Home Blog Page 6

Infosys Hiring 2025: आनदांची बातमी! इन्फोसिस द्वारे नवीन 20,000 कर्मचाऱ्यांची भरती होणार.

करियरनामा ऑनलाईन। मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिस कंपनीने यावर्षी एक मोठा निर्णय घेतला आहे. (Infosys Hiring 2025) IT मध्ये नोकरी करू पाहणाऱ्यांसाठी ही एक आनदांची बातमी ठरणार आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसनं यंदाच्या आर्थिक वर्षात मेगा फ्रेशर्सची भरती घोषणा केली आहे. त्यामुळं आगामी काळात ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ही मोठी संधी असणार आहे. त्याचबरोबर कंपनी यंदा काही महत्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते महत्वाचे निर्णय कुठले असणार आहेत ? या बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

नवीन कर्मचाऱ्यांची भरती (Infosys Hiring 2025) –

गेल्या अर्थिक वर्षात कंपनीनं 11,900 फ्रेशर्सना नोकरीच्या संधी दिल्या होत्या. पण त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत अर्थात 2023 च्या तुलनेत यात 76 टक्के घट झाली होती. कारण 2023-24 या अर्थिक वर्षात कंपनीनं तब्बल 50,000 फ्रेशर्सची भरती केली होती. पण यावर्षी कंपनीने तिसऱ्या तिमाहीत 5,591 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली आहे, ज्यामुळे एकूण कामकाजी संख्येची वाढ 3,23,379 झाली आहे.

(Infosys Hiring 2025) इन्फोसिसने घोषित केले आहे की चालू आर्थिक वर्षात आणखी 20,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण गेल्या काही वर्षात इन्फोसिसने फ्रेशर्सच्या जॉइनिंगच्या तारखांमध्ये विलंब केल्यामुळे कंपनीला टीकेला सामोरे जावे लागले आहे. 2022 मध्ये ज्या तरुण अभियंत्यांना सिस्टम इंजिनीअर म्हणून नियुक्तीची ऑफर देण्यात आली होती, त्यांना कामावर रुजू होण्यासाठी दोन वर्षांहून अधिक प्रतीक्षा करावी लागली. यामुळे आयटी कंपन्यांच्या फ्रेशर्सच्या जॉइनिंग संदर्भातील तक्रारी वाढल्या आहेत. काही संघटनांनी कंपनीला इशारा दिला होता की जॉइनिंगची तारीख पुन्हा ढकलल्यास निदर्शन केली जातील.

इन्फोसिसचे सीएफओ जयेश संघराजका (CFO jayesh sanghrajka) यांनी म्हटलं की आम्ही चालू आर्थिक वर्षात फ्रेशर्सच्या भरतीसाठी मनुष्यबळाचा आढावा घेत आहोत. या आर्थिक वर्षात 15 हजारांपेक्षा जास्त फ्रेशर्सना नोकरी दिली जाईल, असं ते म्हणाले. तर येत्या आर्थिक वर्षात ती संख्या 20 हजारांपर्यंत असेल असं ते म्हणाले. त्याचबरोबर इन्फोसिनं त्यांना अपेक्षित असलेल्या फायद्यापेक्षा अधिक फायदा तिसऱ्या तिमाहीत मिळवला आहे. कंपनीचा यूरोप आणि अमेरिकेतील व्यवसाय देखील चांगल्या प्रकारे नफा मिळवून देत आहे.

कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा –

इन्फोसिस या भारतातील प्रमुख सॉफ्टवेअर कंपनीने नव्या भरतीची घोषणा करून कर्मचाऱ्यांना (Infosys Hiring 2025) मोठा दिलासा दिला आहे. इन्फोसिसच्या या कामगिरीने कंपनीच्या नफ्यात वाढ दर्शवली आहे, कर्मचाऱ्यांची भरती योजना सॉफ्टवेअर क्षेत्रातील बदलत्या ट्रेंडसाठी उत्तम ठरणार आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना नोकऱ्या मिळणार आहेत.

नोकरीविषयक नवनवीन संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – IOCL Apprentice Recruitment 2025: IOCL अंतर्गत मोठी भरती जाहीर; जाणून घ्या अर्जप्रक्रियासह संपूर्ण माहिती

Staff Selection Commission: सरकारी नोकरीच्या शोधात आहात? जाणून घ्या SSC आयोगाबद्दल.

करियरनामा ऑनलाईन। भारतात सर्वात जास्त सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देणारा आयोग म्हणून एसएससी आयोग ओळखला जातो. (Staff Selection Commission) सरकारची विविध मंत्रालय असो, विभाग किंवा कार्यालय या सर्वांसाठी नोकर भरती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या आयोगाच्या खांद्यावर असते. मोठ्या संख्येने सरकारी नोकरी लागण्याची संधी असल्याने या परीक्षांचा अभ्यास अनेक विद्यार्थी करत असतात. मात्र आयोग अंतर्गत भरपूर परीक्षा होत असून यांची पदं सुद्धा निरनिराळी असतात. म्हणुनच या एसएससी कडून भरण्यात येणारी शासकीय पद कोणती असतात? त्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया कशी करायची असते? याच सगळ्या प्रश्नांची उत्तर खालील माहितीतून मिळणार आहे.

SSC कडून आयोजित केलेल्या प्रमुख परीक्षा –

1) संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा (CGL – Combined Graduate Level)

  • पदवीधर उमेदवारांसाठी आयोजित केली जाते.
  • यात असिस्टंट, इन्स्पेक्टर, ऑडिटर, कर सहाय्यक इत्यादी पदांची भरती केली जाते.

2) संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा (CHSL – Combined Higher Secondary Level)

  • 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी.
  • यात लिपिक, डाटा एंट्री ऑपरेटर, सहाय्यक, इत्यादी पदांची भरती केली जाते.

3) SSC MTS (Multi-Tasking Staff) (Staff Selection Commission)

  • यामध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध कार्यकारी पदांसाठी भरती केली जाते.

4) SSC JE (Junior Engineer)

  • इंजिनिअरिंग पदवी असलेल्या उमेदवारांसाठी.
  • या परीक्षेद्वारे अभियंता पदासाठी निवड केली जाते.

5) SSC Stenographer

  • शॉर्टहँड (स्टेनो) शिक्षण असलेल्या उमेदवारांसाठी.
  • सरकारी विभागांमध्ये स्टेनोग्राफर पदांसाठी भरती केली जाते.

SSC च्या प्रमुख परीक्षा (Staff Selection Commission)

1) Tier-I (Preliminary Exam)

  • कंप्युटर आधारित चाचणी.
  • सामान्य बुद्धिमत्ता, गणितीय क्षमता, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान.

2) Tier-II (Main Exam)

  • अधिक सखोल परीक्षा, जसे की गणित, इंग्रजी, स्टॅटिस्टिक्स (विशेष पदांसाठी).

3) Tier-III (Descriptive Paper)

  • इंग्रजी किंवा हिंदी मध्ये निबंध लेखन, पत्र लेखन.

4) Tier-IV (Skill Test)

  • काही पदांसाठी कौशल्य चाचणी, जसे डेटा एंट्री, कंप्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट.

SSC चे कार्यक्षेत्र –

SSC देशभरातील सर्व प्रमुख शहरांमध्ये परीक्षा घेतो. देशाच्या विविध मंत्रालयांमध्ये खालील पदांसाठी भरती केली जाते.

  • वित्त मंत्रालय
  • गृह मंत्रालय
  • विदेश मंत्रालय
  • आयकर विभाग
  • केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI)

पात्रता आणि निवड प्रक्रिया

  • SSC मध्ये सामील होण्यासाठी उमेदवारांना पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, आणि राष्ट्रीयता इत्यादी निकष पूर्ण करावे लागतात.
  • प्रत्येक परीक्षा प्रक्रियेमध्ये निवडीसाठी टियर-1, टियर-2, टियर-3 आणि टियर-4 चाचण्या घेतल्या जातात.

SSC साठी अर्ज प्रक्रिया –

1) ऑनलाइन नोंदणी –

  • SSC च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

2) अर्ज शुल्क –

  • अर्ज शुल्क सामान्य उमेदवारांसाठी 100 रुपये असून, महिलांना, SC/ST, PwD आणि माजी सैनिक उमेदवारांना फीमध्ये सूट आहे.

3) परीक्षेची तारीख –

  • SSC च्या वेबसाइटवर परीक्षेची तारीख आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख जाहीर केली जाते. उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाइट वेळोवेळी तपासात राहावी.

विविध सरकारी पदांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी SSC एक सुवर्ण संधी आहे. CGL, CHSL, MTS, आणि JE अशा विविध परीक्षांसाठी उमेदवारांना तयारी करून आणि योग्य मार्गदर्शन प्राप्त करून सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळवता येतो.

अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी SSC च्या ऑफिशियल वेबसाइटला भेट दया.

हे पण पहा – Top 3 MSW Colleges: सामाजिक कार्याचं शिक्षण घ्यायचंय? ही आहेत TOP 3 कॉलेजेस; प्रवेश प्रक्रियासह संपूर्ण माहिती पहा

IOCL Apprentice Recruitment 2025: IOCL अंतर्गत मोठी भरती जाहीर; जाणून घ्या अर्जप्रक्रियासह संपूर्ण माहिती

करियरनामा ऑनलाईन। इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) भारतातील सर्वात मोठ्या तेल आणि गॅस कंपन्यांपैकी एक आहे. भारतीय तेल क्षेत्रामध्ये तिचा महत्त्वपूर्ण रोल आहे. (IOCL Apprentice Recruitment 2025) याच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. तसेच या पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2025 ही दिलेली आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘ट्रेड अप्रेंटिस’, ‘टेक्निशियन अप्रेंटिस’, ‘ग्रॅज्युएट अप्रेंटिस’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (IOCL Apprentice Recruitment 2025)

या पदांसाठी एकूण 200 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

  • ट्रेड अप्रेंटिस – 55
  • टेक्निशियन अप्रेंटिस – 25
  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस – 120

    शैक्षणिक पात्रता –

    शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

    वयोमर्यादा –

    उमेदवारांना 18-24 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

    अर्ज पद्धती – ऑनलाईन (IOCL Apprentice Recruitment 2025)

    अर्ज कसा करावा?

    • जो उमेदवार दिलेले पात्रता निकष पूर्ण करत असेल आणि NATS/NAPS अप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणीकृत असतील, ते 17 जानेवारी 2025 (सकाळी 10:00 वाजता) ते 16 फेब्रुवारी 2025 (रात्री 11:55 वाजेपर्यंत) NAPS/NATS पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. संबंधित पोर्टलचा दुवा E (2) अ आणि ब मध्ये दिला आहे.
    • उमेदवारांनी त्यांच्या आयडी/ईमेल आयडीद्वारे NATS/NAPS पोर्टलवर लॉगिन करून इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अप्रेंटिसशिप संधीसाठी अर्ज करावा.
    • अपूर्ण किंवा जाहिरातीच्या अटी आणि शर्तींशी अनुरूप नसलेल्या अर्जांना नाकारले जाऊ शकते.
    • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांच्या प्रोफाइलमधील सर्व माहिती (जात, शैक्षणिक तपशील, वैयक्तिक माहिती इत्यादी) आणि एकूण टक्केवारी योग्यपद्धतीने दाखवलेली आहे याची खात्री करावी. यामध्ये काही सुधारणा आवश्यक असल्यास, उमेदवारांनी NATS/NAPS कार्यालयाशी संपर्क साधावा.
    • इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी NATS/NAPS पोर्टलवर योग्य पद्धतीने संबंधित पोस्टसाठी अर्ज केला आहे याची खात्री करावी.

    अर्ज करण्याची अंतिम तारीख – 16 फेब्रुवारी 2025

    महत्वाच्या लिंक्स –

    • अधिक माहितीसाठी PDF पहा.
    • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा. (टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस)
    • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा. (ट्रेड अप्रेंटिस)
    • अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी क्लिक करा.

    सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

    हे पण पहा – UCO Bank Recruitment 2025: युनायटेड कमर्शियल बँक (UCO) द्वारा मोठी भरती जाहीर; पात्रता काय ? अर्ज कसा कराल ?

    UCO Bank Recruitment 2025: युनायटेड कमर्शियल बँक (UCO) द्वारा मोठी भरती जाहीर; पात्रता काय ? अर्ज कसा कराल ?

    करियरनामा ऑनलाईन। युनायटेड कमर्शियल बँक (UCO) द्वारा एक मोठी (UCO Bank Recruitment 2025) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ‘स्थानिक बँक अधिकारी’ (LBO) या पदासाठी एकूण 250 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे.भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

    पदाचे नाव –

    जाहिराती नुसार ‘स्थानिक बँक अधिकारी’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

    पदसंख्या (UCO Bank Recruitment 2025) –

    या पदासाठी एकूण 250 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

    शैक्षणिक पात्रता –

    शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

    वयोमर्यादा –

    उमेदवारांना 20-30 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

    वेतनश्रेणी –

    या पदासाठी उमेदवारांना रु.48,480/- ते रु. 85,920/- दर महिना वेतन असणार आहे.

    अर्ज शुल्क –

    • सर्वसाधारण उमेदवार – रु. 850/-

    • इतर उमेदवार – रु. 175/-

    अर्ज पद्धती – ऑनलाईन (UCO Bank Recruitment 2025)

    अर्ज करण्याची अंतिम तारीख – 05 फेब्रुवारी 2025

    महत्वाच्या लिंक्स –

    अधिक माहितीसाठी PDF पहा.

    ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा.

    अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

    सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

    हे पण पहा – India Post GDS Recruitment 2025: India Post GDS विभागा अंतर्गत 25,000 जागांची लवकरच भरती होणार.

    Top 3 MSW Colleges: सामाजिक कार्याचं शिक्षण घ्यायचंय? ही आहेत TOP 3 कॉलेजेस; प्रवेश प्रक्रियासह संपूर्ण माहिती पहा

    करियरनामा ऑनलाईन। सध्याच्या स्पर्धेच्या युगात अनेक करिअरच्या वाटा तयार झाल्या आहेत. आयटी, डॉक्टर्स आणि इंजिनीयर होण्यासाठी अनेकजण तयारी करत असतात. मात्र काहीजण समाजाशी असणारा आपला कनेक्ट जपत सामाजिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्न करत असतात. (Top 3 MSW Colleges) त्यांच्यासाठी एमएसडब्ल्यू (MSW) हा अत्यंत उत्तम करिअरचा पर्याय आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांना समाजातील विविध समस्या समजून त्यावर काम करण्यासाठी आवश्यक असलेली व्यावसायिक कौशल्ये शिकवतो. या कोर्समध्ये मुख्यतः ग्रामीण आणि शहरी समुदाय, मानसिक आरोग्य, कुटुंब कल्याण, बालकल्याण, धोरण आणि प्रकल्प व्यवस्थापन या विषयांचा समावेश आहे. पदवीनंतर MSW साठीच्या मास्टर्स साठी देशातील टॉपचे कॉलेजेस कोणते आहेत? आपण तिथे कसं जाऊ शकतो? ते खाली दिलेल्या माहितीतून जाणून घ्या.

    भारतातील टॉप 3 एमएसडब्ल्यू कॉलेजेस

    1) टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई

    टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रमुख सामाजिक कार्य संस्थांपैकी एक आहे. 1936 साली स्थापन झालेलं TISS हे सामाजिक कार्य, शैक्षणिक, आणि मानवाधिकार क्षेत्रातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्थेच्या रूपात ओळखले जाते.TISS हे समाजिक कार्य, शिक्षण, मानव संसाधन व्यवस्थापन, महिला अभ्यास, सार्वजनिक धोरण, मानसिक आरोग्य आणि अनेक इतर सामाजिक शास्त्र विषयांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहे. या संस्थेचा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक नसतो, तर विद्यार्थ्यांना समाजातील प्रत्यक्ष परिस्थितीशी जोडून देणारा आहे.

    स्पेशलायझेशन्स (Top 3 MSW Colleges) :

    • समुदाय संघटन आणि विकास (Community Organization and Development Practice)

    • वैद्यकीय आणि मानसिक सामाजिक कार्य (Medical and Psychiatric Social Work)

    • मानव संसाधन व्यवस्थापन आणि श्रमिक संबंध (Human Resource Management and Labour Relations)

    • समाजसेवा धोरण आणि विकास (Social Work in Policy and Development)

    • समाजसेवा आणि सामाजिक उद्योजकता (Social Work and Social Entrepreneurship)

    प्रवेश प्रक्रिया:

    TISSNET (टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस नॅशनल एंट्रन्स टेस्ट) द्वारे प्रवेश घेतला जातो. त्यानंतर व्यक्तिगत मुलाखत (PI) आणि पूर्व-मुलाखत चाचणी (PIT) घेतली जाते.

    मुख्य वैशिष्ट्ये :

    • उत्कृष्ट प्राध्यापक आणि सामाजिक कार्यामध्ये अनुभव असलेले मार्गदर्शक.

    • शैक्षणिक ज्ञान आणि क्षेत्र कार्यामध्ये मजबूत समन्वय.

    • चांगली प्लेसमेंट आणि अल्मनी नेटवर्क.

    2) दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क (DSSW), दिल्ली विद्यापीठ

    दिल्ली 1946 मध्ये स्थापित झालेल्या या शाळेचे उद्दिष्ट आहे सामाजिक कार्यातील उत्कृष्टतेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे. DSSW आपल्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि समाजातील विविध समस्यांवर काम करणारे व्यावसायिक तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे संस्थान सामाजिक कार्य, कुटुंब कल्याण, मानसिक स्वास्थ्य, आणि विकास क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. (Top 3 MSW Colleges)

    स्पेशलायझेशन्स:

    • कुटुंब कल्याण (Family and Child Welfare)

    • वैद्यकीय आणि मानसिक सामाजिक कार्य (Medical and Psychiatric Social Work)

    • समाजसेवा धोरण आणि विकास (Social Work in Policy and Development)

    • समाजसेवा आणि शहरी विकास (Social Work in Urban Development)

    • श्रम कल्याण आणि संस्थागत सेवा (Labour Welfare and Institutional Services)

    प्रवेश प्रक्रिया:

    दिल्ली विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेद्वारे (DU MSW Entrance Exam) प्रवेश मिळवला जातो, त्यानंतर मुलाखत घेतली जाते.

    मुख्य वैशिष्ट्ये:

    • सामाजिक कार्याच्या तत्त्वज्ञानाचा आणि व्यावहारिक वापराचा समन्वय.

    • समाजातील विविध समुदायांसोबत काम

    • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय NGO, शासकीय संस्थांमध्ये चांगली प्लेसमेंट.

    3) आझिम प्रेमजी युनिव्हर्सिटी (APU) बंगलोर

    आझिम प्रेमजी युनिव्हर्सिटी (APU) बंगलोर, भारतातील एक प्रतिष्ठित खाजगी विद्यापीठ आहे, जे 2010 मध्ये स्थापन झाले. या विद्यापीठाचे उद्दिष्ट सामाजिक बदलाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यावसायिकांना तयार करणे आहे. APU विशेषतः सामाजिक कार्य, शिक्षण आणि कायदा या क्षेत्रांमध्ये उच्च दर्जाचे शैक्षणिक अभ्यासक्रम देत आहे. युनीव्हर्सिटीचे मिशन म्हणजे योग्य ज्ञान, कौशल्ये आणि मूल्ये असलेले लोक तयार करणे जे समाजाच्या सर्वसमावेशक विकासासाठी योगदान देऊ शकतात.

    स्पेशलायझेशन्स:

    • समुदाय विकास (Community Development)

    • बालकल्याण (Child Welfare)

    • महिला सशक्तीकरण (Women Empowerment)

    • मानसिक स्वास्थ्य (Mental Health)

    • सामाजिक धोरण आणि परिवर्तन (Social Policy and Change)

    प्रवेश प्रक्रिया:

    Azim Premji University मध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटीची प्रवेश परीक्षा (एपीयू एन्ट्रन्स टेस्ट) देणे आवश्यक आहे. त्यानंतर शॉर्टलिस्टेड विद्यार्थ्यांना मुलाखत (Personal Interview) दिली जाते. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची अकादमिक तयारी, सामाजिक कार्याबद्दलची समज आणि असलेल्या दृषटिकोनाची तपासणी केली जाते.

    मुख्य वैशिष्ट्ये:

    • आधुनिक शैक्षणिक दृष्टिकोन

    • प्रॅक्टिकल प्रशिक्षण

    • सामाजिक भागीदारी

    • सशक्त प्लेसमेंट

    TISS, DSSW, APU हे कॉलेजेस सर्व उच्च दर्जाचे एमएसडब्ल्यू मास्टर डिग्री विद्यार्थ्याना देत आहेत. जे अनुभवयुक्त प्राध्यापक, आणि क्षेत्र कार्यातील संधी यावर आधारित आहेत. हे कॉलेजेस सोशल वर्क, मानवाधिकार, समुदाय विकास, मानसिक स्वास्थ्य, आणि सामाजिक कल्याण या क्षेत्रांमध्ये करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहेत.

    अशाच करिअर महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

    हे पण पहा – Bombay High Court Recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाच्या 64 जागा; असा करा अर्ज

    Bombay High Court Recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाच्या 64 जागा; असा करा अर्ज

    करियरनामा ऑनलाईन। देशातील सर्वात जुने उच्च न्यायालय म्हणून मुंबई उच्च न्यायालयाची ओळख आहे. मुंबई उच्च न्यायालयातून केवळ महाराष्ट्र पुरतेच नाही तर गोवा या राज्याचा आणि दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचाही कायदेविषयक कारभार पाहिला जातो. याच न्यायालयात आता कायद्याचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. (Bombay High Court Recruitment 2025) मुंबई उच्च न्यायालयातील ‘कायदा लिपिक’ पदासाठी तब्बल 64 जागांसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. कायद्याचं शिक्षण आणि सोबतच संगणकीय ज्ञान या पदासाठी उमेदवारांना आवश्यक असणार आहे. या परीक्षेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे. कायदा लिपिक या पदासाठी असणारी वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

    पदाचे नाव –

    जाहिराती नुसार ‘कायदा लिपिक’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

    पदसंख्या (Bombay High Court Recruitment 2025) –

    या पदासाठी एकूण 64 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

    शैक्षणिक पात्रता –

    शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी) (Bombay High Court Recruitment 2025)

    वयोमर्यादा –

    उमेदवारांना 21-30 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

    वेतनश्रेणी –

    या पदासाठी उमेदवारांना रु. 65,000/- दर महिना वेतन असणार आहे.

    नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद.

    अर्ज पद्धती – ऑफलाईन

    अर्ज करण्याची अंतिम तारीख – 29 जानेवारी 2025

    अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजू, बॉम्बे, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी.टी. हॉस्पिटल कंपाऊंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई –400001

    महत्वाच्या लिंक्स –

    • अधिक माहितीसाठी PDF पहा.
    • अॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी CLICK करा.
    • अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

    सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

    हे पण पहा- Coal India Limited Recruitment 2025: कोल इंडिया अंतर्गत 358 पदांची मेगाभरती; ऑनलाईन करा APPLY

    Mazagaon Dock Recruitment 2025: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत मोठी भरती; ऑनलाईन करा APPLY

    करियरनामा ऑनलाईन। भारतीय नौदलाला लागणाऱ्या युद्धनौका पाणबुडी आणि इतर महत्त्वाच्या जहाजांची निर्मिती माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड कडून करण्यात येते. सागरी संरक्षणासाठी ही सरकारी कंपनी भारतासाठी महत्त्वाची समजली जाते. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या माझगाव डॉकमध्ये आता पदवीधरांना अप्रेंटेशनशिपची संधी चालून आली आहे. (Mazagaon Dock Recruitment 2025)पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या विविध 200 जागांसाठी ही भरती होणार असून पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे.

    पदाचे नाव –

    जाहिराती नुसार ‘पदवीधर अप्रेंटिस’, ‘डिप्लोमा अप्रेंटिस’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

    पदसंख्या (Mazagaon Dock Recruitment 2025) –

    या पदासाठी एकूण 200 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

    • पदवीधर अप्रेंटिस – 170

    • डिप्लोमा अप्रेंटिस – 30

    शैक्षणिक पात्रता –

    शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

    वयोमर्यादा –

    उमेदवारांना 18-27 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

    वेतनश्रेणी –

    • पदवीधर अप्रेंटिस – रु. 9000 /-

    • डिप्लोमा अप्रेंटिस – रु. 8000/-

    नोकरी ठिकाण – मुंबई

    अर्ज पद्धती – ऑनलाईन (Mazagaon Dock Recruitment 2025)

    अर्ज सुरू होण्याची तारीख – 16 जानेवारी 2025

    अर्ज करण्याची अंतिम तारीख – 05 फेब्रुवारी 2025

    महत्वाच्या लिंक्स –

    अधिक माहितीसाठी PDF पहा.

    ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा.

    अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

    सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

    हे पण पहा – DSSSB Recruitment 2025: दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ द्वारा मेगाभरती; ऑनलाईन करा APPLY

    NTA Exam Updates 2025: NEET, JEE आणि CUET च्या तारखा जाहीर; या दिवशी होणार परीक्षा.

    करियरनामा ऑनलाईन। बारावीनंतर डॉक्टर, इंजिनीयर किंवा विविध विद्यापीठातील प्रवेशासाठी सर्वच विद्यार्थी प्रवेश परीक्षांची तयारी करत असतात. (NTA Exam Updates 2025) या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) कडून आता 2025 या सर्व प्रमुख प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. यामध्ये नीट, जेईई आणि सीयुइटी या प्रमुख परीक्षांचा समावेश आहे.भारतातील विविध UG आणि PG अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी या प्रवेश परीक्षा महत्त्वाच्या असतात. या परीक्षांच्या संपूर्ण वेळापत्रकासह प्रवेशपत्र कसं मिळवायचं? याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील संपूर्ण माहिती लक्षपूर्वक वाचा.

    JEE Main 2025 परीक्षा केव्हा होणार?

    सत्र 1: JEE Main परीक्षा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2025 दरम्यान होणार आहे. अर्ज प्रक्रिया नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू झाली होती. परीक्षा सुरू होण्याच्या तीन दिवस आधी प्रवेशपत्र उपलब्ध होईल.

    सत्र 2: दुसरे सत्र 1 एप्रिल ते 15 एप्रिल 2025 दरम्यान होणार आहे. या सत्रासाठी नोंदणी फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू होईल, तर प्रवेशपत्र मार्च 2025 च्या शेवटी जारी होण्याची शक्यता आहे. (NTA Exam Updates 2025)

    NEET UG 2025 परीक्षा केव्हा होणार?

    NEET UG परीक्षा 4 मे 2025 रोजी होणार आहे. अर्ज प्रक्रिया मार्च 2025 मध्ये सुरू होईल आणि अधिकृत सूचना फेब्रुवारीत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. प्रवेशपत्र 1 मे 2025 पर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

    CUET 2025 परीक्षा केव्हा होणार?

    CUET UG: UG प्रवेशासाठी CUET परीक्षा मे 2025 मध्ये होणार आहे. अर्ज फेब्रुवारी ते एप्रिल 2025 दरम्यान स्वीकारले जातील. प्रवेशपत्र आणि परीक्षा शहर स्लिप मे 2025 मध्ये उपलब्ध होतील.

    CUET PG: PG प्रवेशासाठी CUET PG परीक्षा 11 मार्च ते 28 मार्च 2025 दरम्यान आयोजित केली जाईल. अर्ज प्रक्रिया डिसेंबर 2024 मध्ये सुरू होईल आणि जानेवारी 2025 पर्यंत चालेल. प्रवेशपत्र मार्च 2025 च्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल.

    विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. (NTA Exam Updates 2025)

    विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट (http://www.nta.ac.in) नियमितपणे तपासणे गरजेचे आहे, जेणेकरून अर्ज, पात्रता निकष, अभ्यासक्रम आणि इतर महत्त्वाच्या माहितीची खात्री केली जाऊ शकते.

    महत्त्वाचे संकेतस्थळे:

    JEE अधिकृत वेबसाइट पहा.
    NEET अधिकृत वेबसाइट पहा.
    CUET अधिकृत वेबसाइट पहा.

    अधिक माहितीसाठी या वेबसाइट्स नियमितपणे तपासत राहा.

    शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन माहिती आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

    हे पण पहा – CBSE Pattern: मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न लागू होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

    ONGC Recruitment 2025: ONGC अंतर्गत 108 रिक्त जागांची भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

    करियरनामा ऑनलाईन। तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC – Oil and Natural Gas Corporation Limited) द्वारा जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (ONGC Recruitment 2025) या जाहिराती अंतर्गत भूवैज्ञानिक, भूभौतिकशास्त्रज्ञ (पृष्ठभाग), भूभौतिकशास्त्रज्ञ (विहिरी), AEE(उत्पादन) – मेकॅनिकल, AEE(उत्पादन) – पेट्रोलियम, AEE(उत्पादन) – केमिकल, AEE(ड्रिलिंग) – यांत्रिक, AEE(ड्रिलिंग) – पेट्रोलियम, AEE (मेकॅनिकल) ), AEE (इलेक्ट्रिकल) इत्यादी पदांसाठी एकूण 108 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 आहे.या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

    पदाचे नाव –

    • भूवैज्ञानिक
    • भूभौतिकशास्त्रज्ञ (पृष्ठभाग)
    • भूभौतिकशास्त्रज्ञ (विहिरी)
    • AEE(उत्पादन) – मेकॅनिकल
    • AEE(उत्पादन) – पेट्रोलियम
    • AEE(उत्पादन) – केमिकल
    • AEE(ड्रिलिंग) – यांत्रिक
    • AEE(ड्रिलिंग) – पेट्रोलियम
    • AEE (मेकॅनिकल) )
    • AEE (इलेक्ट्रिकल)

    पदसंख्या (ONGC Recruitment 2025)

    या पदांसाठी एकूण 642 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

    • भूवैज्ञानिक – 05
    • भूभौतिकशास्त्रज्ञ (पृष्ठभाग) – 03
    • भूभौतिकशास्त्रज्ञ (विहिरी) – 02
    • AEE(उत्पादन) – मेकॅनिकल – 11
    • AEE(उत्पादन) – पेट्रोलियम – 19
    • AEE(उत्पादन) – केमिकल – 23
    • AEE(ड्रिलिंग) – यांत्रिक – 23
    • AEE(ड्रिलिंग) – पेट्रोलियम – 06
    • AEE (मेकॅनिकल) ) – 06
    • AEE (इलेक्ट्रिकल) – 10

    शैक्षणिक पात्रता –

    शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

    वयोमर्यादा –

    वयोमार्यादा जाणून घेण्यासाठी खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.

    अर्ज शुल्क –

    • GEN/EWS/OBC – रु. 1000/-
    • SC/ST/PwBD – शुल्क नाही

    वेतन –

    वर्ग I कार्यकारी पदे (E1 स्तर) – रु. 60,000/– ते रु.1,80,000/- दर महिना वेतन असणार आहे.

    अर्ज पद्धती – ऑनलाईन (ONGC Recruitment 2025)

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2025

    ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा.

    अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

    सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

    DFCCIL Recruitment 2025: DFCCIL अंतर्गत 642 रिक्त पदांची भरती जाहीर; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

    करियरनामा ऑनलाईन। DFCCIL (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (DFCCIL Recruitment 2025) जाहिरातीनुसार ‘एमटीएस’, ‘एक्झिक्युटिव्ह’, ‘ज्युनियर मॅनेजर’ या पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. एकूण 642 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2025 ही दिलेली आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

    पदाचे नाव –

    जाहिराती नुसार ‘एमटीएस’, ‘एक्झिक्युटिव्ह’, ‘ज्युनियर मॅनेजर’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

    पदसंख्या (DFCCIL Recruitment 2025)

    या पदांसाठी एकूण 642 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

    • एमटीएस – 464

    • एक्झिक्युटिव्ह – 175

    • ज्युनियर मॅनेजर – 03

    शैक्षणिक पात्रता –

    शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

    वयोमर्यादा –

    • एमटीएस – 18-30 वर्ष

    • एक्झिक्युटिव्ह – 18-30 वर्ष

    • ज्युनियर मॅनेजर – 18-30 वर्ष

    अर्ज शुल्क –

    • Gen/ OBC/ EWS (For Executive) – रु. 1000/-

    • Gen/ OBC/ EWS (For MTS) – रु. 500/-

    • SC/ ST/ PwD/ ESM – शुल्क नाही

    वेतन –

    • एमटीएस – रु.16,000/- ते 45,000/- (N-1 Level, IDA Pay Scale)

    • एक्झिक्युटिव्ह – रु. 30,000/- ते रु.1,20,000/- (E0 Level, IDA Pay Scale)

    • ज्युनियर मॅनेजर – रु. 50,000/- ते रु. 1,60,000/- (E2 Level, IDA Pay Scale)

    अर्ज पद्धती – ऑनलाईन (DFCCIL Recruitment 2025)

    अर्ज सुरू होण्याची तारीख – 18 जानेवारी 2025

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2025

    अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

    सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.