Home Blog Page 1075

राज्यात लवकरच होणार तलाठी भरती

मुंबई | राज्यातील तलाठी संवर्गातील मंजूर पदांपैकी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मागील दोन वर्षांपासून तलाठी भरती झाली नसल्याने त्यासंदर्भात ‘महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या’ पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात मंत्री पाटील यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.

या बैठकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तलाठी संघाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करुन, राज्यात लवकरच तलाठी भरती जाहीर करेल असे आश्वासन ‘महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या’ पदाधिकाऱ्यांना दिले.

व्हिडीओ एडिटिंग क्षेत्रात मोठ्या संधी

करिअरमंत्रा | दूरचित्रवाहिन्यांमुळे मनोरंजन क्षेत्राचा कायापालट झाला आहे. चित्रपटाबरोबरच टेलीव्हिजन इंडस्ट्रीची अब्जावधीत उलाढाल होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत. जाहिरात असो किंवा व्हिडीओ एडिटिंग, जर आपली कल्पनाशक्ती दांडगी असेल आणि सॉफ्टवेअरमध्ये काम करण्याची आवड असेल, तर व्हिडीओ एडिटिंगमध्ये तुम्ही यशस्वी करिअर करू शकता.

चित्रपट निर्मिती करणार्या प्रत्येक कंपनीत आणि स्टुडिओत एडिटरला मोठी मागणी आहे. फिल्म एडिटर हा व्हिडीओ एडिटिंगच्या माध्यमातून चित्रपटाला अंतिम आकार देत असतो. व्हिडीओ एडिटिंगअंतर्गत संपादनाची संकल्पना आणि त्याच्याशी निगडित असलेल्या गोष्टी विस्ताराने सांगितल्या जातात. जर आपल्यात दृश्य समजून घेऊन त्याचे तत्काळ मूल्यांकन करण्याची क्षमता असेल, तर आपल्यासाठी व्हिडीओ एडिटिंगचा अभ्यासक्रम करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अलीकडच्या काळात वाढत्या तंत्रज्ञानामुळे व्हिडीओ एडिटर्सची मागणी वाढली आहे. कारण टीव्हीवरचा कोणताही कार्यक्रम असो तो व्हिडीओ एडिटर्सशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. सध्या बाजाराची स्थिती पाहता, भविष्यात सुमारे एक लाख प्रशिक्षित व्हिडीओ एडिटरची गरज भासणार आहे. या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर जगात घडणार्या घडामोडी आणि बदलांचे आकलन करून, त्यास संपादन करण्याची हातोटी असायला हवी.

फुटेजचे कॅप्चरिंग, फुटेज एडिट करणे, कोणते दृश्य कोठे योग्य लागू पडते, संगीत आणि आवाजाला कशा प्रकारे मिक्स करू शकतो, या सर्व गोष्टी व्हिडीओ संपादनात पारंगत असलेला संपादक करू शकतो. यासाठी थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टींची गरज आहे. व्हिडीओ एडिटर्स अगोदर लिनियर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करत होते, आता व्हिडीओ एडिटिंगच्या माध्यमातून काम करत आहेत. यशस्वी व्हिडीओ एडिटर होण्यासाठी विविध विषयांचे आकलन असणे गरजेचे आहे. जेणेकरून दृश्यांचे आकलन झाल्यानंतर योग्य रीतीने साउंंड मिक्सिंग करता येईल. जे सतत कल्पनेच्या विश्वात रमलेले असतात आणि दृश्याच्या, विविध सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रभावीपणे एडिटिंग करू इच्छितात, त्यांच्यासाठी व्हिडीओ एडिटिंग करिअरचा चांगला पर्याय ठरू शकतो.

पात्रता – सर्टिफिकेट कोर्स इन व्हिडीओ एडिटिंग अँड साउंंड रेकॉर्डिंग, तसेच डिप्लोमा इन पोस्ट प्रॉडक्शन अँड व्हिडीओ एडिटिंगसारखे अभ्यासक्रम तीन महिन्यांपासून ते तीन वर्षांपर्यंत आहेत. दीड वर्षापासून ते तीन महिन्यांचे शॉर्ट कोर्सही उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. मात्र, पदवी आणि पदविका घेण्यासाठी आपण एखाद्या विषयात पदवी घेतलेली असावी लागते. जर आपल्याला एखाद्या चॅनेलमध्ये नोकरी करायची असेल, तर पदवी असणे आवश्यक आहे. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विषयाचे सर्वांगीण ज्ञान असणे गरजेचे आहे.

संधी – अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर न्यूज, एंटरटेन्मेंट चॅनेल्स, प्रॉडक्शन हाउस, वेब डिझायनिंग कंपनी, म्युझिक वर्ल्ड, फीचर आणि जाहिरात, फिल्म आणि बीपीओ आदी क्षेत्रांत काम करता येते. या क्षेत्रात फ्रीलान्सिंगसाठीदेखील अधिक पर्याय आहेत. पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओ, टेलीव्हिजन आदी क्षेत्रातदेखील शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्टवर काम करता येते. मनोरंजन आणि प्रसारमाध्यमांशी निगडित असलेल्या क्षेत्रात पैसा भरपूर आहे आणि संधीला वाव आहे. न्यूज, एंटरटेन्मेंट चॅनेल, म्युझिक इंडस्ट्री, फीचर आणि जाहिरात संस्था, चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. याशिवाय पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओ, टेलीव्हिजन कंपन्या आदी ठिकाणीही शॉर्ट टर्म करारावर काम मिळू शकते. याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर सतत अपडेट राहणे गरजेचे असते.

साईट सुपरवायझर – बांधकाम क्षेत्रातील करिअर संधी

आज बांधकाम क्षेत्राचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. घर घेणे ही सर्वांसाठी महत्त्वाची गरज झाली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात कामे करण्यासाठी अनेक लोकांची गरज पडत असते. अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत सर्वांचाच सहभाग या क्षेत्राला नेहमी लागत असतो. अशा सहभागी अनेकांपैकी एक म्हणजे ‘साईट सुपरवायझर’. बांधकाम क्षेत्रात सुपरवायझर व्यक्तीचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्याच्याशिवाय इमारतीचे काम पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे हल्ली या क्षेत्राकडे करिअर संधी म्हणून पाहिले जाते.

सिव्हिल इंजिनीअरिंग क्षेत्रात इमारतीच्या उभारणीपासून ते रस्ते, पूल, फ्लायओव्हर्स, स्कायवॉक, रेल्वे इत्यादींचा समावेश होत असतो. प्रत्यक्ष कामाच्या उभारणीसाठी ‘साइट सुपरवायझर’ची गरज असते. अनेक ज्युनिअर, सिनिअर इंजिनीअर्स, आर्किटेक्ट, डिझायनर्स, बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स व सप्लायर्स तसेच काम करून देणाऱ्या मजुरांमधील सुपरवायझर हा महत्त्वाचा दुवा मानला जातो. बांधकाम साहित्य कामाच्या ठिकाणी पोेहोचविण्यापर्यंतची सर्व कामे करून देण्याची जबाबदारी प्रत्येक साईटवरील सुपरवायझरची असते.
सर्वांत प्रथम काय काम करायचे आहे हे इंजिनीअर्सकडून समजावून घ्यावे लागते. त्यानुसार साहित्याची पूर्तता, लागणारे मजूर इत्यादींची जमवाजमव करून उभे राहून काम करून घेण्याची कला सुपरवायझरकडे असणे गरजेचे आहे. जी व्यक्ती योग्य पद्धतीने समन्वय साधू शकते, तीच व्यक्ती या साईट व्हिजन मानल्या गेलेल्या सुपरवायझरचे करिअर योग्य रीतीने पेलू शकते. स्वत: प्रात्यक्षिक केल्याने अनुभव वाढतो व आत्मविश्वास दांडगा होऊन भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होत राहते.

बिल्डिंग साईट सुपरवायझर म्हणून काम पाहण्यासाठी कमीतकमी दहावी-बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच बिल्डिंग मेन्टेनन्सचा कोर्स केला असेल तर उत्तमच. याचसोबत या व्यक्तीला कॉम्प्युटर, इंटरनेटचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे; कारण ती आजच्या काळाची गरज आहे.बिल्डिंग मेन्टेनन्स कोर्स केल्यानंतर बांधकाम क्षेत्रात अनुभवाने साईट सुपरवायझर होता येते. तसेच बिल्डिंग मेन्टेनन्सचा कोर्स करून प्रॅक्टिकल-थिअरी व प्रमाणपत्राची जोड मिळाल्याने या करिअरमध्ये भविष्य उज्ज्वल होण्यास मदत तर होतेच; पण पुढे काही वर्षांनी इमारतीच्या बांधकामाचे स्वतंत्र कॉन्ट्रॅक्ट घेऊन चांगला बिझनेस सुरू करता येतो. दहावी नापास व बारावी मुलांसाठी सुवर्णसंधी आहे. हल्ली साइटसाठी प्रशिक्षित सुपरवायझर मिळत नसल्याने बºयाच खासगी प्रशिक्षण केंद्रांत बिल्डिंग सुपरवायझर हा कोर्स सुरू केला असून तो दहावी व बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी आहे, ही त्यांच्या दृष्टीने एक सुवर्णसंधी आहे. तसेच अशा कोर्समध्ये इमारतीचा पाया, आरसीसी काम, बांधकाम, प्लॅस्टर, प्लंबिंग, पेन्टिंग, टायलिंग, पीओपी इत्यादी अनेक कामांचा समावेश होत असतो. बिल्डिंग सुपरवायझर हा कोर्स खासगी तसेच सरकारी आयटीआयमध्ये शिकविला जातो. आजकालची परिस्थिती बघितल्यास साईटसाठी प्रशिक्षित सुपरवायझरची कमी जाणवत असल्याने बºयाच खासगी प्रशिक्षण केंद्रांत हा कोर्स सुरू केला आहे. हा कोर्स काही आठवड्यांपासून ते दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीपर्यंत शिकविला जातो. कोर्स पूर्ण केल्यानंतर कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी करता येते व पुढे जाऊन स्वतंत्र व्यवसाय सुरू करता येतो.

भावी IAS अधिकार्यांसोबत मुख्यमंत्र्यांचा मसुरी येथे संवाद

मसुरी | अमित येवले

भावी प्रशासकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसूरी येथे संवाद साधला. प्रशासनासमोर जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान हे नेहमीच सनदी अधिकारी यांच्यावर असते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेची नाळ जनतेशी जोडण्यासाठी ‘नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून’ प्रयत्न करावे व त्याचप्रमाणे आज लोकशाहीचे चारही स्तंभ विश्वासार्हतेच्या कसोटीवर उतरण्यासाठी दररोज स्पर्धा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर संविधानाची भूमिका आणि त्यातून येणारे उत्तरदायित्त्व समजून घेऊन सर्वांच्या सहभागाने सनदी अधिकारी यांना काम करावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री यांनी केले.

उत्तराखंडमधील मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये ९३ व्या फाऊंडेशन कोर्समधील प्रशिक्षणार्थी आयएएस,आयपीएस आणि अन्य सेवांमधील अधिकारी तसेच मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रामच्या चौथ्या फेजअंतर्गत प्रशिक्षणासाठी आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी नागरी प्रशासन, शेती क्षेत्रातील बदल, आयात-निर्यात धोरण, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम आणि इतरही विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती व अनेक उत्तरे यावेळी दिली.

मोबाईल कंपन्यांमधील ६० हजार नोकर्या जाणार

मुंबई | स्मार्टफोन, स्मार्टवॉच या माध्यमातून मोबाईल क्षेत्रात रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे मार्च २०१९ पर्यंत मोबाईल कंपन्यांमध्ये काम करणाºया ६० हजार कर्मचाºयांना नोकरी गमवावी लागणार आहे. टीमलीज सर्व्हिसेसने केलेल्या सर्वेक्षणातही भीती व्यक्त झाली आहे. मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरणसुद्धा या स्थितीला कारणीभूत असेल.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इंटरनेट आॅफ थिंग्स व आर्टिफीशीअल इंटेलिजन्स यांचा वापर सातत्याने वाढत आहे. यामुळे दूरसंचार क्षेत्रातील पारंपरिक नोकºयांचे दिवस आता गेले. आता आधुनिक कौशल्य प्राप्त युवक-युवतींना या क्षेत्रात नोकरीची संधी आहे. त्यामुळेच पुढील वर्षभरात या क्षेत्रातील ६० हजार ते ७५ हजार नोकºया संपुष्टात येतील.

नोकर्यांवरील हे संकट २०१९-२० या पुढील आर्थिक वर्षातही कायम असेल. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत आणखी १५ हजार ते २० हजार कर्मचाºयांना नोकºया गमवाव्या लागण्याची शक्यता आहे. आयडीया व व्होडाफोन या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे २०१७-१८ मध्ये जवळपास १ लाख नोकर्या संपुष्टात आल्या होत्या. आता एअरटेल कंपनी टाटा टेलिकॉम व टेलिनॉरची खरेदी करीत आहे. याखेरीज रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) व एअरसेल पूर्णपणे बंद पडले आहे. यामुळे मोबाइल क्षेत्रातील नोकर्या संकटात आहेत. ग्राहक सेवा, टॉवर व्यवस्थापन, ग्राहक सेवा, सीमकार्ड वितरक यांच्यासह दूरसंचार क्षेत्रात सध्या २५ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ग्राहक सेवा व आर्थिक क्षेत्राशी संबंधित १५ हजार नोकर्या तात्काळ संपुष्टात येत आहेत.

स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख | भाग १

नितिन ब-हाटे

स्पर्धापरिक्षांची तयारी करुन अधिकारी व्हायची स्वप्न पाहणार्या तरुणांची संख्या या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाजगीत नोकरी करण्यापेक्षा सरकारी नोकरीत जाऊन समाजासाठी काहीतरी करु इच्छिणार्यांचा स्पर्धापरिक्षांकडे कल आहे. मात्र बर्याचवेळा स्पर्धापरिक्षांची तयारी कशी करावी, सिलेबस काय ते पुस्तके कोणती वाचायला हवीय अशा अनेक गोष्टींमधे विद्यार्थ्यांमधे द्विधा मनस्थिती होते. स्पर्धापरिक्षेची नव्याने तयारी करु इच्छिणार्या धेयवेड्या तरुणांसाठी स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख करुण देणारा हा लेख.

इतर महत्वाचे  –

UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा | #भाग २

स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट | #भाग 3

स्पर्धा परीक्षा ही प्रामुख्याने दोन सेवांसाठी घेतल्या जातात. एक नागरी सेवेसाठी आणि दुसर्या म्हणजे व्यावसायिक सेवांसाठी. आपण नागरी सेवा साठीच्या स्पर्धापरिक्षाची तोंडओळख बघुया. देशाचा प्रशासकीय कारभार सांभाळण्यासाठी UPSC, MPSC, SSC इत्यादी आयोगामार्फत विविध पदांसाठी विशिष्ट परिक्षेमार्फत शासकीय कर्मचारी ते अधिकारी निवडले जातात. या पदांसाठी लाखोच्या पदवीधर गर्दीमधुन पदभार सांभाळण्यासाठीची कौशल्ये व गुण परिक्षार्थी मध्ये असावेत आणि योग्य अधिकारी निवडले जावेत म्हणुन स्पर्धापरिक्षांंचा अट्टाहास असतो. विविध अभ्यासक्रमाचे कोर्सेस पुर्ण केल्यानंतर नोकरी शोधण्यापेक्षा स्पर्धापरिक्षाची तयारी करुन‌ शासकीय सेवेत जाणार्यांचा कल सध्या वाढला आहे

पात्रता –

कोणत्याही विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी घेतल्यानंतर UPSC, MPSC इत्यादी स्पर्धा परिक्षा देता येतात. त्यासाठी विशिष्ट मार्क मिळविण्याची अट नसते. फक्त उत्तीर्ण असावे लागते, पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना‌ सुध्दा परिक्षा देता येतात.

वयोमर्यादा –

प्रत्येक परिक्षा देण्यासाठी कमीतकमी आणि जास्तीत जास्त अशी वयाची अट असते . UPSC मध्ये वया बरोबर परिक्षा प्रयत्नांचेही बंधन असते (२१ ते ३२ वयामध्ये खुला प्रवर्ग असलेल्या परिक्षार्थीस ६ वेळा प्रयत्न करता येतात )

भाषा –

स्पर्धा परिक्षा मध्ये इंग्रजी किंवा हिंदी आणि एक प्रादेशिक भाषा (मराठी) इत्यादीचे भाषाज्ञान तपासले जाते. सरासरी पातळीचे इंग्रजी येणे अपरिहार्य आहे.

प्रवृत्ती आणि कल तपासणारी परिक्षा –

स्पर्धा‌परिक्षा या परिक्षार्थींचा प्रवृत्ती (attitude) आणि कल(aptitude) तपासणार्या असतात त्यामुळे या परिक्षांना गणित, बुद्धिमत्ता चाचणी , उतार्यांचे आकलन, चालु घडामोडी आणि सामान्य अध्ययन हे विषय अनिवार्य असतात.

इतर महत्वाचे  –

तर मग UPSC /MPSC करू नका ???

विश्वास नांगरे पाटीलांचा ‘सिद्धिविनायक पे है विश्वास’, UPSC च्या प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्हिव्हचे काॅल सिद्धिविनायकाकडूनच गेले असल्याचा खुलासा

परिक्षेचे स्वरुप –

प्रत्येक स्पर्धा परिक्षेसाठी ठराविक अभ्यासक्रम आणि परिक्षापद्धती असते . बहुतेक परिक्षांना पुर्व , मुख्य आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात , गट ब आणि क पदांसाठी आता मुलाखतीचा टप्पा काढुन टाकण्यात आला आहे .

१. पुर्व परिक्षा ही चाळणी परीक्षा असते तीचा उद्देश प्रामाणिक आणि योग्य दिशेने अभ्यास करणार्यांना मुख्य परिक्षेसाठी पास करणे किंवा नावाला परिक्षा देणार्यांना परिक्षा प्रक्रियेतुन गाळुन टाकणे हा असतो.

२. मुख्य परिक्षा ही पुर्व परिक्षा पास झालेल्यांसाठी असते . मुख्य परिक्षेत परिक्षार्थींचा कस लागतो कारण मुख्य परिक्षेचा अभ्यासक्रम मोठा असतो , प्रश्नपत्रिका विस्तृत असतात‌ , तसेच अंतिम गुणवत्ता यादीत हे मार्क धरले जातात त्यामुळे पद मिळविण्यासाठी “मुख्य” परिक्षा नावाप्रमाणेच “मुख्य” असते.

३. मुख्य परिक्षा पास झालेल्या परिक्षार्थीची व्यक्तिमत्त्व चाचणी घेतली जाते , त्याला सभोवतालच्या घडामोडींची असलेली जाण , समस्या सोडविण्याचे कौशल्य, निर्णय क्षमता इत्यादी बाबी मुलाखतीमध्ये तपासल्या जातात.

४.परिक्षार्थींना विशिष्ट परिक्षेस फोकस करुन अभ्यासक्रम, मागील वर्षी विचारलेले प्रश्न, चालु घडामोडी याआधारे पद मिळविण्यासाठी योग्य रणनीती आखणे आवश्यक आहे.

५.शासकीय यंत्रणेत जावुन समाजसेवा करण्यासाठी , प्रशासन गतिमान करण्यासाठी किंवा स्वत:च्या क्षमतांना सर्वोच्च न्याय देण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा एक राजमार्ग आहे , स्वत:ला ओळखुन ज्याला जसा जमेल तसा तो निवडावा त्यासाठी प्रामाणिक मार्गदर्शक सोबत असावा.

IMG WA

नितिन ब-हाटे

9867637685

(लेखक ‘लोकनिती IAS, मुंबई’ चे संचालक/ मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत.)