Interview Tips : इंटरव्ह्यूच्या दिवशी पहिल्या 9 मिनिटात ‘या’ चुका टाळा; कसा करायचा प्रश्नांचा सामना? जाणून घ्या…

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत (Interview Tips) आहोत की अनेक मोठ्या कंपन्यांनी रातोरात कर्मचारी कपात केली होती. जगभरावर संभाव्य मंदीचे सावट असताना प्रत्येकजण हा मिळेल त्या नोकरीला धरून राहण्याच्या प्रयत्नात आहे. ज्यांच्याकडे नोकरी नाही किंवा जे नवी नोकरी शोधत आहेत अशी मंडळी मंदीच्या भीतीने आपल्या विचारांना मुरड घालून इंटरव्ह्यूच्या वेळी काही मोठ्या चुका करून बसतात. यामुळे एकतर तुम्ही नोकरीची संधी गमावून बसू शकता किंवा तुम्हाला अत्यंत कमी पगारात नोकरीवर ठेवले जाईल. या चुका कोणत्या व त्या टाळण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे आता आपण पाहणार आहोत.

काही तज्ज्ञांच्या मते; मुलाखतीच्या पहिल्या 9 मिनिटात तुम्ही काय करता यावरूनच तुम्हाला नोकरी मिळणार का नाही हे ठरत असते. 100हून  अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करणाऱ्या (Interview Tips) लिओ यांनी एक बॉस नोकरीसाठी कसा उमेदवार नेमू इच्छितो याची काही गुपिते सांगितली आहेत. यातील पाच सिक्रेट्स आज आपण जाणून घेऊयात..

1. नोकरीच्या इंटरव्ह्यूला अनेकजण आपल्याला सगळं काही माहित असल्याचं दाखवतात पण थोडं सविस्तर विचारल्यावर त्यांची गाडी अडकते. यापेक्षा तुम्ही न ऐकलेल्या, न वाचलेल्या किंवा तुम्हाला नेमकं ठाऊक नाही अशा गोष्टी मान्य करा. तसेच त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी, शिकण्यासाठी (Interview Tips) तुम्ही कसे प्रयत्न कराल हे सांगा. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही कामात किती प्रामाणिक आहात. ते तुमच्या समोर बसलेल्या बॉसला दिसायला हवं
2. कामात अनेकदा खटके उडतात. सहकारीच नव्हे तर कितीतरी वेळा बॉसचे म्हणणे ही आपल्याला खटकू शकते. अशावेळी तुम्ही आरोप धुडकावून लावता की उत्तर शोधता हे महत्त्वाचं असतं. यासाठी तुम्ही तुमच्यातील खिलाडू वृत्ती दाखवणे महत्वाचे आहे. थोडक्यात तुम्ही तुमच्यातील इगो सोडून डोकं थंड कसं ठेवू शकता हे पाहण्यात बॉसला जास्त रस असतो.

3. तुम्ही तुमच्या पूर्व कंपनीविषयी कसे बोलता हे सुद्धा तपासले जाते. चुकूनही तुमच्या जुन्या बॉसविषयी वाईट बोलू नका. सहकाऱ्यांविषयी गॉसिप करू नका. तुमचे विचार (Interview Tips) वेगळे असल्याने जॉब बदलत असाल तर तसं सांगा पण त्यातही कुणाचा अपमान होईल असे बोलणे टाळा.
4. मार्क झुकरबर्गच्या नियमानुसार कोणताही बॉस अशा व्यक्तीला नोकरी देतो ज्याचे ध्येय कंपनीशी मिळते जुळते असेल. यासाठी अनेकजण खोटी सहमती दाखवतात पण असं करून तुम्ही तुमचा आदर गमावून बसाल. तुम्हाला तुमचे मतभेद आदराने मांडता यायला हवेत. (Interview Tips)
5. जर एखादी बाब तुम्हाला पटत नसेल तर ‘हो ला हो’ करण्याची चूक अजिबात करू नका. यामुळे तुम्हाला गृहीत धरले जाऊ शकते. कदाचित यामुळे तुम्हाला जॉब मिळू शकतो पण तुमचा तिथे (Interview Tips) आदर राहणार नाही. तसेच प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्यापेक्षा तुमचा वेगळा विचार तुमचे मुलाखतीमधील पॉईंट्स जास्त वाढवू शकतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com