Home Blog Page 431

Education Loan : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!! तारण न देता 10 लाखापर्यंत मिळणार शैक्षणिक कर्ज

Education Loan

करिअरनामा ऑनलाईन। आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर विद्यार्थी शिक्षणासाठी कर्ज (Education Loan) काढतात. आता या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार शैक्षणिक कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे; या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. सरकार या कर्जाची हमी मर्यादा 7,50,000 रुपयांवरून 10 लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते. याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि कोणत्याही हमी शिवाय त्वरित कर्ज मिळेल. कर्ज मिळण्यात विद्यार्थ्यांचा वेळ जात असल्याच्या तक्रारी आहेत. मंजूर नसलेल्या कर्जामुळे किंवा विनाकारण वेळ घेतल्याने आपल्या अभ्यासावर परिणाम होत असल्याची तक्रारही विद्यार्थ्यांनी केली आहे.

अशी असेल हमी मर्यादा (Education Loan)

सध्याच्या परिस्थितीत 7,50,000 रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारची क्रेडिट गॅरंटी फंड सुविधा उपलब्ध आहे. 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी, बँकेला विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारची हमी किंवा तारण आवश्यक नाही. त्यामुळे कर्जाचा वापर लवकर करता येतो. सरकार कर्ज हमी निधीची मर्यादा 7,50,000 रुपयांवरून 10 लाख रुपये करणार आहे. इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही महागाई वाढली आहे, त्यामुळे केंद्र सरकार कर्जाची रक्कम वाढविण्याचा विचार करत आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, अर्थ मंत्रालयाच्या संबंधित विभागांनी शिक्षण मंत्रालयाशी सल्लामसलत सुरू केली आहे. या संदर्भात शैक्षणिक कर्जाची हमी मर्यादा 33% पर्यंत (Education Loan) वाढविण्याचा विचार सुरू आहे. या निर्णयामुळे देशातील अनेक भागांमध्ये कर्जाची मर्यादा वाढवण्यात येणार आहे. हा नियम पूर्णपणे सरकारी योजनेंतर्गत मिळणाऱ्या कर्जाशी संबंधित आहे, ज्यामध्ये सरकार विद्यार्थ्यांना कर्ज देते.

सरकारची भूमिका

आर्थिक सेवा विभाग असुरक्षित शैक्षणिक कर्ज मर्यादा वाढविण्याच्या विचारात आहे आणि शिक्षण विभागाशी चर्चा करत आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सर्व काही व्यवस्थित राहिल्यास, विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे तारण न देता 10 लाख किंवा त्याहून अधिक कर्ज घेऊ शकतात.

सरकारी बँका आपला वेळ वाया घालवत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार होती. त्यानंतर सरकारने बँकांना शक्य तितक्या लवकर विद्यार्थ्यांना कर्ज देण्याचे आदेश दिले; परंतु आता (Education Loan) कर्जाची मर्यादा वाढवण्यासाठी निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बँकांना 1 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील थकबाकीची चिंता करण्याची गरज नाही कारण सरकार हमी देण्याच्या भूमिकेत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career News : 5G मुळे ‘या’ क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये होणार वाढ; पहा कुठे मिळतील Jobs

Career News

करिअरनामा ऑनलाईन। देशातील 5 G सेवेची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच (Career News) केली आहे. या सेवेमुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे. मोबाइल युजर्सना आता सुपरफास्ट इंटरनेट सेवेचा अनुभव घेता येणार आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय, शिक्षण, उत्पादन आणि विज्ञानाच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे 5G लाँच झाल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रामध्ये नोकऱ्यांची संधी मोठ्या संख्येनं वाढणार आहे. या संदर्भात ‘टीव्ही नाईन हिंदी’नं वृत्त दिलं आहे.

उत्साह वाढवणारा 5G ट्रेंड

भारतात 5G मोबाइलची सेवा सुरू झाल्यानंतर रोजगाराची स्थिती नेमकी कशी असेल हे जाणून घेण्यासाठी मोठी उत्सुकता आहे. या संदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आलं असून, यात टेलिकॉम क्षेत्रात 13 टक्के नोकऱ्यांत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली गेलीय. नोकऱ्यांबद्दल हा ट्रेंड उत्साह वाढवणारा (Career News) मानला जातोय. वास्तविक पाहता देशातील प्रमुख कंपन्या 5G डिजिटल सेवा विविध शहरांत लाँच करत आहेत. डाटा सेंटरची क्षमता वाढवण्यासाठी आणि विशेष काम म्हणजेच स्पेशलाइज्ड रोलसाठी लोकांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.

मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सनुसार, आगामी तिमाहीचा काळ नवीन लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टीनं सकारात्मक दिसत आहे. 5G लाँच झाल्यानंतर टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीची स्थिती सुधारणार आहे. आयात-निर्यात, पर्यटन आणि बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातही वृद्धी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे, टियर 2 आणि टियर 3 शहरांच्या विकासासाठी सरकारने त्यांच्या नव्या धोरणावर लक्ष केंद्रीत केल्यानं रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं आशा निर्माण झाली आहे.

येथे मिळणार नव्या नोकऱ्या (Career News)

Monster.com चे सीईओ शेखर गार्सिया यांनी सप्टेंबर 2022 च्या नोकऱ्यांच्या ट्रेंडबाबत बोलताना महत्त्वाचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, ‘नवीन उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी कंपन्या शाश्वत दृष्टिकोन अवलंबत आहेत. सार्वजनिक मागणी वाढल्यानं सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये वेगाने वाढ होत आहे आणि यात नोकऱ्या वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. भारत सरकारकडून 5G लाँच केल्यानंतर नोकऱ्यांच्या क्षेत्रात नवे रोजगार निर्माण होतील, असा आशेचा किरण दिसत आहे. विशेष करून डिजीटल इंडियाचा मार्ग सुकर बनवण्यासाठी टेलिकॉम क्षेत्रात अधिक नोकऱ्या निर्माण होतील.

5G सेवा सुरू झाल्याने सध्या ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, इंटरनेट व इतर क्षेत्रांत नवीन नोकऱ्या निर्माण होतील. मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा डाटा सांभाळण्याची (Career News) गरज असल्यानं सॉफ्टवेअर इंजिनीअरची मागणी वाढण्याची आशा आहे. मशीन लर्निंग एक्सपर्ट, डाटा एक्सपर्ट, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, आयओटी एक्सपर्ट्सची आवश्यकता असणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Varuna Drone : चाकणच्या तरुणांनी केली कमाल; माणसाला घेऊन उडणारा देशातला पहिला ड्रोन होणार नौदलात दाखल

Varuna Drone

करिअरनामा ऑनलाईन। माणसाला घेऊन उडणारा भारतातील पहिला ड्रोन (Varuna Drone) पुण्यातील चाकण MIDC तील कंपनी सागर डिफेन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपने विकसित केला आहे. केंद्र सरकार लवकरच भारतीय नौदलात माणसाला घेऊन अवकाशात उडणारा हा ड्रोन समाविष्ट करणार आहे.

‘Varuna Drone’ ची वैशिष्ट्ये

या खास टेक्नॉलॉजी असलेल्या ड्रोनला वरुण / ‘Varuna Drone’ असं नाव देण्यात आलं आहे. या ड्रोनमध्ये 100 किलो वजनासह उड्डाण करण्याची क्षमता आहे. यासोबतच नौदलाचे जवान या ड्रोनद्वारे 25 ते 30 Km चा प्रवास 30 मिनिटांत प्रवास पूर्ण करू शकतात. या ड्रोनचा लवकरच नौदलात समावेश करण्यात येणार आहे.

वरुण ड्रोन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत सक्षम आहे. या ड्रोनमुळे एका ठिकाणावरील वस्तू किंवा माणूस दुसऱ्या ठिकाणी कमी वेळात आणि कमी खर्चात सहज घेऊन जाता येणार (Varuna Drone) आहे. ड्रोन पूर्णपणे अँटोमॅटिक आहे. म्हणजेच नौदलाच्या अधिकाऱ्यांना फक्त त्यात बसावे लागेल, ड्रोनच त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल. या ड्रोनच्या कंपनी स्तरावर चाचण्यांमध्ये तो यशस्वी ठरला आहे.

Varuna Drone

बिघाड झाल्यास पॅराशूटने होणार सुरक्षित लॅंडींग (Varuna Drone)

कंपनीचे सह-संस्थापक बब्बर यांचं म्हणणं आहे की, ड्रोनला हवेत तांत्रिक बिघाड झाल्यानंतरही लोकांना सुरक्षितपणे उतरवण्यास सक्षम आहे. यात पॅराशूटची सुविधाही आहे, जी आपत्कालीन स्थितीत किंवा बिघाडाच्या वेळी आपोआप उघडते, ज्यामुळे सुरक्षित लँडिंग करायला सोपं जाईल. यासोबतच वरुणचा वापर एअर अँम्ब्युलन्ससाठी आणि दूरवरच्या भागात सामान पोहोचवण्यासाठीही सहज करता येतो.

जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ड्रोनचे प्रात्यक्षिक करण्यात (Varuna Drone) आलं होतं, ज्यामध्ये त्यांच्यासोबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. त्याचा व्हिडिओ नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर करण्यात आला आहे.

 

 

देशाची सुरक्षा मजबूत होणार

रिपोर्टनुसार, या ड्रोनमुळे देशाची पाळत ठेवणे आणि सुरक्षा मजबूत करण्यात मदत होणार आहे. याशिवाय याचा उपयोग मदत आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतही होऊ शकतो. नॉन प्रोफिटेबल ऑर्गेनाइजेर​​​​​​शन ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचे संचालक स्मित शाह यांच्या म्हणण्यानुसार, देशात ड्रोनला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेले ड्रोनचे प्रामुख्याने तीन उपयोग आहेत, सर्वेक्षण, तपासणी आणि वितरण. हवाई सर्वेक्षणाव्यतिरिक्त, ड्रोनचा वापर पाइपलाइन, पवनचक्क्या इत्यादींच्या तपासणीसाठी, संरक्षणासाठी (Varuna Drone) आणि दुर्गम भागात औषधे आणि आवश्यक साहित्य पोहोचवण्यासाठी केला जातो. याशिवाय एरियल फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफीचाही वापर केला जातो. एवढेच नाही तर ड्रोनचा वापर एअर टॅक्सीसाठीही करणंही शक्य आहे.

Varun Drone

हे माहीत आहे का?

नॅनो ड्रोन वगळता सर्व ड्रोन उड्डाण करण्यासाठी, तुम्हाला डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशन (DGCA) कडून एक विशिष्ट ओळख क्रमांक प्राप्त करावा लागेल. लष्करी क्षेत्राजवळ किंवा सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागात कोणतेही ड्रोन उडवण्यास मनाई आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 5Km आणि उर्वरित विमानतळापासून 3Kmच्या आत ड्रोन उडविण्यास बंदी आहे.

आंतरराष्ट्रीय सीमेच्या 25Km च्या आत ड्रोन उडवल्यास तुमच्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय ड्रोनच्या रेंजनुसार त्यांना किती उंचीवर उडवता येईल हेही ठरवण्यात (Varuna Drone) आलं आहे. 2016 मध्ये जगातील पहिले मानवी उडणारे ड्रोन ‘The Ehang184’ अमेरिकेत तयार करण्यात आलं होतं. हे एक लहान पर्सनल हेलिकॉप्टर आहे, जे फक्त एक प्रवासी वाहून नेण्यासचं सक्षम आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : कौतुकास्पद!! ग्रामीण भागातील टॅलेंट झळकलं; अनामिकाला मिळालं तब्बल 60 लाखांचं पॅकेज

Success Story of Anamika Dakare

करिअरनामा ऑनलाईन | कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुलीला जगविख्यात adobe कंपनीने (Success Story) तब्बल 60 लाखाचे वार्षिक पॅकेज दिले आहे. कॉम्प्युटर इंजिनियरचे शिक्षण घेत असतानाच तिला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील टॅलेंट पुढे आले असून अनामिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

परमनंट जॉब

कोल्हापूरच्या सोनाळी या छोट्याशा गावातली अनामिका डकरे ही आता जगविख्यात adobe कंपनीत टेक्निकल ऑफिसर पदावर कार्यरत होणार आहे. तिच्यातले टॅलेंट पाहून कंपनीने तिला वर्षाला तब्बल 60 लाखांची ऑफर दिली आहे. अनामिकाचे वडील शिक्षक तर आई गृहिणी अशा कुटुंबातून ती पुढे आली. अनामिका डकरे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

इंटर्नशिपमुळे मिळाली संधी (Success Story)

अनामिकाने कॉम्प्युटर इंजनिअरिंग क्षेत्रात आपला डंका कायम ठेवला आहे. शिक्षण घेत असतानाच तिला adob कंपनीने इंटर्नशिपची संधी देत महिन्याला एक लाखाचे विद्यावेतन दिले. ही इंटर्नशिप संपताच तिला 60 लाखांच्या वार्षिक पॅकेजवर कायमस्वरूपी नेमणूक दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला मिळालेली ही सर्वात मोठी ऑफर आहे. त्यामुळे या भागातल्या विद्यार्थ्यांचे टॅलेंटही आता जगभर पोहोचले आहे. तिच्या या यशाबद्दल कॉलेजचे ट्रस्टी, माजी (Success Story) मंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी तिचे अभिनंदन केले. तर कॉलेजच्या प्राचार्यांनी तिच्याविषयी अभिमान व्यक्त केला आहे.

अनामिकाने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरले आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिलकुमार गुप्ता म्हणाले आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Vacancy : ‘या’ महापालिकेत नवीन पदांवर भरती!! पहा कुठे करायचा अर्ज

Job Vacancy

करिअरनामा ऑनलाईन। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Vacancy) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका

भरले जाणारे पद –

  1. वैद्यकीय अधिकारी
  2. स्टाफ नर्स
  3. विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 25 पदे

वय मर्यादा – (Job Vacancy)

वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे

स्टाफ नर्स – 65 वर्षे

विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे

अर्ज फी –

खुला प्रवर्ग – रु. 150/-

राखीव प्रवर्ग – रु. 100/-

नोकरी करण्याचे ठिकाण – नांदेड

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशिक्षण सभागृह, जंगमवाडी, नांदेड वाघाळा शहर मनपा दवाखाना, लायन्स नेत्र रुग्णालय शेजारी, वर्कशॉप कॉर्नर नांदेड पिन कोड – 431605 (Job Vacancy)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वैद्यकीय अधिकारी – MBBS MCI/MMC Council Registration

स्टाफ नर्स – GNM /BSC Nursing /MNC Council Registration

विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी – MS/DNB (General Surgery) MCI/ MMC Council Registration

मिळणारे वेतन –

वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/- दरमहा

स्टाफ नर्स Rs. 20,000/- दरमहा

विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी Rs. 75,000/- दरमहा

आवश्यक कागदपत्रे – 

  1. १० वी, (गुणपत्रक/ प्रमाणपत्र)
  2. १२ वी (गुणपत्रक/ प्रमाणपत्र )
  3. पदवीचे सर्व गुणपत्रक (पहिले वर्ष ते अंतिम वर्ष)
  4. पदवी प्रमाणपत्र
  5. नोंदणी प्रमाणपत्र
  6. जात प्रमाणपत्र
  7. वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
  8. वयाचा पुरावा म्हणून (१० व १२ वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला)

ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत झेरॉक्स प्रतीत (साक्षांकित / स्वसांक्षाकिंत) जोडावीत नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी आणि नोटराईज्ज अॅफिडेव्हीट जोडणे बंधनकारक राहील.

असा करा अर्ज – 

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. (Job Vacancy)
  4. सदर पदांकरिता अधिक माहिती nwcmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2022 आहे.

Nanded Mahanagarpalika Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – nwcmc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Jobs Near Me : ITI उमेदवारांना मोठी संधी!! महापारेषण बारामती अंतर्गत ‘या’ पदांवर भरती

Jobs Near Me

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत (Jobs Near Me) शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.

ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या जाहीरातीसह जोडलेला प्रपत्र-अ परीपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत व मुद्दा क्र. ०२ मध्ये नमुद आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत/स्वसाक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती व इतर कागदपत्रे दिनांक 31.10.2022 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत कार्यकारी (Jobs Near Me) अभियंता यांचे कार्यालय महापारेषण, अउदा संवसु विभाग बारामती, “उर्जा भवन’, प्रशासकीय इमारत, 1 ला मजला, भिगवण रोड, बारामती- 412102 या पत्त्यावर पाठवायचा आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, बारामती

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

पद संख्या – 32 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – बारामती

वय मर्यादा – 18 ते 38 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन / ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महापारेषण, अउदा संवसु विभाग बारामती, “उर्जा भवन’, प्रशासकीय इमारत, 1 ला मजला, भिगवण रोड, बारामती- 412102

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) –

1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

आवश्यक प्रमाणपत्रे/कागदपत्रे –

  1. एस.एस.सी. व आय.टी.आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची प्रत.
  2. शाळा सोडल्याचा दाखला.
  3. आधारकार्ड
  4. मागासवर्गात समाविष्ठ असल्यास जात प्रमाणपत्र.
  5. महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र.
  6. प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र – नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र. ( अजा, व अज या प्रवर्गातील उमेदवार वगळून).
  7. आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवारांने स्वत:च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.

असा करा अर्ज – 

  1. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवार https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेस्थळावरून अर्ज करू शकतात.
  3. अर्जाकरिता आस्थापना क्र. E10162700639 व Opportunity Code : AO275403 आहे.
  4. अर्ज सुरु होण्याची तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.
    Mahapareshan Baramati Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – mahatransco.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Government : रहा तयार!! SSC करणार तब्बल 73,333 पदांवर भरती

Job Government

करिअरनामा ऑनलाईन। देशात सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण – तरुणींसाठी (Job Government) सर्वात मोठी खूशखबर आहे. देशातील सरकारी नोकरी देणारं कमिशन म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन येत्या काही दिवसांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 73,333 पदांसाठी भरती करणार आहे. त्यामुळे जे तरुण तरूणी सरकारी नोकरीचं स्वप्नं बघत आहेत त्यांचं स्वप्नं लवकरच पूर्ण होणार आहे.

कर्मचारी निवड आयोग, एसएससी 2022 मध्ये 73,000 हून अधिक पदांची भरती करेल. त्याद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभाग, संस्था आणि मंत्रालयांमधील गट क आणि ड ची रिक्त पदे भरली जातील. मीडिया (Job Government) रिपोर्ट्सनुसार, विविध मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदांचा तपशील आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, बहुतांश रिक्त पदे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील विभागातील आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या 28,000 हून अधिक पदे आणि दिल्ली पोलिसांमध्ये सुमारे 7550 पदे SSC द्वारे भरायची आहेत. 2022 च्या अनेक भरती परीक्षांचे तपशील आयोगाने आधीच सामायिक केले आहेत. मल्टी टास्किंग स्टाफ भर्ती, CGL भरती, GD कॉन्स्टेबल भर्ती आणि इतरांचा यामध्ये समावेश आहे.

अशी होणार पदभरती – (Job Alert)

अहवालानुसार, जीडी कॉन्स्टेबल भरती अंतर्गत 24,605, सीजीएल भरती अंतर्गत 20,814, दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती अंतर्गत 6433, मल्टी टास्किंग स्टाफ भरती अंतर्गत 4682, सबस्पेक्टर सेंट्रल पोलीस (Job Government) ऑर्गनायझेशन अंतर्गत 4300 आणि CH6900 Exit CH6SL पद मधून करण्यात येणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : मुलींना मिळणार टाटा ट्रस्टकडून Scholarship; काय आहे पात्रता

Education

करिअरनामा ऑनलाईन। हल्ली सर्वांचाच ओढा असतो तो ट्रेण्डिंग विषयांकडे. या पार्श्वभूमीवर (Education) अनेक विषय ट्रेण्डमध्ये नसल्याने मागेच राहतात. प्रत्यक्षात समाजाच्या दृष्टीने विचार करायचा तर इतर विषयही समाजाच्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे असतात. मात्र त्या विषयांकडे वळायचे तर आर्थिक मदतीची शक्यता नसते, अशा वेळेस या शिष्यवृत्ती मुलींना मदतीचा हात पुढे करतात. वेगवेगळया सामाजिक आणि मानसिक समस्यांचा उच्चस्तरीय अभ्यास करणे महिलांना सुलभ जावं, यासाठी टाटा सामाजिक ट्रस्ट मार्फत, लेडी मेहरबाई जी. टाटा एज्युकेशन शिष्यवृत्ती दिली जाते.

शिष्यवृत्तीचे विषय –

(१) समाजकार्य
(२) मानसशास्त्र, विधि (फक्त महिला आणि मुलांच्या संदर्भातील तज्ज्ञतेकरता),
(३) शिक्षण- तसेच शिक्षकांचं प्रशिक्षण
(४) विशेष गरजा असणाऱ्या मुलांचं शिक्षण आणि विकास,
(५) जेंडर स्टडीज – महिला आणि मुलांवर होणारी हिंसा. यामध्ये घरगुती आणि इतरांव्दारे होणाऱ्या हिंसेचा समावेश आहे.
(६) एकल महिला आई, एकल महिला आणि विवाहित महिलांच्या विविध समस्या(७) मुलांचे आरोग्य-विकास आणि पोषण आहार
(८) आरोग्य धोरण आणि आरोग्य शिक्षण- मानसिक आरोग्य
(९) सार्वजनिक आरोग्य- सामुदायिक आरोग्य सेवा
(१०) साथरोगशास्त्र/ रोगपरिस्थिती विज्ञान (Education)
(११) पुनुरुत्पादन आणि आरोग्य
(१२) महिला आणि मुलांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने विकासासाठी जनसंप्रेषण (कम्युनिकेशन)
(१३) पौंगडावस्थेतील समस्या
(१४) समुदायातील सामाजिक नीतीनियमांचा अभ्यास
(१५) सामुदायिक विकास
(१६) ग्राम विकास
(१७) सार्वजनिक धोरण
(१८) लोक प्रशासन
(१९) सामाजिक धोरण
(२०) सामाजिक विकास
(२१) महिला आणि मुलांच्या अनुषंगाने शाश्वत विकास
(२२) तुरुंगात असणाऱ्या महिला

पात्रता –(Education)

  1. या विषयांमध्ये परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या व अमेरिका, इंग्लंड आणि युरोपातील नामवंत विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थेत प्रवेश मिळालेल्या महिला उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात.
  2. पदवी परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या महिला उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतात.
  3. पदव्युत्तर अभ्यास किंवा संशोधन करू इच्छिणाऱ्या विषयांमध्ये संबंधित महिला उमेदवारास दोन वर्षाचा अनुभव असावा.

निवड प्रक्रिया –

अर्ज केलेल्या महिला उमदेवारांच्या गुणवत्तेनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते.

त्यातील निवडक महिलांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं.

या मुलाखती ट्रस्टींमार्फत (विश्वस्त) घेतल्या जातात.

या शिष्यवृत्ती अंतर्गत, संबंधितांना शिक्षण शुल्काचं सहाय्य केलं जातं.

ही रक्कम, संबंधित विद्यार्थिनींची मुलाखतीमधील कामगिरी पाहून, किमान तीन लाख ते कमाल सहा लाख रुपयांपर्यंत राहू शकते. (Education)

निवड झालेल्या विद्यार्थिनी त्यांची शैक्षणिक खर्चाच्या गरज कशा भागवू शकतील, हे सिध्द करण्यासाठी वित्तीय पुरवठ्याचा लेखी पुरावा सादर करावा लागेल.

असा करा अर्ज –

या शिष्यवृत्तीचा अर्ज मिळण्यासाठी, डिजिटल लिंक पाठवण्याची विनंती [email protected] या ईमेलवर करा.

आवश्यक कागदपत्रे –

(१) अभ्यासक्रम आणि स्पेशलायझेशन,
(२) कालावधी,
(३) विद्यार्थिनीने निवडलेल्या विद्यापीठांची पसंतीक्रमानुसार यादी (असल्यास)
/प्रवेश निश्चितीचे पत्र,
(४) प्रत्येक विद्यापीठासाठी लागणारे शिक्षण शुल्क,
५) निधीची उपलब्धता कशी करणार याची थोडक्यात माहिती,
(६) सध्याचा बायोडाटा.

सूचना – स्पष्ट दिसतील अशा पध्दतीने प्रमाणपत्रे स्कॅन करुन पाठवा.

अपूर्ण अर्ज स्वीकारले जात नाहीत.

संपर्कासाठी पत्ता – बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई-४००००१,
दूरध्वनी- ०२२-६६६५८२८२,

अधिकृत वेबसाइट – http://tatatrusts.org

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : सोलापूर महानगरपालिकेत ‘या’ पदांवर भरती जाहीर; इथे पाठवा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन। सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Notification) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, GNM, लॅब तंत्रज्ञ पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

भरली जाणारी पदे –

वैद्यकीय अधिकारी

स्त्रीरोग तज्ञ

GNM

लॅब तंत्रज्ञ

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2022

पद संख्या – 37 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर

वय मर्यादा – (Job Notification)

वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे

स्त्रीरोग तज्ञ – 70 वर्षे

इतर पदे – शासन निर्णयानुसार

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना-4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 

वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – MBBS

स्त्रीरोग तज्ञ – (MD/ DNB/ GDO) in Gynecology & Obstetrics

वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) – (MD/ DNB/ GDO) in Gynecology2
(MD/ DNB/ DCH) in Pediatrics – 6

GNM – GNM/ B.Sc Nursing (Job Notification)

लॅब तंत्रज्ञ – B.SC DMLT

मिळणारे वेतन –

वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – Rs. 60,000/- दरमहा

स्त्रीरोग तज्ञ – Rs. 75,000/- दरमहा

वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) Rs. 2,000/- per meet
(Rs. 30,000/- per month)

GNM Rs. 20,000/-

लॅब तंत्रज्ञ Rs. 17,000/-

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर पाठवावे. (Job Notification)
  3. देय तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जास ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  4. इच्छुक उमेदवारांना वर दिलेल्या पात्यावर आपले अर्ज पाठविता येतील.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.

Solapur Mahanagarpalika Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.solapurcorporation.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career News : राज्यातील 15 हजार शाळा बंद होण्याच्या मार्गावर; शिक्षकांवर टांगती तलवार? ‘या’ शाळा कोणत्या?

Career News

करिअरनामा ऑनलाईन | राज्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या गोर-गरीब, वंचित, बहुजन व (Career News) शेतकऱ्यांच्या मुलामुलींसह शिक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. राज्यातील 0 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या तब्बल 14 हजार 985 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

राज्य सरकारमार्फत 0 ते 20 विद्यार्थी पटसंख्येच्या राज्यात किती शाळा आहेत आणि या शाळा बंद करण्याबाबतची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे ? याबाबतची माहिती मागविण्यात आली होती. पटसंख्या 20 पेक्षा कमी असणाऱ्या शाळा मुख्यत: ग्रामीण, दुर्गम भागात असल्याचे यापूर्वीही समोर आले (Career News) असून, आता पुन्हा एकदा जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत या शाळांमधील विद्यार्थिसंख्येचा आढावा घेण्यात आला आहे. यानुसार शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या संचमान्यतेनुसार राज्यातील 14 हजार 985 शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे.

शासनाच्या या निर्णयाला मोठा विरोध 

राज्य शासनाच्या या निर्णयाला मोठा विरोध होत आहे. शिक्षकांनीही आक्रमक पवित्र घेतला असून ठिकठिकाणी आंदोलने, उपोषणे सुरु झाली आहे. या निर्णयामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या गोर-गरीब, वंचित, बहुजन व शेतकर्‍यांची मुले आणि मुले कायमची शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद झाल्यास उद्भवणार्‍या धोक्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असा सूर राज्यातून उमटू लागला आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांकडून (Career News) चालवण्यात येत असलेल्या 13 हजार 479, अनुदानित 297 आणि विनाअनुदानित 970 शाळा आहेत. त्यामुळे तब्बल 2 ते 3 लाख विद्यार्थी शिक्षणाला मुकण्याची शक्यता आहे तर 18 हजार शिक्षकांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विभागनिहाय 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळांची आकडेवारी पुढीलप्रमाणे – (Career News)

कोकण विभाग : –
मुंबई – 117
पालघर – 317
ठाणे – 441
रत्नागिरी – 1375
सिंधुदुर्ग – 835
रायगड – 1295

नाशिक विभाग :-
नाशिक – 331
जळगाव – 107
अहमदनगर – 775
धुळे – 92
नंदुरबार – 189

पुणे विभाग :-
पुणे – 1132
सातारा – 1039
सोलापूर – 342 (Career News)
सांगली – 415
कोल्हापूर – 507

औरंगाबाद विभाग :-
औरंगाबाद – 347
बीड – 533,
जालना -180,
लातूर – 202,
नांदेड – 394,
उस्मनाबाद – 174,
परभणी – 126,
हिंगोली – 93

नागपूर विभाग :-
नागपूर 555,
चंद्रपूर 437,
वर्धा 398 ,
गडचिरोली 641,
गोंदिया 213,
भंडारा 141.

अमरावती विभाग :-
अमरावती – 394
अकोला – 193
बुलढाणा – 158
वाशिम – 133
यवतमाळ – 350

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com