Railway Recruitment 2023 : रेल्वेत नोकरीची संधी सोडू नका; असिस्टंट लोको पायलट पदावर होणार नवीन भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वेने रिक्त पदांच्या भरतीसाठी (Railway Recruitment 2023) अधिसूचना जारी केली आहे. सहाय्यक लोको पायलट या पदासाठी ही भरती होणार असून या माध्यमातून 238 नवीन पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 7 एप्रिल 2023 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मे 2023 आहे.

संस्था – भारतीय रेल्वे (NORTH WESTERN RAILWAY, JAIPUR)
भरले जाणारे पद – असिस्टंट लोको पायलट
पद संख्या – 238 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख –
7 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
6 मे 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
(Railway Recruitment 2023)
1.असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारानं, फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ आणि टीव्ही), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मेकॅनिक (मोटर वाहन), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक, हीट इंजिन या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी.
किंवा (Railway Recruitment 2023)
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा.
2. बोर्ड लेटरला अनुसरून 20/08/2001, 28/08/2014 आणि 30/09/2015 रोजीच्या RBE क्रमांक 162/2001मध्ये रेल्वे बोर्डाने दिलेल्या सूचनांच्या अनुसार या पदांसाठी सूचित केलेल्या पात्रतेत बसणाऱ्या इंजिनीअरिंगच्या विविध शाखांचं एकत्रितपणे शिक्षण घेतलेल्या (Railway Recruitment 2023) उमेदवारांनाही या पदांसाठी अर्ज करता येऊ शकतो.

वय मर्यादा –
1. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 1 जुलै 2023 रोजी 43 वर्षांपेक्षा जास्त नसावं.
2. OBC प्रवर्गातील 45 आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांचे वय 47 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.rrcjaipur.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com