Anganwadi Bharti 2023 : 12 वी पास महिलांसाठी ‘या’ जिल्ह्यात होतेय अंगणवाडी सेविकांची मेगाभरती; कुठे कराल अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्हा परिषद अंतर्गत (Anganwadi Bharti 2023) अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पदांच्या एकूण 818 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
संस्था – पुणे जिल्हा परिषद , पुणे
भरली जाणारी पदे –

  1. अंगणवाडी सेविका – 134 पदे
  2. अंगणवाडी मदतनीस – 653 पदे
  3. मिनी अंगणवाडी सेविका – 31 पदे

पद संख्या – 818 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (समक्षपणे)
अर्ज करण्याचा पत्ता – 
बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, पुणे जिल्हा परिषद, पुणे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे – (Anganwadi Bharti 2023)

  1. स्थानिक रहिवाशी असलेबाबत स्वयंघोषणापत्र व ग्रामसेवक यांचेकडील रहिवासी दाखला.
  2. अपत्याबाबत – (लहान कुटुंब) असलेबाबत स्वयंघोषणापत्र दाखला
  3. नांवा बाबत – प्रतिज्ञापत्र (मा. तहसिलदार सो यांचे कडील) साक्षांकित प्रत (Anganwadi Bharti 2023)
  4. शाळा सोडलेचा दाखला / प्रमाणपत्र (साक्षांकित प्रत.)
  5. उमेदवार आरक्षण प्रवर्गातील असलेस मा. उपविभागीय अधिकारी सो. यांचेकडील जातीचा दाखला. (साक्षांकित प्रत ) (अ.जा./अ.ज./वि.भ.जा/भ. ज. / इ.मा.व./वि.मा.प्र./आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/विशेष मागास प्रवर्ग)
  6. आधार कार्ड, (साक्षांकित प्रत )
  7. रेशनिंग कार्ड, (साक्षांकित प्रत)
  8. विधवा असलेस पतीच्या मृत्युचा दाखला व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे स्वाक्षरीचा दाखला /
    अनाथ असलेस संबंधित संस्थेचा दाखला.
  9. नियमित अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मिनी सेविका / मदतनीस म्हणुन कमीत कमी 02 वर्षांचा अनुभव असल्यास बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडील अनुभवाचा दाखला.

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, पुणे जिल्हा परिषद, पुणे येथे समक्ष सादर करायचा आहे.
  2. अर्जदाराने अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरावा. (Anganwadi Bharti 2023)
  3. सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांच्या व दाखला यांच्या छायांकित प्रति ( झेरॉक्स) A-4 साईज मध्येच असाव्यात A- 4 पेक्षा लहान अथवा मोठया पेपर वरील असु नयेत.
  4. खाडाखोड किंवा चुकिचे भरलेले अर्ज बाद केले जातील याबाबत संबंधित अर्जदारांस कोणतीही पुर्व सुचना कार्यालयामार्फत दिली जाणार नाही.
  5. अर्जासोबत जोडलेल्या साक्षांकित प्रति, किंवा अन्य कागदपत्रे कोणत्याही परिस्थीतीत उमेदवारांस परत केली जाणार नाहीत.
  6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  7. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. (Anganwadi Bharti 2023)
  8. विहित मुदतीनंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (Anganwadi Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – zppune.org
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com