहेत ज्या तुम्हांला यूपीएससी सोबत देता येतील याची सविस्तर माहिती जाणून घेवूयात. (Competitive Exams)

UPSC सोबत या टॉप 5 परीक्षा देता येतात –

1) राज्य सार्वजनिक सेवा आयोग परीक्षा (Provincial Civil Service)

भारतातील प्रत्येक राज्य आपापल्या राज्य सेवा आयोगामार्फत सरकारी अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी परीक्षा घेत असते.
(उदा. महाराष्ट्रात एमपीएससी तर बिहारमध्ये बीपीएससी) या परीक्षांतूनही राजपत्रित अधिकारी बनण्याची संधी उमेदवारांना असते. अगदी यूपीएससी प्रमाणेच या परीक्षेचाही अभ्यासक्रम असल्यामुळे बहुतांश जण यूपीएससी सोबतच राज्यसेवा आयोगाची परीक्षा देखील देत असतात. राज्यसेवेतून उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, गटशिक्षणाधिकारी अशी महत्त्वाची पदे भरली जातात.

पात्रता: UPSC प्रमाणेच, उमेदवारांना एक मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे.

परीक्षा प्रारूप:

  • प्रिलिम्स: वस्तुनिष्ठ प्रकाराचे प्रश्न.
  • मेन्स: वर्णनात्मक पेपर, जे सामान्यत: UPSC च्या प्रारूपाशी जुळतात.
  • इंटरव्ह्यू: व्यक्तिमत्व चाचणी.
  • महत्वाचे: राज्य सेवा परीक्षा आणि UPSC चा अभ्यासक्रम विशेषतः सामान्य अध्ययन आणि निबंध लेखनाच्या बाबतीत खूप जास्त जुळतो, ज्यामुळे तयारी सोबतच करावी.

2) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS) (Competitive Exams)

भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याचे अनेकांचा स्वप्न असतं. त्यांच्यासाठी संघ लोकसेवा आयोगाच्या माध्यमातूनच CDS ची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून सैन्य, नौदल, वायुसेना मध्ये अधिकारी पदांसाठी असते.

पात्रता:

  • पदवीधर डिग्री (विशिष्ट क्षेत्रांसाठी नौदल/वायुसेनेसाठी).
  • वय मर्यादा: 19 ते 24 वर्ष.

परीक्षा प्रारूप:

  • वस्तुनिष्ठ पेपर ज्यामध्ये इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित हे विषय असतात.
  • SSB मुलाखत,जी व्यक्तिमत्व आणि नेतृत्व क्षमता चाचणी घेत असते.
  • महत्वाचे: CDS परीक्षा सामान्य ज्ञान आणि अ‍ॅप्टिट्यूडवर केंद्रित असते, जे UPSC च्या अभ्यासक्रमाशी जुळेलेली पाहायला मिळते.

3) कर्मचारी निवड आयोग (SSC-CGL)

SSC CGL परीक्षा केंद्रीय सरकारी विभागांमध्ये गट B आणि गट C पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी घेतली जाते.

पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर.

परीक्षा प्रारूप:

  • टियर I: सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य जागरूकता, गणितीय क्षमता आणि इंग्रजी.
  • टियर II: विषय-विशिष्ट चाचण्या आणि कौशल्य आधारित परीक्षा जसे की डेटा एंट्री.
  • महत्वाचे: SSC CGL मध्ये सामान्य जागरूकता विभाग UPSC च्या तयारीशी जुळतो, आणि SSC-CGL च्या माध्यमातून तुम्हाला स्थिर केंद्रीय सरकारी पदे मिळू शकतात.

4) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ग्रेड B अधिकारी परीक्षा

ही एक प्रतिष्ठित परीक्षा आहे जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये ग्रेड B अधिकारी या पदाच्या भरतीसाठी घेतली जाते. अर्थशास्त्र, बँकिंग आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्या अभ्यासाच्या जोरावर तुम्ही परीक्षा पास होऊ शकता.

पात्रता:
किमान 60% गुणांसह पदवी (आरक्षित श्रेणीसाठी 50%).

परीक्षा प्रारूप:

  • फेज I: सामान्य जागरूकता, बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि गणितीय क्षमता.
  • फेज II: आर्थिक आणि सामाजिक मुद्दे, इंग्रजी आणि वित्त/व्यवस्थापन विषयावर विषय आधारित पेपर.
  • मुलाखत: वैयक्तिक मुलाखत.
  • महत्वाचे: UPSC परीक्षेसाठी अर्थशास्त्र हा एक वैकल्पिक विषय असलेल्यांसाठी किंवा वित्त क्षेत्रातील रुचि असलेल्या उमेदवारांसाठी ही परीक्षा उपयुक्त ठरते.

5) भारतीय वन सेवा परीक्षा (IFS)

UPSC द्वारे घेतली जाणारी ही परीक्षा भारताच्या वन संसाधनांची आणि वन्यजीवांची देखरेख करणाऱ्या अधिकारी पदांसाठी असते.

पात्रता:
विज्ञान, कृषी, वनस्पतीशास्त्र किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी.

परीक्षा प्रारूप:

  • प्रिलिम्स: UPSC सिव्हिल सर्विसेस परीक्षेशी समान.
  • मेन्स: दोन वैकल्पिक विज्ञान आधारित पेपर.
  • इंटरव्ह्यू: व्यक्तिमत्व चाचणी.
  • महत्वाचे: UPSC च्या प्रिलिम्सचे प्रारूप समान असल्यामुळे, UPSC सिव्हिल सर्विसेस आणि IFS दोन्ही परीक्षांसाठी एकाच वेळी तयारी केली जाऊ शकते.

UPSC च्या तयारीसोबत या परीक्षा देणे, आपल्याला प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळवण्याची संधी वाढवते आणि आपली तयारी अधिक प्रभावी बनवते. अभ्यासक्रमातील समानता आणि विविध कौशल्यांची आवश्यकता यामुळे या परीक्षांचा अभ्यास एकसाथ केला जाऊ शकतो. जर तुमच्या इंट्रेस्टनुसार या परीक्षांचा निवड केली, तर तुम्ही आपली तयारी अधिक योजनाबद्ध आणि फायदेशीर बनवू शकता.

अशाच करिअर विषयक महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण पहा – Staff Selection Commission: सरकारी नोकरीच्या शोधात आहात? जाणून घ्या SSC आयोगाबद्दल.

MAHAGENCO Recruitmnet 2025: MahaGenco अंतर्गत लवकरच 173 जागांसाठी भरती होणार; पात्रता काय पहा

करियरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात येणार आहे. (MAHAGENCO Recruitmnet 2025) या जाहिरात अंतर्गत कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ, उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ व कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदांसाठी एकूण 173 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तरी उमेदवारांनी वेळोवेळी MAGENCO च्या ऑफिशियल वेबसाइटला भेट द्यावी. (https://mahagenco.in/) भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ, उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ व कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (MAHAGENCO Recruitmnet 2025) –

या पदांसाठी एकूण 173 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
• कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ – 49

• सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ – 75

• उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 27

• अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 19

• कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 03

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (MAHAGENCO Recruitmnet 2025)

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण पहा – MPSC Group A Notification 2025: MPSC अंतर्गत 320 पदांची नवीन जाहिरात प्रकाशित; पात्रता काय? अर्ज कसा कराल ?

MPSC Group A Notification 2025: MPSC अंतर्गत 320 पदांची नवीन जाहिरात प्रकाशित; पात्रता काय? अर्ज कसा कराल ?

करियरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोक सेवा आयोग (Maharashtra Public Service Commission- MPSC)
महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या (MPSC Group A Notification 2025) प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. त्याच बरोबर शासकीय विभागात काही महत्वाच्या पदांची भरती करण्याची जबाबदारी देखील या आयोगावरती असते. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध’ पदांची भरतीची जाहिरात देखील नुकतीच प्रकाशित केली आहे. या पदांसाठी एकूण 320 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्याचबरोबर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 ही दिलेली आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध गट अ पदे’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (MPSC Group A Notification 2025) –

या पदांसाठी एकूण 320 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

  • सिव्हिल सर्जन – 225
  • अन्य ग्रुप अ पदे – 95

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांना 19-38 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

  • खुला वर्ग – रु. 719/-
  • मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग/अनाथ/अपंग – रु. 449/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (MPSC Group A Notification 2025)

अर्ज सुरू होण्याची तारीख – 21 जानेवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2025

महत्वाच्या लिंक्स –

  • अधिक माहितीसाठी PDF पहा.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा.
  • अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Success Story: स्वप्नासाठी घर विकलं पण 23 व्या वर्षी IAS होऊन दाखवलंच

करियरनामा ऑनलाईन। स्पर्धा परीक्षातून उत्तीर्ण होणे वाटते तितकं सोपं काम नाही. अनेकांचे आयुष्य निघून जातात पण यश काही हाताला लागत नाही. पण अनेकजण आपल्या मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणतातच. (Success Story)बिहारचे 23 वर्षीय प्रदीप सिंह त्यापैकीच एक. चला तर मग आज प्रदीप सिंह यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेवूयात.

मुलाच्या स्वप्नासाठी घर विकलं! (Success Story)

बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील एक तरुण, वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून आयएएस अधिकारी बनतो. परंतु त्यांचा हा यशस्वी प्रवास अत्यंत खडतर होता. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. त्यांचे वडील, मनोज सिंह, पेट्रोल पंपावर काम करायचे. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी आपल्या आयुष्यभराची सगळी कमाई विकून टाकली.

प्रदीपचं शिक्षण सुरुवातीपासून इंदूरमध्ये झालं. लहानपणापासूनच हुशार असलेल्या प्रदीपने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर यूपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण होतं. त्यावेळी घरातील परिस्थितीमुळे दिल्लीतील कोचिंगसाठी लागणाऱ्या खर्चासाठी पैशाची जमवाजमव करणे सोपं नव्हतं. मात्र, मुलाच्या स्वप्नांसाठी वडिलांनी मोठं पाऊल उचललं आणि आपल्या मुलाच्या कलेक्टर बनण्याच्या स्वप्नासाठी स्वतःच राहत घर देखील विकलं. (Success Story)

परिस्थिती हालाखीची होती. त्यामुळे जास्त वर्ष प्रयत्न करत राहणं परवडणारं नव्हते. म्हणून पहिल्याच प्रयत्नात पोस्ट काढण्यासाठी प्रदीप मेहनत घेऊ लागले. दिवसाचे 20 तास अभ्यासात गढून जाऊ लागले. प्रदीपने 2018 मध्ये यूपीएससीचा पहिला प्रयत्न केला. संपूर्ण भारतात 93 वा रँक घेऊन पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवलं, मात्र त्यांना आयएएसऐवजी भारतीय महसूल सेवेत (IRS) नियुक्ती मिळाली. हे यश असूनही प्रदीपच्या मनात आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं. (Success Story)

दुसऱ्या प्रयत्नात थेट कलेक्टर

आयएएस होण्याच्या इच्छेपोटी प्रदीप यांनी तयारीत कोणतीच कसर ठेवली नाही. त्यांनी पुन्हा मेहनत घेतली आणि 2019 च्या यूपीएससी परीक्षेत संपूर्ण भारतात 26 वा क्रमांक मिळवला. या कामगिरीने त्यांच्या आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण झालं.

प्रदीप सांगतात की, त्यांच्या वडिलांनी घर विकून केलेल्या त्यागामुळे त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. मात्र, त्यांनी मानसिक ताण न घेता अभ्यास करण्यावर भर दिला आणि कठोर मेहनत घेतली. त्याचेच फळ म्हणून वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी भारतातील सर्वात कठीण समवली जाणारी यूपीएससी परीक्षा (UPSC) ते उत्तीर्ण झाले.

प्रदीप यांच्या मते, यूपीएससीसाठी ठराविक रणनिती आखणं आणि त्यानुसार अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. सतत अभ्यास आणि अपयश पचवण्याची तयारी ठेवली पाहिजे. कठोर मेहनत घेतल्यावर कोणत्याही कठीण परीक्षेत यश मिळवता येतं. मात्र यासोबतच परीक्षेची काठिण्यपातळी लक्षात घेता आणि उत्तीर्ण होण्याची टक्केवारी पाहता प्लॅन बी सुद्धा तयार ठेवायला पाहिजे.

प्रदीप सिंह यांची ही कथा संघर्ष आणि जिद्दीची मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांचे कुटुंब, विशेषतः त्यांच्या वडिलांचा त्याग, आणि प्रदीपची चिकाटी यामुळे त्यांनी केवळ यश मिळवलं नाही, तर इतर अनेकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.

अशाच करिअर विषयक महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – IAF Agniveer Vayu Recruitment 2025: भारतीय हवाई दलात अग्निवीरवायू पदासाठी भरती जारी; 12वी पास उमेदवारांना मोठी संधी