Home Blog Page 301

11th Admission : 11 वी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर!! 8 जूनला सुरु होणार पहिली फेरी तर ‘या’ तारखेला जाहीर होणार मेरिट लिस्ट

11th Admission (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (11th Admission) शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्र जाहीर झाले आहे. ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेला दि. 8 जूनपासून सुरुवात होणार आहे. दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होत आहे. याआधी अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक भरला होता.आता दहावीचा निकाल जाहिर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग दोन भरायचा आहे.
दि. 8 जून रोजी विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी महाविद्यालयाचे पसंती क्रमांक भरता येणार आहेत. तर 19 जूनला अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे ,पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती ,नागपूर महानगरपालिका क्षेत्रासाठी (11th Admission) विद्यार्थ्यांना या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अकरावी प्रवेश मिळवण्यासाठी सहभागी होणे आवश्यक आहे. मुंबई विभागात आतापर्यंत अर्जाचा भाग एक भरुन एक लाख पंधरा हजार विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.

असे आहे 11 वी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक – (11th Admission)
1. 8 ते 12 जून रात्री 10 वाजेपर्यंत – नियमित पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविणे
2. प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे म्हणजे नियमित फेरी-1 साठी पसंती अर्ज भाग-2 ऑनलाईन सादर करणे.
3. विद्यार्थ्यांना भाग-2 मध्ये किमान एक व कमाल 10 पसंतीक्रम नोंदविता येतील.
(विद्यार्थ्यांना डेटा प्रोसेसिंगनंतर भाग-2 मध्ये दिलेल्या त्यांच्या पसंतीनुसार प्रवेशासाठी महाविद्यालय मिळेल / अलॉटमेंट केले जाईल) विद्यार्थ्यांनी विहित मुदतीपूर्वी त्यांचा फॉर्म भाग-2 लॉक करावा
4. 12 जून -प्रवेश अर्ज भाग एक भरणे,मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज प्रमाणित करणे
5. 13 जून -तात्पुरती पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणे
6. 13 ते 15 जून – विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये चुका असल्यास दुरुस्ती संदर्भात गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदविणे
7. 15 जून अंतीम गुणवत्ता यादी तयार करणे (11th Admission)
8. 19 जून सकाळी 10 वाजता- पहिली गुणवत्ता यादी जाहीर
9. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विद्यालय निवड यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे.
10. विद्यार्थी लॉगीनमध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय दर्शविणे.
11. संबंधित विद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगीन मध्ये दर्शविणे
12. फेरीचे कट-ऑफ पोर्टलवर दर्शविणे. (विद्यार्थ्यांना संक्षिप्त संदेश / SMS देणे)
13. 19 ते 22जून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे
14. 23 जून दूसर्‍या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे

पुढील फेर्‍यांसाठी संभाव्य तारखा –
1. नियमित दुसरी प्रवेश फेरी – 23 ते 30 जून
2. नियमित तीसरी प्रवेश फेरी – 1 ते 9 जुलै
3. विशेष प्रवेश फेरी – 10 ते 18 जुलै
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PMC Recruitment 2023 : विना परीक्षा थेट द्या मुलाखत; पुणे महापालिकेत 4 थी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची मोठी संधी

PMC Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगपालिका, समाज विकास विभाग (PMC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून समुपदेशक, समुहसंघटिका, कार्यालयीन सहाय्यक, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्प्युटर हार्डवेअर), स्वच्छता स्वयंसेवक, फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक CIT, TALLY , 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक, शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र ), एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक या पदांच्या 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2023 आहे. मिळालेल्या (PMC Recruitment 2023) अर्जामधून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी त्याचदिवशी सायंकाळी 5 वाजता सदर ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल. यानंतर पात्र यादीतील उमेदवारांनी दि. 8 जून रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे.

संस्था – पुणे महानगपालिका, पुणे
भरली जाणारी पदे – (PMC Recruitment 2023)
1. समुपदेशक 6 पदे
2. समुहसंघटिका 15 पदे
3. कार्यालयीन सहाय्यक 4 पदे
4. रिसोर्स पर्सन 2 पदे
5. विरंगुळा केंद्र समन्वयक 4 पदे
6. सेवा केंद्र मुख्य समन्वयक 2 पदे
7. सेवा केंद्र समन्वयक 3 पद
8. संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्प्युटर हार्डवेअर) 1 पद
9. स्वच्छता स्वयंसेवक 6 पदे (PMC Recruitment 2023)
10. फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक 1 पद
11. फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक 2 पदे
12. ब्युटी पार्लर प्रशिक्षक 2 पद
13. चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक 1 पद
14. कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक 1 पद
15. इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक 2 पदे
16. जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक 1 पद
17. संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक 1 पद
18. संगणक बेसिक CIT, TALLY , 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक 3 पदे
19. शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र ) 1 पदे
20. एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार 1 पद
21. प्रशिक्षण केंद्र समन्वयक 1 पद
22. प्रकल्प समन्वयक 1 पद (PMC Recruitment 2023)
23. प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक 1 पद

पद संख्या – 62 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत्त – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कै. एस.एम.जोशी हॉल, दारूवाला पुल, के.सी. ठाकरे प्रशाले समोर, सोमवार पेठ, पुणे 411011
निवड प्रक्रिया – मुलाखत (PMC Recruitment 2023)
मुलाखतीची तारीख – 08 जून 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
समुपदेशक – MSW/MA
समुहसंघटिका – MSW/MA
कार्यालयीन सहाय्यक – 12th Pass
रिसोर्स पर्सन – M.Com
विरंगुळा केंद्र समन्वयक – 12th Pass
सेवा केंद्र मुख्य समन्वयक – 10th Pass
सेवा केंद्र समन्वयक – 7th Pass (PMC Recruitment 2023)
संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्प्युटर हार्डवेअर) – 12th Pass
स्वच्छता स्वयंसेवक – 4th Pass
फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक विषयाकिंत डिप्लोमा/शासनमान्य आय.टी.आय. उत्तीर्ण

फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक शिवणकामाचा शासनमान्य एक वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण
ब्युटी पार्लर प्रशिक्षक ब्युटी पार्लर प्रशिक्षक उत्तीर्ण
चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक विषयांकित किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण
कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक – 12th Pass
इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक BA
जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक ब्युटी पार्लर प्रशिक्षक उत्तीर्ण
संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक – B.E
संगणक बेसिक CIT, TALLY , 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक BCA,MCA, BCS, MCS, MCM
शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र ) —
एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार —
प्रशिक्षण केंद्र समन्वयक – MSW/पदवीधर
प्रकल्प समन्वयक – MSW/पदवीधर
प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक साक्षर

आवश्यक कागदपत्रे –
1. पासपोर्ट साईज फोटो (PMC Recruitment 2023)
2. जन्मतारखेकरीता (वयाचा दाखला/ दहावीची टीसी / सनद / जन्म प्रमाणपत्र)
3. फोटो आयडी / रहिवाशी दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र (शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका / रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र / अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची MMC नोंदणी / नोंदणी नूतनीकरण / अनुभव प्रमाणपत्र) या अनुषंगाने इतर आवश्यक सत्य प्रत / साक्षांकित प्रती )
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : 10 वी/ ITI साठी रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत 782 जागांवर अप्रेंटिस भरती; ही संधी चुकवू नका

Job Alert (32)

करिअरनामा ऑनलाईन । इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई येथे अप्रेंटिस (Job Alert) पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदाच्या 782 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.
संस्था – इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई (इंडियन रेल्वे)
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
1) सुतार-
2) इलेक्ट्रिशियन –
3) फिटर – 113
4) मशिनिस्ट
5) चित्रकार (Job Alert)
6) वेल्डर
7) एमएलटी-रेडिओलॉजी
8) एमएलटी-पॅथॉलॉजी
9) पासा
पद संख्या – 782 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – किमान 50% गुणांसह 10वी (10+2 प्रणाली) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच संबंधित ट्रेंडमधील ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.
वय मर्यादा –  30 जून 2023 पर्यंत 15 वर्षे ते 24 वर्षे
मिळणारे वेतन – (Job Alert)
1. दरमहा 6,000/- ते 7,000/- रुपये स्टायपेंड दिले जाईल.
2. प्रशिक्षणाच्या दुसर्‍या वर्षी 10 टक्के आणि तिसर्‍या वर्षी 15 टक्के स्टायपेंड वाढवण्यात येईल.
परीक्षा फी – 100 /-रुपये (SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांना शुल्क नाही)

असा करा अर्ज –
1. सर्वप्रथम इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई अप्रेंटिसशिप भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट pb.icf.gov.in ला भेट द्यावी.
2. वेबसाईटच्या होम पेजवर (Job Alert) भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
3. यानंतर तुम्ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
निवड प्रक्रिया –
1. लेखी परीक्षा
2. मुलाखत (Job Alert)
3. दस्तऐवज सत्यापन

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – icf.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Intelligence Bureau Recruitment : गुप्तचर अधिकारी बनून देशसेवा करण्याची मोठी संधी!! महिन्याचा 81,100 पगार

Intelligence Bureau Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत विविध (Intelligence Bureau Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक) पदांच्या तब्बल  797 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 आहे.
संस्था – इंटेलिजन्स ब्युरो, भारत सरकार (Ministry of Home Affairs)
भरली जाणारी पदे –
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक)
पद संख्या – 797 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, नागपूर
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे

अर्ज फी – (Intelligence Bureau Recruitment)
UR, OBC, आणि EWS पुरुष उमेदवार – Rs. 550/-
इतर श्रेणीतील उमेदवार आणि महिला – Rs. 450/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
Engg. Diploma in ECE/ EEE/ IT/ CS, B.Sc.,Degree in Computer Applications
मिळणारे वेतन – Rs. 25,500/- ते 81,100/- रुपये दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमाने अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3.अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. (Intelligence Bureau Recruitment)
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

भरतीचा तपशील –
अनारक्षित -325 पदे
EWS -79 पदे
OBC -215 पदे
SC -119 पदे (Intelligence Bureau Recruitment)
ST -59 पदे

निवड प्रक्रिया –
1. Candidates for Intelligence Bureau Recruitment 2023 will be selected on the basis of Tier First Objective Exam, Tier Second Descriptive Exam, Local Language Test, Interview, Document Verification and Medical Exam. (Intelligence Bureau Recruitment)
2. Tier-I Written Exam (Objective)
3. Tier-II Written Exam (Descriptive)
4. Local Language Test (For SA Only)
5. Interview
6. Document Verification
7. Medical Examination

 

काही महत्वाच्या लिंक्स – (Intelligence Bureau Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
1. APPLY
2. APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/en
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MUHS Nashik Recruitment : लता मंगेशकर हॉस्पिटल अंतर्गत ‘या’ पदांवर नवीन भरती सुरु; इथे पाठवा अर्ज

MUHS Nashik Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS Nashik Recruitment) अंतर्गत एन.के.पी.साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर आणि लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वाचक आणि व्याख्याता पदांच्या एकूण 46 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
भरले जाणारे पद –
1. वाचक – 15 पदे
2. व्याख्याता – 31 पदे
पद संख्या – 46 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (MUHS Nashik Recruitment)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्ही. एस. पी. एम. अकादमी ऑफ हायर एज्युकेशनचे सचिव, एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर आणि लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर –440019

निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MUHS Nashik Recruitment)
1. वाचक – Teacher’s Eligibility Qualification for starting of Post-Graduate, Broad as well as Super- Speciality courses, an increase of seat recognition and renewal recognitions are advised to follow the regulation / Notification amended from time to time by National Medical Commission/ Medical Council of India
2. व्याख्याता – Teacher’s Eligibility Qualification for starting of Post-Graduate, Broad as well as Super- Speciality courses, an increase of seat recognition and renewal recognitions are advised to follow the regulation / Notification amended from time to time by National Medical Commission/ Medical Council of India (MUHS Nashik Recruitment)

असा करा अर्ज –
उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. (MUHS Nashik Recruitment)
प्रमाणपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह साध्या कागदावर / विहित नमुन्यावर अर्ज करायचा आहे.
अधिक माहितीसाठी कृपया विद्यापीठाच्या www.muhs.ac.in वेबसाइटला भेट द्या.
शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
MUHS Nashik Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट (University) – www.muhs.ac.in
अधिकृत वेबसाईट (College) – nkpsims.edu.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Artificial Intelligence : AI घेतंय माणसांची जागा; मे महिन्यात ‘इतक्या’ हजार लोकांनी गमावली नोकरी

Artificial Intelligence

करिअरनामा ऑनलाईन । केवळ मे महिन्यात टेक क्षेत्रातील (Artificial Intelligence) सुमारे चार हजार लोकांना एआयमुळे आपली नोकरी गमवावी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच चॅट जीपीटीचे फाऊंडर सॅम अल्टमन यांनी एआयच्या धोक्यांबाबत इशारा दिला होता. त्यांनी दिलेला हा इशारा आता खरा ठरत असल्याचं यावरुन दिसत आहे.
2022 साली नोव्हेंबर महिन्यात ओपन एआय (OpenAI) कंपनीने चॅटजीपीटी हा एआय चॅटबॉट लाँच केला होता. त्यानंतर गुगल आणि मायक्रोसॉफ्टनेही आपापले चॅटबॉट्स लाँच केले. केवळ फोटो, व्हिडिओ एडिटिंगपुरतं एआय मर्यादित न राहता, चक्क कोडिंग करणारे आणि कित्येक टेक्निकल कामे करू शकणारे एआय सॉफ्टवेअर समोर आले आहेत.

बिझनेस इन्साईडरने इतर काही संस्थांचा डेटा कलेक्ट करून याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. यावर्षीच्या मे महिन्यात जगभरातील तब्बल 80,000 लोकांना आपली नोकरी (Artificial Intelligence) गमवावी लागली. यातील 3,900 लोकांची नोकरी आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे गेली असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतर लोकांची नोकरी कॉस्ट कटिंग, मर्जर, रिस्ट्रक्चरिंग अशा कारणांमुळे गेली असल्याचं यात म्हटलं आहे.

किती जणांनी गमावली नोकरी (Artificial Intelligence)
यावर्षी जानेवारी ते मे दरम्यान जगभरात सुमारे 4 लाख लोकांना आपली नोकरी गमवावी लागली असल्याचंही या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं. मात्र, एआयमुळे एवढ्या प्रमाणात नोकरी जाण्याची ही पहिलीच वेळ होती.
AI ने घेतली माणसांची जागा
फेब्रुवारी महिन्यात सुमारे एक हजार (Artificial Intelligence) कंपन्यांचा सर्व्हे घेण्यात आला होता. यामध्ये असं दिसून आलं, की अमेरिकेतील कित्येक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या जागी चॅटजीपीटी किंवा अन्य चॅटबॉट्सना प्राधान्य देत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : UPSCसाठी सोडली मेडिकलची प्रॅक्टिस; 5 वी रॅंक मिळाली पण IAS पद नको…टॉपरने सांगितली इच्छा

UPSC Success story of Mayur Hajarika

करिअरनामा ऑनलाईन । आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील (UPSC Success Story) तेजपूर येथील रहिवासी मयूर हजारिका व्यवसायाने डॉक्टर आहे. UPSC परीक्षा पास होईपर्यंत मयूरने राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत आसाममध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले आहे. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या मयूरने लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत संपूर्ण भारतात 5 वी रॅंक मिळवून नांव उंचावलं आहे.

UPSC Success story of Mayur Hajarika

UPSCसाठी सोडली मेडिकलची प्रॅक्टिस (UPSC Success Story)
UPSC मध्ये देशात 5 वा क्रमांक मिळवणारा मयूर हजारिका शाळेत असल्यापासूनच अभ्यासात हुशार आहे. आसामच्या माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या बोर्ड परीक्षेत त्याने 10वी रँक मिळवली होती; तर 12 वी च्या परीक्षेत त्याने 9वा क्रमांक मिळवला होता. मयूरकडे एमबीबीएसची पदवी आहे. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर त्याने UPSC ची तयारी सुरु केली. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने मेडिकलचा व्यवसाय सोडला आणि संपूर्ण लक्ष अभ्यासाकडे केंद्रित केले.

UPSC Success story of Mayur Hajarika

ऑनलाईन कोचिंगच्या माध्यमातून केला अभ्यास
मयूरचे वडील कृष्णा हजारिका हे आसामच्या सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) सहाय्यक कार्यकारी अभियंता आहेत. तर त्याची आई मौसमी हजारिका (UPSC Success Story) गृहिणी आहेत. मयूरने 12वीत असताना UPSC परीक्षा देण्याचं ठरवलं होतं.  अभ्यासाच्या तयारीबद्दल बोलताना मयूरने सांगितले; “मी नागरी सेवा परीक्षेसाठी ऑनलाइन कोचिंग घेतले.”

 

UPSC Success story of Mayur Hajarika

IFS सेवेत सामील व्हायचंय (UPSC Success Story)
UPSC परीक्षेत अव्वल ठरलेल्या सर्वाधिक टॉपर्सनी IASला पहिली पसंती दिली आहे. पण दुसरीकडे मयूरचे स्वप्न वेगळे काही करण्याचे आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्याने सांगितले; की “मला या परिक्षेत एवढी चांगली रँक मिळेल अशी अपेक्षा नव्हती. मी माझ्या निकालावर पूर्ण समाधानी आहे. माझे पहिले प्राधान्य भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (IAS) नाही, मला भारतीय विदेश सेवेत (IFS) सामील व्हायचे आहे.”
मयूर हा फुटबॉल प्रेमी आहे. त्याला फावल्या वेळेत (UPSC Success Story) रुबिक्स क्यूब सोडवायला आवडते. अभ्यासातून रिकामा वेळ मिळाल्यानंतर  रुबिक्स क्यूब सोडवणे त्याला मजेदार आणि आव्हानात्मक वाटते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Employment News : राज्य सरकारचा ‘बजाज फीनसर्व्ह’ सोबत करार; पुण्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक; हजारो तरुणांना रोजगाराची संधी

Employment News (4)

करिअरनामा ऑनलाईन । आर्थिक मंदी, जागतिक मंदिचे (Employment News) जगभर वारे वाहत असताना तरुण वर्ग नोकरीच्या चिंतेने ग्रासला आहे. रोजगाराची वाट पाहणाऱ्या सर्व बेरोजगार तरुणांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगली बातमी दिली आहे. पुण्यात पाच हजार कोटींचा गुंतवणूक प्रकल्प येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. राज्यात पुणे फायनान्स हब होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, पुणे शहरात मोठे गुंतवणूक प्रकल्प येत आहेत. बजाज फिनसर्व कंपनी राज्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुणे येथे होणार आहे. यामुळे40 हजार जणांना रोजगार मिळणार आहे. अलीकडच्या काळातील राज्यात झालेली ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कर्ज सुविधा देण्याबरोबरच वित्तीय व्यवहार करणाऱ्या कंपन्यांमध्ये देशात आघाडीच्या समजल्या जाणाऱ्या ‘बजाज फिनसर्व्ह’ कंपनीने पुण्यात पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याबाबत राज्य सरकारशी ‘बजाज फिनसर्व्ह’ कंपनीने करार केला असून, मुंढवा येथे 19 एकर जागेत कंपनीच्या मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रात सेवाप्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्यास मदत होणार आहे.

यासंदर्भात राज्य सरकार आणि बजाज फिनसर्व्ह यांच्यामध्ये शनिवारी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि बजाज (Employment News) फिनसर्व्ह कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. श्रीनिवासन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बजाज फिनसर्व्ह कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यावेळी उपस्थित होते. या करारामुळे रोजगार निर्मितीबरोबर पुण्याच्या विकासात भर पडणार आहे; तसेच अन्य कंपन्यांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आयटी धोरणानुसार, फिनटेक कंपन्यांना सहकार्य केले जाणार आहे.

मुंढव्यात 19एकरमध्ये सकरणार प्रकल्प (Employment News)
राज्य सरकारने माहिती तंत्रज्ञान सुविधेबाबतचे (आयटी) धोरण जाहीर केले आहे. त्यानंतर आता पुण्यातील परिसरांमध्ये मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्याचे या करारावरून समोर आल्याचे बोलले जात आहे.
बजाज फिनसर्व्ह कंपनीमार्फत देण्यात येणाऱ्या कर्जासह विविध प्रकारच्या विम्याची प्रक्रिया ही मुंढव्यातून केली जाणार आहे. त्या सेवेत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. आयटी क्षेत्राशी निगडित दहा हजार नोकरदार; तसेच अन्य सेवा देणारे दहा हजार अशा सुमारे 20 हजार तरुणांना पुढील पाच वर्षांत रोजगार मिळण्याची संधी आहे. तंत्रज्ञानावर आधारित, कमी वेळेत कर्ज सुविधा देणारी कंपनी म्हणून नावारूपाला आलेल्या या कंपनीचा आयटीचा बॅकअप, सर्व्हर्स मुंढव्यातील इमारतीत ठेवण्यात येणार आहेत. कर्ज सुविधेबाबतची सर्व प्रक्रिया ही आता एकाच ठिकाणाहून चालविली जाणार आहे. बजाज फिनसर्व्ह कंपनीमार्फत लवकरच म्युच्युअल फंडही सुरू होणार आहे, त्याचे कार्यालयही मुंढव्यात असणार आहे. बजाज कंपनीच्या मालकीच्या 19 एकर जागेत ही कंपनी उभी राहणार आहे.

सरकारकडून अशी होणार मदत
1. आयटी धोरणानुसार राज्य सरकार बजाज फिनसर्व्ह कंपनीला बांधकाम परवानग्या मिळवून देणार.
2. तीन टॉवर इमारतीसाठी अतिरिक्त प्रीमिअम शुल्कात 50 टक्के सवलत.
3. पाच एफएसआय मिळणार. (Employment News)
4. पर्यावरण विभागाची परवानगी मिळवून देणार.
5. इमारतीच्या काही प्रमाणात व्यावसायिक वापरास परवानगी.
6. औद्योगिक दराने वीज दरआकारणी.

या प्रकल्पाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले; “आर्थिक सेवा क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्व्ह यांच्यात सुमारे पाच हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा करार, ‘बजाज फिनसर्व्ह’चे अध्यक्ष (Employment News) संजीव बजाज यांच्या उपस्थितीत झाला. या गुंतवणुकीमुळे चाळीस हजार तरुणांना रोजगारनिर्मिती होऊन यामुळे ‘आर्थिक सेवा हब’होण्यासाठी पुण्याला मोठी चालना मिळणार आहे. प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसाठी सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन मी दिले आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIT Pune Recruitment 2023 : पुण्यात सरकारी नोकरी; आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये होणार नवीन उमेदवारांची निवड

AIT Pune Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे (AIT Pune Recruitment 2023) येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, उद्योगातील सहायक प्राध्यापक/संसाधन व्यक्ती, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालयीन अधीक्षक, शिपाई, कनिष्ठ लिपिक, वॉर्डन गर्ल्स हॉस्टेल, एक्सचेंज पर्यवेक्षक, ड्रायव्हर, NCC Trg प्रशिक्षक, प्रकल्प अभियंता, कार्यशाळा प्रशिक्षक, लेडी गार्डनर्स या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2023 आहे.
संस्था – आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे
भरली जाणारी पदे – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, उद्योगातील सहायक प्राध्यापक/संसाधन व्यक्ती, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालयीन अधीक्षक, शिपाई, कनिष्ठ लिपिक, वॉर्डन गर्ल्स हॉस्टेल, एक्सचेंज पर्यवेक्षक, ड्रायव्हर, NCC Trg प्रशिक्षक, प्रकल्प अभियंता, कार्यशाळा प्रशिक्षक, लेडी गार्डनर्स
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे-411015
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (AIT Pune Recruitment 2023)
1. प्राध्यापक – Ph.D. Degree in relevant field / Bachelor and Masters Degree in relevant branch
2. सहयोगी प्राध्यापक – B.E / B.Tech / B.sc and M.E / M.Tech / M.sc Or Ph.D. Degree in relevant field
3. सहाय्यक प्राध्यापक – B.E / B.Tech / B.sc and M.E / M.Tech / M.sc
4. उद्योगातील सहायक प्राध्यापक/संसाधन व्यक्ती – Post Graduate Or Ph.D. Degree
5. प्रयोगशाळा सहाय्यक – Diploma in the appropriate discipline within 2 years of experience
6. कार्यालयीन अधीक्षक – Preferably a Retired Army Person with Experience Of least Seven years of administration
7. शिपाई – 12th Pass (AIT Pune Recruitment 2023)

8. कनिष्ठ लिपिक – Graduate in any field / English Typing / Good working knowledge of computer application
9. वॉर्डन गर्ल्स हॉस्टेल – Graduate in any field
10. एक्सचेंज पर्यवेक्षक – Preferably a Retired Army Person with Experience in a similar field
11. ड्रायव्हर – Preferably a Retired Army Person with Experience in a similar field with an HMV license (AIT Pune Recruitment 2023)
12. NCC Trg प्रशिक्षक – Preferably a Retired Army Person with Experience in a similar field
13. प्रकल्प अभियंता – Engineering Graduate and experience in a similar field
14. कार्यशाळा प्रशिक्षक – ITI & NCTVT with Adequate experience
15. लेडी गार्डनर्स – Experience in a similar field

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. (AIT Pune Recruitment 2023)
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (For non- teaching posts)
अर्जाचा नमुना – Form (For non- teaching posts)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (For teaching post)
अर्जाचा नमुना – Form (For teaching post)
अधिकृत वेबसाईट – www.aitpune.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC Results 2023 : कमी मार्क मिळालेत असं वाटतंय? असा करा पेपर रीचेकिंगसाठी अर्ज; इथे आहे संपूर्ण प्रक्रिया

SSC Results 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल नुकताच (SSC Results 2023) जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना जर का रीचेकिंग करायचे असेल तर ते यासाठी अर्ज करू शकतात. दि. 3 जून ते 12 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना रीचेकिंगसाठी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणीसाठी, उत्तरपत्रिका प्रत मिळवण्यासाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाची अधिकृत वेबसाईटverification.mh-ssc.ac.in वर अर्ज करावा लागणार आहे. याबाबतची सगळी माहिती, अटी शर्ती आणि सुचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरुपानेच पैसे भरावे लागणार असून विद्यार्थ्यांना नेट बँकिंगद्वारे देखील पैसे भरता येतील.

या स्टेप्स करा फॉलो – (SSC Results 2023)
1.
पेपरच्या गुणपडताळणीसाठी शनिवार दि. 3 जून ते सोमवार दि. 12 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रु.50/- शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागतील.
2. मार्च 2023 च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स कॉपी मागणीसाठी ई-मेलद्वारे/संकेतस्थळावरुन स्वत: जाऊन घेणे आणि पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल आणि त्यांनी मागणी केलेल्या पद्धतीने झेरॉक्स कॉपी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. झेरॉक्स कॉपीसाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क भरावे लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (SSC Results 2023)
3. पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना सुरुवातीला उत्तरपत्रिकेची झेरॉक्स कॉपी घेणे गरजेचे आहे. त्यानंतर झेरॉक्स कॉपी मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या प्रती विषय 300 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे राहणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल आणि त्या अनुषंगिक येणारे प्रश्न यावर मार्गदर्शन करण्यासाठी मंडळामार्फत समुपदेशक नेमण्यात आले आहेत. ही सुविधा ऑनलाईन निकालाच्या दिवसापासून पुढे आठ दिवस सुरु राहणार असल्याचं शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे.
अधिकृत वेबसाईट – verification.mh-ssc.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com