Home Blog Page 335

BARC Recruitment 2023 : मुंबईमध्ये नोकरीचा गोल्डन चान्स!! महिन्याला 1 लाखापर्यंत मिळणार पगार; काय आहे पात्रता?

BARC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक (BARC Recruitment 2023) विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) पदांच्या 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 06 एप्रिल 2023 आहे.

संस्था – भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई
भरले जाणारे पद –
1. पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी – 15 पदे
2. कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर – 05 पदे
3. वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) – 02 पदे
पद संख्या – 22 पदे (BARC Recruitment 2023)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 40 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 06 एप्रिल 2023
मुलाखतीचा पत्ता – BARC हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई 400 094
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BARC Recruitment 2023)
1. पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी – MS/MD/DNB degree or Diploma from recognized university in the concerned specialty. The candidates having Diploma must possess minimum 2 years of Post diploma experience in the specialty concerned.
2. कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर – MBBS from recognized university with one year internship from recognized institution. (BARC Recruitment 2023)
3. वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) – MD or DNB (Radiology) OR M.B.B.S.with relevant P.G.Diploma with experience.

मिळणारे वेतन – (BARC Recruitment 2023)
1. पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी Consolidated monthly pay – Rs. 86,000/- for the 1st year, Rs. 88,000/- for the 2nd year and Rs. 90,000/- for the 3rd year.
2. कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर Rs. 72,000/- per month
3. वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) Gross Ent. Rs. 1, 04,988/- (per month) [Rs.45098/- plus DA(pre-revised) admissible to SO/D(Medical Officer) ]

निवड प्रक्रिया –

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. उमेदवाराने आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
  3. उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची मूळ प्रमाणपत्रे, प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींचा एक संच आणि (BARC Recruitment 2023)
  4. एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा.
  5. मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे दाखवावीत.
  6. वरील पदांकरीता मुलाखत 06 एप्रिल 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  7. निवडीशी संबंधित सर्व माहिती http://www.barc.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.barc.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DTP Maharashtra Recruitment : इंजिनियर्ससाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची मोठी संधी; इथे करा अर्ज

MSRTC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि (DTP Maharashtra Recruitment) मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

संस्था – नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद – रचना सहायक
पद संख्या – 177 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग
वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे
अर्ज फी – (DTP Maharashtra Recruitment)
अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
राखीव प्रवर्ग – रु. 900/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
रचना सहायक स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम (DTP Maharashtra Recruitment) तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षांची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक घेतले असणे आवश्यक.
मिळणारे वेतन – Rs. 36,800 ते 1,22,800/- दरमहा

  1. वय मर्यादा – (DTP Maharashtra Recruitment)
    किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  2. मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / अनाथांसाठी वयोमर्यादा ०५ वर्ष शिथिलक्षम राहील.
  3. दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील.
  4. त्याचबरोबर अगोदरच शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांच्या (DTP Maharashtra Recruitment) बाबतीत वयोमर्यादा १० वर्षांनी शिथिल राहील.
  5. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली क्योमयदितील शिथिलतेची सवलत यांपैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.

भरतीचा तपशील –

DTP Maharashtra Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (DTP Maharashtra Recruitment)
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF 
अधिक महितीसाठी जाहिरात पहा (सर्वसाधारण सूचना) – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://dtp.maharashtra.gov.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IGNOU Recruitment 2023 : टायपिंग येणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी!! इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात भरती सुरु; शिक्षण फक्त 12वी

IGNOU Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अंतर्गत (IGNOU Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट-कम-टायपिस्ट पदाच्या एकूण 200 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

संस्था – इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
भरले जाणारे पद – ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023
पद संख्या – 200 पदे (IGNOU Recruitment 2023)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  2. संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वय मर्यादा –
31 मार्च 2023 रोजी 18 ते 27 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – (IGNOU Recruitment 2023)
जनरल/ओबीसी /EWS: ₹1000/- [SC/ST/महिला: ₹600/-, PWD: फी नाही]
मिळणारे वेतन – 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया –

  1. लेखी परीक्षा (IGNOU Recruitment 2023)
  2. कौशल्य चाचणी / प्रकार चाचणी
  3. दस्तऐवज पडताळणी
  4. वैद्यकीय तपासणी

काही महत्वाच्या लिंक्स – (IGNOU Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSRTC Recruitment 2023 : शिक्षण फक्त 8 वी ते 10 वी पास; ST महामंडळ जळगाव अंतर्गत ‘या’ पदावर भरती

MSRTC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत (MSRTC Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मेकॅनिक (मोटार व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर (गॅस व इले.) या पदांच्या एकूण 100 जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
भरली जाणारी पदे – (MSRTC Recruitment 2023)

  1. मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – 60 पदे
  2. मेकॅनिक डिझेल – 25 पदे
  3. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – 13 पदे
  4. वेल्डर (गॅस व इले.) – 2 पदे

पद संख्या – 100 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध होईल
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव (महाराष्ट्र)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – १० वी उत्तीर्ण.
  2. मेकॅनिक डिझेल – १० वी उत्तीर्ण. (MSRTC Recruitment 2023)
  3. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – १० वी उत्तीर्ण.
  4. वेल्डर (गॅस व इले.) – ०८ वी उत्तीर्ण.

मिळणारे वेतन –

  1. मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – ₹६००० ते ₹७७०० दरमहा
  2. मेकॅनिक डिझेल: ₹६००० ते ₹७७०० दरमहा (MSRTC Recruitment 2023)
  3. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स: ₹६००० ते ₹७७०० दरमहा
  4. वेल्डर (गॅस व इले.): ₹६००० ते ₹७७०० दरमहा

अर्ज फी – फी नाही (MSRTC Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – 

  1. मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – APPLY
  2. मेकॅनिक डिझेल – APPLY
  3. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – APPLY
  4. वेल्डर (गॅस व इले.) – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : IITian झाली IPS आणि नंतर IAS, गरिमा अग्रवालला इतकं यश कसं मिळालं? जाणून घ्या…

UPSC Success Story Garima Agarwal IAS

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय प्रशासकीय सेवा विभाग हा देशाच्या (UPSC Success Story) नोकरशाहीमध्ये सर्वात प्रभावशाली मानला जातो. यामध्ये, उमेदवार विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सचिव दर्जाची पदे मिळवतात, तर जिल्हा स्तरावर ते विविध प्राधिकरणांमध्ये जिल्हा दंडाधिकारी आणि आयुक्तांची पदे व्यापतात. यामुळेच दरवर्षी लाखो युवक संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत नशीब आजमावताना दिसतात. मात्र, प्रत्येकाला यश मिळतेच असे नाही. पण असे काही प्रयत्नवादी असतात जे पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करतात.
अशीच एक आश्वासक भारतीय प्रशासकीय अधिकारी आहे; ती म्हणजे गरिमा अग्रवाल. मध्य प्रदेशातील खरगोन येथील 29 वर्षीय गरिमाने पहिल्याच प्रयत्नात UPSC पास होवून IPS पद मिळवले होते, पण तिचे ध्येय काही वेगळेच होते. तिने पुन्हा तयारी केली आणि दुसऱ्या प्रयत्नात IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले. जाणून घेऊया IAS गरिमाची यशोगाथा…

UPSC Success Story Garima Agarwal IAS

लहानपणापासूनच हुशार
सरस्वती विद्या मंदिर, खरगोन येथून गरिमा यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले आहे. त्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. गरिमा यांनी शालेय जीवनापासून ते (UPSC Success Story) यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसपर्यंत ज्या ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले त्यात त्यांनी नेहमी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. त्यांची मोठी बहीण प्रीती अग्रवाल यांनी 2013 मध्ये भारतीय टपाल सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती.

 

UPSC Success Story Garima Agarwal IAS

IITian ते IPS आणि नंतर IAS (UPSC Success Story)
गरिमा UPSC CSE परीक्षेत 240 वा क्रमांक मिळवून पहिल्याच प्रयत्नात IPS अधिकारी बनल्या. लगेच पुढच्याच प्रयत्नात 2018 मध्ये CSE परीक्षेत त्यांनी कठोर प्रयत्न करून संपूर्ण भरतातून 40 वी रँक तर मिळवत IAS होण्याचे स्वप्नही पूर्ण केले. विशेष म्हणजे UPSC देण्यापूर्वी गरिमा यांनी आयआयटी हैदराबादमधून पदवी प्राप्त केली आहे.

UPSC Success Story Garima Agarwal IAS

गरिमा यांनी दिल्या अभ्यासाच्या टिप्स
गरिमा यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुकांना अभ्यासाच्या टिप्स दिल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवा की प्राथमिक (UPSC Success Story) परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची तयारी स्वतंत्रपणे न करता एकत्रितपणे करणं फायद्याचं ठरतं.
गरिमायांच्या मते, अनेक वेळा यूपीएससी पूर्व परीक्षेत येणारे प्रश्न मुख्य परीक्षेतही येतात. म्हणूनच पुनरावृत्ती आवश्यक आहे. केवळ भरपूर अभ्यास साहित्य गोळा करून यश मिळत नाही तर ते वाचावे लागते आणि वाचलेले लक्षात ठेवावे लागते. तसेच मॉक टेस्ट देवून उत्तर लेखनाचा (UPSC Success Story) सराव वाढवा. मॉक टेस्टद्वारे तुमची पुनरावृत्ती तपासत राहा. इंटरनेटवर अभ्यासाचे भरपूर साहित्य उपलब्ध आहे. गरिमाच्या म्हणण्यानुसार, ज्या विषयात मला कमी गुण मिळाले त्या विषयांसाठी मी स्वतंत्रपणे सराव करायचे आणि त्यांची उजळणी करायचे.

UPSC Success Story Garima Agarwal IAS

‘निराश होऊ नका; धीर धरा’
नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रोत्साहन देताना गरिमा सांगतात की; “या परीक्षेत यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम आणि चिकाटी. तुमची मानसिक स्थिति अशा प्रकारे तयार करा की ज्या दिवशी तुम्हाला वाचावेसे वाटणार नाही त्याच (UPSC Success Story) दिवशी चांगल्या पद्धतीने वाचन करा आणि तुमच्यात नवीन धैर्य कसे निर्माण होते ते पहा. ज्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा मिळते अशा लोकांच्या संपर्कात रहा. नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून दूर राहणेच चांगले. अपयश किंवा यश दोन्ही आपल्या मनात असते, जिद्द असेल तर आपण काहीही साध्य करू शकतो.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

General Knowledge : स्पर्धा परीक्षांसाठी अशी करा ‘GK’ ची तयारी; जाणून घ्या काही सोप्या टिप्स

GK Updates 1 Apr

करिअरनामा ऑनलाईन । जगभरात नोकरीसाठी स्पर्धा वाढली आहे. कोणतीही (General Knowledge) प्रायव्हेट कंपनी असो की सरकारी संस्था नोकर भरतीच्यावेळी परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी कंपनीत असलेल्या पोस्टनुसार प्रश्न विचारले जातात. त्यात जर सरकारी नोकरी असेल तर त्यात गणित (Maths), विज्ञान (Science), मेंटल स्किल्स (Mental Skills) बरोबरच सामान्य ज्ञानाबद्दलही (General Knowledge) प्रश्न विचारले जातात. मात्र अनेकदा विद्यार्थी इतर विषयांत चांगले गुण मिळवूनही सामान्य ज्ञानात मार्क्स मिळवू शकत नाहीत. याचं प्रमुख कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीनं केलेला अभ्यास आणि ज्ञानाची कमतरता. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला जनरल नॉलेजचा अभ्यास कशा पद्धतीनं करायचा हे सांगणार आहोत.

आतंरराष्ट्रीय न्यूज पेपर वाचणं आवश्यक (General Knowledge)
जगभरात हजारो प्रादेशिक वृत्तपत्र आहेत पण यामध्ये केवळ त्याच्या सभोवतालच्या घटनांशी संबंधित बातम्या आढळतात जे पुरेसं नाही. म्हणून GK वाढवण्यासाठी इंग्रजी आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर (International News Paper) वाचणं आवश्यक आहे. हे वृत्तपत्र दररोज सविस्तर वाचलं पाहिजे. यामुळे नक्कीच तुमचं GK वाढण्यास मदत होईल.
GK चं पुस्तक वाचा
आपले ज्ञान विस्तृत करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे वाचन. GK वाढवण्यासाठी आपण विविध विषयांवरील पुस्तकं वाचणे महत्त्वाचं आहे. बुक्स स्टोअरमध्ये (General Knowledge) हजारो GK पुस्तकं (GK books) उपलब्ध असतात इथून तुम्ही आवडीपैकी कोणतंही एक निवडू शकता आणि सामान्य ज्ञानाचं पुस्तक वाचण्यास सुरुवात करू शकता.

दररोज इंग्रजी बातम्या ऐका
दररोज किमान अर्धा तास इंग्रजी बातम्या ऐका. दररोज इंग्रजी बातम्या ऐकल्यामुळे आपल्या GK मध्ये सुधारणा होईल. तुमची स्मरणशक्ती देखील सुधारेल. तुम्ही (General Knowledge) कोणत्याही चॅनेल किंवा रेडिओवरील बातम्या ऐकू शकता कारण हा बातम्यांचा सर्वोत्तम स्रोत आहेत.
Quiz आणि GK टेस्ट द्या
वृत्तपत्र किंवा वेबद्वारे दरमहा किमान एक GK टेस्ट द्या. बरेच क्विझ आणि GK गेम्स या स्वरुपात देखील उपलब्ध आहेत जे खेळत असताना आपण बऱ्याच (General Knowledge) गोष्टी शिकु शकतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

School Holidays : एप्रिलमध्ये शाळेला मिळणार ‘इतक्या’ सुट्या; पहा यादी

School Holidays

करिअरनामा ऑनलाईन । काही दिवसांपुर्वी इयत्ता दहावी, बारावीच्या (School Holidays) परीक्षा संपल्या आहेत. आता अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांची लगबग सुरु आहे. यासोबतच मुलेही सुट्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत. एप्रिल महिन्यात अनेक सण येत आहेत आणि यासह शनिवार आणि रविवारची सुट्टी तर आहेच. गुड फ्रायडे, ईद, रमजान असे अनेक मोठे सण एप्रिलमध्ये येत असल्याने मुलांना लांब सुट्ट्या मिळणार आहेत. कौटुंबिक सहलीची योजना आखत असलेल्या पालकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. एप्रिलमध्ये किती दिवस शाळेला सुट्टी आहे? हे जाणून घेवूया..
एप्रिलमध्ये शाळेत शिकणाऱ्या मुलांना जास्त दिवस मौजमजा करता येणार आहे. त्यांना सलग अनेक दिवस सुट्या मिळणार आहेत, त्याचप्रमाणे या महिन्यात 5 रविवार (School Holidays) येत असून अनेक शाळांमध्ये शनिवारच्या सुट्याही दिल्या जात आहेत. त्यामुळे जोडून येणाऱ्या सुटीचा आनंद घेता येणार आहे.

एप्रिलमधील सुट्ट्यांची यादी – (School Holidays)
१ एप्रिल – शनिवार
२ एप्रिल – रविवार
४ एप्रिल – महावीर जयंती
७ एप्रिल – गुड फ्रायडे
८ एप्रिल – शनिवार
९ एप्रिल – रविवार
१४ एप्रिल – आंबेडकर जयंती
१५ एप्रिल – शनिवार (School Holidays)
१६ एप्रिल – रविवार
२१ एप्रिल – रमजान
२२ एप्रिल – ईद उल फित्र
२३ एप्रिल – रविवार
२९ एप्रिल – जानकी नवमी
३० एप्रिल – रविवार

जवळपास १५ दिवस शाळा बंद राहणार आहेत. यंदा एप्रिल महिन्यात ५ रविवार आणि ५ शनिवार असल्याने त्यादिवशी शाळा बंद असतील. काही शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर काहींना शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा असते. याशिवाय अनेक महापुरुषांच्या जयंती (School Holidays) या महिन्यात येत आहेत. तसेच एप्रिलमध्ये महावीर जयंती, आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, ईद देखील असते त्यामुळे मुलांना लांब सुट्टीचा आनंद घेता येईल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Jalgaon Recruitment : जळगावच्या जिल्हा परिषदेत ‘या’ पदांवर भरती सुरु; लगेच पाठवा अर्ज

ZP Jalgaon Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, जळगाव येथे रिक्त पदांच्या (ZP Jalgaon Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 38 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची  शेवटची तारीख 3 एप्रिल 2023 आहे.
संस्था – जिल्हा परिषद, जळगाव
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 38 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 एप्रिल 2023
मिळणारे वेतन – 60,000/- दरमहा
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – 70 वर्षे

अर्ज फी – (ZP Jalgaon Recruitment)
Open/OBC/EWS – रु. 150/-
SC/ST – रु. 100/-
PWD/ Female – फि नाही.
असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायावर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता. (ZP Jalgaon Recruitment)
  3. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  4. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
मा. मुख्य्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डिंग) जिल्हा परिषद जळगाव. (ZP Jalgaon Recruitment)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.zpjalgaon.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : ग्रॅज्युएट्ससाठी राज्याच्या ‘या’ जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीचा गोल्डन चान्स; असा करा अर्ज

Government Jobs (29)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी अंतर्गत (Government Jobs) तक्रार निवारण प्राधिकारी पदाच्या विविध जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2023 आहे.

संस्था – जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी
भरले जाणारे पद – तक्रार निवारण प्राधिकारी
नोकरी करण्याचे ठिकाण – परभणी
वय मर्यादा – 66 वर्षे (https://parbhani.gov.in/)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथील रोहयो कक्ष उपजिल्हाधिकारी (रोहयो) परभणी

मिळणारे वेतन – रु. 45,000/- दरमहा
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)
1. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
2. उमेदवारास लोकप्रशासन/ विधी / सामाजिक कार्य / शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान २० वर्षाचा अनुभव असावा.

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जाचा विहित नमूना OMBUDSMAN पदाची तपशील वर माहिती, या बाबतची सधारीत सूचना http://parbhani.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. (Government Jobs)
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2023 आहे.
  7. मुदती नंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – parbhani.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Dipali Goenka : या आहेत NDTV च्या नव्या डायरेक्टर दीपाली गोयंका; रतन टाटांपेक्षा महाग आहे यांचं घर 

Dipali Goenka

करिअरनामा ऑनलाईन । उद्योगपती दीपाली गोयंका आणि (Dipali Goenka) सेबीचे माजी अध्यक्ष यू. के. सिन्हा  यांची अदानी समूहाच्या मालकीच्या NDTV ने स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. दोघांचा कार्यकाळ 27 मार्च 2023 पासून दोन वर्षांसाठी असेल. नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटीच्या शिफारसीच्या आधारे आणि शेअरधारक आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Dipali Goenka

फोर्ब्सच्या भारतातील सर्वात शक्तिशाली महिला (Dipali Goenka)
दीपाली गोयंका या वेलस्पन इंडिया लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार दीपाली गोयंका या आशिया आणि भारतातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक आहेत. नुकताच मुंबईतील वरळी येथे देशातील सर्वात (Dipali Goenka) महागडा फ्लॅट खरेदी करण्यात आला होता. तो सुप्रसिद्ध उद्योगपती बी. के. गोयंका यांनी त्यांची पत्नी दीपाली गोयंका यांच्यासाठी विकत घेतला होता. या घराची किंमत रतन टाटा यांच्या घरापेक्षा जास्त आहे.

Dipali Goenka

मानसशास्त्राच्या पदवीधर
दीपाली गोएंका या मानसशास्त्रात पदवीधर आहेत. त्या हार्वर्डच्या माजी विद्यार्थिनी आहेत. दीपाली गोयंका यांनी वयाच्या 18 व्या वर्षी बी. के. गोयंकाशी विवाह केला. त्यांचे पती वेलस्पन ग्रुपचे चेअरमन आहेत. दीपाली गोयंका यांच्या लिंक्डइन अकाऊंटनुसार, त्या त्यांच्यातील उत्कृष्ट नेतृत्व कौशल्यामुळे (Dipali Goenka) ओळखल्या जातात. वेलस्पन ही जगातील सर्वात मोठ्या होम टेक्सटाईल कंपन्यांपैकी एक आहे. 2003 मध्ये दीपाली गोयंका यांनी स्पेसेस हा प्रीमियम बेड आणि बाथ ब्रँड लाँच केला होता.

Dipali Goenka

दीपाली गोयंकांची Networth
दीपाली गोयंका ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सतत सक्रिय असतात. त्या एखाद्या सोशल मीडिया स्टारपेक्षा कमी नाहीत. इंस्टाग्रामवर त्याचे 191k फॉलोअर्स आहेत. दुसरीकडे, जर वेलस्पन ग्रुपबद्दल सांगायचे झाले तर त्यांच्याकडे 25,000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. कंपनीचे उत्पन्न 2.3 अब्ज डॉलर्स आहे. बी. के. गोएंका यांनी मुंबईत खरेदी केलेले पहिले पेंट हाऊस सुमारे 240 कोटी रुपयांचे आहे. या घरात (Dipali Goenka) ते पत्नी दीपाली गोएंकासोबत राहणार आहेत.
थ्री सिक्स्टी वेस्ट इमारतीच्या 63 व्या, 64व्या आणि 65व्या मजल्यावर बांधलेले हे पेंटहाऊस आता गोएंका दाम्पत्याचे नवीन घर आहे. त्याचे एकूण (Dipali Goenka) क्षेत्रफळ 30,000 चौरस फूट आहे. दुसरीकडे, जर आपण रतन टाटा यांच्या घराबद्दल बोललो तर त्याची किंमत सुमारे 150 कोटी रुपये आहे.

Dipali Goenka

मला एक व्यक्ती म्हणून विकसित व्हायचं होतं
दिपाली सांगतात; “मला पारंपारिक मारवाडी कुटुंबाची पार्श्वभूमी लाभली आहे. तिथे मुलीचे लग्न कमी वयात होणं ही बाब अगदी सामान्य आहे. मला दोन मुली आहेत. त्यापैकी (Dipali Goenka) मोठी मुलगी 10 आणि लहान मुलगी 7 वर्षांची झाल्यानंतर मी व्यवसायात सक्रियपणे काम करू लागले. मला एक व्यक्ती म्हणून विकसित व्हायचे होते आणि त्याबद्दल माझ्या कल्पना स्पष्ट होत्या.”
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com