Scholarship : अपंग विद्यार्थिनींसाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती जाहीर, पहा पात्रता आणि फायदे

करिअरनामा ऑनलाईन। अपंग विद्यार्थिनींना अनेकदा खूप शिकायचं असतं. त्यांचा बौध्दिक (Scholarship) आवाकाही खूप चांगला असतो. मात्र अनेकदा अपंगत्वामुळे त्यांना व त्यांच्या पालकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातही आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडावे लागणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे. त्यांच्यासाठी खास केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने निरनिराळ्या शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या आहेत…

मुलींच्या शिक्षणासाठी पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. विशेषत: आर्थिक बाबींमुळे अपंग मुलींच्या शिक्षणात अडथळे येऊ शकतात ही बाब लक्षात घेऊनच केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या अपंग व्यक्ती (दिव्यांगजन) सक्षमीकरण विभागानं वेगवेगळया शिष्यवृत्ती (Scholarship) योजना सुरु केल्या आहे. या शिष्यवृत्तींमध्ये शालान्त परीक्षा पूर्व, शालान्त परीक्षेनंतर, आणि टॉप क्लास एज्युकेशन आणि नॅशनल ओव्हरसिज शिष्यवृत्तींचा समावेश आहे.

या आहेत अटी आणि शर्ती –

(१) किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. मात्र त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
(२) कोणत्याही पालकाची केवळ दोनच अपंग अपत्ये, या योजनेचा लाभ घेऊ शकतात. दुसरे अपत्य हे जुळ्या मुली असतील, तर दोघींनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.

शालान्त परीक्षा पूर्व शिष्यवृत्ती – (Scholarship)

  • ही शिष्यवृत्ती- ९ वी आणि १० वीमध्ये असणाऱ्या विद्यार्थिनींना मिळू शकते. शासनमान्य शाळेत किंवा केंद्रिय अथवा राज्य शिक्षण मंडळानं मान्यता प्रदान केलेल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करु शकतात.
  • या शिष्यवृत्तींतर्गत हॉस्टेलमध्ये राहून शिकणाऱ्या मुलींना दरमहा ८०० रुपये व इतर मुलींना दरमहा ५०० रुपये अर्थसहाय्य १२ महिन्यांसाठी दिले जाते. पुस्तकांच्या खर्चासाठी वर्षाला एक हजार रुपयांचं सहाय्य केलं जातं. अपंगांचा प्रकार लक्षात घेऊन दोन ते चार हजार रुपयांच्या मर्यादेत, अपंग अनुदान दिलं जातं.

शालान्त परीक्षेनंतरची शिष्यवृत्ती –

शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत मान्यताप्राप्त पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. मान्यताप्राप्त शाळेतील ११ वी व १२वी मधील विद्यार्थिनीही या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात.

शिष्यवृत्तीचे 4 प्रकार –

गट पहिला- पुढील विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींना याचा लाभ मिळू शकतो- वैद्यकीय/अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान/ व्यवस्थापन आणि व्यवसाय(बिझिनेस) / वित्त प्रशासन/ संगणकशास्त्र किंवा संगणक उपयोजिता (ॲप्लिकेशन)/ कृषी, पशुवैद्यकीय (Scholarship) आणि संबंधित शाखा/ फॅशन तंत्रज्ञान/ वास्तुकला आणि नियोजन.
या शिष्यवृत्तींतर्गत, हॉस्टेलमध्ये राहून शिकणाऱ्या मुलींना दरमहा १६०० रुपये व इतर मुलींना दरमहा ७५० रुपये अर्थसहाय्य १२ महिन्यांसाठी केले जाते.

गट दुसरा – पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमातील पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थिनींना याचा लाभ मिळू शकतो – औषधीनिर्माण शास्त्र/ एलएलबी/ जनसंवाद/ हॉटेल व्यवस्थापन आणि कॅटेरिंग/ पॅरॉमेडिकल/ ट्रॅव्हल-टुरिझम-हॉस्पिटॅलिटी/ इंटेरिअर डेकोरेशन/ डायेटिक्स – न्युट्रिशन/कमर्शिअल आर्ट/ फायनान्शिअल सर्व्हिसेस (बँकिंग/इन्शुरन्स/टॅक्सेशन)
या शिष्यवृत्तींतर्गत वसतीगृहात राहून शिकणाऱ्या मुलींना दरमहा ११०० रुपये व इतर मुलींना दरमहा ७०० रुपये अर्थसहाय्य १२ महिन्यांसाठी केले जाते.

गट तिसरा– गट पहिला आणि दुसऱ्यामध्ये समाविष्ट नसलेले सर्व पदवी अभ्यासक्रम. उदा- बीए/ बीएस्सी/ बीकॉम.
या शिष्यवृत्तींतर्गत, वसतीगृहात राहून शिकणाऱ्या मुलींना दरमहा ९५० रुपये व इतर मुलींना दरमहा ६५० रुपये अर्थसहाय्य १२ महिन्यांसाठी केले जाते.

गट चौथा – ११ वी, १२वी, आयटीआय आणि तंत्रनिकेतनचा तीन वर्षे कालावधीची पदविका.
या शिष्यवृत्तींतर्गत, वसतीगृहामध्ये राहून शिकणाऱ्या मुलींना दरमहा ९०० रुपये व इतर मुलींना दरमहा ५५० रुपये अर्थसहाय्य १२ महिन्यांसाठी केले जाते.

चारही गटांना पुस्तकांच्या खर्चासाठी वर्षाला प्रत्येकी दीड हजार रुपयांचे सहाय्य केलं जातं. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेने ना परतावा शिक्षण शुल्क आकारल्यास ते परत केलं जातं. या शिष्यवृत्तीचे दरवर्षी नूतनीकरण केलं जातं. दरवर्षी उत्तीर्ण होणं आवश्यक.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटवर माहिती घ्या –

http://www.scholarship.gov.in

http://www.disabilityaffairs.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com