Employment News : राज्य सरकारचा ‘बजाज फीनसर्व्ह’ सोबत करार; पुण्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक; हजारो तरुणांना रोजगाराची संधी

करिअरनामा ऑनलाईन । आर्थिक मंदी, जागतिक मंदिचे (Employment News) जगभर वारे वाहत असताना तरुण वर्ग नोकरीच्या चिंतेने ग्रासला आहे. रोजगाराची वाट पाहणाऱ्या सर्व बेरोजगार तरुणांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगली बातमी दिली आहे. पुण्यात पाच हजार कोटींचा गुंतवणूक प्रकल्प येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. राज्यात पुणे फायनान्स हब होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, पुणे शहरात मोठे गुंतवणूक प्रकल्प येत आहेत. बजाज फिनसर्व कंपनी राज्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुणे येथे होणार आहे. यामुळे40 हजार जणांना रोजगार मिळणार आहे. अलीकडच्या काळातील राज्यात झालेली ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कर्ज सुविधा देण्याबरोबरच वित्तीय व्यवहार करणाऱ्या कंपन्यांमध्ये देशात आघाडीच्या समजल्या जाणाऱ्या ‘बजाज फिनसर्व्ह’ कंपनीने पुण्यात पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याबाबत राज्य सरकारशी ‘बजाज फिनसर्व्ह’ कंपनीने करार केला असून, मुंढवा येथे 19 एकर जागेत कंपनीच्या मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रात सेवाप्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्यास मदत होणार आहे.

यासंदर्भात राज्य सरकार आणि बजाज फिनसर्व्ह यांच्यामध्ये शनिवारी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि बजाज (Employment News) फिनसर्व्ह कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. श्रीनिवासन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बजाज फिनसर्व्ह कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यावेळी उपस्थित होते. या करारामुळे रोजगार निर्मितीबरोबर पुण्याच्या विकासात भर पडणार आहे; तसेच अन्य कंपन्यांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आयटी धोरणानुसार, फिनटेक कंपन्यांना सहकार्य केले जाणार आहे.

मुंढव्यात 19एकरमध्ये सकरणार प्रकल्प (Employment News)
राज्य सरकारने माहिती तंत्रज्ञान सुविधेबाबतचे (आयटी) धोरण जाहीर केले आहे. त्यानंतर आता पुण्यातील परिसरांमध्ये मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्याचे या करारावरून समोर आल्याचे बोलले जात आहे.
बजाज फिनसर्व्ह कंपनीमार्फत देण्यात येणाऱ्या कर्जासह विविध प्रकारच्या विम्याची प्रक्रिया ही मुंढव्यातून केली जाणार आहे. त्या सेवेत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. आयटी क्षेत्राशी निगडित दहा हजार नोकरदार; तसेच अन्य सेवा देणारे दहा हजार अशा सुमारे 20 हजार तरुणांना पुढील पाच वर्षांत रोजगार मिळण्याची संधी आहे. तंत्रज्ञानावर आधारित, कमी वेळेत कर्ज सुविधा देणारी कंपनी म्हणून नावारूपाला आलेल्या या कंपनीचा आयटीचा बॅकअप, सर्व्हर्स मुंढव्यातील इमारतीत ठेवण्यात येणार आहेत. कर्ज सुविधेबाबतची सर्व प्रक्रिया ही आता एकाच ठिकाणाहून चालविली जाणार आहे. बजाज फिनसर्व्ह कंपनीमार्फत लवकरच म्युच्युअल फंडही सुरू होणार आहे, त्याचे कार्यालयही मुंढव्यात असणार आहे. बजाज कंपनीच्या मालकीच्या 19 एकर जागेत ही कंपनी उभी राहणार आहे.

सरकारकडून अशी होणार मदत
1. आयटी धोरणानुसार राज्य सरकार बजाज फिनसर्व्ह कंपनीला बांधकाम परवानग्या मिळवून देणार.
2. तीन टॉवर इमारतीसाठी अतिरिक्त प्रीमिअम शुल्कात 50 टक्के सवलत.
3. पाच एफएसआय मिळणार. (Employment News)
4. पर्यावरण विभागाची परवानगी मिळवून देणार.
5. इमारतीच्या काही प्रमाणात व्यावसायिक वापरास परवानगी.
6. औद्योगिक दराने वीज दरआकारणी.

या प्रकल्पाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले; “आर्थिक सेवा क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्व्ह यांच्यात सुमारे पाच हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा करार, ‘बजाज फिनसर्व्ह’चे अध्यक्ष (Employment News) संजीव बजाज यांच्या उपस्थितीत झाला. या गुंतवणुकीमुळे चाळीस हजार तरुणांना रोजगारनिर्मिती होऊन यामुळे ‘आर्थिक सेवा हब’होण्यासाठी पुण्याला मोठी चालना मिळणार आहे. प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसाठी सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन मी दिले आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com