Home Blog Page 430

IAS Success Story : ‘वडिलांच्या अंत्यविधीला जायलाही पैसे नव्हते, आईसोबत बांगड्या विकल्या… UPSC पास होऊन IAS झालो…’

IAS Success Story Ramesh Gholap

करिअरनामा ऑनलाईन। असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीने प्रबळ इच्छा शक्तीने एखादी (IAS Success Story) काम हाती घेतले तर जगातील कोणतीही शक्ती त्याला पराभूत करू शकत नाही. सर्वात मोठ्या समस्या देखील त्या व्यक्तीच्या इच्छा शक्तीसमोर लहान वाटतात. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलत आहोत, जो घरच्या बिकट परिस्थितीमुळे खूप तुटला होता पण त्यांनी कधीही हार मानली नाही आणि देशातील सर्वात कठीण UPSC परीक्षा उत्तीर्ण होवून ते IAS अधिकारी बनले. खरं तर, आम्ही बोलत आहोत आयएएस अधिकारी रमेश घोलप यांच्याबद्दल, जे  सिव्हिल सर्व्हिसेस किंवा कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असणाऱ्या आजच्या तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.

IAS Success Story Ramesh Gholap

लहानपणी झाले पोलिओची शिकार

रमेश घोलप  यांना लहानपणीच डाव्या पायाला पोलिओ झाला होता. त्यांच्या (IAS Success Story) कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी त्यांना आपल्या आईसोबत रस्त्यावर बांगड्या विकायच्या होत्या. रमेश अशा अडचणींना कधीच घाबरले नाहीत आणि स्वप्नांच्या मागे धावत असताना कठोर परिश्रमामुळे ते एक दिवस आयएएस अधिकारी झाले.

IAS Success Story Ramesh Gholap

आईसोबत बांगड्या विकल्या (IAS Success Story)

रमेश यांच्या कुटुंबात एकूण चार जण होते. रमेश यांच्या वडिलांचे सायकलचे छोटेसे दुकान होते, पण वडिलांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर उभे राहिले. एके दिवशी जास्त दारू घेतल्याने वडिलांची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यानंतर रमेशच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या आईवर आली. उदरनिर्वाहासाठी आईने रस्त्यावर बांगड्या विकायला सुरुवात केली. रमेश यांच्या डाव्या पायात पोलिओ असूनही ते  आई आणि भावासोबत अशा परिस्थितीत बांगड्या विकायचे.

IAS Success Story Ramesh Gholap

वडिलांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी पैसे नव्हते

रमेश यांनी सुरुवातीचे शिक्षण गावी राहून पूर्ण केले होते. यानंतर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते आपल्या मामाकडे  बारसी या गावी गेले. 2005 साली रमेश बारावीत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. अशा परिस्थितीत रमेश यांना लवकरात लवकर घर गाठणे खूप गरजेचे होते. मामाच्या (IAS Success Story) गावातून त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी बसने फक्त 7 रुपये लागायचे, पण अपंग असल्यामुळे रमेश यांचे 2 रुपयात तिकीट नाइट असे; पण वेळ अशी होती की रमेशकडे बसचे भाडे भरायला पैसे नव्हते. तेव्हा अवघे दोन रुपयेही त्यांच्या जवळ नव्हते; हा प्रसंग ते विसरत नाहीत.

IAS Success Story Ramesh Gholap

शिक्षकांनी घराची जबाबदारी वाटून घेतली

रमेश यांना बारावीत 88.5 टक्के गुण मिळाले होते. यानंतर घराची जबाबदारी वाटून घेण्यासाठी ते शिक्षक झाले. त्यांनी गावातीलच शाळेत शिक्षक म्हणून शिकवायला सुरुवात केली. अध्यापनासोबतच (IAS Success Story) रमेश यांनी पदवीही संपादन केली. शिक्षक होऊन रमेश आपल्या कुटुंबाचा खर्च चालवत होते  पण ते या नोकरीवर समाधानी नव्हते. त्यांच्या मनात काही वेगळेच चालले होते.

IAS Success Story Ramesh Gholap

यूपीएससीच्या तयारीसाठी गावकऱ्यांकडून घेतलं कर्ज

रमेश यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सहा महिन्यांची नोकरीही सोडली आणि पूर्ण मेहनतीने परीक्षेची तयारी सुरू केली. 2010 मध्ये त्यांनी यूपीएससीचा पहिला प्रयत्न केला, ज्यामध्ये ते यशस्वी होऊ शकले नाहीत.  यानंतर त्यांच्या आईने गावकऱ्यांकडून काही पैसे उसने घेतले आणि रमेश (IAS Success Story) यांना शिक्षणासाठी दिले. अधिकारी होण्याचा चंग रमेश यांनी मनाशी बांधला होता.  त्यांनी झोकून देवून UPSC चा अभ्यास केला. गाव सोडण्यापूर्वी रमेश यांनी वरिष्ठ अधिकारी होईपर्यंत गावकऱ्यांना तोंड दाखवणार नाही, अशी शपथ गावकऱ्यांसमोर घेतली होती. त्यानुसार वचनपूर्ती करत रमेश यांनी IAS अधिकारी होवून गावाचं नांव उज्ज्वल केलं आहे.

IAS Success Story Ramesh Gholap

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : अंतराळात गेला अन् ढेकर आला तर काय होईल?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन। क्लास वन अधिकारी होण्यासाठी UPSC द्वारे दरवर्षी नागरी सेवा (GK Updates) परीक्षा घेतली जाते. यामध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी सहभागी होतात. काही जण पूर्व आणि मुख्य परीक्षा पास करून मुलाखती पर्यंत पोहोचतात. पण मुलाखतीमध्ये विचारलेले असे प्रश्न असतात की ते ऐकून अनेकजण गोंधळून जातात. हे प्रश्न सोपे असतात परंतु त्यांची उत्तरे फक्त तेच उमेदवार देऊ शकतात ज्यांचे सामान्य ज्ञान चांगले आहे. तुमची IQ लेव्हल चांगली आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हे प्रश्न एकदा नक्की पहा…

प्रश्न – जर कोणी अंतराळात (Space) गेला अन् त्याला जर ढेकर आला तर काय होईल ?

उत्तर – General Knowledge च्या या प्रश्नाच्या उत्तरावर तुमचीही बोलती बंद होईल परंतु या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे. तसं पाहिलं तर ,अंतराळात (Space) गुरुत्वाकर्षण नसतं, त्यामुळे अंतराळात (GK Updates) ढेकर येऊच शकत नाहीत. कारण, गुरुत्वाकर्षण नसल्याने अंतराळात पोटातील गॅसपासून लिक्विड वेगळं होतं. त्यामुळे अंतराळात ढेकरच येऊ शकत नाही…

प्रश्न – असा कोणता जीव आहे, जो एकावेळी 2 हजार फुग्यांएवढा श्वास घेतो अन् तेवढाच सोडतो ?

उत्तर – ब्लू व्हेल हा असा जीव आहे, जो एकावेळी दोन हजार फुग्यांएवढा श्वास घेतो आणि तेवढाच श्वास सोडतो.

प्रश्न – जगातला असा कोणता देश आहे, ज्याचा ध्वज आयाताकृती नाही अन् चौकोनीही नाही ?

उत्तर – जर तुमच्याकडे देश आणि जगाची माहिती असेल तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर सहज देऊ शकता. जर उत्तर येत नसेल तर त्याच उत्तर ‘नेपाळ देश’ आहे ज्याचा ध्वज आयाताकृती नाही अन् चौकोनीही नाही..

प्रश्न – (GK Updates)

आपल्या शरीराचा असा कोणता भाग आहे, जिथे रक्ताचा एक अंशही पोहचत नाही?

उत्तर – कॉर्निया (डोळ्याचा पारदर्शक भाग) हा आपल्या शरीरातील एकमेव भाग आहे जिथे रक्तपुरवठा होत नाही. हा एक अवयव आहे जो थेट हवेतून ऑक्सिजन घेतो.

प्रश्न – दात पाहून घोडा आहे की घोडी हे सांगता येईल का ?

उत्तर – हा प्रश्न ऐकून तुम्हाला तर घाम फुटू शकतो. परंतु हे खरे आहे, दात पाहून घोडा आहे की घोडी हे तुम्ही सांगू शकता. तर घोड्यामध्ये 40 दात आढळतात, तर घोडीमध्ये 36 दात आढळतात. (GK Updates)

प्रश्न- इंग्रजीतला असा कोणता शब्द आहे, शेवटची चार अक्षरे काढून टाकली तर त्याच्या उच्चारात काही फरक पडणार नाही ?

उत्तर – होय, इंग्रजीला तो शब्द आहे Queue. हा एकमेव शब्द आहे ज्याचा शेवटची चार अक्षरे काढून टाकल्यानंतर उच्चार सारखाच राहतो, विश्वास बसत नसेल तर तुम्हीच पहा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Textiles Committee Recruitment : वस्त्रोद्योग समिती, मुंबई अंतर्गत भरती सुरु; ‘या’ पत्यावर पाठवा अर्ज

Textiles Committee Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। वस्त्रोद्योग समिती, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (Textiles Committee Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गुणवत्ता आश्वासन अधिकारी, कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी, कनिष्ठ अन्वेषक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – वस्त्रोद्योग समिती, मुंबई

भरली जाणारी पदे – (Textiles Committee Recruitment)

गुणवत्ता आश्वासन अधिकारी

कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी

कनिष्ठ अन्वेषक

पद संख्या – 17 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – 63 वर्षे

  1. गुणवत्ता आश्वासन अधिकारी (EP&QA) – 25 वर्षे
  2. गुणवत्ता आश्वासन अधिकारी (प्रयोगशाळा) – 21 ते 27 वर्षे
  3. कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी (प्रयोगशाळा) – 19 ते 25 वर्षे
  4. कनिष्ठ अन्वेषक – 22 ते 28 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याचा पत्ता – सचिव, वस्त्रोद्योग समिती, भारत सरकार, वस्त्र मंत्रालय, पी. बाळू रोड, प्रभादेवी, मुंबई – 400025 (Textiles Committee Recruitment)

मिळणारे वेतन –

गुणवत्ता आश्वासन अधिकारी (EP&QA) – 7 व्या CPC नुसार पे मॅट्रिक्समध्ये स्तर 6 (रु. 35,400/- ते रु. 1,12,400/-) .

गुणवत्ता आश्वासन अधिकारी (प्रयोगशाळा) – 7 व्या CPC नुसार पे मॅट्रिक्समध्ये स्तर 6 (रु. 35,400/- ते रु. 1,12,400/-)

कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी (प्रयोगशाळा) – 7 व्या CPC नुसार पे मॅट्रिक्समध्ये स्तर 5 (रु. 29,200/- ते रु. 92,300/-).

कनिष्ठ अन्वेषक – 7 व्या CPC नुसार पे मॅट्रिक्समध्ये स्तर 5 (रु. 29,200/- ते रु. 92,300/-).

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 

PDF 1

PDF 2

अर्ज Download करण्यासाठी येथे CLICK करा – https://cutt.ly/0BPxpiy

अधिकृत वेबसाईट – textilescommittee.nic.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SEEPZ Recruitment 2022 : SEEPZ अंतर्गत ‘या’ रिक्त पदांवर भरती; पहा कुठे करायचा अर्ज

SEEPZ Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई अंतर्गत अधीक्षक, मूल्यमापनकर्ता, प्रतिबंधक (SEEPZ Recruitment 2022) अधिकारी, परीक्षक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई (Seepz Special Economic Zone)

भरली जाणारी पदे –

अधीक्षक

मूल्यमापनकर्ता (SEEPZ Recruitment 2022)

प्रतिबंधक अधिकारी

परीक्षक

पद संख्या – 06 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याचा पत्ता – विकास आयुक्त सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, सीप्झ सर्व्हिस सेंटर बिल्डिंग अंधेरी (ई), मुंबई-400096

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SEEPZ Recruitment 2022)

SEEPZ Mumbai Bharti 2022

मिळणारे वेतन –

  1. अधीक्षक – Rs. 9,300 -34,800/-
  2. प्रतिबंधक – अधिकारी Rs. 9,300 -34,800/-
  3. परीक्षक Rs. 9,300 -34,800/-
  4. मूल्यमापनकर्ता Rs. 9,300 -34,800/-

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (SEEPZ Recruitment 2022)
  3. अर्ज जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 45 दिवसाच्या आत (9 नोव्हेंबर 2022) संबंधती पत्यावर पाठवावे.
  4. अर्जाच्या विहित नमुन्यासह तपशीलवार जाहिरात www.seepz.gov वर उपलब्ध आहे. अर्जाचे स्वरूप परिशिष्ट म्हणून जोडलेले आहे.
  5. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – seepz.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Scholarship : अपंग विद्यार्थिनींसाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती जाहीर, पहा पात्रता आणि फायदे

Scholarship

करिअरनामा ऑनलाईन। अपंग विद्यार्थिनींना अनेकदा खूप शिकायचं असतं. त्यांचा बौध्दिक (Scholarship) आवाकाही खूप चांगला असतो. मात्र अनेकदा अपंगत्वामुळे त्यांना व त्यांच्या पालकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातही आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडावे लागणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे. त्यांच्यासाठी खास केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने निरनिराळ्या शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या आहेत…

मुलींच्या शिक्षणासाठी पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. विशेषत: आर्थिक बाबींमुळे अपंग मुलींच्या शिक्षणात अडथळे येऊ शकतात ही बाब लक्षात घेऊनच केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या अपंग व्यक्ती (दिव्यांगजन) सक्षमीकरण विभागानं वेगवेगळया शिष्यवृत्ती (Scholarship) योजना सुरु केल्या आहे. या शिष्यवृत्तींमध्ये शालान्त परीक्षा पूर्व, शालान्त परीक्षेनंतर, आणि टॉप क्लास एज्युकेशन आणि नॅशनल ओव्हरसिज शिष्यवृत्तींचा समावेश आहे.

या आहेत अटी आणि शर्ती –

(१) किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. मात्र त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
(२) कोणत्याही पालकाची केवळ दोनच अपंग अपत्ये, या योजनेचा लाभ घेऊ शकतात. दुसरे अपत्य हे जुळ्या मुली असतील, तर दोघींनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.

शालान्त परीक्षा पूर्व शिष्यवृत्ती – (Scholarship)

  • ही शिष्यवृत्ती- ९ वी आणि १० वीमध्ये असणाऱ्या विद्यार्थिनींना मिळू शकते. शासनमान्य शाळेत किंवा केंद्रिय अथवा राज्य शिक्षण मंडळानं मान्यता प्रदान केलेल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करु शकतात.
  • या शिष्यवृत्तींतर्गत हॉस्टेलमध्ये राहून शिकणाऱ्या मुलींना दरमहा ८०० रुपये व इतर मुलींना दरमहा ५०० रुपये अर्थसहाय्य १२ महिन्यांसाठी दिले जाते. पुस्तकांच्या खर्चासाठी वर्षाला एक हजार रुपयांचं सहाय्य केलं जातं. अपंगांचा प्रकार लक्षात घेऊन दोन ते चार हजार रुपयांच्या मर्यादेत, अपंग अनुदान दिलं जातं.

शालान्त परीक्षेनंतरची शिष्यवृत्ती –

शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत मान्यताप्राप्त पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. मान्यताप्राप्त शाळेतील ११ वी व १२वी मधील विद्यार्थिनीही या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात.

शिष्यवृत्तीचे 4 प्रकार –

गट पहिला- पुढील विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींना याचा लाभ मिळू शकतो- वैद्यकीय/अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान/ व्यवस्थापन आणि व्यवसाय(बिझिनेस) / वित्त प्रशासन/ संगणकशास्त्र किंवा संगणक उपयोजिता (ॲप्लिकेशन)/ कृषी, पशुवैद्यकीय (Scholarship) आणि संबंधित शाखा/ फॅशन तंत्रज्ञान/ वास्तुकला आणि नियोजन.
या शिष्यवृत्तींतर्गत, हॉस्टेलमध्ये राहून शिकणाऱ्या मुलींना दरमहा १६०० रुपये व इतर मुलींना दरमहा ७५० रुपये अर्थसहाय्य १२ महिन्यांसाठी केले जाते.

गट दुसरा – पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमातील पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थिनींना याचा लाभ मिळू शकतो – औषधीनिर्माण शास्त्र/ एलएलबी/ जनसंवाद/ हॉटेल व्यवस्थापन आणि कॅटेरिंग/ पॅरॉमेडिकल/ ट्रॅव्हल-टुरिझम-हॉस्पिटॅलिटी/ इंटेरिअर डेकोरेशन/ डायेटिक्स – न्युट्रिशन/कमर्शिअल आर्ट/ फायनान्शिअल सर्व्हिसेस (बँकिंग/इन्शुरन्स/टॅक्सेशन)
या शिष्यवृत्तींतर्गत वसतीगृहात राहून शिकणाऱ्या मुलींना दरमहा ११०० रुपये व इतर मुलींना दरमहा ७०० रुपये अर्थसहाय्य १२ महिन्यांसाठी केले जाते.

गट तिसरा– गट पहिला आणि दुसऱ्यामध्ये समाविष्ट नसलेले सर्व पदवी अभ्यासक्रम. उदा- बीए/ बीएस्सी/ बीकॉम.
या शिष्यवृत्तींतर्गत, वसतीगृहात राहून शिकणाऱ्या मुलींना दरमहा ९५० रुपये व इतर मुलींना दरमहा ६५० रुपये अर्थसहाय्य १२ महिन्यांसाठी केले जाते.

गट चौथा – ११ वी, १२वी, आयटीआय आणि तंत्रनिकेतनचा तीन वर्षे कालावधीची पदविका.
या शिष्यवृत्तींतर्गत, वसतीगृहामध्ये राहून शिकणाऱ्या मुलींना दरमहा ९०० रुपये व इतर मुलींना दरमहा ५५० रुपये अर्थसहाय्य १२ महिन्यांसाठी केले जाते.

चारही गटांना पुस्तकांच्या खर्चासाठी वर्षाला प्रत्येकी दीड हजार रुपयांचे सहाय्य केलं जातं. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेने ना परतावा शिक्षण शुल्क आकारल्यास ते परत केलं जातं. या शिष्यवृत्तीचे दरवर्षी नूतनीकरण केलं जातं. दरवर्षी उत्तीर्ण होणं आवश्यक.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटवर माहिती घ्या –

http://www.scholarship.gov.in

http://www.disabilityaffairs.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NTPC Recruitment 2022 : इंजिनियर्सना मोठी संधी!! नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत ‘या’ पदावर भरती

NTPC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या (NTPC Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी पदाच्या 864 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

पद संख्या – 864 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2022

अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 ऑक्टोबर 2022

भरती प्रकार – खाजगी

पद संख्या – 864 पदे

संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड

भरले जाणारे पद – इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NTPC Recruitment 2022)

इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी – उमेदवाराकडे इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –

कमीत कमी- 18 वर्ष

जास्तीत जास्त – 27 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS – 300/-

SC/ST – फि नाही

PWD/ Female – फि नाही.

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (NTPC Recruitment 2022)
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. किंवा नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.ntpc.co.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 11 नोव्हेंबर 2022  आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.ntpc.co.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Vacancy : Walk in Interview!! होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र येथे भरती सुरु

Job Vacancy

करिअरनामा ऑनलाईन। होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई येथे लवकरच काही (Job Vacancy) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक, प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक, अभियंता प्रशिक्षणार्थी, तांत्रिक प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11, 15, 16, 17 आणि 18 नोव्हेंबर 2022 (पदांनुसार) असणार आहे.

संस्था – होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई

भरली जाणारी पदे –

प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक (Project Scientific Assistant)

प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक (Project Lab Assistant)

अभियंता प्रशिक्षणार्थी (Engineer Trainee)

तांत्रिक प्रशिक्षणार्थी (Technical Trainee)

लिपिक प्रशिक्षणार्थी (Clerk Trainee)

पद संख्या – 08 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Vacancy)

  1. प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक (Project Scientific Assistant) –

उमेदवारांनी Full-time B.Sc./ B.S. (in any stream of Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

2. प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक (Project Lab Assistant) –

उमेदवारांनी H.S.C. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

3. अभियंता प्रशिक्षणार्थी (Engineer Trainee) –

उमेदवारांनी Full-time degree in B.E/ B.Tech in Computer Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

4. तांत्रिक प्रशिक्षणार्थी (Technical Trainee) – (Job Vacancy)

उमेदवारांनी Full time Diploma in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

5. लिपिक प्रशिक्षणार्थी (Clerk Trainee) –

उमेदवारांनी Graduate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक (Project Scientific Assistant) – 55,600/- रुपये दरमहा

प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक (Project Lab Assistant) – 35,900/- रुपये दरमहा

अभियंता प्रशिक्षणार्थी (Engineer Trainee) – 25,000/- रुपये दरमहा

तांत्रिक प्रशिक्षणार्थी (Technical Trainee) – 16,000/- रुपये दरमहा

लिपिक प्रशिक्षणार्थी (Clerk Trainee) – 15,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीची तारीख – 11, 15, 16, 17 आणि 18 नोव्हेंबर 2022 (पदांनुसार)

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

Download Application Form – Click

अधिकृत वेबसाइट – https://www.hbcse.tifr.res.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ITBP Recruitment 2022 : 12 वी उत्तीर्णांसाठी इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये भरतीची घोषणा

ITBP Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (ITBP Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर व्हेटनरी) पदांच्या 40 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. 19 ऑक्टोबर 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 19 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2022

भरले जाणारे पद –

हेड कॉन्स्टेबल (एज्युकेशन & स्ट्रेस काउंसलर)

पद संख्या – 40 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर व्हेटनरी) – 12 वी उत्तीर्ण आणि व्हेटनरी कोर्स किंवा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असावे.

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष

जास्तीत जास्त – 25 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS: 100/-

फीस पे माध्यम – 

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता – (ITBP Recruitment 2022)

पुरुष
महिला

असा करा अर्ज – 

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या; किंवा इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्सच्या अधिकृत वेबसाईट itbpolice.nic.in ला भेट द्या.
  3. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 17 नोव्हेंबर 2022 आहे. (ITBP Recruitment 2022)
  4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – itbpolice.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : PDKV अंतर्गत भरती सुरु; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन। डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध रिक्त (Job Notification) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती तंत्रज्ञान), कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहाय्यक, फील्ड सहाय्यक पदांच्या 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17, 18 ऑक्टोबर 2022 (पदानुसार) आहे.

संस्था – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

भरले जाणारे पद – (Job Notification)

  1. सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती तंत्रज्ञान)
  2. कनिष्ठ संशोधन फेलो
  3. प्रकल्प सहाय्यक
  4. फील्ड सहाय्यक

पद संख्या – 05 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला, नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता –

1. सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती तंत्रज्ञान) – वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, सोर्घम संशोधन केंद्र, डॉ. PDKV, अकोला

2. कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहाय्यक, फील्ड सहाय्यक – असोसिएट डीनचे कार्यालय, महाराजबाग प्राणीसंग्रहालयासमोर, कृषी महाविद्यालय, नागपूर

मुलाखतीची तारीख – 17, 18 ऑक्टोबर 2022 (Job Notification)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती तंत्रज्ञान) – Ph.D. Agri. Botany (Plant Physiology)

2. कनिष्ठ संशोधन फेलो – 1. M. Tech in Soil and Water Conservation Engineering or Irrigation and Drainage Engineering from a recognized university.
2. MH-CIT or Diploma in Computer Science

3. प्रकल्प सहाय्यक -1. B. Sc (Agriculture) /B.Sc. (Hons.) Agriculture /B.Sc (Horticulture/B.Tech. (Agril. Engg) from a recognized university.
2. Candidate having experience in micro irrigation /Soil, plant and water analysis will be given preference.

4. फील्ड सहाय्यक – Diploma in Agriculture from a recognized university

मिळणारे वेतन –

  1. सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती तंत्रज्ञान) Rs, 57,700/- दरमहा
  2. कनिष्ठ संशोधन फेलो Rs, 40,700/- दरमहा
  3. प्रकल्प सहाय्यक Rs, 18,700/- दरमहा
  4. फील्ड सहाय्यक Rs, 10,700/- दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

जन्मतारखेशी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे

शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र

अनुभव प्रमाणपत्र (Job Notification)

NET/SET परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र

जात वैधता प्रमाणपत्र

निवड प्रक्रिया –

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  4. सदर पदांकरिता मुलाखत दिलेल्या पत्यावर 17, 18 ऑक्टोबर 2022 ला घेण्यात येणार आहे.
  5. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/TD दिला जाणार नाही.
  6. ही नियुक्ती पूर्णपणे प्रकल्प कार्यकाळासाठी कंत्राटी पद्धतीने केली जाईल आणि डॉ. पीडीकेव्ही, अकोला अंतर्गत
  7. नियमित नियुक्तीसाठी पदावर कोणताही दावा असणार नाही.
  8. निवडलेल्या उमेदवाराने समाधानकारक कर्तव्ये पार पाडली नाहीत तर, PI ला त्याला/तिला केव्हाही संपुष्टात आणण्याचा अधिकार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

PDF 1 

PDF 2

अधिकृत वेबसाईट – www.pdkv.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Google Recruitment 2022 : Google India मध्ये ‘या’ पदांवर भरतीसाठी लगेच Apply करा

Google Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। गुगल सोबत नोकरी करायला णाला नाही आवडणार? यासाठी गुगल इंडिया (Google Recruitment 2022) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागातील अप्रेंटीशीप या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – गुगल इंडिया

भरली जाणारी पदे –

  1. डिजिटल मार्केटिंग अप्रेंटिसशिप
  2. माहिती तंत्रज्ञान अप्रेंटिसशिप
  3. डेटा अ‍ॅप्रेंटिसशिप
  4. प्रोजेक्ट मॅनेजमेंट अप्रेंटिसशिप

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Google Recruitment 2022)

  • डिजिटल मार्केटिंग अप्रेंटिसशिप –

उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • माहिती तंत्रज्ञान अप्रेंटिसशिप –

उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • डेटा अ‍ॅप्रेंटिसशिप –

उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर (Google Recruitment 2022) डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • प्रोजेक्ट मॅनेजमेंट अॅप्रेंटिसशिप –

उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोट

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com