Home Blog Page 1074

हॉटेलिंगमधील संधी

घरचं खाऊन कंटाळा आला की, अथवा एखाद्या विशिष्ट प्रसंगाला, हॉटेलमधले चमचमीत खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो. आपल्यामध्ये खवय्ये नावाची एक जात आहे, ती अशा अनेक ठिकाणी फिरून विविध ठिकाणच्या चवी घेऊन जिभेचे चोचले पुरवीत असते. काही वर्षांपासून जेव्हा लोकांच्या उत्पन्नाचा स्तर वाढला, लोकांची हॉटेलिंगची हौस वाढली, तसे हॉटेल या व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. स्पर्धा वाढली आणि यातून ‘हॉटेल मॅनेजमेंट’ या करिअरचा जन्म झाला.

हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग खरंतर अनुभवसिद्ध करिअर आहेत. यात तुमचं वेगळंपण सिद्ध करावं लागतं आणि त्यावर तुमचं यश अवलंबून आहे. बऱ्याच लोकांना चांगलं जेवण करून लोकांना खायला घालायला आवडतं. त्यामुळे खरंच जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटसंबंधित क्षेत्रात करिअर करायचे असेल तर त्याचा शास्त्रीय अभ्यास करणं गरजेचं आहे.

आपल्या देशात उत्पन्नाची वाढती पातळी पाहता, येथे हॉटेल या व्यवसायाला खूप संधी आहे. या क्षेत्रात साधा ढाबा उघडून पुढे स्वत:चे पंचतारांकित हॉटेल किंवा हॉटेलची चेन उघडल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. यातून प्रेरणा घेऊन मराठी मुलांनी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात स्वयंरोजगारासाठी उतरण्यास हरकत नाही.
हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळविण्याकरिता दोन अभ्यासक्रम असतात.

१. बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (चार वर्षे) : या अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनतर्फे होणारी कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट (सीमॅॅट) देणे आवश्यक असते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपही मिळते.
२. बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (तीन वर्षे) : या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याकरिता कोणतीही प्रवेश परीक्षा देण्याची बंधने नाहीत. या अभ्यासक्रमात प्रत्यक्ष प्रवेश घेता येईल. याशिवाय, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये दीड वर्षाचा डिप्लोमा कोर्स करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

विद्या शाखा व अभ्यासक्रम

फ्रंट आॅफिस मॅनेजमेंट : या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये येणाºया पाहुण्यांचे प्रवेश होण्यापासून तर बाहेर जाईपर्यंत दिल्या जाणाºया सर्व सेवा शिकविल्या जातात. चेक-इन, चेक-आउट, रूम प्रोव्हायडिंग, बिलिंग या सर्व घटकांच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते.

हाउसकीपिंग : या अंतर्गत हॉटेल क्लीनिंग, हॉटेल मेंटनन्स याबद्दल शिकविले जाते; शिवाय ग्राहकांना लंच, डिनर व त्यांच्या इतर गरजा व सुविधा देण्याबाबत शिकवले जाते.

फूड अ‍ॅण्ड ब्रेवरेज प्रॉडक्शन : या विद्या शाखेत प्रथमत: बेसिक फूड आणि ड्रिंक्स बनविणे, नंतर कॉन्टिनेन्टल फूड आणि ड्रिंक्स बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या दोन विषयांचे प्रशिक्षण दिल्यानंतर क्वांटिटी फूड बनविणे शिकविले जाते. फूड अ‍ॅण्ड ब्रेवरेज सर्व्हिस : या अभ्यासक्रमात हॉटेलमधील ग्राहकांकडून फूड आणि ड्रिंक्स यांच्या आॅर्डर्स घेणे व सर्व्ह करण्याची योग्य पद्धत हे घटक त्यात येतात.

मागच्या वर्षी प्रिलिम्स निघाली होती..यावर्षी ती पण नाही ?? मग हे वाचाच

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति, भाग ७| नितिन ब-हाटे 

“हारने वालो का भी, अपना एक रुदबा होता हैं,
अफसोस तो वो करे, जो दौड मैं शामील ना थे “

या‌ थाटात तुम्ही रममाण असाल तर आत्मपरीक्षण(self-introspection) करण्याची नितांत गरज आहे, कारण आपण ज्या दौड मध्ये शामील झालो आहोत तिथं आपण नेमके कुठे आहोत, आपल्या पुढे किती स्पर्धक आहेत?, आपण आधीपेक्षा किती प्रगल्भ झालो आहोत ?, या‌ वयात आपण कुठे असणार होतो?, ही दौड कधी संपणार आहे?, आपले अटेम्ट का राहतायत?, पोस्ट निघणारं‌ वर्ष नेमके कोणते आहे? या सर्वांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तरच रुदबा(पद) मिळेल. नाहीतर जिदंगीभर अफसोस करावा लागेल, हारणं कधीच वाईट नाही पण “का हारलो…?” हे न शोधणं खुप वाईट आहे. या लेखात ते शोधण्याचा प्रयत्न करु…

स्पर्धापरिक्षेची दौड सामुहिकरित्या भासत असली तरी वैयक्तिकच आहे, “जागा कितीही येऊ दे मला एकचं पोस्ट पाहिजे….”, “यावर्षी आपली पोस्ट फिक्स….”असं सामुहिकरित्या चहाच्या कट्ट्यावर बोलुन वैयक्तिक पातळीवर कृतीत आणलं नाही तर चहाचा कट्टा बदलावा लागतो. याउलट पोस्ट मिळवणारे वैयक्तिक पातळीवर चालु घडामोडी अपडेट्स करीत असतात, वाचलेल्या गोष्टी रिव्हाईस करीत राहतात, स्वतःच्या चुकांवर आणि कमतरतांवर काम करीत राहतात. त्यांचा प्राधान्यक्रम ठरलेला असतो,‌ विचारांची स्पष्टता, कामातील सातत्य, अभ्यासाचे नियोजन, निर्णयातील समतोलपणा, विचार(thought) आणि कृती(action) मधील कमी करत गेलेलं अंतर त्यांना पोस्ट मिळवुन देतं, आणि नंतर तेच चहाच्या कट्ट्यावर चर्चेचा विषय ठरतात, “तो आमच्या अभ्यासिकेत होता, आज IAS/DC आहे.”

इतर महत्वाचे –

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-2019 जाहीर

तुम्ही सुंदर डान्स करता? मग त्यातच करिअर करा

आता तुम्ही परिक्षेच्या कोणत्या टप्प्यावर आहात आणि का आहात ….? मागच्या वेळेस प्रिलिम निघाली होती यावर्षी तर तीपण का नाही निघाली……? काहीतरी चुकतंय…? याचं कारण तुमच्या आतापर्यंतच्या केलेल्या अभ्यासात, वाचलेल्या पुस्तकात आणि घेतलेल्या निर्णयात आहे. मार्गदर्शक निवडीपासुन रुम, मेस, जागा, अभ्यासमित्र, पुस्तके, विषय आणि पदापर्यंत…..या सर्वांच्या निवडीत आहे. स्वतःच्या स्वभाव, सवयी, अभ्यासपद्धती इत्यादीचं आकलन होणं गरजेचं आहे

UPSC/MPSC मध्ये 3/4 वर्षे गुंतवणूक केल्यानंतर वेळोवेळी स्वःताचे आत्मपरीक्षण(SWOT analysis) केले पाहिजे कारण आपल्या प्रयत्नाच्या दिशेत धोलपुर हाऊस किंवा यशदा लागणार नसेल तर प्रवास व्यर्थ आहे,
रिझल्ट येतं नाही म्हणजे अपुरे प्रयत्न, कमी मेहनत, नकोत्या गोष्टीमध्ये वेळेचा अपव्यय, चुकीची अभ्यासशैली, संकल्पनांची अस्पष्टता, बेसिक माहितीचा अभाव, कामातील आळस, पेपर सरावातील चालढकल, चुकीच्या वेळेत चुकीचा विषय, अभ्यासाची चुकीची दिशा, योग्य मार्गदर्शकाचा अभाव, एकाच वेळी दोन दगडांवर पाय, आणि अनियमितता ही कारणं स्पष्ट आहेत. बाकी यावर्षी जागा आलेल्या नाहीत, नोटीफिकेशन आले नाही, मन लागत नाही, घरुन फोन आला होता, पैशाचा प्राॅब्लेम चालु आहे, पेपर कठिण काढला होता ही सगळी कारणं दुय्यम आहेत. कारण यश‌ फक्त त्यांनाच मिळते ज्यांना त्याची खरचं गरज आहे.

आता हे चक्रव्यूह भेदायचंय, यशाचा गुलाल उधाळायचाय..?…..नेमके काय शोधता येईल…?? काय करता येईल..??

१) “प्रथम आपलं चुकतंय हे स्विकार/मान्य करणे आणि काय चुकतंय ते शोधुन त्यांच्यावर लगेच काम करणे” म्हणजेच उपलब्ध वेळ, राहिलेला अभ्यास, प्राधान्य, ‘य’ पोस्ट मिळण्याची शक्यता इत्यादी चौकटीत नियोजन करणे. वेग , वेळ आणि आक्रमकता यानुसार काम करावे लागेल.

२) स्वतःचं चिकित्सक विश्लेषण(Critical Analysis) करुन संकल्पनांची स्पष्टता, तथ्यांचे पाठांतर, वाढलेला बुध्द्यांक , प्रगल्भतेचा स्तर इत्यादीचा अंदाज घेऊन कमकुवत विषय सरासरी पातळीवर आणणे आणि स्ट्राॅन्ग विषय अधिक पक्के करणे .

३) सावध‌ ऐका पुढल्या हाका….- स्पर्धापरिक्षामध्ये परिक्षा आणि स्वतःला समजुन घेतल्या शिवाय यश मिळणार नाही, आयोगाला अपेक्षित काय आहे माझी ते द्यायची किती तयारी झाली आहे ?अजुन किती द्यावं लागेल ? त्यासाठी आयोग आणि मी यांच्या अपेक्षांमधील अंतर कमी केलं पाहिजे.

४) भावनात्मक मजबुत – यश अपयश दुय्यम आहे, या प्रवासात तुम्ही स्वतःला सादर कसे करता, अपयश आलं तरी तुमच्यातला लढण्याचा आत्मविश्वास किती परिपक्व आहे , कौटुंबिक किंवा खाजगी आयुष्यातील समस्या कुशलतेने हाताळण्याच कसब तुमच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे, मानसिक आणि भावनात्मक दृष्टीने सक्षम असणे आवश्यक आहे.

५) कुछ नया चाहिऐ- रटाळ आणि चाकोरीबद्ध दिनक्रमामुळे अभ्यासात तोचतोचपणा आलाय का?? त्याच त्याच गोष्टी दिल्या की त्याचं गोष्टी रिटर्न मिळतात, दररोजच्या कामात नाविन्य शोधलं पाहिजे, वेळेनुसार लवचिक राहता आलं पाहिजे त्यामुळे पुर्ण प्रक्रिया एन्जाॅय करता येते.

६) आर्थिक चणचण – “२५ पर्यंत क्लासवन ,नंतर मिळेल ती पोस्ट” असे मार्गक्रमण असेल तर उपलब्ध वेळेनुसार काम झालं नाही त्यामुळे प्राधान्यक्रम बदलला हे सिद्ध होते, त्यात आर्थिक पेच आला तर लवकर जाग येणं आवश्यक आहे कारण या दुखण्याला इलाज म्हणजे एक वर्षाच्या खर्चाची सोय करणे, बचत करुन ठेवणं किंवा स्वतः कमवणे‌ आणि अपेक्षित कालावधी मध्ये पोस्ट मिळवुन मोकळं होणं. ठराविक वेळेनंतर नोकरी करुन अभ्यास करता येतो.

७) अधिकारीपणाच भुतं – अधिकारी होण्याआधीच बडेजाव करत हिडंण, मोठी पुस्तक घेऊन मिरवणं, रात्ररात्र भाषणांची तयारी करणं, विविध चर्चासत्रामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा अतिरेक करणं इत्यादी भुतं उतरणे खुप अगत्याचे आहे. दहावी ला बोर्डात येण्यासाठी जसा जीवतोडुन अभ्यास केला होता तसा आता ही परिक्षा पास करण्यासाठी अभ्यास केला की पोस्ट मिळते.

८) मन रमत नाही(Isolation vs social)- लग्नसोहळा, पार्टया, कार्यक्रम इत्यादींमध्ये वाववरणं कठिण वाटतयं, करिअरसंबंधी प्रश्र्नांची उत्तर देता येत नाही तर मग काही काळ भुमिगत व्हा, पण मग त्यात तुमचा सोशल आत्मा हरवु देऊ नका, तुम्ही नेमके सोशल राहिलात की अभ्यास एन्जाॅय करता कि अलग(Isolate)होऊन ते शोधायला पाहिजे. मी नेमका बहिर्मुख (extrovert)व्यक्ति आहे की अंतर्मुख (Introvert) व्यक्ति आहे हे माहिती पाहिजे.

९) व्यक्तिगत दोष(Personality Error) – स्पर्धापरिक्षांचा संघर्ष व्यक्तिगत दोष दुरु केल्या शिवाय लढता येणार नाही, चुकीची जडलेली सवय, अहंकेद्री वृत्ती, बेजबाबदारपणा आणि इतर दोष दुर करण्यासाठी दररोज स्वतःवर काम करावं लागेल. निवड झालेला एक व्यक्ति एक “संस्था” म्हणुन घडलेला असतो ज्याच्या मनगटात आयुक्तालय, संपुर्ण जिल्हा सांभाळण्याची ताकद असते.

१०) स्वांन्त सुखाय(Psudo self entertainment)- वरील कोणत्याच पैलुवर काम केलं‌ नाही तर आपण आपल्या भोवती निर्माण केलेल्या स्वांन्त सुखाय रिंगणात स्वमनोरंजन करीत बसतो तयारी चालु आहे, एवढं संपलं एवढं राहिलं, यावर्षी नक्की पोस्ट निघेल असं वाटतंय ……इत्यादी मनकल्पना आखित बसतो याउलट ठोस आणि स्पष्ट दिसणारा अभ्यासाची ब्लु प्रिंट तयार असेल तर आपल्याच विश्वात रममाण फुग्याला वास्तवाची टाचणी टोचुन फोडता येते.

या रिंगणातुन लवकर बाहेर पडणे अपेक्षित आहे कारण या प्रक्रियेत‌ तुमचा वेळ निघुन जात असतो, इथे तुम्ही एकटे नसता, तुमच्या सोबत तुमचे आई-वडिल, बहिण, भाऊ ‌, जोडीदार, कुटुंब ,तुमचा समाज, आणि पुर्ण गाव गुंतलेला असतो, तुमच्या यशाचा फायदा तुमच्या गावतील शेवटच्या वेशीवरील लहान लेकराला होणार असतो. नंतर ठरविलेल्या गोष्टींना खुप अंतर असते, आज स्वतःवर काम केलं‌‌ नाही तर उद्या समाजावर काम करता येणार नाही, आज तुम्ही पोस्ट साठी अभ्यास करीत नसाल तर उद्या पोस्ट मिळणार नाही हे नक्की आहे.

अब हवाएँ ही करेंगी रौशनी का फ़ैसला
जिस दिए में जान होगी वो दिया रह जाएगा- महशर बदायुनी

Nitin Barhate UPSC MPSC

नितिन ब-हाटे

9867637685
(लेखक ‘लोकनीति IAS, मुंबई ‘ चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)

भाषांतरातही करिअर आहे..!

करिअरमंत्रा | जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग कवेत आले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात भाषांतराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतीच्या किंवा सामाजिकतेच्या सीमा ओलांडून नवनवीन ज्ञान प्राप्त करणे, हा कुठेतरी सर्वांसाठी उत्सुकतेचा किंवा ज्ञानाचा विषय ठरला आहे. एखाद्या विशिष्ट भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये जो काही आशय किंवा मजकूर असेल, त्याला त्या विशिष्ट भाषेतील लोकांना कळेल, अशा शब्दांमध्ये गुंफून त्या आशयाची बांधणी करणे, म्हणजेच भाषांतर होय. एका भाषेमधून दुसºया भाषेमधील आशय किंवा मजकूर, त्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता दुसºया भाषेत अनुवादित करणे, म्हणजेच भाषांतर होय. मात्र, यासाठी दोन्ही भाषांचे सर्वांगीण ज्ञान भाषांतरकाराला असायला हवे. यामध्ये जर तुम्ही प्रावीण्य मिळवले तर तुमच्यासाठी संधीचे भांडार खुले आहे.

प्रशासकीय कार्य हे एका विशिष्ट भाषेतून चालते मात्र, इतर भाषांमध्येसुद्धा त्याचे भाषांतर करण्याची गरज भासते. भारताचाच विचार केला, तर भारतात विभिन्न राज्यांमध्ये भिन्न भिन्न भाषा बोलल्या जातात आणि त्या त्या राज्याचे कार्य त्या त्या भाषेतून होत असते. केंद्र सरकारचे काम हिंदी किंवा इंग्रजी या भाषांमधून होते, तर राज्य सरकारचे काम स्थानिक भाषेमधून होते (उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर शासकीय कार्य हे मराठीतून होते). मग अशा वेळेला वेगवेगळे कागदपत्र, दस्तावेज यांचे भाषांतर करण्याची गरज भासते. अनेक वेळा सरकारी कचेरीमधून म्हणजेच कोर्टकचेरीमधूनही भाषांतराची गरज भासत असते.
विविध कायद्यांची अंमलबजावणी करत असताना त्या कायद्यांचे रूपांतर त्या विशिष्ट भाषेमध्ये करून मगच ते लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे शासकीय अनुवाद हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याला प्रशासकीय अनुवादाची जोड आहे.

जाहिरातीचे भाषांतर

बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतामध्ये प्रवेश केल्यापासून त्यांच्यासाठी बाजारपेठ विस्तारण्यासाठी किंवा स्वत:चे उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे जाहिरात होय. त्यामुळे जाहिरातींमध्ये सुद्धा भाषांतराची नवीन संधी उपलब्ध झाली आहे. जाहिरातींचे भाषांतर करत असताना त्यात त्या त्या कल्पना म्हणजे जाहिरात जशी मुळात सर्जनात्मक असते, ती सर्जनशीलता दुसºया भाषेमध्ये जशीच्या तशी येणे आवश्यक असते. त्यामुळे पटकन लोकांच्या मनाचा ठाव घेणारी, लोकांना चटकन उच्चारता येणारी, त्यांना पाठ होणारी अशी जाहिरात तयार करावी लागते.

वेगवेगळ्या जाहिरातींच्या टॅगलाइन किंवा कॅचलाइन यांचे इतर भाषांमध्ये भाषांतर करत असताना खूप कसरत करावी लागते. खाद्या जाहिरातीसाठी जे काही मसुदा लेखन केले जाते. त्या मसुदा लेखनाचे भाषांतर आजकाल आवश्यक झाले आहे.

हे भाषांतर करत असताना त्यामध्ये खूप जास्त सावध राहणे आवश्यक आहे. भारताचा विचार केला तर इंग्रजीमधील जाहिराती या मराठी, गुजराथी, हिंदी, पंजाबी, तामिळ, बंगाली, कानडी ,तेलुगू, मल्याळम, ओरिया अशा भाषांमध्ये भाषांतरीत कराव्या लागतात, त्यामुळे भाषांतरकाराला मसुदा लेखनाचे भाषांतर हे एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध आहे. विभिन्न प्रादेशिक भाषांमध्ये ज्यांनी आपली पदवी घेतली आहे. त्यांना भाषांतराची संधी उपलब्ध असते, अर्थात त्यासाठी त्यांना ज्या भाषेतून भाषांतर करायचे ती भाषा आणि ज्या भाषेत भाषांतर करायची ती भाषा, यावर प्रभुत्त्व असणे आवश्यक असते. महाराष्ट्राचाच विचार केला तर मराठीतून बीए, बीएमएम करणारे अशा पदवीधारकांना भाषांतराचे हे माध्यम उपलब्ध आहे. इतर भाषांवर असलेले प्रभुत्त्व, संगणकीय ज्ञान, इतर कौशल्य, इतर भाषांमधील पुस्तकांचे वाचन हे जर व्यवस्थित असेल, तर ती व्यक्ती आणखीन जास्त चांगल्या
पद्धतीने भाषांतर करू शकते. एकूणच भाषांतरासाठी अशी बरीचशी दालने आता उपलब्ध आहेत.

पुस्तकाचे भाषांत

भाषांतरामधला सर्वात जास्त चर्चित व लोकांना माहीत असलेले भाषांतर म्हणजे पुस्तकांचे भाषांतर होय. गेल्या दोन दशकांमध्ये विभिन्न देशांतल्या गाजलेल्या पुस्तकांचे किंवा गाजलेल्या लेखकांच्या प्रसिद्ध साहित्यकृतींचे भाषांतर करण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. असे बाजारात असलेल्या एकूण पुस्तकांमधून दिसते. भारताचा विचार केला तर अमेरिका, युरोप, रशिया, जर्मनी इथल्या पुस्तकांचे अनुवाद आपल्याकडे उपलब्ध होताना दिसतात. याखेरीज भारतीय भाषांमधले भिन्न भिन्न भाषांमधल्या गाजलेल्या कादंबर्या, कथासंग्रह, कविता यांचेसुद्धा भाषांतर होताना आपल्याला दिसते. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे भाषांतर तर हमखासच होते. याखेरीज अत्यंत गाजलेल्या आणि चर्चेत असलेल्या पुस्तकांचेसुद्धा भाषांतर होताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे भाषेची मर्यादा ओलांडून त्या त्या विषयातील साहित्यप्रेमींना हा पुस्तकांचा ठेवा प्राप्त होतो. यात वेगवेगळ्या प्रकाशन संस्था लेखकाला मानधन देतात. विविध माध्यमे लोकरुचीनुसार त्यांना मजकूर पुरवीत असतात. यामध्ये वृत्तपत्रे, सिनेमा, रेडिओ , टेलिव्हिजन या सर्वच माध्यमांचा समावेश होतो. यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आशय, त्याचे बिनचूक भाषांतर करावे लागते. मात्र, त्याच बरोबर त्या त्या मालिका किंवा चित्रपटाप्रमाणे त्यात काही बदल केले जातात, म्हणजेच मूळ इंग्रजीतल्या किंवा दक्षिण भारतीय भाषेतल्या चित्रपटांसाठी सबटायटल्स किंवा डबिंग ज्या वेळेला हिंदीमध्ये केले जाते, तेव्हा त्यात हिंदीतील काही गाजलेली उदाहरणे टाकावी लागतात, हा याच्यातील फरक आहे.

८३३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची निवड न्यायालयाकडून रद्द

नागपूर | परिवहन विभागातील ८३३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा करण्यात आलेली उमेदवारांची निवड उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरवली. या आदेशामुळे निवड झालेल्या उमेदवारांना मोठा फटका बसला असून केंद्र सरकारने पदासाठी घालून दिलेली अर्हता शिथिल केल्याने हा प्रकार घडला आहे.

राज्याच्या परिवहन विभागात रिक्त ८३३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ३० जानेवारी २०१७ ला जाहिरात प्रसिद्ध करून या पदासाठी अभियांत्रिकीच्या पदवीसह उमेदवारांना अवजड माल वाहन व अवजड प्रवासी वाहन चालवण्याचा परवाना आणि विशिष्ट वर्कशॉपमध्ये एक वर्ष कामाचा अनुभव अशी अर्हता केंद्र सरकारने घालून दिली आहे. त्या अर्हतेत राज्य सरकारने बदल केला. राज्य सरकारने जाहिरातीमध्ये हलके मोटार वाहन व गिअर असलेली मोटार सायकल चालवण्याचा परवाना आणि निवड झाल्यानंतर कामाचा अनुभव घेण्याची मुभा दिली होती. त्यामुळे राजेश फाटे या उमेदवाराने उच्च न्यायालयात धाव घेत राज्य सरकारच्या अर्हता शिथिल करण्याला आव्हान दिले.

या प्रकरणाची सुनावणी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. झका हक यांच्यासमक्ष झाली. यावेळी राज्य सरकारच्या जाहिरातीनुसार उमेदवारांची ३० एप्रिल २०१७ मध्ये परीक्षा घेतली व उमेदवारांची निवड केली. त्यावेळी न्यायालयाने निवडीवर सद्यस्थिती ठेवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.

आता या प्रकरणात केंद्र सरकारने विशिष्ट पदासाठी तयार केलेले नियम राज्य सरकारला शिथिल करता येणार नाही, असे स्पष्ट करीत केंद्र सरकारच्या नियमानुसार अर्हता धारण करणाऱ्यांची निवड वैध असून त्यांनाच नियमित करण्यात यावे, असे न्यायालयाने नमूद केले. या आदेशामुळे सरकारच्या जाहिरातीनुसार अर्हता धारण करणाऱ्यांची निवड रद्द होते, असे स्पष्ट झाले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ४०० जागा

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर आणि ज्युनिअर कंसल्टंट (ऑपरेशन) पदांच्या जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर पदाच्या २१० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी.ई./बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्पुटर सायन्स/ आयटी) अर्हताधारक असावा.

ज्युनिअर कंसल्टंट (ऑपरेशन) पदाच्या १९० जागा
शैक्षणिक पात्रता – आयटीआय (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ रेडिओ & टीव्ही/ इलेक्ट्रिकल & फिटर) अर्हताधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी ज्युनिअर टेक्निकल पदांसाठी ३० वर्ष आणि ज्युनिअर कंसल्टंट पदांसाठी २८ वर्षापेक्षा जास्त नसावे.( अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – नाही.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही.

थेट मुलाखत – ज्युनिअर टेक्निकल पदांसाठी ९ नोव्हेंबर २०१८ रोजी (सकाळी ९:३०वाजता) आणि ज्युनिअर कंसल्टंट पदांसाठी ८ नोव्हेंबर २०१८ रोजी (सकाळी ९:३० वाजता) घेण्यात येईल.

मुलाखतीचे ठिकाण – विभागीय कार्यालय, १२०७, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई. दूरध्वनी:- ०२२-४२२४२४९/ २४२२३४४३

संबंधित संकेतस्थळ

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-2019 जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त ३ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा- २०१९ (CDS-I) मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I)- २०१९
भारतीय भूदल (मिलिटरी) अॅकॅडमी, डेहराडून मध्ये १०० जागा, भारतीय नौदल अॅकॅडमी मध्ये ४५ जागा, हवाई दल अॅकॅडमी, हैदराबाद मध्ये ३२ जागा, ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (पुरुष) चेन्नई मध्ये २२५ जागा आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (महिला) चेन्नई मध्ये १५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा इंजिनिअरिंग पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९६ ते १ जुलै २००१ किंवा २ जानेवारी १९९६ ते १ जुलै २००० किंवा २ जानेवारी १९९५ ते १ जानेवारी २००१ दरम्यान झालेला असावा.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला प्रवगातील उमेदवारांना फिस मध्ये पूर्णपणे सवलत.

परीक्षा – ३ फेब्रुवारी २०१९ रोजी लेखी परीक्षा घेणयात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ नोव्हेंबर २०१८ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

सबंधित संकेतस्थळ

एम.बी.बी.एस./ बी.डी.एस. सामाईक प्रवेश परीक्षा (NEET-2019) जाहीर

देशातील अनुदानित आणि विना-अनुदानित महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०१९-२०१२० वर्षांकरिता एम.बी.बी.एस./ बी.डी.एस. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय चाचणी एजन्सी (एनटीए) मार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा NEET (UG)- 2019 मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा NEET (UG)- 2019

शैक्षणिक पात्रता – बारावी परीक्षा उत्तीर्ण (जीवशास्त्र/ रसायनशास्त्र/ भौतिकशास्त्र/ जैविकशास्त्र)

वयोमर्यादा –  उमेदवाराचा जन्म ५ मे १९९४ ते ३१ डिसेंबर २००२ दरम्यान झालेला असावा. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागासवर्गीय/ अपंग) उमेदवारांना ५ वर्ष सवलत.

परीक्षा फीस – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागासवर्गीय/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना ७५०/- रुपये आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी १४००/- रुपये आहे.

प्रवेशपत्र – १५ एप्रिल २०१९ पासून उपलब्ध होईल.

परीक्षा – ५ मे २०१९ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१८ आहे.

ऑनलाईन अर्ज करा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या ४७ जागा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण २६ जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह दहावी/ बारावी उत्तीर्ण (इंग्रजी) किंवा डी.एड./ डी.टी.एड/ बी.एड.(इंग्रजी) किंवा MHTET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

माध्यमिक शिक्षक पदाच्या एकूण २१ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ए., बी.एड. (इंग्रजी/ मराठी/ हिंदी/ समाजशास्त्र) किंवा बी.एस्सी.बी.एड.(गणित/ विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई

परीक्षा फीस – नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ नोव्हेंबर २०१८ आहे.

संबंधित संकेतस्थळ

तुम्ही सुंदर डान्स करता? मग त्यातच करिअर करा

करिअरमंत्रा | अनादी काळापासून भारताला नृत्याची महान परंपरा लाभली आहे. आजकाल रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून नृत्यप्रकार अगदी घराघरात पोहोचले आहेत. नृत्य हा पूर्णवेळ व्यवसाय असू शकतो, हेच मुळात कित्येकांना माहीत नसायचे. मात्र, आता परिस्थिती बदलते आहे. नृत्यकलेकडेसुद्धा एक चांगला करिअरचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. तरुण पिढी या क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वळते आहे.

नृत्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी किमान बारावी पास असणे अनिवार्य आहे. तसे पाहता, या क्षेत्राशी शिक्षणाचा संबंध कमी प्रमाणात येतो. हे क्षेत्र कौशल्यावर आधारित आहे. रिदमची समज, नृत्यातील सादरीकरणाचे टप्पे या गोष्टींना फार महत्त्व असते. आता यात पदवी आणि पदविकाही घेता येते. पीएच.डी ही पदवीही संपादन करता येते. बऱ्याचदा कलाकारांना ९-५ नोकरी करायला आवडत नाही, पण डान्स क्लास हा चांगला पर्याय ठरतो. नृत्यवर्गामुळे नियमित दरमहा विद्यार्थ्यांकडून फी मिळते, शिवाय डान्स क्लासबरोबर नृत्यसादरीकरण करणेही शक्य होते. आजकाल बहुतांश शाळांमध्ये नृत्य हा शैक्षणिक विषय म्हणून सामावून घेतला आहे. त्यामुळे विविध शाळांमध्येही नृत्य शिक्षकाची नोकरी करता येऊ शकते.

मुलांच्या मानसिकतेचा विचार करून, त्यांच्या कलाने घेऊन, त्यांच्यात नृत्याची गोडी निर्माण करणे, त्यांच्याकडून कार्यक्रमांची तयारी करून घेणे इ. अनेक गोष्टींची कसरत नृत्यगुरूला करावी लागते. अनुभव मात्र, नृत्यगुरूसाठी खूप महत्त्वाचा समजला जातो. विद्यार्थ्यांना शिकविल्याने नृत्यगुरू कलाकार म्हणूनही अधिक समृद्ध होतो, विद्यार्थ्यांकडूनही खूप शिकायला मिळते, हे मात्र निर्विवाद सत्य आहे! इतर विषयांप्रमाणे नेट-सेटची परीक्षा नृत्य विषयात उत्तीर्ण झाल्यावर, विविध नृत्य महाविद्यालयांत व विद्यापीठांतही नृत्यशिक्षक म्हणून नेमणूक होऊ शकते.

चित्रपटांमध्ये, पुरस्कार सोहळ्यांमध्ये पार्श्वनर्तक म्हणून नृत्य करणे हादेखील एक मोठा करिअरचा पर्याय आहे. असे अनेकविध पर्याय नृत्यक्षेत्रात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे, कलाकार अजून वेगवेगळ्या करिअरच्या संधी नृत्यात निर्माण करत आहेत. इतर क्षेत्रांप्रमाणेच हेदेखील झपाट्याने वाढणारे आणि आर्थिकदृष्ट्याही स्थिरता देणारे क्षेत्र आहे.

नृत्याचे दोन प्रकार पडतात. शास्त्रीय अथवा क्लासिकल आणि दुसरा लोकनृत्य अथवा फोकडान्स. या अभ्यासक्रमात सामान्य ज्ञानाबरोबर नृत्याच्या इतिहासाबद्दल शिकविले जाते. काही प्रमाणपत्र अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. पदव्युत्तर पदवी घेण्याच्या संधी अनेक विद्यापीठांत आहेत. नृत्य शिकविण्याबरोबर त्यातील बारकावे, धून ऐकून स्टेप शिकणे आदी बाबी त्यात समाविष्ट असतात. प्रात्यक्षिकाला फार महत्त्व राहते.

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कला केंद्र, विविध टी.व्ही. चॅनेल, वेगवेगळ्या नृत्यसमूहात काम करू शकता. अनेक नृत्य महोत्सव जगभरात भरत असतात, त्यातही सहभागी होता येते. मालिका, अल्बम, चित्रपट नृत्यदिग्दर्शक, नृत्योपचार तज्ज्ञ म्हणूनही काम मिळेल. नेट सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अध्यापनही करता येते. परदेशात भारतीय नृत्य शिक्षकांना चांगली मागणी आहे. ज्यांचा स्वभाव उद्योगी आहे, ते स्वत:ची नृत्य संस्था काढू शकतात. आजकाल रिअ‍ॅलिटी शोसाठी नृत्य प्रशिक्षक हवे असतात. आता छोट्या शहरांतही कामाच्या संधी उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल विविध पदांच्या १६१ जागा

महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल सोसायटी अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या निवासी शाळांच्या आस्थापनेवरील शिक्षक आणि शिक्षेकेतर पदाच्या एकूण १६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१८ आहे.

प्राचार्य पदाच्या एकूण ५ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.ए./ एम.एस्सी सह बी.एड. आणि २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) पदाच्या एकूण ३२ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.एस्सी.बी.एड./ एम.ए.बी.एड./ MSCIT आणि CTET/ CET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) पदाच्या ६६ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.एस्सी.बी.एड./ बी.एस्सी./ MSCIT आणि CTET/ CET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

क्रीडा शिक्षक (सह विषय शिक्षक) पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – बीए/ बी.एस्सी./ बी.पी.एड. आणि MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अधीक्षक (पुरुष/ महिला) पदाच्या २३ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी/ एम.एस.डब्ल्यू आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

कनिष्ठ लिपिक (संगणक चालक) पदाच्या १३ जागा
शैक्षणिक पात्रता – बीए/ बी.कॉम./ बी.एस्सी. सह इंग्रजी टायपिंग ४० (श.प्र.मि.) व मराठी ३० (श.प्र.मि.) व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

प्रयोगशाळा सेवक पदाच्या एकूण १३ जागा
शैक्षणिक पात्रता – विज्ञान शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे विषयक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ आक्टोंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – केवळ २०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ नोव्हेंबर २०१८ आहे.

ऑनलाईन अर्ज करा