UPSC Exam Training : त्वरा करा!! UPSC प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया झाली सुरु; ‘ही’ आहे शेवटची तारीख

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या (UPSC Exam Training) विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज 25 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय संचालक डॉ. के. एस. जैन यांनी दिली आहे.

येथे घेता येईल प्रशिक्षण

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे (UPSC Exam Training) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले ऍकॅडमी, पुणेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

महत्वाच्या तारखा 

ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत भरता येतील. अर्ज भरण्याची तसेच (UPSC Exam Training) परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2022 आहे.  प्रवेश परीक्षा 4 डिसेंबर 2002 रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेची वेळ सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राहील. परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबईचे संचालक डॉ. के. एस. जैन यांनी केले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com