Home Blog Page 334

UPSC ESE Mains 2023 : UPSC मेन्सची तारीख जाहीर; कधी होणार परीक्षा?

UPSC ESE Mains 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC ESE Mains 2023) इंजिनीअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशनच्या मेन्स 2023 च्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षा 25 जून 2023 रोजी घेतली जाईल आणि ती दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी परीक्षा दुपारी 2 ते 5 वाजताच्या दरम्यान होईल. यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिलं आहे.
327 जागा भरणार
ESE प्रीलिम्स 2023 उत्तीर्ण झालेले उमेदवार मेन्स परीक्षेला बसण्यास पात्र असतील. परीक्षेसाठी अ‍ॅडमिट कार्ड्स लवकरच UPSCच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. यूपीएससी इंजिनीअरिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट 2023 अंतर्गत विविध इंजिनीअरिंग (UPSC ESE Mains 2023) विभागांमध्ये 327 रिक्त जागा भरण्यासाठी सरकारकडून आयोजित केली जात आहे. भरती प्रक्रियेमध्ये प्रीलिम्स परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा आणि पर्सनॅलिटी टेस्टचा समावेश असतो.

निवड प्रक्रिया (UPSC ESE Mains 2023)
मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पर्सनॅलिटी टेस्टसाठी बोलावले जाईल, ही निवड प्रक्रियेची अंतिम फेरी असेल. पर्सनॅलिटी टेस्ट उमेदवाराची लीडरशिप स्कील्स, कम्युनिकेशन स्क्रील्स व एकूण व्यक्तिमत्व गुणांचे मूल्यांकन करण्यासाठी घेतली जाते.
ईएसई परीक्षा ही भारतातील इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्ससाठी सर्वात प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. ही विविध सरकारी विभागांमध्ये काम करण्याची आणि देशाच्या (UPSC ESE Mains 2023) पायाभूत सुविधा आणि विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची संधी देते.
ईएसई मेन 2023 परीक्षेची तयारी करत असलेले इच्छुक उमेदवार अभ्यासाचे योग्य नियोजन आणि समर्पणातून परीक्षा उत्तीर्ण करू शकतात आणि सरकारी इंजिनीअरिंग विभागात काम करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतात. UPSC ESE Mains 2023 परीक्षेची तारीख जाहीर झाली असल्याने उमेदवारांनी अ‍ॅडमिट कार्ड्स व परीक्षेच्या वेळापत्रकाशी संबंधित अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Exam Notice डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा-

  • वेब ब्राउझर उघडा आणि UPSC ची ऑफिशिअल वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या.
  • होम पेजवर टॉप मेन्यूमधील ‘Examination’ टॅबवर क्लिक करा.
  • ड्रॉप-डाउन मेनूमधून, ‘Active Examinations’ निवडा आणि नंतर तुम्हाला ज्या परीक्षेची नोटीस डाउनलोड करायची आहे त्या नावावर क्लिक करा. (UPSC ESE Mains 2023)
  • एक्झाम पेजवर ‘नोटीस’ सेक्शन शोधा आणि नोटीस डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  • नोटीस तुमच्या डिव्हाइसवर PDF स्वरूपात डाउनलोड केली जाईल. तुम्ही PDF रीडर वापरून ते उघडू आणि पाहू शकता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : सरपंचाची लेक झाली पायलट!! सृष्टी उडवणार विमान; स्पेशल ट्रेनिंगसाठी जाणार स्पेनला

Success Story Srishti Verma

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील (Success Story) सृष्टी वर्मा ही मुलगी विमान उडवणार असून ती पहिली व्यावसायिक पायलट बनली आहे. सृष्टीने रायबरेलीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीतून दोन वर्षांचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतरच ती व्यावसायिक पायलट बनली आहे. सृष्टी पायलट झाल्यामुळे तीच्या कुटुंबात आणि गावात आनंदाचे वातावरण आहे.
लहानपणीच पाहिलं स्वप्न
मुझफ्फरपूर पोसचे माजी सरपंच कै. शिवकुमार वर्मा हे सृष्टीचे वडील. त्यांचा मुलगा कौशल वर्मा हा एका खासगी विमा कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. नोकरीनिमित्त (Success Story) तो काही वर्षांपूर्वी दिल्लीला शिफ्ट झाला आणि आता तो मुंबईत राहतो. सृष्टी वर्मा सांगते की; ती तिच्या वडिलांना नोकरीमुळे बऱ्याचवेळा विमानात प्रवास करताना पाहायची. त्यामुळे तिने लहानपणीच पायलट होण्याचे स्वप्न पहिले आणि त्या दिशेने तिने पाऊल टाकण्यास सुरवात केली.

स्पेशल ट्रेनिंगसाठी जाणार स्पेनला
व्यावसायिक पायलट लायसन्स कोर्स पूर्ण करण्यासाठी सृष्टी दोन वर्षांपूर्वी प्रवेश परीक्षेला बसली होती. ज्यामध्ये प्रथम लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी होती. यामध्ये सृष्टीने 27 वा क्रमांक (Success Story) मिळवला आणि सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमी, रायबरेलीमध्ये स्थान मिळवले. जिथे दोन वर्षांच्या शिक्षणानंतर ती व्यावसायिक पायलट बनली आहे. सृष्टी पायलट होताच तिला अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर आल्या. पण ती आता स्पेशालिस्ट ट्रेनिंगसाठी दोन महिन्यांसाठी स्पेनला जाणार आहे.
‘मुलींनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे’ (Success Story)
सृष्टी सांगते की, मुली कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाहीत. मुलीही विमान उडवू शकतात आणि प्रत्येकाने काहीतरी वेगळे क्षेत्र निवडले पाहिजे. ती म्हणते; “एकच ध्येय ठेवा (Success Story) आणि त्या ध्येयाला स्पर्श करण्यासाठी कठोर परिश्रम करा. त्यानंतर तुम्ही ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण झाले नाही असे कधीच होऊ शकत नाही.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti Answer Key : पोलीस शिपाई भरतीची Answer Key पहा एका क्लिकवर

Police Bharti Answer Key

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील विविध (Police Bharti Answer Key) जिल्ह्यात पोलीस भरती 2023 ची लेखी परीक्षा 2 एप्रिल 2023 रोजी पार पडली. या सर्व परीक्षांची Answer Key म्हणजेच उत्तरतालिका आम्ही खाली अपडेट करत आहोत. सर्व जिल्ह्यांच्या उत्तरतालिका अपडेट झालेल्या नाहीत. काही दिवसांत आम्ही जास्तीत जास्त उत्तरतालिका अपडेट करण्याचा प्रयत्न करू. उमेदवारांनी करिअरनामाला नियमित भेट देत रहा; म्हणजे आपल्याला सर्व उत्तर तालिका वेळेवर मिळतील.

Download करा महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जिल्हा निहाय Answer Key (Police Bharti Answer Key)

  • Wardha Police Shipai Answer Key – Download
  • Yavatmal Police Shipai Answer Key 2023 – Download
  • Thane Police Shipai Answer Key 2023 – Download
  • Navi Mumbai Police Shipai Answer Key – Download
  • Gondia Police Shipai Answer Key – Download
  • Nanded Police Shipai Answer Key – Download
  • Aurangabad Police Shipai Answer Key – Download
  • Nashik Gramin Police Shipai Answer Key – Download
  • Thane Gramin Police Answer Key ठाणे ग्रामीण पोलीस भरती -2021 लेखी परीक्षेची Answer key – Download
  • Sambhaji Nagar Police Shipai Answer Key – Download
  • Solapur Gramin Police Shipai Answer Key – Download
  • Raigad Police Shipai Answer Key – Download
  • Akola Police Shipai Answer Key – Download
  • Nagpur Gramin Police Shipai Answer Key – Download
  • Akola Police Shipai Answer Key – Download
  • Chandrapur Police Shipai Answer Key
    Download SET D
    Download SET C
    Download SET B
    Download SET A
  • Latur Police Shipai Answer Key – Download (Police Bharti Answer Key)
  • Amravati Police Shipai Answer Key – Download
  • Amravati Gramin Police Shipai Answer Key – Download
  • Kolhapur Police Shipai Answer Key – Download

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Shikshak Bharti Update : भावी शिक्षकांसाठी मोठी अपडेट!! ‘डीएड’ होणार बंद! आता ‘बीएड’चीच पदवी घ्यावी लागणार

Shikshak Bharti Update

करिअरनामा ऑनलाईन । सध्याच्या प्रचलित शैक्षणिक पद्धतीत जिल्हा (Shikshak Bharti Update) परिषद शाळांवर शिक्षक होण्यासाठी 12 वीनंतर दोन वर्षाचे डीएड शिक्षण घ्यावे लागते. तर माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांसाठी बीएड बंधनकारक आहे. मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी आता 12वीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन विद्यार्थ्यांना ‘बीएड’च करावे लागणार आहे.
केंद्राने दिली मान्यता
केंद्र सरकारचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व अकृषिक विद्यापीठांमध्ये जून 2023-24 नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना शेवटच्या सेमिस्टरवेळी विद्यार्थ्यांना (Shikshak Bharti Update) ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यास त्यासंबंधीची सहा महिने ॲप्रेटायशेन, इंटरशिप करावी लागेल. त्यानंतर तो नोकरी किंवा व्यवसायात उतरू शकतो. सध्या सर्वच अकृषिक विद्यापीठांनी कोर्स स्ट्रक्चर तयार केले आहे.
ॲकॅडमिक कौन्सिलने देखील त्यास मान्यता दिली असून प्राध्यापकांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची 5 एप्रिलला बैठक होणार असून त्यात नवीन शैक्षणिक धोरणावर शिक्कामोर्तब होणार आहे. बारावीनंतर नव्याने पदवीला प्रवेश (Shikshak Bharti Update) घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पॅटर्न लागू असणार आहे. सध्या शिक्षण घेत असलेल्यांना हा पॅटर्न लागू असणार नाही.

असं आहे नवीन शैक्षणिक धोरण (Shikshak Bharti Update)

  • तीन वर्षाची पदवी आता चार वर्षांची होणार आणि त्यानंतर थेट पीएचडी करता येईल.
  • विषय निवडीसाठी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळणार असून एखाद्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी दुसरा विषय घेऊ शकतो.
  • एका वर्षानंतर सर्टिफिकेट मिळेल, दोन वर्षानंतर डिप्लोमाचे प्रमाणपत्र तर तीन वर्षानंतर पदवी प्रमाणपत्र मिळणार.
  • चार वर्षे झाल्यावर डिग्रजी विथ ऑनर्स किंवा डिग्री विथ रिसर्च मिळणार; रिसर्च घेतले तरच पीएचडी करता येईल.
  • पाच वर्षे पूर्ण केल्यावर पदव्युत्तर पदवी मिळेल आणि गॅप पडला तरीदेखील दोन-तीन वर्षांनी प्रवेश घेता येतो.
  • परीक्षेची सत्र पद्धती कायम असणार, पण ‘सीबीसीएस’ पॅटर्ननुसार टक्केवारी नव्हे ग्रेडेशन (स्कोअर क्रेडिट) पद्धती असणार.

पदवी पूर्ण करण्यासाठी 7 वर्षांची मुदत
सध्याच्या शैक्षणिक धोरणानुसार, तीन वर्षांची पदवी पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांची कालमर्यादा ठरलेली आहे. पण, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवीचा अभ्यासक्रम (Shikshak Bharti Update) पूर्ण करण्यासाठी सात वर्षांचा काळ विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. दरम्यान, ‘पीजी’ केलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षात बीएड करता येईल. तर पदवी घेतलेल्यांना दोन वर्षे तर बारावीनंतर बीएडसाठी चार वर्षे लागणार आहेत. नवीन धोरणात ‘डीएड’ नाही. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक होण्यासाठी ‘बीएड’च करावे लागणार आहे. पण, विषय निवडताना कोणता शिक्षक व्हायचा, त्यावरून विषय घेता येणार आहेत.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC HSC Exam Result 2023 : खुषखबर!! 10वी आणि 12वी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणार! पहा तारखा

SSC HSC Exam Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (SSC HSC Exam Result 2023) दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर होणार की नाही याबाबत साशंकता असतानाच विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यंदा दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होणार आहेत. बारावी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
संपानंतर उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाने घेतला वेग
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी शिक्षक, शिक्षकेतर संघटनांनी पुकारलेल्या संपानंतर जलद गतीने सुरु असून या उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत पूर्ण होणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. दहावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीची डेडलाईन 15 एप्रिलची असणार आहे. तर त्याआधी बारावी बोर्ड पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर (SSC HSC Exam Result 2023) निकाल तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल.
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे दहावी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र संप मागे घेतल्यानंतर शिक्षकांनी हे काम प्राधान्याने हाती घेतल्याने दहावी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल वेळेत जाहीर होणार आहे.

15 लाख, 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी दिली 10वीची परीक्षा (SSC HSC Exam Result 2023)
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या काळात पार पडली. यंदा राज्यभरातील 15 लाख, 77 हजार 256 विद्यार्थी या परीक्षेला पात्र ठरले. राज्यातील 533 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावी परीक्षार्थींच्या संख्येत 61 हजार 708 इतकी घट झाली आहे.
14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी दिली 12 वीची परीक्षा
राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात आयोजित करण्यात (SSC HSC Exam Result 2023) आली होती. संपूर्ण राज्यातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. राज्यभरात 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा पार पडली.

यंदा अनेक नियम बदलले
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अनेक नियम यंदा बदलण्यात आले होते. यासोबतच कॉपी मुक्त परीक्षा आयोजित करण्यासाठी काही कठोर नियमही जाहीर (SSC HSC Exam Result 2023) करण्यात आले होते. उमेदवाराने परीक्षेचा पेपर चोरल्यास, मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर घेतला, विकत घेतला किंवा पाठवला तर परीक्षा रद्द केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता. तसंच पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्याचं निलंबन केली जाईल, असंही बोर्डाकरुन सांगण्यात आलं होतं.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : सोलापूर महानगरपालिकेत ‘या’ पदांवर भरती; पात्रता फक्त 8वी ते 10वी पास

Job Notification (35)

करिअरनामा ऑनलाईन । सोलापूर महानगरपालिकेत (Job Notification) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 27 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

संस्था – सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
पद संख्या – 27 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध होईल

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
1) मेसन / Mason – 02 पदे
उमेदवार 8 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
2) मेकॅनिक / Mechanic – 01 पद
उमेदवार 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. (Job Notification)
3) वायरमन / Wireman – 05 पदे
उमेदवार 8 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
4) प्लंबर / Plumber – 12 पदे (Job Notification)
उमेदवार 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
5) सुतार / Carpenter – 02 पदे
उमेदवार 8 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
6) इलेक्ट्रिशियन / Electrician – 05 पदे
उमेदवार 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 7,700/- रुपये ते 8,050/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – www.solapurcorporation.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – (Job Notification)
पद क्र. 1 येथे क्लिक करा – APPLY
पद क्र. 2 येथे क्लिक करा – APPLY
पद क्र. 3 येथे क्लिक करा – APPLY
पद क्र. 4 येथे क्लिक करा – APPLY
पद क्र. 5 येथे क्लिक करा – APPLY
पद क्र. 6 येथे क्लिक करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2023 : रेल्वेत नोकरीची संधी सोडू नका; असिस्टंट लोको पायलट पदावर होणार नवीन भरती

Railway Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वेने रिक्त पदांच्या भरतीसाठी (Railway Recruitment 2023) अधिसूचना जारी केली आहे. सहाय्यक लोको पायलट या पदासाठी ही भरती होणार असून या माध्यमातून 238 नवीन पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 7 एप्रिल 2023 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मे 2023 आहे.

संस्था – भारतीय रेल्वे (NORTH WESTERN RAILWAY, JAIPUR)
भरले जाणारे पद – असिस्टंट लोको पायलट
पद संख्या – 238 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख –
7 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
6 मे 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
(Railway Recruitment 2023)
1.असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारानं, फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ आणि टीव्ही), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मेकॅनिक (मोटर वाहन), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक, हीट इंजिन या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी.
किंवा (Railway Recruitment 2023)
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा.
2. बोर्ड लेटरला अनुसरून 20/08/2001, 28/08/2014 आणि 30/09/2015 रोजीच्या RBE क्रमांक 162/2001मध्ये रेल्वे बोर्डाने दिलेल्या सूचनांच्या अनुसार या पदांसाठी सूचित केलेल्या पात्रतेत बसणाऱ्या इंजिनीअरिंगच्या विविध शाखांचं एकत्रितपणे शिक्षण घेतलेल्या (Railway Recruitment 2023) उमेदवारांनाही या पदांसाठी अर्ज करता येऊ शकतो.

वय मर्यादा –
1. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 1 जुलै 2023 रोजी 43 वर्षांपेक्षा जास्त नसावं.
2. OBC प्रवर्गातील 45 आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांचे वय 47 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.rrcjaipur.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2023 : 10वी पाससाठी कोल्हापूर वीज मंडळात भरती सुरु; या लिंकवर करा अर्ज

Mahavitaran Recruitment 202

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (Mahavitaran Recruitment 2023) लिमिटेड, कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इलेक्ट्रिशियन पदाच्या एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, कोल्हापूर
भरले जाणारे पद – इलेक्ट्रिशियन
पद संख्या – 12 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
मिळणारे वेतन – Rs. 6,000/- ते 10,000/- दरमहा

असा करा अर्ज –
(Mahavitaran Recruitment 2023)
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (Mahavitaran Recruitment 2023)
4. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

काही महत्वाच्या लिंक्स – (Mahavitaran Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – kolhapur.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Actor Success Story : कधी सँडविच घेण्यासाठी नव्हते पैसे; आज एका चित्रपटासाठी मिळतात करोडो रुपये

Actor Success Story Shreyas Talpade

करिअरनामा ऑनलाईन । बॉलिवूडचा सुपरहिट (Actor Success Story) चित्रपट ‘ओम शांती ओम’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता श्रेयस तळपदे याचा आज वाढदिवस आहे. हिंदी चित्रपटांमधून या अभिनेत्याने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने खूप गुदगुल्या केल्या आहेत. श्रेयस मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत खूप सक्रिय आहे. श्रेयस हा मराठी चित्रपट उद्योगातील अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये यश संपादन केले आहे. आज आपण श्रेयसच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया…

Actor Success Story Shreyas Talpade

दिग्दर्शन…प्रॉडक्शन…व्हॉईस ओव्हर
श्रेयस तळपदे 20 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. दिग्दर्शनापासून ते प्रॉडक्शन आणि व्हॉईस ओव्हरपर्यंत त्याने प्रत्येक क्षेत्रात कमांड घेतली आहे. कोणताही (Actor Success Story) गॉडफादर किंवा फिल्मी कनेक्‍शन न ठेवता स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या श्रेयसची कथा खूप प्रेरणादायी आहे.

Actor Success Story Shreyas Talpade

नाटकातून अभिनयाची छाप पाडली (Actor Success Story)
श्रेयसचा जन्म 27 जानेवारी 1976 रोजी मुंबईत झाला. कॉलेजमध्येच त्यांनी थिएटर करायला सुरुवात केली. त्याचा अभिनय पाहून त्याला मराठी मालिकांमध्ये काम मिळू लागले. मराठी मालिकांमध्ये काम करण्यासोबतच तो मराठी नाटकातही काम करायचा. अभिनेता श्रेयस तळपदेने ओम शांती ओम, गोलमाल सिरीज, वाह ताज आणि इक्बाल यांसारखे हिंदी चित्रपट आणि मराठी भाषेत 45 चित्रपट केले आहेत .

Actor Success Story Shreyas Talpade

‘इकबाल’ ने केले स्टार
श्रेयसने चित्रपट दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांच्या बहुचर्चित आणि पुरस्कार विजेत्या ‘इकबाल’ चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. इक्बाल या (Actor Success Story) चित्रपटातील श्रेयसच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि त्याला मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या.

Actor Success Story Shreyas Talpade

सँडविच घ्यायला पैसे नव्हते
मिडियाशी संवाद साधताना श्रेयस तळपदेने आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून दिली आणि सांगितले की, त्याने त्याच्या कारकिर्दीत कधीही करण जोहर किंवा यशराजच्या चित्रपटात काम केले नाही. पण याचा अर्थ असा नाही की तो सक्षम अभिनेता नाही. श्रेयस तळपदेच्या आयुष्यात (Actor Success Story) एक वेळ अशी आली जेव्हा त्याच्याकडे सँडविच घेण्यासही पैसे नव्हते किंवा घराचे भाडे भरायलाही पैसे नव्हते. तसेच बसने स्टुडिओला जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसायचे. मेहनत आणि संघर्ष करून त्याने खूप नाव कमावले. आज तो करोडोंची कमाई करत आहे.
अलीकडेच श्रेयसने प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटासाठी हिंदीत डबिंग केले आहे. यापूर्वी त्याने ‘द लायन किंग’च्या हिंदी आवृत्तीत हॉलिवूड (Actor Success Story) अभिनेता बिली आयचनरच्या व्यक्तिरेखेला आवाज दिला होता.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : सूर्याचे आणि चंद्राचे प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो?

GK Updates 2 Apr.

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
आज आपण खगोल शास्त्राशी संबंधित काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत….

1 .ऑक्टोबर २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाने (IAU) कोणत्या ग्रहाचे ग्रहपद काढून त्याचा समावेश छोट्या ग्रहांच्या समूहात केला ?
उत्तर – प्लुटो
2. सर्वप्रथम आकाशगंगेबाबत भाकित करणारा खगोलशास्त्रज्ञ कोण ?
उत्तर – हर्षल (GK Updates)
3. सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचायला किती मिनिटे लागतात?
उत्तर – ८ मिनिटे १६ सेकंद
4. चंद्रावरून प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो ?
उत्तर – १.३ सेकंद
5. सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह कोणता ?
उत्तर – बुध
6. पृथ्वीपासून सर्वांत जवळ असलेला ग्रह कोणता ?
उत्तर – (GK Updates) शुक्र

7. ग्रहांमध्ये सर्वाधिक घनता पृथ्वीची आहे, तर सर्वांत कमी घनत्व असलेला ग्रह कोणता ?
उत्तर – शनी
8. कोणत्या ग्रहाची परिवलन व परिभ्रमण या दोन्ही गती जवळपास सारख्याच आहेत ?
उत्तर – शुक्र
9. सर्वांत कमी परिवलन गती कोणत्या ग्रहाची आहे?
उत्तर – शुक्र
10. सूर्यकुळातील सर्वांत मोठा ग्रह गुरू आहे, तर सर्वांत लहान ग्रह कोणता आहे?
उत्तर – बुध
11. कोणत्या दोन ग्रहांचा आकार जवळपास सारखाच असल्यामुळे त्यांना जुळे ग्रह असे संबोधतात.?
उत्तर – पृथ्वी व शुक्र
12. सूर्यकुळातील तारा असे कोणत्या ग्रहाला संबोधतात.?
उत्तर – शुक्र (GK Updates)

13. मंगळ या ग्रहाला ….असेही संबोधतात.?
उत्तर – लाल ग्रह
14. सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला तारा कोणता ?
उत्तर – प्रॉक्झिमा सेंटॉरी
15. सूर्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासापेक्षा किती पटींनी मोठा आहे ?
उत्तर – १०९ पटींनी
16. सूर्याच्या आकारामध्ये किती पृथ्वी बसू शकतात ?
उत्तर – जवळपास तेरा लक्ष
17. सूर्यापासून मिळणारा प्रकाश कशामुळे मिळतो?
उत्तर – हायड्रोजनच्या एकत्रीकरणाने (GK Updates)
18. पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती कशामुळे होते?
उत्तर – पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे

19. पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो ?
उत्तर – ५९ ट्टक्के
20. सूर्यकुळात सर्वाधिक गुरुत्वाकर्षण शक्ती असलेला ग्रह कोणता ?
उत्तर – गुरू
21. कोणत्या ग्रहावर ‘शुमेकर लेव्ही’ हा धुमकेतू आदळला होता ?
उत्तर – गुरू
22. सूर्याला स्वतःभोवती फिरण्याला (परिवलनाला) किती कालावधी लागतो ?
उत्तर – २५ दिवस
23. चंद्र दररोज noकिती मिनिटे उशिरा उगवतो ?
उत्तर – ५० मिनिटे
24. सूर्यसिद्धांत कुणी मांडला ?
उत्तर – पेरी लाप्लासे (GK Updates)
25. सूर्यमालेतील निळ्या रंगाचा ग्रह कोणता ?
उत्तर – पृथ्वी
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com