Home Blog Page 337

Bed Rest Studies : इथे चक्क झोपायचा मिळतो लाखोंत पगार; ‘या’ संस्थेत कर्मचाऱ्यांना दिलं जातं आराम करण्याचं काम

Bed Rest Studies

करिअरनामा ऑनलाईन । उदरनिर्वाह करण्यासाठी लोक अनेक (Bed Rest Studies) प्रकाराचे काम करत असतात. काही व्यवसायात उतरतात तर काही नोकरी करणे पसंत करतात.  नोकरी करणाऱ्या गटामधील सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांचा गट काहीसा संतृष्ट आणि आर्थिकरित्या स्थिर स्वरुपाचा असतो. याउलट खासगी पद्धतीने काम करणारे लोक काहीसे असमाधानी आहेत असं चित्र पाहायला मिळतं. या गटातील सदस्य सतत काम करत असतात. यामुळे ते ज्या ठिकाणी ताणतणाव असणार नाही, कामावरुन बॉसची बोलणी खावी लागणार नाही अशा प्रकारच्या नोकरीच्या शोधात असतात. त्यातही काहीजण काम कमी आणि पैसे जास्त मिळावेत अशी अपेक्षा करत असतात. अशाच एका आरामदायी नोकरीविषयीची माहिती आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

Bed Rest Studies

NASA देणार झोपायचे पैसे (Nasa Artificial Gravity Bed Rest Experiment)
नासा म्हणजेच ‘नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अ‍ॅन्ड स्पेस एजन्सी’ या अमेरिकन संस्थेमध्ये भरती सुरु झाली आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना झोपायचे पैसे मिळणार आहेत. नासासंबंधित ही गोष्ट प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली आहे. यामुळे लोकांची या नोकरीबद्दलची उत्सुकता वाढली (Bed Rest Studies) आहे. माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासाचे जर्मन एरोस्पेस सेंटर मिळून बऱ्याच काळापासून कृत्रिम गुरुत्वाकर्षण बेड रेस्टसंबंधित संशोधन करत आहे. त्यांच्या या प्रयोगामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना महिन्याला 13 ते 14 लाख रुपये दिले जातात असं म्हटलं जात आहे.

Bed Rest Studies

असं आहे जॉब प्रोफाईल (Bed Rest Studies)
नासाच्या संशोधनातील प्रयोगामध्ये व्यक्तीला बेडवर झोपवले जाते आणि त्याच्या शरीराचा अभ्यास केला जातो. एका जागी दिवसरात्र झोपून राहिल्यावर मानवी शरीरामध्ये काय बदल होऊ शकतात याबद्दल शास्त्रज्ञ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अ‍ॅन्ड स्पेस एजन्सी या अमेरिकन संस्थेद्वारे सदर प्रयोगामध्ये याआधीही अनेकजण सहभागी झाले आहेत. या प्रयोगामध्ये सहभाग घेणाऱ्यांना दोन महिने शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली राहावे लागते.

 

Bed Rest Studies

सोशल मीडियावर या नोकरीची चर्चा
अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, नासाच्या कृत्रिम गुरुत्वाकर्षण बेड रेस्ट प्रयोगामध्ये सहभागी झालेल्या लोकांना दोन महिन्यांच्या कालावधीसाठी तब्बल 18 हजार (Bed Rest Studies) अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 14 लाख रुपये दिले जातात. म्हणजे त्यातील एका व्यक्तीवर एका महिन्यात 7 लाख रुपये खर्च केले जातात. दरम्यान ही गोष्ट खरी आहे की खोटी याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे.
अधिक माहितीसाठी CLICK करा – https://www.nasa.gov/analogs/envihab/bed-rest-faqs

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Ordnance Factory Recruitment : लष्करासाठी शस्त्रे बनवण्याच्या कारखान्यात अप्रेंटीस भरती सुरु; काय आहे पात्रता?

Ordnance Factory Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । आयुध निर्माणी, भंडारा येथे अप्रेंटीस (Ordnance Factory Recruitment) पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2023 आहे.

संस्था – आयुध निर्माणी, भंडारा

भरले जाणारे पद – अप्रेंटीस (Ordnance Factory Recruitment)

पद संख्या – 40 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भंडारा

वय मर्यादा – 18 वर्षे पूर्ण

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा- ४४१९०६

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Bachelors Degree in any field

मिळणारे वेतन – अप्रेंटीस Rs. 9000/- दरमहा

असा करा अर्ज – (Ordnance Factory Recruitment)

  1. या भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी सर्व आवश्यक दस्ताऐवज स्व- स्वाक्षरीत करुन अर्जाच्या नमुन्यासोबत संलग्न करुन महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा- ४४१९०६ यांचे नावे डाकेद्वारे पाठवावेत. (Ordnance Factory Recruitment)
  3. लिफाफ्यावर ‘आ.नि. भंडारा येथे सामान्य शाखेमध्ये स्नातक अप्रेंटिसशिप प्रशिक्षण’ असे लिहावे.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

भरतीचा तपशील –
Ordnance Factory Bhandara Vacancy 2023 details

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PF Interest News : सरकारी नोकरदारांचं नशीब उजळलं! कोट्यवधी कर्मचाऱ्यांना PF वर मिळणार ‘इतके’ व्याज, EPFO नं केलं जाहीर

PF Interest News

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (PF Interest News) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी वरील व्याजात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे EPFO च्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 8.15 टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी EPFO ​​कडून 8.10 टक्के दराने व्याज दिले जात होते. यंदाच्या PF च्या व्याज दरात कपात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

PFO च्या व्याजात वाढ (PF Interest News)
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी EPF खातेधारकांसाठी 8.15 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा देशातील 6 कोटींहून अधिक ईपीएफ खातेधारकांना होणार असून त्यांच्या खात्यात अधिक पैसे जमा होतील. 2021-22 साठी, EPFO ​​ने व्याजदर 8.1 टक्क्यांपर्यंत कमी केला होता. हा व्याज दर गेल्या चार दशकांतील सर्वात खालच्या पातळीवर आला होता. 2020-21 या आर्थिक वर्षात तो 8.50 टक्के होता.

अर्थ मंत्रालय काढणार अध्यादेश
गेल्या वर्षी म्हणजेच 2021-22 साठी हा व्याजदर 8.1 टक्के दराने होता. हा व्याजदर गेल्या 40 वर्षांतील सर्वात कमी असून सरकारच्या या निर्णयाला मोठा विरोध झाला होता.
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) व्याज दर निश्चित करतात. अर्थ मंत्रालय हे निश्चित केलेले व्याज दर लागू करण्याबाबतचे आदेश जारी करतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (PF Interest News) दोन दिवसीय बैठक 27 मार्चपासून सुरू झाली होती.
EPFO चे जवळपास 6 कोटी खातेदार आहेत. या कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे 27.73 लाख कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन EPFO च्या माध्यमातून केले जाते.

कर्मचार्‍यांच्या पगारातून होणार कपात
एखाद्या कर्मचाऱ्याच्या पगारातून १२% कपात केलेली रक्कम ईपीएफ खात्यात कम केली जाते. कर्मचार्‍यांच्या पगारातून नियोक्त्याने केलेल्या कपातीपैकी ८.३३% रक्कम EPS (कर्मचारी पेन्शन योजना) पर्यंत पोहोचते, तर ३.६७% EPF मध्ये जमा केली जाते. दरम्यान, तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची सध्याची शिल्लक (PF Interest News) घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासू शकता. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उमंग अॅप, वेबसाइट किंवा तुमच्या मोबाइल फोनवरून एसएमएस पाठवून तुम्ही हे जाणून घेऊ शकता. सध्याच्या काळात देशभरात सुमारे ६.५ कोटी कर्मचारी ईपीएफओ सदस्य आहेत.
ईपीएफओ कुठे करते गुंतवणूक (PF Interest News)
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ​​अनेक ठिकाणी पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा केलेली रक्कम गुंतवते. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा काही भाग व्याजाच्या स्वरूपात (PF Interest News) खातेदारांना परत केला जातो. सध्या EPFO ​​कर्जाच्या पर्यायांमध्ये 85 टक्के गुंतवणूक करते. ज्यामध्ये सरकारी रोखे आणि बाँडचा समावेश आहे. उर्वरित 15 टक्के रक्कम ईटीएफमध्ये गुंतवली जाते. पीएफचे व्याज कर्ज आणि इक्विटीच्या कमाईच्या आधारावर ठरवले जाते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Saraswat Bank Recruitment : ग्रॅज्युएट्ससाठी खुषखबर!! सारस्वत बँकेत ‘या’ पदांवर भरती सुरु; या लिंकवर करा अर्ज

Saraswat Bank Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक (Saraswat Bank Recruitment) आनंदाची बातमी आहे. सारस्वत सहकारी बँकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) पदांच्या एकूण 150 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2023 आहे.
संस्था – सारस्वत सहकारी बँक
भरले जाणारे पद – कनिष्ठ अधिकारी (Junior Officer)
पद संख्या – 150 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Saraswat Bank Recruitment)

  1. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
  2. बँक/NBFC/विमा कंपन्या/बँकेच्या कोणत्याही उप कंपनीमध्ये किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  3. उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे. (Saraswat Bank Recruitment)

वय मर्यादा – 1 मार्च 2023 रोजी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा जास्त नसावी.
परीक्षा फी – रु. 750/- (Saraswat Bank Recruitment)
मिळणारे वेतन – रु. 2,44,343/- ते रु. 4,83,520 वार्षिक
असा करा अर्ज –

  1. उमेदवारांनी प्रथम सारस्वत सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइट saraswatbank.com वर जा.
  2. मुख्यपृष्ठावरील घोषणा विभागात जा.
  3. आता तुम्ही ‘कनिष्ठ अधिकारी रिक्त पदांची जाहिरात येथे क्लिक करा (Saraswat Bank Recruitment)
  4. आता सारस्वत बँक कनिष्ठ अधिकारी भर्ती 2023 च्या अधिसूचनेची PDF तुमच्या समोर उघडेल.
  5. आता तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट देखील घेऊ शकता.
  6. खाली दिलेल्या APPLY लिंकवरुन तुम्ही अर्ज करू शकता.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.saraswatbank.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : नारळाचे वैज्ञानिक नाव काय आहे? तलाठी/पोलीस भरतीत असे प्रश्न विचारतात

GK Updates 28 Mar

करिअरनामा ऑनलाईन । मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही सरकारी परीक्षेचा (GK Updates) अभ्यास करत असाल तर तुम्हाला जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जातात. पोलिस भरती, तलाठी भरती तसेच MPSC च्या लेखी परीक्षेत आणि मुलाखतीच्या फेरीत जनरल नॉलेज वर हमखास प्रश्न समोर येतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत.
प्रश्न – नारळाचे वैज्ञानिक नाव काय आहे
उत्तर – (GK Updates) कोको न्यूसिफेरा
प्रश्न – आधुनिक भारताचे जनक कोण?
उत्तर – राजा राम मोहन राय
प्रश्न – आधुनिक भारताचे शिल्पकार कोण?
उत्तर – पंडित जवाहरलाल नेहरू
प्रश्न – महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ कोणते?
उत्तर – राजघाट
प्रश्न – आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण?
उत्तर – ह.  ना. आपटे

प्रश्न – (GK Updates) स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण?
उत्तर – लॉर्ड रिपन
प्रश्न – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक कोण?
उत्तर – ए ओ ह्यूम
प्रश्न – भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण?
उत्तर  – सॅम पित्रोदा
प्रश्न – भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण?
उत्तर – दादासाहेब फाळके (GK Updates)
प्रश्न – संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव काय होते?
उत्तर – ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NCERT Syllabus : NCERT चा अभ्यासक्रम बदलणार! केंद्रीय शिक्षण विभागाची पुस्तकात बदल करण्याची घोषणा

NCERT Syllabus

करिअरनामा ऑनलाईन । एनसीईआरटीच्या सर्व श्रेणींच्या अभ्यासक्रमात (NCERT Syllabus) बदल होणार असून नवीन पाठ्यपुस्तक शैक्षणिक धोरणानुसार हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण खात्याने दिली आहे. यामुळे आता NCERTच्या सर्व पुस्तकांमध्येही बदल होणार आहे. पुढील शैक्षणिक धोरणांपासून म्हणजे 2024-25 पासून हा अभ्यासक्रम लागू केली जाणार असल्याची माहिती आहे.

शिक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन पाठ्यपुस्तके 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून लागू केली जाण्याची शक्यता आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार या (NCERT Syllabus) अभ्यासक्रमात बदल केला जाणार असून त्यावर या आधीपासूनच काम सुरू करण्यात आलं आहे. कोरोना काळात डिजिटल शिक्षणाचं महत्व समोर आलं. त्याच आधारावर सर्व नवीन पाठ्यपुस्तके एकाच वेळी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली जातील जेणेकरून कोणीही त्यांना डाउनलोड करू शकेल. तसेच पाठ्यपुस्तके नियमितपणे अद्ययावत केली जातील, त्यासाठी एक इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क विकसित केलं जाणार आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RCFL Recruitment 2023 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये ‘या’ पदावर भरती; जाणून घ्या पात्रता

RCFL Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी (वित्त), वरिष्ठ अधिकारी (वित्त), व्यवस्थापक (वित्त), अधिकारी (वैद्यकीय) या पदांच्या 11 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड
भरली जाणारी पदे – (RCFL Recruitment 2023)

  1. अधिकारी (वित्त) – 1 पद
  2. वरिष्ठ अधिकारी (वित्त) – 5 पदे
  3. व्यवस्थापक (वित्त) – 2 पदे
  4. अधिकारी (वैद्यकीय) – 3 पदे

पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2023 (RCFL Recruitment 2023)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. अधिकारी (वित्त) – CA / CMA.
  2. वरिष्ठ अधिकारी (वित्त) – CA / CMA अथवा पदवी (B.com/BAF/BBA) MBA/MMS/PGDM/PGDBM अथवा पदव्युत्तर पदवी.
  3. व्यवस्थापक (वित्त) – CA / CMA अथवा पदवी (B.com/BAF/BBA) MBA/MMS/PGDM/PGDBM अथवा पदव्युत्तर पदवी. (RCFL Recruitment 2023)
  4. अधिकारी (वैद्यकीय) – MBBS.

अर्ज फी –
Open/OBC/EWS – ₹१,०००
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

मिळणारे वेतन –

  1. अधिकारी (वित्त) – ₹४०,००० ते ₹१४०००० दरमहा
  2. वरिष्ठ अधिकारी (वित्त): ₹५०००० ते ₹१६०००० दरमहा
  3. व्यवस्थापक (वित्त): ₹७०००० ते ₹२००००० दरमहा (RCFL Recruitment 2023)
  4. अधिकारी (वैद्यकीय): ₹४०००० ते ₹१४०००० दरमहा

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
    किंवा राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.rcfltd.com ला भेट द्या.
  3. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १० एप्रिल २०२३ आहे. (RCFL Recruitment 2023)
  4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – (RCFL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Walt Disney Layoffs : IT नंतर मनोरंजन क्षेत्रावर संकटाचे ढग! Walt Disneyने 7000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Walt Disney Layoffs

करिअरनामा ऑनलाईन । वॉल्ट डिस्ने कंपनीने 7000 कर्मचाऱ्यांना (Walt Disney Layoffs) कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने या कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली होती. रॉयटर्सने बॉब इगर यांच्या पत्राचा हवाला देत याबाबत माहिती दिली होती. कंपनीने खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आपला व्यवसाय सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मनोरंजन क्षेत्रावरही संकट
मनोरंजन क्षेत्र मोठ्या नुकसानीचा सामना करत आहे. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. या माध्यम कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. या कारणास्तव कंपन्यांनी त्यांच्या खर्चात कपात करण्यास सुरुवात केली आहे. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात केली आहे.

वॉल्ट डिस्नेकडून कधी होणार टाळेबंदी (Walt Disney Layoffs)
वॉल्ट डिस्नेचे सीईओ म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या पहिल्या गटाला कामावरून काढून टाकण्यापूर्वी त्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली जाईल. प्रथम क्रमवारी 4 दिवसांत होईल. आणि दुसरी छाटणी (Walt Disney Layoffs) एप्रिलमध्ये होईल. यामध्ये हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी अंतिम फेरीची निवड करण्यात येईल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांना का काढून टाकलं जात आहे
एंटरटेनमेंट ग्रुपने फेब्रुवारीमध्ये असे जाहीर केले की ते $5.5 अब्ज खर्च वाचवण्यासाठी 7,000 कर्मचार्यांना काढून टाकतील. तेव्हापासून डिस्ने आणखी कर्मचाऱ्यांना कामावरून (Walt Disney Layoffs) कमी करू शकते अशा अनेक चर्चा होत्या. मात्र, आता कंपनी कधी आणि किती वेळा टाळे ठोकणार आहे, हे सीईओंच्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की Amazon, Meta आणि Microsoft सारख्या कंपन्यांनी दुसऱ्या फेरीत कर्मचाऱ्यांची छाटणी केली आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RBI Recruitment 2023 : 10वी उत्तीर्णांना नोकरीचा गोल्डन चान्स!! भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘या’ पदांवर भरती

RBI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी (RBI Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2023 आहे.
संस्था – भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India)
भरले जाणारे पद – वाहन चालक
पद संख्या – 5 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
वय मर्यादा – 01 मार्च 2023 रोजी 18 ते 35 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट,]
परीक्षा फी – जनरल ₹450/-+GST [SC/ST/ExSM: ₹50/-+GST ]

मिळणारे वेतन – 17,270/- रुपये ते 37,770/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई|
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2023
निवड प्रक्रिया – परीक्षा (Online) एप्रिल/मे 2023
महत्वाची सूचना – (RBI Recruitment 2023)

  1. उमेदवार हा RBIच्या मुंबई कार्यालयाच्या भर्ती झोनमधील निवासी असावा, उदा. महाराष्ट्र राज्य (विदर्भ* प्रदेश वगळता) गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली.
  2. या पदासाठी फक्त विदर्भातील अनुसूचित जमाती (ST) उमेदवार अर्ज करू शकतात.
  3. उमेदवार 01/03/2023 रोजी पदवीधर असावा. (RBI Recruitment 2023)
  4. बॅचलर पदवी पूर्ण केलेले उमेदवार आणि उच्च पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  5. उमेदवाराच्या अधिवास स्थितीच्या समर्थनार्थ कागदपत्रे मागविण्याचा अधिकार बँकेकडे आहे.
  6. माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवाराने 10वी इयत्ता उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांनी सशस्त्र दलाबाहेर पदवी प्राप्त केलेली नसताना किमान 15 वर्षे संरक्षण सेवा दिली असावी.
  7. या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार स्थानिक भाषेत प्रवीण असावेत, म्हणजे मराठी भाषा वाचायला, लिहायला, बोलायला आणि समजायला यायला हवी.

निवड प्रक्रिया –

  1. ऑनलाइन चाचणी (RBI Recruitment 2023)
  2. कौशल्य / ड्रायव्हिंग चाचणी
  3. वैद्यकीय चाचणी

काही महत्वाच्या लिंक्स – (RBI Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agniveer Recruitment : अग्निवीरांसाठी मोठी अपडेट; इंडियन नेव्ही अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर; असा करा चेक

Agniveer Recruitment (3)

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन नेव्हीमध्ये अर्ज केलेल्या अग्निवीरासांठी (Agniveer Recruitment) सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय नौदलातील वरिष्ठ माध्यमिक भरती अंतर्गत अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी या रिक्त पदासाठी अर्ज केला आहे ते भारतीय नौदल भरतीच्या अधिकृत वेबसाइट agniveernavy.cdac.in ला भेट देऊन निकाल तपासू शकतात.
भारतीय नौदलाने जारी केलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण 1400 पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 08 डिसेंबर 2022 रोजी सुरू झाली. यामध्ये अर्ज करण्यासाठी 28 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. यामध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

असा चेक करा निकाल – (Agniveer Recruitment)

  1. उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट agniveernavy.cdac.in वर जावे.
  2. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील नवीनतम अद्यतने लिंकवर क्लिक करा.
  3. यानंतर SSR अग्निवीर 10+2 फेज 1 निकाल 2022 च्या लिंकवर क्लिक करा.
  4. पुढील पानावर, तुम्हाला चेक रिझल्टच्या लिंकवर जावे लागेल.
  5. विनंती केलेल्या तपशीलांसह लॉग इन करा. (Agniveer Recruitment)
  6. लॉगिन केल्यानंतर निकाल उघडेल.
  7. पुढील वापरासाठी निकाल सेव्ह करा.

अग्निवीरांच्या भरतीसाठी जारी केलेल्या या भरतीच्या माध्यमातून एकूण 1400 पदांची भरती केली जाईल. यामध्ये पुरुषांसाठी 1120 पदांसाठी भरती होणार आहे. त्याचबरोबर महिला बॅचसाठी 280 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झालेल्या (Agniveer Recruitment) उमेदवारांसाठी फेज 2 परीक्षा घेतली जाईल.
नौदलातील या भरतीसाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेनंतर जवानांना अग्निवीर भरतीसाठी शारीरिक पात्रता परीक्षेला (Agniveer Recruitment) बसावे लागेल. पुढील प्रक्रिया आणि रिक्त जागेचा तपशील अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध अधिसूचनेत देण्यात आला आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com