Career News : कंपनीची हद्द झाली… म्हणाले; मोबाईल नंबरमध्ये ‘हा’ आकडा असेल तर मिळणार नाही Job

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या जाहिराती आपण अनेकवेळा पाहत असतो. पेपरमध्ये (Career News) किंवा टीव्हीवर विविध क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी जाहिराती प्रसिद्ध होत असतात. सरकारी असो किंवा खासगी कंपनीतील नोकरी असो, यासाठी विविध अटी या जाहीरातीत दिलेल्या असतात. तुमची शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, तुम्ही केलेले वेगवेगळे कोर्स, त्या योग्यतेनुसार नोकरी दिली जाते. पण सध्या नोकरीची एक जाहीरात चांगलीच चर्चेत आली आहे. यात शैक्षणिक पात्रता किंवा वयाची मर्यादा गरजेची नुसार एक विचित्र (Career News) अट कंपनीने ठेवली आहे. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांमध्ये चांगलाच संताप पसरला आहे.

जाहिरातीत काय म्हटलंय…

एका कंपनीच्या मालकाने नोकरी देण्याची घोषणा केली आहे. पण या (Career News) कंपनीत अशा लोकांना नोकरी मिळणार नाही ज्यांच्या मोबाईल फोन नंबरचा पाचवा आकडा 5 आहे. या विचित्र अटीमुळे नोकरी शोधणाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

कंपनीचा मालक अंधश्रद्धाळू (Career News)

ही जाहीरात चीनमधली आहे. इथं एका खासगी कंपनीच्या मालकाने इंटरव्ह्यूसाठी येणाऱ्या उमेदवारांसमोर अट ठेवली आहे. तुम्हाला नोकरी हवी असेल आणि तुमच्या मोबाईल फोन नंबरमध्ये पाचवा आकडा 5 असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बदलावा लागेल. या कंपनीचा मालक प्रचंड अंधश्रद्धाळू आहे. कर्मचाऱ्याच्या फोन नंबरमध्ये पाचवा आकडा 5 असेल तर कंपनीसाठी नुकसानदायक ठरू शकतो, असं त्याला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे या मालकाने अशी विचित्र अट टाकली आहे.

उमेदवार संतप्त

वास्तविक या विचित्र अटीचा नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या शैक्षणिक किंवा शारिरीक पात्रेतेशी काहीही संबंध नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांनी या विचित्र अटीवर नाराजी व्यक्त केली आहे. 21 व्या (Career News) शतकातही अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. तर एखाद्या ज्योतिषालाच नोकरीला का ठेवत नाही, असा सवलाही काहीजणांनी उपस्थित केला आहे.

सीनिअर्सशी होऊ शकतं भांडण

ज्योतिष तज्ज्ञांच्यामते चीनमध्ये अनेक कंपन्या पारंपारिक ज्योतिषशास्त्राशी प्रभावित आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार मोबाईल फोन नंबरचा पाचवा आकडा 5 असल्यास कर्मचाऱ्यांचं सीनिअर्सशी भांडण होऊ शकतं. हे कंपनीसाठी लाभदायक नसल्याचं ज्योतिष तज्ज्ञांचं मत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com