Jobs Near Me : ITI उमेदवारांना मोठी संधी!! महापारेषण बारामती अंतर्गत ‘या’ पदांवर भरती

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत (Jobs Near Me) शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.

ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या जाहीरातीसह जोडलेला प्रपत्र-अ परीपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत व मुद्दा क्र. ०२ मध्ये नमुद आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत/स्वसाक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती व इतर कागदपत्रे दिनांक 31.10.2022 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत कार्यकारी (Jobs Near Me) अभियंता यांचे कार्यालय महापारेषण, अउदा संवसु विभाग बारामती, “उर्जा भवन’, प्रशासकीय इमारत, 1 ला मजला, भिगवण रोड, बारामती- 412102 या पत्त्यावर पाठवायचा आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, बारामती

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

पद संख्या – 32 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – बारामती

वय मर्यादा – 18 ते 38 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन / ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महापारेषण, अउदा संवसु विभाग बारामती, “उर्जा भवन’, प्रशासकीय इमारत, 1 ला मजला, भिगवण रोड, बारामती- 412102

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) –

1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

आवश्यक प्रमाणपत्रे/कागदपत्रे –

  1. एस.एस.सी. व आय.टी.आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची प्रत.
  2. शाळा सोडल्याचा दाखला.
  3. आधारकार्ड
  4. मागासवर्गात समाविष्ठ असल्यास जात प्रमाणपत्र.
  5. महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र.
  6. प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र – नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र. ( अजा, व अज या प्रवर्गातील उमेदवार वगळून).
  7. आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवारांने स्वत:च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.

असा करा अर्ज – 

  1. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवार https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेस्थळावरून अर्ज करू शकतात.
  3. अर्जाकरिता आस्थापना क्र. E10162700639 व Opportunity Code : AO275403 आहे.
  4. अर्ज सुरु होण्याची तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.
    Mahapareshan Baramati Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – mahatransco.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com