Home Blog Page 429

Education : ‘ही’ संस्था गरजू विद्यार्थ्यांसाठी सरसावली; करून घेते ‘NEET’ परीक्षेची तयारी

Education

करिअरनामा ऑनलाईन। वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी NEET परीक्षा द्यावी लागते. ही अत्यंत (Education) कठीण परीक्षा असते. यामध्ये उत्तीर्ण होणं सोपं नसलं तरी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातल्या ‘फिफ्टी व्हिलेजर्स सर्व्हिस इन्स्टिट्यूटमध्ये’ शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी ही परीक्षा पास होतात. या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे समाजातल्या आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातल्या विद्यार्थ्यांना इथे प्रवेश दिला जातो आणि परीक्षेची तयारी करून घेतली जाते.

फिफ्टी व्हिलेजर्स सर्व्हिस इन्स्टिट्यूट

भारत-पाकिस्तानची सीमा म्हटलं, की लष्करी छावण्या, बंदुका, गोळ्या, सैनिक वगैरे बाबी डोळ्यांसमोर येतात; मात्र याच सीमेवर बंदुका आणि गोळ्यांशी काहीही संबंध नसलेली (Education) एक संस्था कार्यरत आहे. तिथे आरोग्याच्या सुरक्षेसाठी ज्ञान दिलं जातं. या संस्थेत वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट (NEET) परीक्षेची तयारी करून घेतली जाते. नीट परीक्षेबाबत शिक्षण देणाऱ्या संस्थांपैकी ही सर्वोत्तम अशी एक संस्था आहे. फिफ्टी व्हिलेजर्स सर्व्हिस इन्स्टिट्यूट असं त्याचं नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता यावं, यासाठी ही संस्था त्यांना मदत करते.

यावर्षी 27 विद्यार्थी यशस्वी (Education)

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यामध्ये ही संस्था आहे. यंदा जुलै महिन्यात वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली. यामध्ये या संस्थेतल्या 27 विद्यार्यांनी यश मिळवलेलं आहे. संस्थेची स्थापना 10 वर्षांपूर्वी झाली. तेव्हापासून आतापर्यंत इतक्या कमी वेळात संस्थेतून शिक्षण घेतलेले 65 विद्यार्थी आज डॉक्टर बनले आहेत.

2012 मध्ये झाली स्थापना

डॉ. भरत सरन आणि त्यांच्या टीमद्वारे 2012 मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. शिकण्यासाठीचं साधन नसल्यामुळे जे विद्यार्थी डॉक्टर बनू शकत नाहीत, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा या (Education) संस्थेचा उद्देश होता. दर वर्षी 10वी उत्तीर्ण केलेल्या 50 गरीब विद्यार्थ्यांची निवड यासाठी केली जाते. निवड केलेल्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषय घेऊन सरकारी कॉलेजमध्ये 11वी-12वीसाठी प्रवेश मिळवून दिला जातो. मग त्यांना ‘नीट’साठी शिक्षण दिलं जातं.

गरजू विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण

शिकण्याची इच्छा असलेल्या प्रतिभावान पण गरीब विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश दिला जातो. आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांचं सुरू असलेलं शिक्षण थांबण्याच्या मार्गावर आहे, त्यांनाही यात प्रवेश मिळतो. त्यांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं जातं. अनेकदा मजुरी करून कुटुंबाचं पोट भरणारे विद्यार्थीही स्वतःचं शिक्षण इथून पूर्ण करतात. एक वेळ उपाशी राहणारे, प्रसंगी रस्त्यावर झोपायची वेळ आलेले, चहाच्या (Education) टपरीवर काम केलेले विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. भारत-पाकिस्तानच्या सीमेवर असणारी ही संस्था समाजाच्या आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातल्या गरजू, पण प्रतिभावान विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी मदत करते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Exim Bank Bharti 2022 : भारतीय निर्यात-आयात बँक मध्ये ‘या’ पदांवर भरती

Exim Bank

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय निर्यात-आयात बँक मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (Exim Bank Bharti 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मॅनेजर (कायदा), मॅनेजर (माहिती तंत्रज्ञान), मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – भारतीय निर्यात-आयात बँक

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 नोव्हेंबर 2022

पद संख्या – 45 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

भरली जणारी पदे – (Exim Bank Bharti 2022)

  1. मॅनेजर (कायदा) – 2 पदे
  2. मॅनेजर (माहिती तंत्रज्ञान) – 2 पदे
  3. मॅनेजमेंट ट्रेनी – 41 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

मॅनेजर (कायदा): MBA/PGDBA-फायनान्स किंवा CA झालेले असावे.

मॅनेजर (माहिती तंत्रज्ञान): B.E/ B.Tech/ MCA.

मॅनेजमेंट ट्रेनी: MBA/PGDBA-फायनान्स or CA.

मिळणारे वेतन –

मॅनेजर (कायदा): 48,170/- ते 69,810/-

मॅनेजर (माहिती तंत्रज्ञान): 48,170/- ते 69,810/-

मॅनेजमेंट ट्रेनी: 48,170/- ते 69,810/-

वय मर्यादा –

कमीत कमी: 21 वर्ष

जास्तीत जास्त: 35 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹६००/-.

SC/ST: ₹१००/-.

PWD/ Female: ₹१००/-.

फीस पे मध्यम – ऑनलाईन

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (Exim Bank Bharti 2022)
  4. किंवा भारतीय निर्यात-आयात बँक च्या अधिकृत वेबसाईट www.eximbankindia.in ला भेट द्या.
  5. अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०४ नोव्हेंबर २०२२ आहे.
  6. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  7. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  8. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  9. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – www.eximbankindia.in

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Tips : करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी 11 महत्वाच्या गोष्टी

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन। जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे. आणि यशस्वी होण्याासाठी (Success Tips) प्रत्येकाला अगदी सोपा मार्ग हवा आहे. उत्कर्ष आणि उन्नती ही दोन यशाची चाके आहेत. त्यामुळे प्रत्येकाला उत्कर्ष आणि उन्नती करायची आहे. अशावेळी काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. अशावेळी या 11 गोष्टी फॉलो करणं कायम फायदेशीर ठरतील. ज्यामुळे तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल आणि हे यश तुमच्यासोबत चिरंतर राहिल.

या 11 गोष्टी फॉलो करा –

1) योग्य प्रमाणात आहार घ्या. कायम संतुलित आहार घ्यायला हवा. आवश्यक आणि पचेल एवढंच जेवण प्रत्येकाने दररोज करावं. उत्तम आहारामुळे निरोगी आयुष्य राहण्यास (Success Tips) मदत होते.

 

 

 

 

Success Tips

2) दररोज व्यायाम करा. व्यायाम प्रकार हा महत्वाचा आणि जीवनातील अविभाज्य घटक असायला हवा. व्यायाम करताना पुरेशी काळजी घ्या. योगासने आणि चालणे हे उत्तम पर्याय आहेत.

 

 

 

 

 

Success Tips
3) लवकर झोपा आणि लवकर उठा या गोष्टी सतत फॉलो करा. दररोज 8 तास चांगली झोप मिळणे आवश्यक आहे. म्हणून योग्य वेळेत झोप घ्या.

Success Tips

4) व्यसनांपासून दूर रहा. तंबाखू, सिगरेट, दारू या गोष्टींपासून सतत दूर राहा. व्यसनांमुळे (Success Tips) आयुष्य कमी होते. त्यामुळे चांगल्या गोष्टींची सवय लावा.

 

Success Tips

5) भौतिक सुखापेक्षा शारीरिक सुखाचा विचार करा. अंतर्मन कसं आनंदी राहील याचा विचार करा. चांगल्या गोष्टी करण्यासाठी अग्रेसर राहा. सकारात्मक विचार अट्टाहासाने करा.

Success Tips

6) चांगल्या संगतीत राहा. कामय काही ना काही नवनवीन गोष्टी शिकत राहा. आणि यासाठी चांगल्या लोकांच मार्गदर्शन महत्वाच आहे.

Success Tips

7) डोकं कायम शांत ठेवा. याचा फायदा तुम्हालाच होईल. कमी बोला आणि भरपूर ऐका ही गोष्ट सर्वात प्रथम आयुष्यात फॉलो करा. यामुळे तुम्ही कायम शांत राहता.

Success Tips

8) कोणत्याही गोष्टीचा त्रास करून घेण्यापेक्षा त्या संकटातून किंवा प्रश्नांमधून मार्ग कसा काढता येईल याचा सर्वाधिक विचार करा. कायम सकारात्मक राहा. काळजी करण्यापेक्षा काळजी घ्या.

Success Tips

9) स्वतःला सर्वात जास्त वेळ द्या. यामुळे इतरांकडून अपेक्षा कमी होतील. आणि तुम्ही (Success Tips) स्वतःला वेळ देण्यात व्यस्त राहाल.

Success Tips

10) औषधांची अजिबात सवय लावून घेऊन नका. डोकेदुखी, अंग दुखी यासारख्या गोष्टींसाठी औषधांची मदत घेऊ नका. औषधांना स्वतःपासून दूर ठेवा.

Success Tips
11) क्रिएटिव्ह बना. कायम स्वतःचं पॅशन फॉलो करा. नवनवीन गोष्टी शिकत राहा आणि त्या जीवनात चिरंतर ठेवा.

 

Success Tips

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career News : कंपनीची हद्द झाली… म्हणाले; मोबाईल नंबरमध्ये ‘हा’ आकडा असेल तर मिळणार नाही Job

Career News

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या जाहिराती आपण अनेकवेळा पाहत असतो. पेपरमध्ये (Career News) किंवा टीव्हीवर विविध क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी जाहिराती प्रसिद्ध होत असतात. सरकारी असो किंवा खासगी कंपनीतील नोकरी असो, यासाठी विविध अटी या जाहीरातीत दिलेल्या असतात. तुमची शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, तुम्ही केलेले वेगवेगळे कोर्स, त्या योग्यतेनुसार नोकरी दिली जाते. पण सध्या नोकरीची एक जाहीरात चांगलीच चर्चेत आली आहे. यात शैक्षणिक पात्रता किंवा वयाची मर्यादा गरजेची नुसार एक विचित्र (Career News) अट कंपनीने ठेवली आहे. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांमध्ये चांगलाच संताप पसरला आहे.

जाहिरातीत काय म्हटलंय…

एका कंपनीच्या मालकाने नोकरी देण्याची घोषणा केली आहे. पण या (Career News) कंपनीत अशा लोकांना नोकरी मिळणार नाही ज्यांच्या मोबाईल फोन नंबरचा पाचवा आकडा 5 आहे. या विचित्र अटीमुळे नोकरी शोधणाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

कंपनीचा मालक अंधश्रद्धाळू (Career News)

ही जाहीरात चीनमधली आहे. इथं एका खासगी कंपनीच्या मालकाने इंटरव्ह्यूसाठी येणाऱ्या उमेदवारांसमोर अट ठेवली आहे. तुम्हाला नोकरी हवी असेल आणि तुमच्या मोबाईल फोन नंबरमध्ये पाचवा आकडा 5 असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बदलावा लागेल. या कंपनीचा मालक प्रचंड अंधश्रद्धाळू आहे. कर्मचाऱ्याच्या फोन नंबरमध्ये पाचवा आकडा 5 असेल तर कंपनीसाठी नुकसानदायक ठरू शकतो, असं त्याला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे या मालकाने अशी विचित्र अट टाकली आहे.

उमेदवार संतप्त

वास्तविक या विचित्र अटीचा नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या शैक्षणिक किंवा शारिरीक पात्रेतेशी काहीही संबंध नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांनी या विचित्र अटीवर नाराजी व्यक्त केली आहे. 21 व्या (Career News) शतकातही अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. तर एखाद्या ज्योतिषालाच नोकरीला का ठेवत नाही, असा सवलाही काहीजणांनी उपस्थित केला आहे.

सीनिअर्सशी होऊ शकतं भांडण

ज्योतिष तज्ज्ञांच्यामते चीनमध्ये अनेक कंपन्या पारंपारिक ज्योतिषशास्त्राशी प्रभावित आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार मोबाईल फोन नंबरचा पाचवा आकडा 5 असल्यास कर्मचाऱ्यांचं सीनिअर्सशी भांडण होऊ शकतं. हे कंपनीसाठी लाभदायक नसल्याचं ज्योतिष तज्ज्ञांचं मत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job News : Job Seekers साठी मोठी बातमी; ‘ही’ कंपनी भारतात देणार 20,000 नोकऱ्या

Job News

करिअरनामा ऑनलाईन | जॉबच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी खुशखबर (Job News) आहे. जगातील टॉप अकाउंटिंग कंपनीपैकी एक कंपनी देशात तब्बल 20,000 जागांसाठी भरती करणार आहे अशी माहिती कंपनीच्या CEO नं दिली आहे.

कंपनीचे नुकतेच नियुक्त झालेले सीईओ डॉ. येझदी नागपुरेवाला यांनी एका मुलाखतीत सांगितले; KPMG ही कंपनी भारतात पुढील 2-3 वर्षात आपल्या भारतीय कंपनीसाठी आणि कंपनीच्या जगभरातील वितरण आर्मसाठी 20,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.

केजीएस आणि केपीएमजी इंडिया दरम्यान, बिग फोर व्यावसायिक सेवा कंपनी सध्या भारतात 40,000 हून अधिक लोकांना रोजगार देते. KPMG ने कोविड-19 व्यत्ययावर मात केली (Job News) आणि ग्राहकांनी त्यांच्या कंपन्यांची लवचिकता बळकट करण्यासाठी विविध सेवांचा शोध घेतल्याने देशात मजबूत वाढ झाली आहे.

नागपुरवाला म्हणाले की, कंपनीसाठी भारताचा व्यवसाय 2022 मध्ये 25% पेक्षा जास्त वाढला आहे आणि 2023 मार्चचे निकाल देखील 25% पेक्षा जास्त असतील. KPMG सक्रिय असलेल्या सर्व प्रदेशांमध्ये सर्वात वेगवान वाढीसह भारत हे मुख्य तीन बाजारपेठांपैकी एक आहे. त्यांच्या मते, KPMG जगभरातील नेटवर्कला भारत हा सर्वोच्च मोठा पुरवठादार आहे.

बिग फोर कंपन्यांनी एक नमुना लक्षात घेतला आहे ज्यामध्ये KPMG त्यांच्या गैर-ऑडिट ऑपरेशन्सचा वेगाने विस्तार करत आहे, ज्यामध्ये सल्ला, कर आणि व्यवहार समाविष्ट आहेत.

नागपुरवाला पुढे म्हणाले की फर्मने काही वर्षांपूर्वी सल्लागार पद्धतीवर पुन्हा (Job News) लक्ष केंद्रित करणे आणि पुनरुज्जीवित करणे सुरू केले आहे  त्यांच्या मते, आता भारतातील KPMG च्या व्यवसायाचा सुमारे 60% भाग आहे आणि इतर उभ्यांपेक्षा अधिक वेगाने विस्तारत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Fair : SSC/ HSC/ ITI/ Graduation उमेदवारांसाठी पंढरपूरमध्ये भरतोय रोजगार मेळावा; ‘हा’ आहे पत्ता

Job Fair

करिअरनामा ऑनलाईन। सोलापूर येथे विक्री प्रशिक्षणार्थी, बाजार विकास कार्यकारी, (Job Fair) प्रशिक्षणार्थी, उत्पादन/गुणवत्ता नियंत्रण, मशीन ऑपरेटर, असेंब्ली लाइन ऑपरेटर, विमा सल्लागार, ईपीपी प्रशिक्षणार्थी, शिकाऊ प्रशिक्षणार्थी इ. करीता पंडित दिनदयाल उपाध्याय, रोजगार मेळावा 3 सोलापूर चे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने नांव नोंदणी करायची आहे. नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. रोजगार मेळाव्याची तारीख 18 ऑक्टोबर 2022 आहे.

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 3, सोलापूर

भरली जाणारी पदे – सेल्स ट्रेनी, ट्रेनी, रिकव्हरी ऑफिसर आणि शिपाई, सेल्स एक्झिक्युटिव्ह, ऑफिसर, ऑपरेटर/हेल्पर/अधिकारी, विमा सल्लागार, ऑपरेटींग इंजिनियर्स, बिलिंग एक्झिक्युटिव्ह/स्टाफ नर्स/ऑफिसर, इ. (Job Fair)

पद संख्या – 589+ जागा

भरती – खाजगी नियोक्ता

आवश्यक शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ ITI/ Graduation

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

राज्य – महाराष्ट्र

विभाग – पुणे

जिल्हा – सोलापूर (Job Fair)

नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर (Solapur)

मेळाव्याचा पत्ता – कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर

रोजगार मेळाव्याची तारीख – 18 ऑक्टोबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Fair)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

नांव नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Jobs Govt : 10वी/12वी पासना रेल्वेत ‘या’ पदांवर भरतीची घोषणा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Jobs Govt

करिअरनामा ऑनलाईन। दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (Jobs Govt) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ग्रुप ‘C’ लेवल-2 (7th CPC), भूतपूर्व ग्रुप ‘D’ लेवल-1 (7th CPC) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर

भरली जाणारी पदे –

  1. ग्रुप ‘C’ लेवल-2 (7th CPC)
  2. भूतपूर्व ग्रुप ‘D’ लेवल-1 (7th CPC)

पद संख्या – 08 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Jobs Govt)

ग्रुप ‘C’ लेवल-2 (7th CPC) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 12th Pass with ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

  • भूतपूर्व ग्रुप ‘D’ लेवल-1 (7th CPC) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 10th Pass with ITI, NCVT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Jobs Govt)

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://secr.indianrailways.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agnipath Yojana : अग्निवीरांना बँकिंग सुविधा देण्यासाठी सैन्यदल सज्ज, ‘या’ बँकांशी केला करार

Agnipath Yojana

करिअरनामा ऑनलाईन। ‘अग्निवीर’ भरती झाल्यानंतर अग्निविरांना बँकिंग सुविधा देण्यासाठी (Agnipath Yojana) भारतीय लष्कराने 11 बँकांशी सामंजस्य करार केले आहेत. संरक्षण मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. या वर्षी जूनमध्ये सरकारने तीन सेवांसाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत, 17 ते 21 वयोगटातील तरुणांना केवळ 4 वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाईल, त्यापैकी 25 टक्के नियमित सेवेसाठी निवडले जातील.

‘या’ बँकांशी केला करार – (Agnipath Yojana)

1. स्टेट बँक ऑफ इंडिया,

पंजाब नॅशनल बँक,

3. बँक ऑफ बडोदा,

4. आयडीबीआय बँक,

5. आयसीआयसीआय बँक,

6. एचडीएफसी बँक,

7. अॅक्सिस बँक,

8. येस बँक,

9. कोटक महिंद्रा

10. IDFC फर्स्ट बँक

11. बंधन बँक

अग्निवीरांच्या नोंदणीनंतर भारतीय लष्कर ‘अग्निवीरांना या बँकांच्या माध्यमातून बँकिंग सुविधा देणार आहे. या 11 बँकांसोबत ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्रालयाने दिली.

पहिल्या बॅचचे प्रशिक्षण जानेवारीपासून सुरू –

या सुरू करत आहेत. ‘अग्निवीर’ची पहिली तुकडी पुढच्या (Agnipath Yojana) वर्षी जानेवारीपर्यंत लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रात रुजू होईल.

भरतीसाठी महिलांचा प्रतिसाद लक्षणीय –

अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्याच्या कोअर ऑफ मिलिटरी पोलीस म्हणजेच CMP विभागात रिक्त असलेल्या 100 जागांवर भरतीसाठी जवळपास अडीच लाख तरुणींनी अर्ज केले आहेत. सध्या सीएमपी ही सैन्यातील अशी एकमेव शाखा आहे जिथं अधिकारी रँक खालील पदांवर महिलांची भरती केली जाते. जमाव नियंत्रित (Agnipath Yojana) करणं, तपास, घुसखोरीविरोधी कारवाई, सण समारंभांतील बंदोबस्त अशा ठिकाणी महिला मिलिटरी पोलीस दलांतील कर्मचाऱ्यांना ड्युटी दिली जाते. दरम्यान, अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य भरतीची प्रक्रिया आधीप्रमाणेच असून, या प्रक्रियेला मिळणार प्रतिसादही उत्साह वाढवणारा आहे. अग्निपथ योजनेचे निकष व अटी पूर्वीप्रमाणे कायम असल्याचं या भरती प्रक्रियेची जाण असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIT Kanpur Recruitment : पदवीधरांना मोठी संधी!! इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कानपूर येथे ‘या’ पदांवर भरती सुरु

IIT Kanpur Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कानपूर येथे रिक्त पदांच्या (IIT Kanpur Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 119 रिक्त पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कानपूर

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 नोव्हेंबर 2022

पद संख्या – 119 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – कानपूर

भरती प्रकार – सरकारी

भरले जाणारे पद – कनिष्ठ सहाय्यक

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IIT Kanpur Recruitment)

उमेदवार पदवीधर आणि कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ज्ञान असावे.

मिळणारे वेतन – 

कनिष्ठ सहाय्यक – 21,700/- ते 69,100/-

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 30 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS: 700/-
SC/ST: फि नाही (IIT Kanpur Recruitment)
PWD/ Female: फि नाही

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायावर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कानपूर च्या अधिकृत वेबसाईट www.iitk.ac.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०९ नोव्हेंबर २०२२ आहे. (IIT Kanpur Recruitment)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.iitk.ac.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SBI PO Exam 2022 : अशी असेल परीक्षेसाठीची सिलेक्शन प्रोसेस; कोणत्या तारखेला होणार प्रिलिम्स?

SBI PO Exam 2022

करिअरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी भरती (SBI PO Exam 2022) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. SBI PO भर्ती 2022 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली आहे. PO भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 22 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झाली. SBI ने प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातीनुसार, प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी एकूण 1600 रिक्त जागा आहेत. SBI PO भर्ती 2022 साठी उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, गट व्यायाम आणि मुलाखतीनंतर केली जाईल.

महत्वाच्या तारखा –

SBI PO भर्ती 2022 च्या वेळापत्रकानुसार, प्राथमिक परीक्षा 17, 18, 19 आणि 20 डिसेंबर 2022 रोजी घेतली जाईल. SBI PO भरती परीक्षेचे प्रवेशपत्र SBI वेबसाइटवर जारी केले जाईल.

2020 आणि 2021 च्या तुलनेत यावेळी PO च्या रिक्त जागा कमी निघाल्या आहेत.

SBI PO भर्ती 2022 मध्ये एकूण 1600 रिक्त जागा आहेत. तर 2020 आणि 2021 मध्ये PO च्या 2000-2000 रिक्त जागा आल्या. पीओ पदाच्या रिक्त जागा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कमी होत आहेत. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढविण्याची मागणी उमेदवारांकडून होत आहे.

अशी असेल गुणवत्ता यादी (SBI PO Exam 2022)

SBI PO भर्ती 2022 मध्ये, उमेदवारांना तीन परीक्षा द्याव्या लागतील. परंतु अंतिम गुणवत्ता यादी दोन टप्प्यातील गुणांची केली जाईल. पीओ भरतीची प्राथमिक परीक्षा पात्रता आहे.

भरली जाणारी पदे –

प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

एकूण जागा – 1673

शैक्षणिक पात्रता –

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

जे त्यांच्या पदवीच्या शेवटच्या वर्षात/सेमिस्टरमध्ये आहेत (SBI PO Exam 2022) ते देखील या अटीच्या अधीन राहून तात्पुरते अर्ज करू शकतात.

मुलाखतीसाठी बोलावल्यास, त्यांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

चार्टर्ड अकाउंटंट प्रमाणपत्र असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

इतका मिळणार पगार –

प्रोबेशनरी ऑफिसर (PO) – 65,780/- – 68,580/- रुपये दरमहा

परीक्षा फी –

खुल्या प्रवगासाठी आणि इतरांसाठी – 750/- रुपये

SC/ST/PWD प्रवर्गांसाठी – शुल्क नाही

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com