Home Blog Page 419

Auri Katarina : टापटीपपणासाठी तिने लाथाडली मोठ्या पगाराची नोकरी; घरोघरी जाऊन फ्री करते साफसफाई

Auri Katarina

करिअरनामा ऑनलाईन। स्वच्छता करणं हा स्त्रियांचा मुळ स्वभाव. घराची (Auri Katarina) साफसफाई करणं कोणाला नाही आवडत? पण हेच घर दुसऱ्याचं असेल तर कदाचित आपल्याला आवडणार नाही. पण आता असे खूप कमी लोक असतील ज्यांना घर जास्त स्वच्छ करायला आवडेल. पण एक महिला आहे जिला घर साफ करणे इतके आवडते की तिने ते आपले स्वप्न बनवले आहे. वास्तविक, ऑरी कॅटरिना नावाच्या महिलेने आपली नोकरी सोडली आणि आता ती लोकांची घरे साफ करत जगभर फिरत आहे.

Auri Katarina

लोकांची गलीच्छ घरे स्वच्छ करते 

29 वर्षीय ऑरी कॅटरिना हिने 2021 च्या उन्हाळ्यात तिच्या क्लिनिंग कंपनीत सर्व्हिस मॅनेजरची नोकरी सोडली. आता ती जगभर फिरते आणि लोकांना त्यांची गलिच्छ घरे स्वच्छ करण्यात मदत करते.

Auri Katarina
Auri Katarina

खरं तर, ऑरीने एका त्रासलेल्या आईला घर साफ (Auri Katarina) करण्यात मदत केली होती. तेव्हापासून ती स्वच्छतेच्या प्रेमात पडली. यादरम्यान तिला अनेक महिने पैसेही मिळाले नाहीत. मात्र, त्यादरम्यान तिने टिकटॉकवर तिचे व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली.

हळूहळू ऑरीचा व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल झाला आणि ती या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टार झाली. यामुळे आता त्यांना प्रायोजक मिळतात आणि त्यामुळे त्यांचा खर्च भागतो.

Auri Katarina

परदेशात जावून करते सफाईची कामे (Auri Katarina)

प्रायोजकाकडून मिळणाऱ्या पैशातून ती जगभर फिरते आणि लोकांची घरे साफ करते. कोणाचेही घर स्वच्छ करण्यासाठी ती एक पैसाही घेत नाही. ऑरी कॅटरिना ही फिनलंडची आहे. पण तीने अमेरिकेतून ब्रिटनमध्ये जाऊन लोकांची घरे स्वच्छ केली आहेत. टिकटॉकवर तिचे 78 लाख फॉलोअर्स आहेत, तर इन्स्टाग्रामवर 20 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात.

Auri Katarina

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIESL Recruitment 2022 : AI इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; थेट द्या मुलाखत

AIESL Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। AI इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत (AIESL Recruitment 2022) कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे. मुलाखतीची तारीख (पदांनुसार) 14, 21 & 28 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – AI इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड

भरली जाणारी पदे – कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी

पद संख्या – 27 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली, मुंबई, कोलकाता

अर्ज फी (DD) – 1500/- रुपये

निवड प्रक्रिया – मुलाखत

भरली जाणारी पदे – (AIESL Recruitment 2022)

कार्यकारी – Finance (Senior Level) – 02 पदे

कार्यकारी – Finance Level II – 02 पदे

कार्यकारी – Finance – 09 पदे

कनिष्ठ कार्यकारी – Finance – 14 पदे

मुलाखतीचा पत्ता –

दिल्ली – दुसरा मजला, सीआरए बिल्डिंग, सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स, अरबिंदो मार्ग, जोर बाग, नवी दिल्ली-110003.

कोलकाता – Air India Engineering Services Ltd., APU केंद्र, कार्मिक विभाग, पहिला मजला, नवीन तांत्रिक क्षेत्र, DUM DUM, कोलकाता, पश्चिम बंगाल – 700052

मुंबई – AIESL, कार्मिक विभाग नवीन अभियांत्रिकी संकुल, सहार, विलेपार्ले (पूर्व), बामनवाडा जवळ, सिगारेट कारखाना, मुंबई-400099

मुलाखतीची तारीख –

दिल्ली – 14 नोव्हेंबर 2022
मुंबई – 21 नोव्हेंबर 2022 (AIESL Recruitment 2022)
कोलकाता – 28 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

कार्यकारी – Finance (Senior Level) Candidates should be a CA/ ICWA with minimum of 10 years of post-qualification experience
कार्यकारी – Finance Level II Candidates should be a CA/ ICWA with minimum of 7 years of post-qualification experience
कार्यकारी – Finance Candidates should be a CA/ ICWA with minimum of 5 years of post-qualification experience
कनिष्ठ कार्यकारी – Finance Candidates should be an Inter Chartered Accountant/ Inter Cost & Management Accountant or Full time MBA in Finance

मिळणारे वेतन –

कार्यकारी – Finance (Senior Level) Rs. 12,000/-
कार्यकारी – Finance Level II Rs. 10,000/-
कार्यकारी – Finance Rs. 8,000/-
कनिष्ठ कार्यकारी – Finance Rs. 5,000/-

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.aiesl.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti 2022 : खुशखबर!! लवकरच तलाठ्यांची 4 हजार पदे भरणार; कोणत्या विभागात किती पदे?

talathi bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया (Talathi Bharti 2022) करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 4 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे–पाटील यांनी आज दिले.

महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात (Talathi Bharti 2022) राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.

तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री विखे-पाटील यावेळी म्हणाले.

विभागनिहाय पदे – (Talathi Bharti 2022)

  • पुणे विभाग –

मंजूर पदे – 2543
स्थायी पदे – 1620
अस्थायी पदे – 923

  • नाशिक विभाग –

मंजूर पदे – 2118
स्थायी पदे – 1364
अस्थायी पदे – 754

  • कोकण विभाग –

मंजूर पदे – 1445
स्थायी पदे – 1014
अस्थायी पदे – 431

  • अमरावती विभाग –

मंजूर पदे – 2326
स्थायी पदे – 1806
अस्थायी पदे – 520 (Talathi Bharti 2022)

  • औरंगाबाद विभाग –

मंजूर पदे – 2533
स्थायी पदे – 1523
अस्थायी पदे – 1010

  • नागपूर विभाग –

मंजूर पदे – 1671
स्थायी पदे – 1247
अस्थायी पदे – 424

अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF  

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

India Job : माहित आहे का? भारतातील ‘हे’ मंत्रालय देतं जगभरात सर्वाधिक नोकऱ्या

India Job

करिअरनामा ऑनलाईन। बेरोजगारी ही या काळातील सर्वात (India Job) मोठी समस्या आहे. भारत असो वा जगातील इतर कोणताही देश, सगळेच बेरोजगारीने त्रस्त आहेत. अमेरिकेसह संपूर्ण युरोप सध्या बेरोजगारीशी झुंजत आहे. मात्र भारतासाठी थोडासा दिलासा आहे कारण ‘स्टॅटिस्टा’ या बाजार आणि ग्राहक डेटा विशेषज्ञ संशोधन कंपनीने जारी केलेल्या अहवालानुसार, भारताचे संरक्षण मंत्रालय हे जगातील सर्वात मोठे नियुक्ती करणारे मंत्रालय आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सध्या 29.2 कोटी सदस्य आहेत. म्हणजेच नोकऱ्या देण्याच्या बाबतीत भारतीय संरक्षण मंत्रालयाने चीन आणि अमेरिकेला मागे टाकले आहे.

चीन आणि अमेरिका पिछाडीवर (India Job)

मार्केट आणि कंझ्युमर डेटा स्पेशालिस्ट रिसर्च कंपनी स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, नोकरीच्या बाबतीत भारतीय संरक्षण मंत्रालय अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय आणि चीनच्या संरक्षण मंत्रालयापेक्षा पुढे आहे. 291 दशलक्ष लोक अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात, तर दुसरीकडे 255 दशलक्ष लोक चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात.

असं आहे संरक्षण बजेट 

कर्व्ह फोर्समध्ये भारत पुढे असला तरी संरक्षण (India Job) बजेटच्या दृष्टिकोनातून बघितले तर अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. जिथे चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेचे संरक्षण बजेट 65,91,244 कोटी आहे. तर चीनचे संरक्षण बजेट 24,11,029 कोटी आहे. भारत जगात तिसर्‍या क्रमांकावर असून त्याचे संरक्षण बजेट 6,30,323 कोटी रुपये आहे.

भारताचे संरक्षण मंत्रालय नोकरदारांच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर असू शकते, परंतु जेव्हा आपण सर्वात जास्त रोजगार निर्माण करणाऱ्या खाजगी कंपन्यांमध्ये कोणाचा (India Job) समावेश होतो त्याबद्दल बोलतो तेव्हा फक्त दोनच कंपन्यांचे नाव समोर येते. या दोन्ही कंपन्या अमेरिकेतील आहेत, पहिली वॉलमार्ट आणि दुसरी अॅमेझॉन आहे. जेथे वॉलमार्टमध्ये 230 दशलक्ष लोक काम करतात, तेथे सुमारे 16 कोटी लोक अॅमेझॉनमध्ये काम करतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Jobs Near Me : सरकारी नोकरीची संधी!! NHM अंतर्गत ‘या’ शहरात भरती सुरु

Jobs Near Me

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली येथे (Jobs Near Me) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, सर्जन, वैद्यकीय अधिकारी, sts RNTCP, RNTCP-STLS-TB, ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक, RSSK कौन्सेलर, RBSK , EMS समन्वयक, सिकल सेल, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, ऑप्टोमेट्रिस्ट, दंत आरोग्यतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, योग थेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी यूजी (युनानी), शितसाखळी तंत्रज्ञ , लसीकरण फील्ड मॉनिटर्स ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली (National Health Mission, Hingoli)

भरली जाणारी पदे – (Jobs Near Me)

हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, सर्जन, वैद्यकीय अधिकारी, RNTCP, RNTCP-STLS-TB, ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक, RSSK कौन्सेलर, RBSK , EMS समन्वयक, सिकल सेल, (Jobs Near Me) ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, ऑप्टोमेट्रिस्ट, दंत आरोग्यतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, योग थेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी यूजी (युनानी), शितसाखळी तंत्रज्ञ , लसीकरण फील्ड मॉनिटर्स

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Jobs Near Me)

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Resume (Jobs Near Me)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद हिंगोली.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – https://hingoli.nic.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Exam Training : त्वरा करा!! UPSC प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया झाली सुरु; ‘ही’ आहे शेवटची तारीख

UPSC Exam Training

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या (UPSC Exam Training) विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज 25 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय संचालक डॉ. के. एस. जैन यांनी दिली आहे.

येथे घेता येईल प्रशिक्षण

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे (UPSC Exam Training) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले ऍकॅडमी, पुणेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

महत्वाच्या तारखा 

ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत भरता येतील. अर्ज भरण्याची तसेच (UPSC Exam Training) परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2022 आहे.  प्रवेश परीक्षा 4 डिसेंबर 2002 रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेची वेळ सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राहील. परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबईचे संचालक डॉ. के. एस. जैन यांनी केले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

WCL Recruitment : 12 वी/ITI/डिप्लोमा/ग्रॅज्युएट्सना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब; असा करा अर्ज

WCL Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपूर येथे (WCL Recruitment) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ अप्रेंटीस, ITI ट्रेड अप्रेंटीस, सुरक्षा रक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 07 नोव्हेंबर 2022 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड, नागपूर

भरली जाणारी पदे – (WCL Recruitment)

  1. पदवीधर अप्रेंटीस (Graduate Apprentice) – 101 पदे
  2. तंत्रज्ञ अप्रेंटीस (Technician Apprentice) – 215 पदे
  3. ITI ट्रेड अप्रेंटीस (ITI Trade Apprentice) – 840 पदे
  4. सुरक्षा रक्षक (Security Guard) – 60 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

पदवीधर अप्रेंटीस (Graduate Apprentice) –

उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

तंत्रज्ञ अप्रेंटीस (Technician Apprentice) –

उमेदवारांनी डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे. (WCL Recruitment)

ITI ट्रेड अप्रेंटीस (ITI Trade Apprentice) –

उमेदवारांनी ग्रॅज्युएशन ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

सुरक्षा रक्षक (Security Guard) –

उमेदवारांनी ग्रॅज्युएशन 12वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IPS Success Story : ‘या’ दोन ओळींनी दिली प्रेरणा; IPS अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांच्या यशाचं रहस्य

IPS Success Story Girish Yadav

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकाऱ्यांची फार (IPS Success Story) मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील, मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी संपूर्ण देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. अशाच एका अधिकाऱ्याच्या कामगिरीविषयी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया मराठी मातीत जन्माला आलेले आयपीएस अधिकारी गिरीश यादव यांच्याबाबत.

ग्रामीण भागातून घेतले शालेय शिक्षण 

गिरीश यादव यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण हे कराडमधील तांबवे या गावी मराठी माध्यमातून झाले आहे. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातून पूर्ण केले. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयात बीटेकची पदवी घेतली.

हार्डवर्क तुम्हाला पुढे नेईल (IPS Success Story)

गिरीश यादव यांनी UPSC परिक्षा देत अवघ्या तिसऱ्याच प्रयत्नात आयपीएस रँक मिळवली. सध्या ते तामिळनाडू राज्यात सेवा बजावत आहेत. ते सांगतात की, यूपीएससी करताना स्पर्धा खूप आहे. कदाचित विद्यार्थ्यांना अपयशही मिळू शकते. त्यामुळे काही वेळा विद्यार्थी हा तणावात जातो. विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी ते सांगतात; “काहीवेळा तुमच्या आयुष्यात काही गोष्टी घडतात तिथून तुमचं आयुष्य बदलून जातं. त्याला तुम्ही माईलस्टोन म्हणू शकतात. मी जरी ग्रामीण भागातून आलो तरी हार्डवर्क, मेहनत केली तर प्रत्येकजण ध्येय गाठण्यासाठी पुढे जाऊ शकतो.”

‘Plan B’ ठेवा तयार 

स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना IPS अधिकारी (IPS Success Story) गिरीश यादव सांगतात की, स्पर्धा परिक्षा देणाऱ्या उमेदवाराने आयुष्यात Plan B नेहमी तयार ठेवला पाहिजे कारण एक गोष्ट तुम्हाला जमली नाही तर जे तुम्हाला जमतं त्याकडे तुम्ही वळू  शकता.

‘फैझ अहमद फैझ’ यांनी दिली प्रेरणा

स्पर्धा परिक्षा देताना कधीकधी व्यक्ती हा तणावात जातो. कारण काही जण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात तर काही जण तिसऱ्या, चौथ्या प्रयत्नापर्यंत यश मिळवतात. अशावेळी (IPS Success Story) तणाव येणं साहजिक आहे. यावर बोलताना गिरीश यादव सांगतात; ” अभ्यास करताना अनेकवेळा ताण – तणावाला सामोरे जावे लागले. यावर उपाय म्हणून मी ज्याठिकाणी अभ्यास करायचो त्याठिकाणी ‘फैझ अहमद फैझ’ यांचा शेर लिहून ठेवला होता. तो असा की,

‘दिल ना-उमीद तो नहीं नाकाम ही तो है

लम्बी है ग़म की शाम मगर शाम ही तो है|

या ओळी वाचल्या की मला प्रेरणा  मिळायची आणि मी पुनः जोमाने तयारी करायचो.” त्यामुळे विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करावेत असा सल्ला ते देतात.

इतिहासाची प्रचंड आवड 

“शालेय जीवनापासूनच इतिहास विषयाची आवड असल्याने मी इतिहास हा पर्याय निवडला. काही ऐतिहासिक पुस्तके तसेच चित्रपटांच्या वाचनामुळे ही आवड कायम आहे;” असे ते सांगतात.

विद्यार्थ्यांना दिल्या अभ्यासाच्या टिप्स

“2016 मधील माझ्या पहिल्या प्रयत्नात मी संपूर्ण 2 महिने ऐच्छिक पूर्वतयारीसाठी दिले होते. कारण मी पहिल्यांदाच इतिहास हा विषय घेतला होता. लागोपाठच्या प्रयत्नांत या विषयाला दिलेला वेळ कमी झाला. यानंतर मी मुख्यतः प्रिलिम्स आणि मेन्सच्या दरम्यानच्या दिवसांमध्ये इतिहासाचा अभ्यास केला.

मी इतिहासासाठी दैनंदिन/नियमित उत्तर लिहिण्याचा सराव केलेला नाही. पण प्रिलिम्स आणि मेन परीक्षेच्या दरम्यान अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीत, मी आठवड्यातून (IPS Success Story) एकदा विभागीय इतिहास पर्यायी चाचणी सोडवली. तसेच परीक्षेच्या 15 दिवस आधी पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी एकाच दिवसात पूर्ण चाचणी सोडवली. यामुळे मला माझा वेग, सादरीकरण सुधारण्यात आणि काही महत्त्वाच्या चुका आधीच टाळण्यात मदत झाली;” असेही ते सांगतात.

ते पुढे सांगतात; “वेगळ्या नोट्सऐवजी, माझ्याकडे साइड-मार्जिन नोट्स असायची, ज्यामुळे मी जे काही वाचले आहे ते थोड्या वेळात उजळणी करण्यास मला मदत झाली. तसेच अशा नोट्स असण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही काही सब-पॉइंट विसरल्यास लगेच क्रॉस चेकचा संदर्भ घेऊ शकता.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Unique Career Options : ग्राफोलॉजी म्हणजे काय? असं करा करिअर; पगार मिळतो लाखात 

Unique Career Options

करिअरनामा ऑनलाईन। कोणाचंही लिखाण किंवा त्यांच्या लिखाणाची (Unique Career Options) पद्धत बघून किंवा अक्षरं बघून त्यांचं व्यक्तिमत्वं सांगणारे कोणी एक्सपर्ट्स तुम्ही बघितले आहेत का? हे नक्कीच ज्योतिषी नाहीत. हे आहेत ग्राफोलॉजीस्ट. ग्राफोलॉजी हा एक कोर्स आहे जो केल्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी शिकू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा ग्राफोलॉजीस्ट कसं व्हावं हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

सर्वप्रथम, एखादी व्यक्ती ग्राफोलॉजिस्ट कशी बनू शकते हे समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. ग्राफोलॉजिस्ट होण्यासाठी मानसिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे.

ग्राफोलॉजिस्ट हे काम करतात (Unique Career Options)

ग्राफोलॉजी तज्ञ एखाद्याची स्वाक्षरी, लेखन शैली, शब्दांमधील अंतर आणि कुटिल रेषा यांचा अभ्यास करतात. हे एक प्रकारे कोणत्याही माणसाचे मानसशास्त्रीय विश्लेषण आहे. एवढेच (Unique Career Options) नाही तर तुम्हाला कोणाचे व्यक्तिमत्व बदलायचे असेल तर हस्ताक्षराची पद्धत बदलूनही ते तुम्ही साध्य करू शकता.

असे आहेत करिअरचे पर्याय

1. कॉर्पोरेट कंपन्या सल्लागार सेवा म्हणून ग्राफोलॉजिस्टची नियुक्ती करतात. याच्या मदतीने ते प्रतिभावान लोकांना ओळखतात आणि त्यांना नोकरीवर ठेवतात.

2. फॉरेन्सिक तपासणीच्या क्षेत्रात ग्राफोलॉजिस्ट खूप महत्वाचे आहेत. ग्राफोलॉजिस्ट गुन्हेगारी प्रकरणे सोडविण्यास मदत करतात. खटला सोडवण्यासाठी न्यायालय आणि पोलीसही त्यांची मदत घेतात. (Unique Career Options)

3. याशिवाय, विद्यापीठे आणि शाळांमध्ये शिक्षक म्हणून ग्राफोलॉजिस्टसाठी एक चांगला पर्याय आहे.

इथे करता येईल कोर्स –

1. भारताचे हस्तलेखन विश्लेषक, विशाखापट्टणम

2. इन्स्टिट्यूट ऑफ ग्राफोलॉजी आणि शिक्षण आणि विकास कार्यक्रम कोलकाता

3. आंतरराष्ट्रीय ग्राफोलॉजी रिसर्च सेंटर, मुंबई (Unique Career Options)

4. GraphologyIndia.com, दिल्ली

5. बंगळुरूमध्ये यासाठी अनेक महाविद्यालये आणि संस्था आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UCIL Bharti 2022 : 10वी/ ITI साठी Uranium Corporation of Indiaमध्ये भरती सुरु; लगेच करा APPLY

UCIL Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे (UCIL Bharti 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, टर्नर/मशीनिस्ट, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मेक. डिझेल / मेक. MV, कारपेंटर, प्लंबर पदांच्या 239 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Uranium Corporation of India Ltd.)

भरली जाणारी पदे –

१ फिटर – ८० पदे
२ इलेक्ट्रिशियन – ८० पदे
३ वेल्डर – ४० पदे
४ टर्नर/मशीनिस्ट – १२ पदे
५ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – ०५ पदे
६ मेक. डिझेल / मेक. MV – १२ पदे
७ कारपेंटर – ०५ पदे
८ प्लंबर – ०५ पदे

पद संख्या – २३९ पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२२

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (UCIL Bharti 2022)

वरील पदांकरीता अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी 10 वी आणि ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 25 वर्ष

अर्ज फी – फी नाही

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (UCIL Bharti 2022)
  3. किंवा युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.uraniumcorp.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरत पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – www.uraniumcorp.in

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com