Home Blog Page 1073

महानदी कोलफील्डस लिमिटेड मध्ये 370 जागांसाठी भरती

खाणप्रकल्प हे नव्याने उदयाला येत असलेले आणि मोठी रोजगार क्षमता असणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात चांगला पगार असून करिअरच्या अधिक संधी उपलब्ध आहेत. माइनिंग क्षेत्रात काम खूप आहे आणि लोक कमी आहेत. माइनिंग कोर क्षेत्रात पगाराचं पैकेज ज्यादा मिळते कारण त्यात फील्ड जॉब असतो. महानदी कोलफील्डस लिमिटेड कंपनीमधे नुकतीच ३६० पदांकरता भरती निघाली आहे. आजच अर्ज भरा आणि नोकरी मिळवा.

एकूण – 370 जागा

पदाचे नाव –

1)ज्युनियर ओव्हरमन T&S : 149 जागा

2)माइनिंग सिरदार T&S : 201 जागा

3)डेप्युटी सर्वेअर T&S: 20 जागा

शैक्षणिक पात्रता –

1) पद क्र.1
(1) उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा
(2)मायनिंग इंजिनिअर डिप्लोमा
(3)ओवरमन प्रमाणपत्र
(4)गॅस परीक्षण प्रमाणपत्र
(5)प्रथमोपचार प्रमाणपत्र

2) पद क्र.2
(1) उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा
(2)मायनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा व ओवरमन प्रमाणपत्र
(3)गॅस परीक्षण प्रमाणपत्र
(4)प्रथमोपचार प्रमाणपत्र

3) पद क्र.3
(1) उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा
(2) सर्व्हे प्रमाणपत्र

वयाची अट – 10 जानेवारी 2019 रोजी 18 ते 30 वर्ष (SC/ST/ माजी सैनिक : फी नाही )

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2019

ऑनलाइन अर्ज – Apply Online(सुरुवात 21 डिसेंबर 2018) 

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा – http://www.mahanadicoal.in/Welcome.php#

नोकरी आणि करिअर संबंधी अपडेट्स मिळवण्याकरता आजच आमचा WhatsApp आणि Telegram चॅनल जाॅइन करा.

WhatsApp ग्रुपल जाॅइन व्हा
Join WhatsApp Group

आमचा Telegram चॅनल जाॅइन करा
Join Telegram

MPSC ची जाहीरात प्रसिद्ध, मराठा समाजासाठी राखीव जागा

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी (एमपीएससी) 342 पदांचा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामधे मराठा समाजासाठी निर्माण करण्यात आलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

एकुण जागा – ३४२

पदाचे नाव –

उप जिल्हाधिकारी – 40 जागा
पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त – 34 जागा
सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा – 16 जागा
उद्योग उप संचालक, तांत्रिक – 02 जागा
तहसिलदार – 77 जागा
उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा – 25 जागा
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी – 03 जागा
कक्ष अधिकारी – 16 जागा
सहायक गट विकास – 11 जागा
उद्योग अधिकारी, तांत्रिक – 05 जागा
नायब तहसिलदार – 113 जागा

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1,2,5,6,8,9 & 11 – पदवीधर किंवा समतुल्य

पद क्र.3 – 55% गुणांसह B.Com किंवा CA किंवा ICWA किंवा M.Com

पद क्र.4 & 10 – BE/BTech (सिव्हिल) किंवा B.Sc

पद क्र.7- इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (Physics & Maths)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र.

Fee – अमागास प्रवर्ग: ₹524/- [मागासवर्गीय: ₹324/-]

परीक्षा –

पूर्व: 17 फेब्रुवारी 2019
मुख्य: 13,14 & 15 जुलै 2019
परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 केंद्र.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2018

नोकरी आणि करिअर संबंधी अपडेट्स मिळवण्याकरता आजच आमचा WhatsApp आणि Telegram चॅनल जाॅइन करा.

WhatsApp ग्रुपल जाॅइन व्हा
Join WhatsApp Group

आमचा Telegram चॅनल जाॅइन करा
Join Telegram

तुमच्या यशामध्ये कोणीतरी आडवं येतंय ? मग या गोष्टी लक्षात ठेवा..तुमची प्रगती कुणी अडवू शकत नाही

सक्सेस मंत्रा | जीवनात यश मिळविण्यासाठी नेहमीच समस्यांचा सामना करावा लागतो. परिश्रमी आणि आत्मविश्वासाने भरलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात सुद्धा अशी परिस्थिती येते. त्यावेळी असं वाटतं की आता पुढे जाण्याचे सगळे दरवाजे बंद झाले आहेत, अशाने ते अस्वस्थ होतात. अशी परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात येते, मात्र ही वेळ हार मानण्याची नाही तर स्वतःत आत्मविश्वास निर्माण करण्याची आहे की मी यशस्वी होण्यासाठीच बनलो आहे. चला तर मग जाणून घेवूयात काही सर्वोत्तम टिप्स ज्यामुळे तुम्ही तूमचं लक्ष्य प्राप्त करू शकाल.

१. उद्देश निर्धारित करा-

जीवनात लक्ष्य निर्धारित करणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा चांगल्या पद्धतीने आपण आपला उद्देश जाणून घेतला तर लक्ष्य प्राप्त करणं सोपं जातं. एका गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे की उद्देश फार छोटा किंवा फार मोठा देखील असून नये जो मिळवणं जवळजवळ अशक्य असेल. त्यामुळे उद्देश विचार करूनच निर्धारित केला पाहिजे.

२. उपलब्ध संसाधनांचा योग्यप्रकारे वापर करणे –

आयुष्य आपल्याला दररोज खूप संधी देत असतं. आपल्याला फक्त त्यांना ओळखून त्यांचा योग्य उपयोग करता आला पाहिजे. उद्देश प्राप्त करण्यासाठी आपल्या आसपासच्या संसाधनांचा योग्य वापर करता आला पाहिजे, संसाधनं वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. जसे वेळ, मेहनत, धन- संपत्ती यांसारखे..

३. नवे विचार आणि योजनांचा स्वीकार करताना घाबरू नये –

नवे विचारच आपल्याला पुढे जाण्याची शक्ती देत असतात. नवे विचार आणि योजना ही आपल्या यशाची सुरुवात आहे. काही शतकांपूर्वी आपण ज्या पद्धतींचा वापर करायचो त्यातल्या पद्धती आता अस्तित्वातच नाहीयेत. आज आपण अश्या काळात जगत आहोत जिथे दिवसागणिक प्रत्येक गोष्ट वेगाने बदलताना दिसत आहे. त्यामुळे या बदलत्या काळात नवीन गोष्टी शिकताना मागे हटता काम नये.

४. वेळ आल्यावर सगळ्या जखमा भरल्या जातात-
प्रत्येक व्यक्तीला जीवनात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या परिस्थितीतून जावं लागतं. जीवनात कितीही वाईट दिवस असोत वेळ आल्यावर सगळ्या जखमा भरल्या जातात आणि आपण या अशा परिस्थितीशी दोन हात करायला शिकतो.

५. धैर्य ठेवा-
जेव्हा केव्हा अपयशाचा सामना करावा लागेल तेव्हा आपण डगमगून जावू नये. धैर्याने या परिस्थितीचा सामना करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उगाच कुणी म्हंटलेलं नाही, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

जाणुन घ्या जगप्रसिद्ध कंपन्याचे सीईओ मानसिक तणाव कसे हाताळतात

आरोग्यमंत्रा | दिवसभराच्या धकाधकीतून आपण सगळेच मानसिक ताणाला बळी पडतो. सुरुवातीस हा ताण एखाद्या चिमटीसारखा वाटतो परंतु कालांतराने याच तणावामुळे संपुर्ण शरीराची लाहीलाही होते. परिणामी, तुमचे स्वास्थ्य ढासळते, आनंद नाहिसा होतो. हा ताण कोणालाच नाही चुकला. जगप्रसिद्ध अब्जाधिशही याच तणावाला तोंड देतात. फक्त त्यांची यास सामोरे जाण्याची पद्धत निराळी असते. हे एवढेच कारण आहे त्यांच्या अद्वितीय यशाचे.

पाहुया तर जगातील या व्यक्ती मानसिक तणाव कसा हाताळतात ते.

१. शेरील सँडबर्ग

फेसबुकच्या सीईओ शेरील सँडबर्ग यांना रोज नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. एवढ्या मोठ्या कंपनीचा डोलारा सांभाळायचा म्हणजे ताण तर येणारच. म्हणून त्या रात्री झोपताना फोन बंद करुन झोपतात. जेणेकरुन त्यांना वारंवार ई-मेल आणि मेसेजस पाहण्यासाठी रात्री अपरात्री उठावे लागणार नाही.

२. जॅक डॉर्सी

ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी सांगतात, ‘सहसा ताण अनपेक्षित घटनांतून निर्माण होतो. दिनक्रमातील कामांमध्ये जितके सातत्य असेल तितका तणाव कमी होतो.’ ते आपल्या दिवसाची आखणी आधीच तयार करुन ठेवतात. म्हणजे अवेळी येणाऱ्या अडथळ्यांमुळे चिडचिड होत नाही..

३. सुझॅन वॉचिस्की

व्यस्त दिनक्रमामुळे उद्योजकांकडे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होते. परंतु, युट्युबच्या सीईओ सुझॅन वॉचिस्की दिवसभरातला ताण दूर करण्यासाठी स्वतःसाठी वेळ राखून ठेवतात. यातून त्यांना फक्त मनःशांतीच नाही तर बऱ्याच प्रश्नांचा उलगडाही होतो.

४. टिम कूक

अॅपलचे सीईओ टिम कूक यांना समीक्षक जगातील सर्वात मोठी डोकेदुखी वाटते. आजकाल प्रत्येकजण आपले मत, विचार आणि समीक्षण समोरच्यावर लादत असतो. अशी बिनबुडाची बोलणी वेळीच दुर्लक्षित करावी नाहीतर ती आपल्या मेंदूत कॅन्सरसारखी जखडून बसतात. याने तुम्हाला भोवतालच्या नकारात्मकतेस डावलून प्रगती करण्यास मदत होते.

५. मेग व्हिटमन

P & G, eBay आणि ह्युलेट पॅकार्ड (Hewlett-Packard HP) यासारख्या नामवंत कंपन्यांच्या सीईओ राहिलेल्या मेग व्हिटमन सांगतात की, ताण कमी करण्यासाठी त्या आपल्या मुलासोबत फ्लाय फिशिंग करण्यासाठी जातात. संशोधनातही असे आढळून आलेय की अवांतर छंद जोपासल्याने मनावरील ताण कमी होतो.

आॅफिसला जातानाही दिसा फॅशनेबल!

सौंदर्यसाधना | आॅफिसला काय घालून जावं? असा प्रश्न अनेकजणींना रोजच पडतो. आॅफिसला जाताना साधे सुधे जरा कमी फॅशनचे कपडे घालण्याकडेच अनेकींचा कल असतो. आॅफिस म्हणजे कॅज्युअल लुक इतकं हे समीकरण घट्ट झालं आहे. पण कधीकधी कंटाळा आणणारं हे समीकरण ब्रेक करता येतं. तशी सोय ‘आॅफिस वेअर फॅशन’नं दिली आहे. आता ही कुठली नवी फॅशन? असा प्रश्न पडला असेल तर नेटवर जावून शोधा. शोधलं की फॅशनच्या जगात आॅफिस लूकसाठीही फॅशनचे कपड्यापासून त्यावर घालायच्या दागिन्यांपर्यंत असंख्य फॅशन उपलब्ध आहे. फॅशन म्हणजे चमकढमक, चंकीफंकी लूक नसून आपलं नैसर्गिक रूप उठावदार दिसेल यासाठी कपड्यांपासून मेकअपपर्यंत उपलब्ध असलेले पर्याय म्हणजेच फॅशन. आॅफिस म्हणजे कामाची जागा. दिवसभरात कामानिमित्त अनेक लोकांना आपण भेटत असतो. कामानिमित्त बाहेर वावरत असतो. त्यामुळे आपला लूक कसाही ठेवून चालत नाही. आपल्याला आणि आपल्याला भेटणा-यालोकांना आपल्याकडे पाहून छान वाटावं यासाठी आपण काही प्रयत्न करायला हवेत. यासाठी आॅफिस वेअर फॅशननं अनेक पर्याय तुमच्यासमोर ठेवले आहेत. त्यातला तुम्हाला कोणता आवडतो ते पाहा!

. आॅफिसमध्ये घालून जाण्यासाठी फुलांचे आकर्षक डिझाइन असलेले कपडे उठावदार रंगात बाजारात उपलब्ध आहे.

. इनकॉर्पोरेटिंग प्रिण्टस हा प्रिण्टसचा नवा प्रकार उपलब्ध आहे. भडक आणि मोठ्या आकारातल्या प्रिण्टसमुळे आॅफिसमध्ये व्यक्तिमत्त्व खुलून दिसतं. शिवाय आॅफिसमध्ये अचानक एखादा कार्यक्रम निघाला किंवा छोटी मोठी मीटिंग असली तर या प्रिण्टसचे कपडे घालणं हा उत्तम पर्याय ठरतो.इनकॉर्पोरेटिंग प्रिण्टसचे टॉपस घातलेले असतील तर त्यावर ब्लेझर घालावं हेच कपडे घालून आॅफिसच्याच कामासाठी कुठे संध्याकाळी जायचं असेल तर ब्लेझर काढून गळ्यात एखादा नाजूकसा दागिना घालावा. आॅफिससाठी ही फॅशन उत्तम

. पेस्टल रंगाचे टॉप्स, त्यावर काळ्या पांढ-या रंगाचं ब्लेझर, गडद रंगाची फ्लेअर्ड पॅण्ट, कमीत कमी दागिने ही फॅशन आॅफिससाठी अनेकजणी फॉलो करता आहेत. फारच घाई असली तर पांढ-या आणि काळ्या रंगाचं कॉम्बिनेशनही उठून दिसतं.

. पूर्वी स्कर्ट हे आउटिंगसाठी किंवा कार्यक्रमासाठीच वापरले जायचे. पण आता आॅफिसला जाताना पायाच्या घोट्यापर्यंतचे पेन्सिल स्कर्टस, त्यावर शोभेल असा टॉप आणि त्यावर पॉलिश्ड् दागिनेही घालता येतात. शुक्रवार-शनिवार या दिवशी आॅफिसमध्ये काम असलं तरी सर्वजण येणा-या रविवारमुळे रिलॅक्सड मूडमध्ये असतात. तेव्हा शुक्रवार पाहून अशी फॅशन करायला काहीच हरकत नाही.

. गळ्यातल्या स्कार्फवजा स्कार्व्हसमुळेही आॅफिसमध्ये हटके लूक मिळू शकतो. यासाठी कमी डार्क शेडचे कपडे आणि त्यावर जरा भडक रंगाचे स्कार्व्हस उठाव आणतात.

. एखाद्या महत्त्वाच्या कॉर्पोरेट मीटिंगमध्ये जायचे असेल , तिथे आपलं व्यक्तिमत्त्व जरा रूबाबदार दिसायला हवं असं वाटत असेल तर केप्स आणि लॉंग जॅकेटस घालावेत.

प्रेम आणि करिअर

लव्हगुरु | गौरी नारायण मोरे

श्रावणातल्या सरी नुकत्याच सुरु झाल्या होत्या, तो मातीचा खरपूस वास जिभेला पाणी आणून सोडत होता. रूमवर जाऊन गरमागरम चहा आणि कुरकुरीत कांदाभजी चा बेत करावा म्हणून ऑफिस मधून लवकरच पाय काढला. मुंबईच ट्राफिक म्हणजे जणू तारेवरची कसरतच. ती करत करत रूमवर पोहचले. आलिशाने दरवाजा उघडायला खूप वेळ लावला. माझ्या जिभेवरची चव विरुनच गेली होती. रागाने माझा चेहरा एकदम लालबुंद झाला होता. दार उघडताच माझ्या शब्दाचे मार तिच्यावर होण्याआधी तिच्या चेहऱ्यावरचे निस्तेज भाव तिची ढाल बनून माझ्यासमोर उभे राहिले. मी माझ्या शब्दांचा आवंढा तिथेच गिळला. खूप प्रयत्नांनी मी तिच्या भावनांना वाट मोकळी करून देऊ शकले. तिच्या बोलण्यावरून इतकाच कळलं होतं की तिझ ब्रेकअप झालंय.

बघायला गेलं तर आलिशा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहानच. तिचा स्वभाव एकदम वेगळा हट्टी, बिनधास्त, जगाशी अपडेटेड, 24 तास ऑन लाईन राहून फेसबुक, व्हाट्स अप, इंस्टा ला पिक अपडेट करणार. गेल्या महिन्यातच ती मला सुजय बद्दल सांगत होती. सुजय तिचा फेसबुक वरचा फ्रेंड. Hii hello नंतर मैत्री वाढत गेली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आता ब्रेकअप.

मग असा प्रश्न पडतो प्रेम करायचाच नाही का? आयुष्यात नक्की कशाला प्रायोरिटी द्यायची? मला वाटत प्रेम हे भावनांशी जोडलं गेलं आहे तर करिअर हे तत्वांशी. आयुष्य जगताना भावना आणि तत्व दोन्ही महत्वाची असतात. या धावपळीच्या जगात दोन क्षण सुखाचे घालवण्यासाठी आपुलकीची माणसं हवीतच. आपल्यावर प्रेम करणारी, जीवाला जीव लावणारी, हक्काने रागावणारी, आपल्यावर रुसणारी मानस तर नक्कीच हवी आहेत. त्यामुळं आयुष्यात प्रेम हे केलंच पाहिजे. पण प्रेमाच्या ओघात वाहून न जाता जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टींची अावश्यकता आहे त्या पूर्ण केल्या पाहिजेत आणि यामध्ये पहिला नंबर लागतो तो करिअरचा. आयुष्य जगताना प्रेमाला आणि करिअर ला एकाच तागाड्यात तोलायला काही हरकत नाही. प्रेमाचा करिअर वर आणि करिअरचा प्रेमावर शून्य मात्र परिणाम पडता कामा नये. प्रेमात कोणत्याही टर्म्स आणि कंडिशन नसल्या पाहिजेत. कोणत्याही नात्याचं बंधन नसावं, हक्काची भाषा नसावी, ज्याची त्याला स्पेस असावी तरच नातं खोलवर आणि घट्ट रुजत.

आयुष्यात करिअर हे भरल्या ताटाप्रमाणे असावं आणि प्रेम हे ताटातल्या लोणच्याप्रमाणे असावं. जेवढं मुरेल तेवढं त्याची चव खुलवणार. अस्तित्व छोटं पण जाणीव मोठी, त्यामुळं प्रेम भरभरून ओसंडून केलं पाहिजे ना फक्त माणसावर नाही तर करिअर वर, गुरा ढोरांवर, वाहत्या पाण्यावर, निसर्गावर, निर्जीव दगडावर आणि सर्वांत महत्वाचं स्वतःवर…

गौरी मोरे

तुमच्या प्रमोशन ने ऑफिसमधील लोक जळत आहेत? मग त्यांना असे सांभाळा..

लव्हगुरु | ऑफिसमध्ये असे अनेक लोक असतात ज्यांना दुसऱ्यांचं यश पचणी पडत नाही. तुमच्या बॉसने तुमचं कौतुक केलं तर काहींच्या पोटात जोरात दुखायला लागतं. अशात तुमच्या जर हे लक्षात आलं तर ते तुम्हाला त्रासदायक ठरतं. अशावेळी काही टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला होणारा त्रास तुम्ही कमी करू शकता.

१) बॉसने एखाद्याचं कौतुक केल्यास काहींना याचा त्रास होतो आणि त्यामुळे ते लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतात. काहींच्या अशा वागण्यामुळे ऑफिसमधील वातावरण बिघडतं. यामुळे होणारा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही स्वत: एक टीम म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याचा प्रयत्न करा. कामासंबंधी बोलणं करा. त्यांना तुमचा सकारात्मकपणा दाखवा. काही दिवसांनी परिस्थिती बदलेल.

२) जर आधीपासूनच काही लोक तुमच्यावर ‘जळतात’, तुमच्यावर राग धरून असतात तर अशावेळी परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला संयमाने काम करावं लागेल. आपल्या शब्दांवर कंट्रोल ठेवायला हवा. तुमचा एक चुकीचा शब्द तुमच्या विरोधात त्यांच्यासाठी शस्त्र ठरू शकतो. याने ऑफीसमध्ये तुमची इमेज बिघडण्यास कुणीच रोखू शकणार नाही.

३) जर तुमच्या काही लोक ‘जळत’ असतील आणि यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर अशांसोबत तुम्ही केवळ कामापुरतं बोला. पण जर तुमचा सिनिअरच तुमच्यावर ‘जळत’ असेल तर इथे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. अशावेळी काही गैरसमज असतील तर संवाद साधून ते दूर करावेत.

४) तुमचं जर बॉसने भरभरून कौतुक केलं किंवा तुम्हाला इतरांपेक्षा अधिक बोनस दिला किंवा प्रमोशन दिलं तर ही गोष्ट ओरडत कुणाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला जरी याने आनंद झाला असला तरी तुमच्या या वागण्याला काही लोक गर्व समजू शकतात. यामुळे काही लोक तुमच्या विरोधात जाऊ शकतात.

५) ऑफीसमध्ये जर तुमच्या सहकाऱ्याची काम करण्याची पद्धत किंवा त्यांची एखादी कल्पना आवडली नाही तर तुमच्या डोक्यातील कल्पना त्यांच्यासमोर ठेवा. त्यांना काही सजेशन्स द्या. पण त्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करू नका.

स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट

स्पर्धापरिक्षा अभ्यासनिती | नितिन ब-हाटे

कोणताही खेळ जिंकण्यासाठीच खेळला पाहिजे, आणि जिंकण्यासाठी त्या खेळाचे सर्व नियम आणि डावपेच माहीती पाहिजेत, मागील लेखात आपण स्पर्धापरिक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा याबद्दल जाणुन घेतले, आता स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट समजुन घेऊ

“सुर्य आणि सुर्याखालचे सर्व काही” असा अभ्यास असलेली परिक्षा म्हणुन या परिक्षांकडे पाहिले जाते, या परिक्षांचा आवाका मोठा आहे आवाका समजण्यासच प्रथम काही काळ जातो त्यानंतर हा अतिप्रचंड अभ्यासक्रम आवाक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रयत्न वस्तुनिष्ठ आणि नियोजनबद्ध असावा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा परिक्षार्थींनी अट्टाहास कायम ठेवावा परंतु वेळ आणि वेगाच्या मर्यादा लक्षात घेऊन कमी वेळेत जास्त अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी योग्य रणनीती कायम उपयोगी ठरते.

स्पर्धापरिक्षा वेळ, वेग आणि आक्रमकता या त्रिसुत्री मध्ये पार करणारा उमेदवार लवकर यशस्वी होऊ शकतो, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त वेगाने अभ्यासक्रम पूर्ण करणे, जास्तीत जास्त उजळणी करणे, सराव चाचण्या देणे, अपयश आले तरी त्याचं आक्रमकतेने पुन्हा लढत राहणे हेच यशाचे गमक आहे.

स्पर्धा परीक्षांची योग्य रणनीती आखण्यासाठी पुढील चौकट आहे

. आयोगाचा अभ्यासक्रम(UPSC, SSC, MPSC)

. मागील वर्षी विचारलेले प्रश्न आणि चालु घडामोडी

. सराव चाचण्या

. स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखुन मार्गक्रमण

आयोगाचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षी विचारलेले प्रश्न या आधारे स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखुन सध्या घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी याआधारे रणनीती बनवायची असते

उदाहरणार्थ जी परिक्षा टार्गेट करावयाची आहे तीचा प्रथम अभ्यासक्रम पाठ करुन घ्यावा ,मग या परिक्षेच्या आधी झालेल्या प्रश्नपत्रिका बारकाईने अभ्यासाव्यात त्यानुसार प्रत्येक घटकाची पुस्तके/अभ्याससाहित्य निवडावे आपल्याला समजणारे आणि न समजणारे यानुसार प्रत्येक घटकाला कमी जास्त (आपल्या क्षमता आणि मर्यादा नुसार) महत्त्व देऊन अभ्यास करावा. सर्व अभ्यास मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषण करता करता चालु घडामोडी वर लक्ष ठेवीत करीत रहावा.

स्पर्धापरिक्षांमध्ये चालु घडामोडीनां विशेष महत्व असते त्यामुळे चालु घडामोडी आणि त्याची बेसिक संकल्पना अशा जोडीत अभ्यास असावा

अशारीतीने तीनवेळा व्यवस्थित वाचन आणि बर्याचदा रिव्हीजनस् झाल्यावर जमेल तेवढ्या स्वतःवेळ लावुन सराव चाचण्या दयाव्यात, चाचणी झाल्यावर बरोबर/ चुक प्रश्नांचे पर्यायाने त्या घटकांचे विश्लेषण करावे चुकत असलेले घटक सुधारण्याचा प्रयत्न करीत रहावा. बरोबर घटकांची उजळणी करीत रहावे.

वरील चौकटीमध्ये स्पर्धापरिक्षाच्या अभ्यासाची रणनीती असावी.

“सध्या स्पर्धा परिक्षां मध्ये अभ्यासाच्या विषयानुरूप खोली पेक्षा अभ्यासाचा परिघ विस्तार अधिक आहे म्हणजे तुम्हाला एखाद्या विषयाच्या खोलवर ज्ञाना पेक्षा अधिकाधिक विषयांचे विश्लेषणात्मक ज्ञान असणे अपेक्षित आहे”

“Patience, Persistence and Perspiration make an unbeatable Combination for Success – Nepolean Hill.”

तुमच्या प्रवासात तुमची स्वत:च्या अभ्यासावरील आणि मार्गदर्शकावरील निष्ठा कायम असावी , म्हणजे स्पर्धापरिक्षेतील यश लवकर मिळते.

 

नितिन ब-हाटे.
9867637685
(लेखक ‘लोकनीति IAS, मुंबई’ चे संचालक/ मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत.)

UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती | नितिन ब-हाटे

स्पर्धापरिक्षांची तयारी करावी आणि शासकीय सेवेत सिलेक्ट व्हावे अशी अनेकांची इच्छा असते परंतु नेमकी तयारी कधी सुरू करावी याबद्दल स्पष्टता नसते. हा अभ्यास कधी सुरू करावा याची माहिती स्पर्धापरिक्षा लेखमालेच्या या दुसर्या लेखात घेऊ. स्पर्धापरिक्षांचा द्यायच्या आहेत असा ठाम निर्धार झाला कि,

१.स्वत:च्या क्षमता आणि कमतरता , 
२. UPSC/MPSC आयोगाच्या अपेक्षा 
३. अधिकारी होण्यासाठी लागणारी प्रवृत्ती आणि कल

इत्यादी गोष्टींचे बारकाईने विश्लेषण करावे. त्यातील अंतर आणि मेहनतीची आवश्यकता लक्षात आली की लगेच अभ्यास सुरू करावा. “अर्ली बर्ड, रीचेस अर्ली” या उक्तीप्रमाणे ‌जेवढ्या लवकर अभ्यास सुरू कराल तेवढ्या लवकर यशोशिखर गाठाल.

) १० वी नंतर – हा टप्पा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खुप लवकर होतो, या टप्प्यावर स्पर्धापरिक्षांची तोंडओळख करुन घेता येईल त्यानुसार विस्तृत वाचनाची सवय लावणे, स्वतःच्या सवयींवर काम करणे, भोवताल आणि स्व: समजुन घेणे इत्यादी गोष्टी करता येतील. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्याला काय आवडते आणि काय चांगले जमेल याचा शोध घेऊन आपला सक्षम शैक्षणिक आलेख तयार करणे अपेक्षित आहे

) १२ वी नंतर – स्पर्धापरिक्षाच्या अभ्यासाची सुरुवात करण्याचा हा सर्वात उत्तम काळ आहे. ज्यात पदवी मिळताना तुमच्याकडे पोस्ट असण्याची संधी आहे. बारावी नंतर अभ्यास सुरू केल्यावर आपणास 3/4 वर्ष मिळतात परिक्षा न देता फक्त अभ्यास करता येतो(पदवी अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता). हे 3/4 वर्षे रणनीती आखुन नियोजनबद्ध अभ्यास पुर्ण करता येतो .सामान्य अध्ययनातील सर्व संकल्पना समजुन घेणे. या पहिल्या ते तिसर्या वर्षांपर्यंत अनुक्रमे बेसिक, NCERTs आॅप्शनल/‌HRD, निबंध,Ethics , मेन्स, प्रिलिम असा सर्वांंगीण आणि संपुर्ण अभ्यास करता येतो .स्वत:च्या विकासावर लक्ष देता येते तसेच आपापल्या क्षेत्रात आपण तज्ज्ञ होणेही येथे अपेक्षित आहे.

) पदवीच्या शेवटच्या वर्षाला- हा अभ्यास आव्हानात्मक असतो. पदवीला उत्तम मार्क्स मिळवून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा असतो. या स्टेज वर दोन्ही आघाड्यांवर लढत रहावे लागते, अभ्यासाचे योग्य नियोजन आवश्यक आहे.

) पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर – सर्वाधिक परिक्षार्थी या स्टेजवर अभ्यास करतात. घरची आर्थिक परिस्थिती ठिक असल्यास पुर्ण वेळ अभ्यास करता येतो . पण तो कमी वेळेत ,अधिक वेगात समान आक्रमकतेने पुर्ण करावयाचा असतो . कारण या स्टेज वर लवकरात लवकर आपलं करिअर सेट करण समाजाकडुन अपेक्षित असतं. हा पुर्ण वेळ वापरुन सुरवातीच्या काही प्रयत्नातंच पोस्ट मिळवुन घ्यावी.

) नोकरी करुन – नोकरी करूनही पोस्ट मिळवता येते पण त्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास, मानसिक स्थैर्य आवश्यक असते कारण या स्टेज वर आपली स्पर्धा पुर्ण वेळ अभ्यास करणार्यांशी असते .आपण उत्कृष्ट विश्लेषक आणि निरीक्षक असणे आवश्यक आहे.

UPSC/MPSC आयोगाला वर्षोनवर्षे पुस्तकात डोकं घालून बसणार्या परिक्षार्थीं ऐवजी कमी वेळेत अधिकाधिक आकलन कौशल्ये असणारी तसेच, कामामध्ये नाविन्य शोधणारे चिकित्सक अष्टपैलू परिक्षार्थी अपेक्षित आहेत. ही अपेक्षा पूर्ण केलीत तर मग तुम्ही पदवी दरम्यानच्या कोणत्याही वर्षी तयारी केली तरी निश्र्चित यश मिळवता.

या अभ्यासप्रवासात प्रामाणिक मार्गदर्शक असणे अपरिहार्य आहे कारण, कुठे पोहचायचे हे जरी माहित असले तरी कसे पोहचायचे हे अनुभवी मार्गदर्शकच सांगु शकतो. स्पर्धा परीक्षा ही प्रचंड स्पर्धात्मक असल्याने योग्य दिशा आणि अभ्यास याशिवाय पद मिळविणे अशक्य आहे. सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य दिशेने नियोजन असेल तर वरील पैकी कोणत्याही स्टेज वरील परिक्षार्थी UPSC/MPSC मधुन क्लास वन पदवी मिळवु शकतो.

Something don’t just happen,they happen because somebody decided to make them happen

नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक ‘लोकनिती IAS, मुंबई’ चे संचालक/ मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत.)

“मी कोणत्या सरकारी परिक्षेची तयारी करु…?”

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति, भाग 11 | नितिन बऱ्हाटे

शाळेमध्ये असताना रुबाब करणारे तलाठी भाऊसाहेब, भीती वाटणारे पोलिस काका, “साहेब ” आले, ”साहेबांना विचारुन सांगतो” असं म्हणणारे सरकारी आॅफिसातील क्लर्क यांना पाहिल्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ताफ्यात दिव्याच्या गाडीमध्ये मागच्या सीटवर बसलेले मोठे साहेब व्हायला काय करावं लागतं बरं ? असा प्रश्र्न पडायचा. टि.व्ही. वर पिक्चर पाहताना त्यातील डॅशिंग आॅफिसर पाहून अधिकारशाही बद्दल आपसुकच वर्दी किंवा शासकीय रुबाबाचे आकर्षण सुरु व्हायचे. पण तेव्हा कोणती परिक्षा दिल्यावर कोणता अधिकारी होता येते याची माहिती नव्हती. या लेखात आपण हेच समजून घेणार आहोत.

प्रशासन, पोलिस, राजस्व, टपाल, वित्त, आरोग्य,वीमा अशा विविध सरकारी खात्यांमध्ये किमान बारावी किंवा पदवीच्या पात्रतेवर वर्ग 3 , वर्ग 2 आणि वर्ग 1 चे अधिकारी स्पर्धापरिक्षांद्वारे निवडले जातात. सर्वप्रथम आपण विविध आयोग आणि त्याद्वारे मिळणारी पदे (सेवा) पाहुया.

UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) –

A. 12 वी नंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी साठी प्रवेश परिक्षा,

B. पदवी नंतर

१) अखिल भारतीय सेवा (IAS, IFS (forest), IPS) साठी परिक्षा घेतली जाते, तसेच या परिक्षेतुन परदेश सेवा, राजस्व, रेल्वे, टपाल, ऑडिट अकांऊट, माहीती, काॅर्पोरेट अॅड लाॅ, नागरी वित्त इत्यादी विविध पदांसाठी (सेवा) परिक्षा घेतली जाते. भारतीय वन सेवा आणि यु.पी.एस.सी.ची पुर्व परिक्षा एकत्रच होते. पुर्व, मुख्य (विस्तृत लिखाण) आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत ही परिक्षा वर्ग 1 चं पद मिळवुन देते,
२) Assistant commandant – परिक्षा आणि शारीरिक चाचणी यांच्या आधारावर CAPF, CISF, ITBP, SSB इत्यादी निमलष्करी दलांसाठी वर्ग 1 ची वर्दी मिळवुन देणारी परिक्षा‌ आहे तसेच Combine Defence service ही परिक्षा ही सैन्य,नौदल आणि हवाई दलामध्ये अधिकारी होण्यासाठी घेतली जाते.
‍३) विविध अभियांत्रिकी सेवांसाठी परिक्षा
४) वैद्यकीय सेवांसाठी परिक्षा इत्यादी.
यु.पी.एस.सी‌. मधुन निवडलेल्या अधिकार्यांची नेमणुक भारतात कोठेही संबधित राज्यशासनाच्या अखत्यारीत होते.

MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) –

A. पदवी नंतर

वर्ग 1 पदांसाठी MPSC कडुन UPSC च्या‌ धर्तीवर तीन टप्प्यांत म्हणजे पुर्व , मुख्य (वस्तुनिष्ठ) आणि मुलाखतीद्वारे उपजिल्हाधिकारी, उप पोलिस अधिक्षक, कक्ष अधिकारी, तहसीलदार,महाराष्ट्र वित्त सेवा, परिवहन अधिकारी, निबंधक,नायाब तहसीलदार, कौशल्य विकास अधिकारी इत्यादी पदांवर स्पर्धापरिक्षांद्वारा निवडले जातात,महाराष्ट्र राज्य मध्ये कुठेही नेमणूक केली जाते.

वर्ग 2 (अराजपत्रित) साठी पोलिस उपनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी (मंत्रालय), राज्य(विक्री)कर निरीक्षक इत्यादी तीन पदांसाठी पुर्व आणि मुख्य दोन टप्प्यांत संयुक्त परिक्षा घेतली जाते (PSI साठी शारीरिक चाचणी आणि मुलाखत आहे) वर्ग 3‌ साठी कर सहायक, मंत्रालय क्लर्क यांची संयुक्त परिक्षा,
महीला बाल कल्याण,‌उत्पादन शुल्क, अभियांत्रिकी सेवा किंवा इतर राज्य शासन विभागांसाठी मागणीनुसार ‌पदे भरली जातात

SSC (स्टाफ सिलेक्शन कमिशन) द्वारे बारावी नंतर क्लर्कीकल पदांसाठी आणि पदवीच्या पात्रतेवर केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये वर्ग 2 चे अधिकारी तसेच कर्मचारी स्पर्धापरिक्षांद्वारे निवडले जातात, नेमणूक ‌संपुर्ण भारतात कोठेही होते, कार्यालयीन कामकाजासाठीचे सर्व कर्मचारी हा आयोग निवडते , परिक्षा पुर्व आणि मुख्य (गणित आणि इंग्रजी) अशा दोन टप्प्यांत घेतली जाते.

BANK(IBPS) भारतातील प्रत्येक बॅंक “प्रोबेशनरी अधिकारी” आणि “क्लर्क” या दोन सेवांसाठी जागांच्या मागणी नुसार परिक्षेची जाहीरात देते ही परिक्षा IBPS हा आयोग आयोजित करते . या परिक्षेत गणित , बुध्दिमत्ता चाचणी, जनरल अवेअरनेस, फायनान्स आणि इंग्रजी या विषयांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात.
RBI – बॅकांची बॅंक असलेली RBI, Grade B अधिकारी आणि असिस्टंट या पदांसाठी पुर्व‌ आणि मुख्य (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) अशा दोन टप्प्यांत परिक्षा घेते‌.

विविध शासकीय, निमशासकीय वीमा कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रिय कंपन्या विविध ‌पदवी आणि अनुभव या निकषांवर वेळोवळी पदे भरत असतात त्याततही अनेक संधी आहेत.

तलाठी, ग्रामसेवक या परिक्षा(वस्तुनिष्ठ) संबंधित जिल्हा आयुक्तालय कडुन जागांच्या आवश्यकतेनुसार घेतल्या जातात. तसेच बारावी च्या आधारावर संबंधित पोलिस शहाराकडुन पोलिस/शिपाई सेवेसाठी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा अशा दोन टप्प्यांत परिक्षा घेतली जाते.

वरील सर्व आयोगांच्या वेबसाइटवर जाऊन संबंधित परिक्षांचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आणि परिक्षापद्धती इत्यादी संबधी विस्तृत मध्ये माहीती काढुन योग्य मार्गदर्शन घेऊन तुम्हाला

1. जमणारी

2. आवडणारी आणि

3. समजणारी परिक्षा मेहनत घेऊन द्यावी.

सर्वांकडे समान शाररीक आणि मानसिक क्षमता असते ,” ज्याचा संघर्ष मोठा त्याचे पद मोठे” ही एकच गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ठरवते.
पदवी पर्यंत तुम्हाला किती मार्क मिळाले? , तुम्ही कोठुन आलात ?, तुमच्या घरातले शासकीय सेवेत आहेत का ? तुम्ही अस्सलिखित इंग्रजी बोलता का ? इत्यादी गोष्टी तुमचा वर्ग 3 ते वर्ग 1 पदाचा प्रवास ठरवु शकत नाही, मात्र परिक्षा देण्याचे ठरविल्यानंतर तुम्ही किती जीव ओतुन तयारी करताय ती मेहनत तुम्ही पोलिस शिपाई बनणार की IPS बनणार हे नक्की ठरवते.

Nitin Barhate UPSC MPSC

नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक’लोकनीति IAS, मुंबई’ चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)