PF Interest News : सरकारी नोकरदारांचं नशीब उजळलं! कोट्यवधी कर्मचाऱ्यांना PF वर मिळणार ‘इतके’ व्याज, EPFO नं केलं जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (PF Interest News) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी वरील व्याजात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे EPFO च्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 8.15 टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी EPFO ​​कडून 8.10 टक्के दराने व्याज दिले जात होते. यंदाच्या PF च्या व्याज दरात कपात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

PFO च्या व्याजात वाढ (PF Interest News)
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी EPF खातेधारकांसाठी 8.15 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा देशातील 6 कोटींहून अधिक ईपीएफ खातेधारकांना होणार असून त्यांच्या खात्यात अधिक पैसे जमा होतील. 2021-22 साठी, EPFO ​​ने व्याजदर 8.1 टक्क्यांपर्यंत कमी केला होता. हा व्याज दर गेल्या चार दशकांतील सर्वात खालच्या पातळीवर आला होता. 2020-21 या आर्थिक वर्षात तो 8.50 टक्के होता.

अर्थ मंत्रालय काढणार अध्यादेश
गेल्या वर्षी म्हणजेच 2021-22 साठी हा व्याजदर 8.1 टक्के दराने होता. हा व्याजदर गेल्या 40 वर्षांतील सर्वात कमी असून सरकारच्या या निर्णयाला मोठा विरोध झाला होता.
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) व्याज दर निश्चित करतात. अर्थ मंत्रालय हे निश्चित केलेले व्याज दर लागू करण्याबाबतचे आदेश जारी करतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (PF Interest News) दोन दिवसीय बैठक 27 मार्चपासून सुरू झाली होती.
EPFO चे जवळपास 6 कोटी खातेदार आहेत. या कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे 27.73 लाख कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन EPFO च्या माध्यमातून केले जाते.

कर्मचार्‍यांच्या पगारातून होणार कपात
एखाद्या कर्मचाऱ्याच्या पगारातून १२% कपात केलेली रक्कम ईपीएफ खात्यात कम केली जाते. कर्मचार्‍यांच्या पगारातून नियोक्त्याने केलेल्या कपातीपैकी ८.३३% रक्कम EPS (कर्मचारी पेन्शन योजना) पर्यंत पोहोचते, तर ३.६७% EPF मध्ये जमा केली जाते. दरम्यान, तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची सध्याची शिल्लक (PF Interest News) घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासू शकता. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उमंग अॅप, वेबसाइट किंवा तुमच्या मोबाइल फोनवरून एसएमएस पाठवून तुम्ही हे जाणून घेऊ शकता. सध्याच्या काळात देशभरात सुमारे ६.५ कोटी कर्मचारी ईपीएफओ सदस्य आहेत.
ईपीएफओ कुठे करते गुंतवणूक (PF Interest News)
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ​​अनेक ठिकाणी पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा केलेली रक्कम गुंतवते. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा काही भाग व्याजाच्या स्वरूपात (PF Interest News) खातेदारांना परत केला जातो. सध्या EPFO ​​कर्जाच्या पर्यायांमध्ये 85 टक्के गुंतवणूक करते. ज्यामध्ये सरकारी रोखे आणि बाँडचा समावेश आहे. उर्वरित 15 टक्के रक्कम ईटीएफमध्ये गुंतवली जाते. पीएफचे व्याज कर्ज आणि इक्विटीच्या कमाईच्या आधारावर ठरवले जाते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com