Home Blog Page 342

Top 10 Law Colleges in maharashtra : वकिलांची मागणी वाढतेय!! लॉ करण्यासाठी ‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 10 लॉ कॉलेजेस 

Top 10 Law Colleges in maharashtra

करिअरनामा ऑनलाईन । ज्या तरुणांना आपले करिअर (Top 10 Law Colleges in maharashtra) समाजात उच्च स्थानावर नेऊन ठेवायचे आहे त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. सध्या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांत दिवसागणिक वकिलांची आवश्यकता भासत आहे. तुम्हालाही या क्षेत्रात करिअर करण्यात रस आहे का? चला तर… लॉचं म्हणजेच कायद्याचं शिक्षण देणाऱ्या महाराष्ट्रातील संस्था, आवश्यक कौशल्य आणि संधी याविषयी आज आपण जाणून घेऊया….
वकिली क्षेत्रात पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी
कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावं लागलं, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची. खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता भासत असतेच. फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयेच नाही, तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर (Top 10 Law Colleges in maharashtra) अडचणी सोडवण्यासाठी याच वकीलमंडळींची मदत घ्यावी लागते. दिवाणी किंवा नागरी आणि फौजदारी गुन्ह्यांमध्ये वकील आपल्या पक्षकाराची बाजू न्यायालयात मांडतात. म्हणूनच आज कायद्याचा अभ्यास केलेल्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी निर्माण झालेल्या पाहायला मिळतात.
‘या’मध्ये करता येईल स्पेशलायझेशन
कायदेशीर प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा न्यायालयापुढे आपल्याला गरज भासते ती आपलं प्रतिनिधित्व करणाऱ्या  वकिलाची. कायद्याच्या क्षेत्रात काम करताना वकिलाकडे कोणत्या ना कोणत्या क्षेत्राचा खास अभ्यास असणं गरजेचं असतं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी एखाद्या क्षेत्रात स्पेशलायझेशन (Top 10 Law Colleges in maharashtra) करायला हवं. तुम्हाला नागरी, फौजदारी, सायबर, प्रशासकीय, मानव अधिकार, संवैधानिक, कौटुंबिक, रिअल इस्टेट, कॉर्पोरेट, टॅक्सेशन, आंतरराष्ट्रीय, व्यापार, लेबर, बौद्धिक संपदा (इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी)/ पेटंट आदींपैकी एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून स्पेशलायझेशन करता येईल. वकील म्हणून काम करताना (प्रॅक्टिस करताना) स्टेट सेंट्रल बार काऊन्सिलकडे नावनोंदणी करून मान्यता मिळवावी लागते.

असा असतो अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण (Top 10 Law Colleges in maharashtra)
कायदा क्षेत्रातील पदवी मिळवायची असेल तर ‘लॉ कोर्स’ करायला हवा. यासाठी विद्यार्थ्यांकडे दोन पर्याय आहेत. एक तर कोणत्याही क्षेत्रातील पदवीनंतर तीन वर्षांचा लॉ कोर्स (एलएलबी) करणे किंवा बारावीनंतर पाच वर्षांचा बीए एलएलबी (ऑनर्स) अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन पदवी मिळवता येते. ज्या विद्यार्थ्यांना न्यायालयात कायद्याचे काम (प्रॅक्टिस) करण्याची इच्छा नाही, असे विद्यार्थी दोन वर्षांचा करस्पॉन्डन्स कोर्स करू शकतात. पदवीनंतर (ग्रॅज्युएशन) दोन वर्षांचा बॅचलर ऑफ जनरल लॉ (बीजीएल) किंवा बॅचलर ऑफ अ‍कॅडमिक लॉ (बीएल) हा अभ्यासक्रम करण्याचा पर्याय अशा विद्यार्थ्यांना निवडता येईल.
इथे मिळते रोजगाराची संधी
कायद्याची पदवी मिळवलेल्या अर्थात अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या वकिलांना ट्रायल कोर्ट (सत्र न्यायालय), हाय कोर्ट (उच्च न्यायालय), सुप्रीम कोर्ट (सर्वोच्च न्यायालय) आणि कॉझी जुडिशिअल इन्स्टिट्यूशन्समध्ये वकील म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होते. इंडियन लीगल सर्व्हिस (भारतीय कायदेविषयक सेवा) तसेच, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांमध्येही पदवीधर वकिलांना नोकरीच्या संधी मिळू शकतात.
टीचिंग, कायदेविषयक पुस्तकं/ जर्नल्स/ रिपोर्ट्स यासाठी लेखन आणि संपादन, कायदेविषयक ज्ञानाचे आऊटसोर्सिंग, भारतीय लष्कर, नौदल आणि वायू दलाच्या कायदेविषयक (Top 10 Law Colleges in maharashtra) शाखांमध्ये किंवा विविध ट्रस्टवर ट्रस्टी म्हणूनही काम करण्याची संधी प्रशिक्षित वकिलांना मिळू शकते.

‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 10 लॉ कॉलेजेस –

  1. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, चर्चगेट, मुंबई.
  2. सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, फोर्ट, मुंबई.
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय, धुळे
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागपूर
  5. नंदुरबार विधी महाविद्यालय, नंदुरबार (Top 10 Law Colleges in maharashtra)
  6. आय.एल.एस. विधी महाविद्यालय, पुणे
  7. डीईएस विधी महाविद्यालय, पुणे
  8. श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय, रत्‍नागिरी
  9. यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे
  10. शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय
    विधी महाविद्यालय (शारदा भवन शिक्षण संस्था, नांदेड)

राज्यातील अन्य लॉ कॉलेजेस –

  1. सिंबायोसिस विधि महाविद्यालय, पुणे
  2. डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, वडाळा, मुंबई.
  3. के. सी. लॉ कॉलेज, चर्चगेट, मुंबई.
  4. न्यू लॉ कॉलेज, माटुंगा, मुंबई.
  5. रिझवी लॉ कॉलेज, वांद्रे, मुंबई.
  6. जी. जे. अडवाणी लॉ कॉलेज, वांद्रे. (Top 10 Law Colleges in maharashtra)
  7. जीतेन्द्र चौहान कॉलेज ऑफ लॉ, विलेपाल्रे.
  8. चिल्ड्रन वेल्फेअर लॉ कॉलेज, मालाड.
  9. नालंदा लॉ कॉलेज, बोरिवली.
  10. व्ही. ई. एस. कॉलेज ऑफ लॉ, चेंबूर.
  11. गव्हर्मेंट लॉ कॉलेज, मुंबई www.glcmumbai.com
  12. किशनचंद छेलाराम लॉ कॉलेज, मुंबई www.kclawcollege.co
  13. न्यू लॉ कॉलेज, मुंबई

इंटर्नशिप्स करण्याचे फायदे
कायद्याचं शिक्षण घेत असताना, वकील म्हणून पदवी मिळवताना शक्य होईल तेवढ्या इंटर्नशिप्स करत राहायला हव्यात. यामुळे वकील म्हणून स्वतंत्र काम सुरू करण्यापूर्वीच तुम्हाला या क्षेत्रात कसं काम करायचं, प्रत्यक्ष काम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आदी बाबींची कल्पना येईल. इंटर्नशिप करताना तुम्हाला आपण कोणत्या विषयात स्पेशलायझेशन करायला हवं, याचा अंदाज बांधता येणं (Top 10 Law Colleges in maharashtra) शक्य होईल. काही लॉ फर्म्स योग्य उमेदवारांना प्री प्लेसमेंट्स देतात. एक यशस्वी वकील म्हणून स्वत:ची ‘इमेज’ तयार करण्यासाठी अनेक वर्षांची खडतर तपश्चर्या करायला लागते, त्यामुळे संयम ठेवून आपलं काम सातत्याने करायला हवं; असं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RITES Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी RITES लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; महिन्याचा 1 लाख 40 हजार पगार

RITES Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारत सरकारच्या RITES लिमिटेड अंतर्गत (RITES Recruitment 2023) अभियंता पदाच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.

संस्था – RITES Limited

भरले जाणारे पद – अभियंता

पद संख्या – 17 पदे

वय मर्यादा – 32 वर्षे

अर्ज फी –

सामान्य/ओबीसी उमेदवार – Rs. 600/- (RITES Recruitment 2023)
EWS/ SC/ST/ PWD उमेदवार – Rs. 300/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023

काही महत्वाच्या तारखा – (RITES Recruitment 2023)

RITES Bharti 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

अभियंता Full time Bachelor’s Degree in any branch of Engineering OR
Full time Master’s Degree in relevant field (RITES Recruitment 2023)

मिळणारे वेतन – Rs. 40, 000 – Rs.1, 40, 000/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. या पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (RITES Recruitment 2023)
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना rites.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.

भरतीचा तपशील – (RITES Recruitment 2023)

RITES Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (RITES Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासतही येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – rites.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Career : भारताच्या नेव्हीत कसं व्हायचं खलाशी? काय असतं काम आणि किती मिळतो पगार; घ्या संपूर्ण माहिती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्कराच्या युद्धनौका (Indian Navy Career) चालवण्याची जबाबदारी खलाशींवर (Sailor) असते. जर कोणाला भारतीय नौदलात सामील व्हायचे असेल तर त्याच्याकडे खलाशी होण्याचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. भारतीय नौदल लेखी चाचणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि वैद्यकीय चाचणीनंतर खलाशांची भरती करते. याआधारे अखिल भारतीय रँक तयार करण्यात आली आहे. भारतीय नौदल दरवर्षी नाविकांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करते. नौदलात खलाशी बनण्याचे कोणते मार्ग आहेत ते आज आपण पाहणार आहोत…

Indian Navy Career

मुख्य 2 पदे –

1. आर्टिफिसर अप्रेंटिस (AA) – 12 वी पास (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित)

2. वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR) – 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित)

1. आर्टिफिसर अप्रेंटिस (AA) (Indian Navy Career)

  • नौदलात आर्टिफिसर अप्रेंटिस प्रवेशासाठी वय मर्यादा 17 ते 20 वर्षे आहे.
  • यासाठी फक्त पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.
  • आर्टिफिसर प्रवेशासाठी 12वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह किमान 55% गुण असणे आवश्यक आहे.

2. वरिष्ठ माध्यमिक भरती (SSR)

  • नौदलातील वरिष्ठ माध्यमिक भरतीसाठी, वय मर्यादा 17 ते 21 वर्षे आहे.
  • उमेदवार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

Indian Navy Career

जॉब प्रोफाईल आणि पगार –
आर्टिफिसर अप्रेंटिस-

  • नौदलातील आर्टिफिसर अप्रेंटिसकडे जहाजाचे संचालन आणि प्रणोदन यंत्रे, शस्त्रे आणि सेन्सर्स इत्यादींची देखभाल करण्याची जबाबदारी असते. (Indian Navy Career)
  • आर्टिफिसर अप्रेंटिसला प्रशिक्षणादरम्यान दरमहा 14,600/- रुपये पगार मिळतो. प्रशिक्षणानंतर, स्तर-3 ची वेतनश्रेणी 21,700/- ते 69,100/- रुपये आहे.

वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR) –

  • वरिष्ठ माध्यमिक भर्तीच्या पदावर रुजू झाल्यानंतर, अत्याधुनिक जहाजे, पाणबुड्या, क्षेपणास्त्र नाशक इत्यादी हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. याशिवाय सोनार आणि रडार वगैरेही चालतात. (Indian Navy Career)
  • सीनियर सेकेंडरी रिक्रूटला देखील आर्टिफिसर अप्रेंटिस प्रमाणेच पगार मिळतो.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MH CET Law 2023 : वकील व्हायचंय? Law प्रवेशासाठीचे अर्ज सुटले; आजच करा Online Apply

MH CET Law 2023

करिअरनामा ऑनलाईन MH CET Law 2023 |  विधी शाखेतील वाढत्या संधींचा विचार करता अलीकडील काळात लाॅ मधे करिअर करु इच्छिणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लाॅ ही शाखा आज अनेक तरुणांना आकर्षीत करत असून लाॅ ची पदवी घेतल्यानंतर करिअरच्या अनेक संधी निर्मान होताना दिसत आहेत. LLB CET 2023 साथीचे अर्ज सुटले असून तुम्हालाही वकील व्हायचं असेल तर आजच Law CET 2023 परीक्षेसासाठी ऑनलाईन अर्ज करा. या अपडेटमध्ये आम्ही लॉ प्रवेश परीक्षेबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

Click Here to Get Job

Law शाखेचीच निवड का म्हणुन ? 

१२ वी ची परिक्षा पास झाल्यानंतर किंवा पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर आता पुढे काय करायचे हा प्रश्न सर्वांनाच सतावत असतो. पुर्वी १२ वी झाल्यानंतर अभियात्रिकी शाखेला प्रवेश घेण्याचा ट्रेंड तयार झाला होता. परंतु आता इंजिनिअरिंगसारख्या तात्रिकी शिक्षणाला म्हणावा तसा वाव राहिलेला नाही. तसेच विज्ञान, वाणिज्य, कला यांसारख्या शाखांमधून चांगल्या गुणांनी पदवी घेतलेले अनेक युवक सुद्धा बेरोजगारीचा सामना करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमधे लाॅ हे क्षेत्र तरुणांना आश्वासक वाटत आहे. शिवाय वकिलीचे शिक्षण कधीच वाया जात नाही; ते आज ना उद्या आपल्या कामाला येतेच असेही बोलले जाते, त्यामुळे तरुण वर्ग लाॅकडे आकर्षीत होत आहे.

विशेषत: UPSC – MPSC अशा स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्या युवकांसाठी लाॅ एक पर्वणीच ठरत आहे. स्पर्धा परिक्षांमधून येणार्या अस्थिरतेवर मात करण्यासाठी लाॅ चे शिक्षण स्पर्धापरिक्षा विद्यार्थ्याना मदत करत आहे. आज बरेच विद्यार्थी स्वत:ची नोकरी वा इतर अभ्यास सांभाळून लाॅ ला प्रवेश घेताना दिसत आहेत. तेव्हा, जर तुम्ही १२ वी पास असाल कींवा तुम्ही कोणत्याही शाखेमधून पदवीचे शिक्षण पुर्ण केलेले असेल आणि आता वकिल होण्याचे स्वप्न पाहत असाल, लाॅ शाखेला प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर मग तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात असे समजण्यास हरकत नाही. LLB CET 2023

Official Advertisement – PDF (www.careernama.com)

MH CET law 2023 important dates

Event Dates for 5-year LLB Dates for 3-year LLB
Issue of notification January 08, 2023 January 08, 2023
Release of application form March 1, 2023 (Released) March 15, 2023 **Released**
Last date apply March 23, 2023
March 14, 2023
March 11, 2023
March 25, 2023
Release of admit card Around 10 days before exam Around 10 days before exam
MH CET Law exam date 2023 (Announced) April 20, 2023
April 2, 2023
May 2 – May 3, 2023
Declaration of result To be notified To be notified
Commencement of counselling and seat allotment To be notified To be notified

लाॅ मधिल करिअरच्या संधी (MH CET Law 2023)

लाॅ शाखेची पदवी घेतल्यानंतर करिअरच्या (career) अनेक संधी आहेत. सर्वप्रथम लाॅ पुर्ण झाल्यानंतर कोणत्याही न्यायालयामधे वकिली सुरु करता येते. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय ते अगदी स्थानिक न्यायालयांमधे वकीली करण्यास तुम्ही पात्र होता. याशिवाय सरकारी क्षेत्रातील अनेक पदांकरिता घेण्यात येणार्या परिक्षांसाठी तुम्ही पात्र होता. यामधे न्यायाधीशांपासून सरकारी वकील इत्यादी पदे येतात. तसेच याव्यतिरिक्त अनेक कंपन्यामधे लीगल अॅडव्हायजर या पदाच्या अनेक जागा रिक्त असतात. काॅर्पोरेट क्षेत्रातसुद्धा नोकरीच्या अनेक संधी आहेत. महिलांकरीता लाॅ नंतर संरक्षण खात्यातसुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत. विविध लाॅ फर्म्स मधेही तुम्ही रुजू होऊन चांगला पगार मिळवू शकता. जर तुमच्यामधे पॅशन असेल आणि जिद्द व चिकाटीने काम करण्याची तयारी असेल तर या क्षेत्रामधे संधींना अंत नाही असे म्हणण्यास हरकत नाही. MH CET LAW 2023

CET Exam –

विधी शाखेला प्रवेश घेण्यासाठी नेशनल इन्स्टिट्युट आॅफ लाॅ करीता CLAT ही परिक्षा द्यावी लागते तर महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेण्याकरिता MHT – CET Law ही प्रवेश परिक्षा द्यावी लागते. पुर्वी पदवीच्या गुणांवरुन लाॅ शाखला प्रेवश मिळत असे परंतू २०१६ पासून शासनाने लाॅ प्रवेशासाठी प्रवेश परिक्षा घेणे सुरु केले आहे. MH CET LAW 2023

BALLB आणि LLB –

१२ वी नंतर विधी शाखेला प्रवेश घेणार्यांसाठी BALLB हा कोर्स असतो तर कोणत्याही शाखेतून पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करणार्यांसाठी LLB हा कोर्स असतो. BALLB या कोर्स चा कालावधी ५ वर्षांचा असतो तर LLB चा कालावधी ३ वर्षांचा असतो. या दोन्ही कोर्सेस करिता दरवर्षी सी.ई.टी. प्रवेश परिक्षा घ्याण्यात येते. हजारो विद्यार्थी या परिक्षेला बसतात. त्यातील साधारणत: १५००० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. LLB CET 2023

प्रवेश परिक्षेचे स्वरुप व अभ्यासक्रम (LLB CET Syllabus) –

विधी शाखेची प्रवेश परिक्षा १५० गुणांची व बहुपर्यायी स्वरुपाची असते. इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि लिगल अॅप्टीट्युड हे विषय परिक्षेसाठी असतात. या परिक्षेमधे निगेटीव्ह मार्कींग पद्धत वापरली जात नाही. ही परिक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येते. MH CET LAW 2023 परिक्षासाठी २ तास वेळ देण्यात येतो तसेच ही प्रवेश परिक्षा मराठी किंवा इंग्रजी अशा कोणत्याही माध्यमातून देता येते. MH CET Law 2023

प्रवेश प्रक्रीया MH CET LAW 2023

प्रवेश परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काहीच काळात लाॅ साठीची प्रवेश प्रक्रीया चालू होते. सी.ई.टी. च्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. संपुर्ण प्रवेश प्रक्रीया आॅनलाईन पद्धतीने होते. प्रवेशाच्या साधरणत: ૪ ते ५ फेर्या होतात. विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या फेर्या सुरु होण्यापूर्वी महाविद्यालयांची पसंती यादी जमा करण्यास सांगण्यात येते. पसंती याद्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार महाविद्यालये दिली जातात. LLB CET 2023

अर्ज कसा भराल, अर्ज भरण्याची शेवटची तारिख –

इच्छुक विद्यार्थी https://info.mahacet.org या वेबसाईटवर अर्ज भरु शकतात. एल.एल.बी. साठीच्या सी.ई.टी. परिक्षेचे अर्ज १५ एप्रिल पासून उपलब्ध झाले असून २० मे ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. १२ वी नंतर देता येणारी बी.ए. एल.एल.बी. साठीच्या प्रवेश परिक्षेसाठीची अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. MH CET LAW 2023

अधिक माहितीसाठी पहा – Click Here (www.careernama.com)

Register Now – Click Here (www.careernama.com)

MH CET law registration fee 2023

Category

Fees

General*

Rs. 800

OBC^

Rs. 600

SC^

Rs. 600

ST^

Rs. 600

MH CET law 2023 exam pattern

Particular

Details

Test mode

Online, CBT (Computer Based Test)

Language

Marathi and English

Type of paper

Multiple choice question paper

Exam duration

120 minutes

Total number of questions

150

Total marks

150

Marking scheme

1 mark for each correct answer

Negative marking

No

ही महाविद्यालये लाॅसाठी प्रतिष्ठीत

पुण्यामधील आय.एल.एस. महाविद्यालय लाॅ साठी प्रतिस्ठीत मानले जाते. देशातील टाॅपच्या पहील्या पाच महाविद्यालयांमधे या विद्यालयाचा समावेश होतो. त्यानंतर मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयाचा (जी.एल.सी.) नंबर लागतो. याचबरोबर के.सी. लाॅ काॅलेज (मुंबई), नवलमल फिरोदिया लाॅ काॅलेज (पुणे), सिद्धार्थ लाॅ(मुंबई) इत्यादी महाविद्यायेही प्रतिष्ठीत मानली जातात. LLB CET 2023

तर मित्रांनो, विधी शाखेला प्रवेश घेण्याचा तुमचा निर्णय पक्का असेल तर आता प्रवेश परिक्षेच्या तयारीला लागा. लाॅ ची पदवी घेतल्यानंतर तुमचे भविष्य उज्वल आहे यात शंका नाही. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. MH CET Law 2023

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Board Exam : उत्तर पत्रिका स्विकारण्यास शिक्षकांचा नकार; 10 वीच्या 50 लाख तर 12 वीच्या 80 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून

Board Exam

करिअरनामा ऑनलाईन । जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी (Board Exam) सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या संपाचा दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला फटका बसला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे दहावीच्या सुमारे 50 लाख उत्तरपत्रिका, तर बारावीच्या सुमारे 80  लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत, असा दावा संघटनांनी केला आहे. परिणामी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाला विलंब होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. या संपात शिक्षकही सहभागी झाले आहेत. सध्या शिक्षकांकडून दहावी आणि (Board Exam) बारावीची परीक्षा घेतली जात आहे. मात्र, जुन्या पेन्शनची मागणी मान्य होईपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे.

त्यामुळे 14 मार्चपासून उत्तरपत्रिका स्वीकारणे आणि तपासणीचे काम शिक्षकांनी पूर्णपणे थांबवले आहे. त्यामुळे लाखो उत्तरपत्रिका तपासणीविना बोर्डाच्या कार्यालयात पडून आहेत. त्यातच (Board Exam) बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते.
बारावीच्या उत्तरपत्रिका 27 फेब्रुवारीपर्यंत बोर्डाकडे पडून होत्या. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला आधीच विलंब झाला आहे. त्यात आता पुन्हा शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम थांबविले आहे. त्यामुळे निकालाला विलंब होणार असून, त्याचा फटका पुढील वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेला बसण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

“सरकारचा जुन्या पेन्शनचा निर्णय होईपर्यंत शिक्षकांचा उत्तरपत्रिका (Board Exam) तपासणीवर बहिष्कार आहे. सध्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र, शिक्षक उत्तरपत्रिका स्वीकारत नाहीत. त्यामुळे बोर्डाकडे उत्तरपत्रिका पडून आहेत. सद्यस्थितीत दहावीच्या सुमारे ५० लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत”; अशी माहिती महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी दिली.
तर “सध्या बारावीच्या सुमारे 80 लाख उत्तरपत्रिकांची (Board Exam) तपासणी बाकी आहेत. यातील अनेक उत्तरपत्रिका बोर्डाकडे पडून आहेत. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्णपणे थांबवले आहे;” असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Sport Jobs Vacancy : कबड्डी खेळाडूंसाठी राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेत भरती सुरु; ऑनलाईन करा Apply

Sport Jobs Vacancy

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिकेत रिक्त पदांच्या (Sport Jobs Vacancy) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 18 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2023 आहे.

संस्था – ठाणे महानगरपालिका, ठाणे
भरले जाणारे पद – खेळाडू (कबड्डी)
पद संख्या – 18 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे, महाराष्ट्र (Sport Jobs Vacancy)
मिळणारे वेतन – Rs. 20,000/- ते Rs. 25,000/- दरमहा
वय मर्यादा – 25 ते 30 वर्ष
अर्ज/ परीक्षा फी – फी नाही

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
    किंवा ठाणे महानगरपालिका च्या अधिकृत वेबसाईट www.thanecity.gov.in ला भेट द्या.
  3. अर्ज करण्याची शेवटची दिनांक २४ मार्च २०२३ आहे. (Sport Jobs Vacancy)
  4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – (Sport Jobs Vacancy)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.thanecity.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : एखाद्याला प्रपोज करणे हा गुन्हा आहे का? MPSC/UPSC मुलाखतीत विचारले जाणारे Tricky प्रश्न

GK Updates 19 Mar (1)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे UPSC परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत यूपीएससीची परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. युपीएससी परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSCच्या मुलाखतीत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. जिल्हा गॅझेटियर म्हणजे काय?
उत्तर :- हा अहवाल इंग्रजांच्या काळात दरवर्षी तयार केला जायचा. त्यात संपूर्ण जिल्ह्याचे रेकॉर्ड ठेवले जायचे.
2. रोबोटिक्सचे भविष्य काय आहे? अशी वेळ येईल का जेव्हा रोबोट माणसांची जागा घेतील?
उत्तर :- (GK Updates) रोबोटिक्स आणि माणसाचे विचार ह्यात भावनिक फरक आहे. मानवाने रोबोट बनवले आहेत. भावना आणि चैतन्य अजूनही रोबोटमध्ये आलेले नाही आणि ते येणे कठीण आहे. रोबोट्सनी माणसांची जागा घेणे अवघड आहे.
3. वायसरायच्या पत्नीच्या नावावर कोणत्या रुग्णालयाचे नाव आहे?
उत्तर :- इतिहासाचा हा प्रश्न आयएएसच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. उत्तर देताना उमेदवाराने सांगितले की, हे रुग्णालय मध्य भारतच्या व्हाईसरॉयच्या पत्नी एल्गिन यांच्या (GK Updates) नावावर बांधले गेले आहे. आता ते राणी दुर्गावती हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. जबलपूरमधील हे पहिले रुग्णालय आहे.
4. कोणता प्राणी जखमी झाल्यावर माणसांसारखा रडतो?
उत्तर :- अस्वल.

5. सूर्यकिरणांमध्ये किती रंग असतात?
उत्तर :– सूर्यकिरणांमध्ये 7 रंग असतात (वांगी रंग , जांभळा, निळा, हिरवा, पिवळा, नारिंगी आणि लाल)
6. जर एखाद्या मुलाने मुलीला प्रपोज केले तर प्रपोज करणे गुन्हा ठरेल का?
उत्तर :- IPC च्या कोणत्याही कलमात प्रस्ताव मांडणे गुन्हा म्हणून वर्गीकृत केलेले नाही.
7. अकबराच्या नऊ रत्नांची नावे सांगा? (GK Updates)
उत्तर :- 1. राजा बिरबल, 2. मियां तानसेन, 3. अबुल फजल, 4. राजा मानसिंग, 5. राजा तोडर मल, 6. मुल्ला दो प्याजा, 7. फकीर अझुद्दीन, 8. अब्दुल रहीम खान-ए-खाना, 9. फकीर अजियोद्दीन .
8. स्नायूंमध्ये कोणते आम्ल साचल्याने थकवा येतो?
उत्तर :- लॅक्टिक ऍसिड.

9. वकील फक्त काळा कोट का घालतात?
उत्तर :- काळा कोट शिस्त आणि आत्मविश्वास दर्शवतो.
10. एखाद्या मुलाला ऑफिसमध्ये तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचा असेल तर तुम्ही काय कराल?
उत्तर :- या प्रश्नावर महिला उमेदवाराने सांगितले की, त्या उमेदवाराला प्रशिक्षणात वेगवेगळ्या परिस्थितीत कसे वागायचे हे शिकवले जाईल. (GK Updates)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career News : चला..ऑफिसला या… केंद्रीय कर्मचाऱ्यांचं ‘वर्क फ्रॉम होम’ झालं बंद; लोकसभेत दिली माहिती

Career News (11)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट (Career News) समोर आली आहे. कोरोना काळापासून सुरु असलेलं केंद्रीय कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम आता बंद होणार आहे. कोविड-19 काळात, ऑनलाइन काम करणाऱ्या बहुतांश लोकांना घरून काम करण्याच्या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळाला होता. पण आता वर्क फ्रॉम होम पूर्णपणे बंद झाले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले की, “सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना शारीरिकरित्या कार्यालयात येण्याचे आवाहन केले जाईल. त्यांनी घरून काम करू नये. तसेच (Career News) आता घरून काम करण्याचा नियम सर्वसाधारणपणे लागू होऊ दिला जाणार नाही;” अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभेत भाजप खासदार रंजनबेन धनंजय भट्ट आणि खासदार श्रीनिवास दादासाहेब पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती दिली.

कोविड-19 महामारीच्या काळात कार्यालयात सामाजिक अंतराची (Social Distance) अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने मध्यम तसेच कनिष्ठ कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली होती. साथीच्या आजारावरील निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याने कर्मचाऱ्यांनी आता (Career News) कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून घरातून काम करण्याचा नियम जवळपास सर्वच क्षेत्रात लागू करण्यात आला होता. आता कार्यालयात परतीचा फॉर्म्युला राबवला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Anganwadi Bharti 2023 : 12 वी पास महिलांसाठी ‘या’ जिल्ह्यात होतेय अंगणवाडी सेविकांची मेगाभरती; कुठे कराल अर्ज

Anganwadi Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्हा परिषद अंतर्गत (Anganwadi Bharti 2023) अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पदांच्या एकूण 818 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
संस्था – पुणे जिल्हा परिषद , पुणे
भरली जाणारी पदे –

  1. अंगणवाडी सेविका – 134 पदे
  2. अंगणवाडी मदतनीस – 653 पदे
  3. मिनी अंगणवाडी सेविका – 31 पदे

पद संख्या – 818 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (समक्षपणे)
अर्ज करण्याचा पत्ता – 
बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, पुणे जिल्हा परिषद, पुणे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे – (Anganwadi Bharti 2023)

  1. स्थानिक रहिवाशी असलेबाबत स्वयंघोषणापत्र व ग्रामसेवक यांचेकडील रहिवासी दाखला.
  2. अपत्याबाबत – (लहान कुटुंब) असलेबाबत स्वयंघोषणापत्र दाखला
  3. नांवा बाबत – प्रतिज्ञापत्र (मा. तहसिलदार सो यांचे कडील) साक्षांकित प्रत (Anganwadi Bharti 2023)
  4. शाळा सोडलेचा दाखला / प्रमाणपत्र (साक्षांकित प्रत.)
  5. उमेदवार आरक्षण प्रवर्गातील असलेस मा. उपविभागीय अधिकारी सो. यांचेकडील जातीचा दाखला. (साक्षांकित प्रत ) (अ.जा./अ.ज./वि.भ.जा/भ. ज. / इ.मा.व./वि.मा.प्र./आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/विशेष मागास प्रवर्ग)
  6. आधार कार्ड, (साक्षांकित प्रत )
  7. रेशनिंग कार्ड, (साक्षांकित प्रत)
  8. विधवा असलेस पतीच्या मृत्युचा दाखला व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे स्वाक्षरीचा दाखला /
    अनाथ असलेस संबंधित संस्थेचा दाखला.
  9. नियमित अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मिनी सेविका / मदतनीस म्हणुन कमीत कमी 02 वर्षांचा अनुभव असल्यास बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडील अनुभवाचा दाखला.

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, पुणे जिल्हा परिषद, पुणे येथे समक्ष सादर करायचा आहे.
  2. अर्जदाराने अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरावा. (Anganwadi Bharti 2023)
  3. सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांच्या व दाखला यांच्या छायांकित प्रति ( झेरॉक्स) A-4 साईज मध्येच असाव्यात A- 4 पेक्षा लहान अथवा मोठया पेपर वरील असु नयेत.
  4. खाडाखोड किंवा चुकिचे भरलेले अर्ज बाद केले जातील याबाबत संबंधित अर्जदारांस कोणतीही पुर्व सुचना कार्यालयामार्फत दिली जाणार नाही.
  5. अर्जासोबत जोडलेल्या साक्षांकित प्रति, किंवा अन्य कागदपत्रे कोणत्याही परिस्थीतीत उमेदवारांस परत केली जाणार नाहीत.
  6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  7. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. (Anganwadi Bharti 2023)
  8. विहित मुदतीनंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (Anganwadi Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – zppune.org
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Interview Tips : इंटरव्ह्यूच्या दिवशी पहिल्या 9 मिनिटात ‘या’ चुका टाळा; कसा करायचा प्रश्नांचा सामना? जाणून घ्या…

Interview Tips (1)

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत (Interview Tips) आहोत की अनेक मोठ्या कंपन्यांनी रातोरात कर्मचारी कपात केली होती. जगभरावर संभाव्य मंदीचे सावट असताना प्रत्येकजण हा मिळेल त्या नोकरीला धरून राहण्याच्या प्रयत्नात आहे. ज्यांच्याकडे नोकरी नाही किंवा जे नवी नोकरी शोधत आहेत अशी मंडळी मंदीच्या भीतीने आपल्या विचारांना मुरड घालून इंटरव्ह्यूच्या वेळी काही मोठ्या चुका करून बसतात. यामुळे एकतर तुम्ही नोकरीची संधी गमावून बसू शकता किंवा तुम्हाला अत्यंत कमी पगारात नोकरीवर ठेवले जाईल. या चुका कोणत्या व त्या टाळण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे आता आपण पाहणार आहोत.

काही तज्ज्ञांच्या मते; मुलाखतीच्या पहिल्या 9 मिनिटात तुम्ही काय करता यावरूनच तुम्हाला नोकरी मिळणार का नाही हे ठरत असते. 100हून  अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करणाऱ्या (Interview Tips) लिओ यांनी एक बॉस नोकरीसाठी कसा उमेदवार नेमू इच्छितो याची काही गुपिते सांगितली आहेत. यातील पाच सिक्रेट्स आज आपण जाणून घेऊयात..

1. नोकरीच्या इंटरव्ह्यूला अनेकजण आपल्याला सगळं काही माहित असल्याचं दाखवतात पण थोडं सविस्तर विचारल्यावर त्यांची गाडी अडकते. यापेक्षा तुम्ही न ऐकलेल्या, न वाचलेल्या किंवा तुम्हाला नेमकं ठाऊक नाही अशा गोष्टी मान्य करा. तसेच त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी, शिकण्यासाठी (Interview Tips) तुम्ही कसे प्रयत्न कराल हे सांगा. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही कामात किती प्रामाणिक आहात. ते तुमच्या समोर बसलेल्या बॉसला दिसायला हवं
2. कामात अनेकदा खटके उडतात. सहकारीच नव्हे तर कितीतरी वेळा बॉसचे म्हणणे ही आपल्याला खटकू शकते. अशावेळी तुम्ही आरोप धुडकावून लावता की उत्तर शोधता हे महत्त्वाचं असतं. यासाठी तुम्ही तुमच्यातील खिलाडू वृत्ती दाखवणे महत्वाचे आहे. थोडक्यात तुम्ही तुमच्यातील इगो सोडून डोकं थंड कसं ठेवू शकता हे पाहण्यात बॉसला जास्त रस असतो.

3. तुम्ही तुमच्या पूर्व कंपनीविषयी कसे बोलता हे सुद्धा तपासले जाते. चुकूनही तुमच्या जुन्या बॉसविषयी वाईट बोलू नका. सहकाऱ्यांविषयी गॉसिप करू नका. तुमचे विचार (Interview Tips) वेगळे असल्याने जॉब बदलत असाल तर तसं सांगा पण त्यातही कुणाचा अपमान होईल असे बोलणे टाळा.
4. मार्क झुकरबर्गच्या नियमानुसार कोणताही बॉस अशा व्यक्तीला नोकरी देतो ज्याचे ध्येय कंपनीशी मिळते जुळते असेल. यासाठी अनेकजण खोटी सहमती दाखवतात पण असं करून तुम्ही तुमचा आदर गमावून बसाल. तुम्हाला तुमचे मतभेद आदराने मांडता यायला हवेत. (Interview Tips)
5. जर एखादी बाब तुम्हाला पटत नसेल तर ‘हो ला हो’ करण्याची चूक अजिबात करू नका. यामुळे तुम्हाला गृहीत धरले जाऊ शकते. कदाचित यामुळे तुम्हाला जॉब मिळू शकतो पण तुमचा तिथे (Interview Tips) आदर राहणार नाही. तसेच प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्यापेक्षा तुमचा वेगळा विचार तुमचे मुलाखतीमधील पॉईंट्स जास्त वाढवू शकतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com