Home Blog Page 296

NFDC Recruitment 2023 : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये ‘ही’ पदे रिक्त; पात्रता 10 वी पास ते जर्नलिझम 

NFDC Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उत्सव समन्वयक, रोजंदारी कामगार पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे.

संस्था – नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – (NFDC Recruitment 2023)
1. उत्सव समन्वयक
2. रोजंदारी कामगार
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जून 2023

वय मर्यादा – उत्सव समन्वयक – 40 वर्षे
अर्ज करण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (पी अँड ए), नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., 5वा मजला, एनएमआयसी बिल्डिंग, एनएफडीसी – एफडी कॉम्प्लेक्स, 24, पेडर रोड, कुंबला हिल, मुंबई – 400 026
E-Mail ID – [email protected]
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. उत्सव समन्वयक – Graduate degree preferably in Journalism/Media & Entertainment/Mass Communication/Film Study from a recognized Institute/University or Graduate Degree in any discipline. (NFDC Recruitment 2023)
2. रोजंदारी कामगार – 10th Pass

मिळणारे वेतन –
1. उत्सव समन्वयक – Rs. 55,000/- दरमहा
2. रोजंदारी कामगार As per Delhi Court Order dated 14th October 2022.
आवश्यक कागदपत्रे –
1. जन्मतारखेचा पुरावा म्हणून मॅट्रिक/माध्यमिक प्रमाणपत्र
2. पात्रतेच्या समर्थनार्थ गुणपत्रिका/पदवी प्रमाणपत्रांचा संपूर्ण संच
3. प्रत्येक पदासाठी (NFDC Recruitment 2023) वेतनश्रेणीसह पूर्ण अनुभवाचा पुरावा
4. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
5. अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि
6. पे-इन-स्लिप (लागू सल्यास)

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
पात्रतेचे निकष – (NFDC Recruitment 2023)

NFDC Mumbai Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (NFDC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अर्जाचा नमुना Download करण्यासाठी येथे CLICK करा – CLICK
अधिकृत वेबसाईट – www.nfdcindia.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : विना परीक्षा थेट द्या मुलाखत!! कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

Job Notification (58)

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत (Job Notification) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तात्पुरते सहाय्यक प्राध्यापक, तात्पुरते सहयोगी प्राध्यापक, तात्पुरते साथीदार (कंठसंगीत साथीदार, तबला साथीदार, हार्मोनियम साथीदार, नाट्यशास्त्र साथीदार, पी. एल. सी. साथीदार, कथ्थक साथीदार, भरतनाट्यम साथीदार, टेक्निशियन (संगीत व नाट्यशास्त्र)), तात्पुरते समन्वयक पदाच्या एकूण 175 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2023 आहे.

संस्था – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
भरली जाणारी पदे – (Job Notification)
1. तात्पुरते सहाय्यक प्राध्यापक – 149 पदे
2. तात्पुरते सहयोगी प्राध्यापक – 10 पदे
3. कं ठसंगीत साथीदार – 01 पद
4. तबला साथीदार – 02 पदे
5. हार्मोनियम साथीदार – 02 पदे
6. नाट्यशास्त्र साथीदार – 02 पदे (Job Notification)
7. पी. एल. सी. साथीदार – 01 पद
8. कथ्थक साथीदार – 01 पद
9. भरतनाट्यम साथीदार – 01 पद
10. टेक्निशियन (संगीत व नाट्यशास्त्र) – 02 पदे
11. तात्पुरते समन्वयक 04 पदे
पद संख्या – 175 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. तात्पुरते सहाय्यक प्राध्यापक – A Master‘s degree with 55% marks (or an equivalent grade in a point scale wherever the grading system is
followed) in a concerned/relevant/allied subject from an Indian University or an equivalent degree from an
accredited foreign university (Read PDF for complete details)
2. तात्पुरते सहयोगी प्राध्यापक i) A good academic record, with a Ph.D. Degree in the concerned/allied/relevant disciplines;
ii) A Master‘s Degree with at least 55% marks (or an equivalent grade on a point scale, wherever the grading (Job Notification)
the system is followed); and (Read PDF for complete details)
3. कंठसंगीत साथीदार – M.A./ M.P.A./ Alankar Purna/ Ph.D. / Five years of experience
तबला साथीदार Music expert and five years of experience in music accompaniment to renowned artistes
4. हार्मोनियम साथीदार – Music expert and five years of experience in music accompaniment to renowned artistes

5. नाट्यशास्त्र साथीदार – M.P.A./ Five years of experience
6. पी. एल. सी. साथीदार – Graduation/Five years of experience
7. कथ्थक साथीदार – Kathak Diploma or Visharad
8. भरतनाट्यम साथीदार – Bharatnatyam Diploma or Visarad
9. टेक्निशियन (संगीत व नाट्यशास्त्र) – A) Theater Technician Specialization with 5 years, Experience in Camera, Light, and Sound, Knowledge for the Theater Department of a musical instrument is essential. (Job Notification)
b) For Music Department: Minimum 12th pass,
Knowledge of musical instruments, and sound system operation is required.
10. तात्पुरते समन्वयक – A Master‘s degree with 55% marks (or an equivalent grade in a point scale wherever the grading system is followed) in a concerned/relevant/allied subject from an Indian University, or an equivalent degree from an accredited foreign university. (Read PDF for complete details)

मिळणारे वेतन – (Job Notification)
1. तात्पुरते सहाय्यक प्राध्यापक Rs. 32,000/- to Rs. 40,000/- p. m. consolidated.
2. तात्पुरते सहयोगी प्राध्यापक Rs. 35,000/- p.m. consolidated
3. कंठसंगीत साथीदार Rs. 12,000/- p.m. consolidated
4. तबला साथीदार Rs. 12,000/- p.m. consolidated
5. हार्मोनियम साथीदार Rs. 12,000/- p.m. consolidated
6. नाट्यशास्त्र (Job Notification) साथीदार Rs. 12,000/- p.m. consolidated
7. पी. एल. सी. साथीदार Rs. 12,000/- p.m. consolidated
8. कथ्थक साथीदार Rs. 12,000/- p.m. consolidated
9. भरतनाट्यम साथीदार Rs. 12,000/- p.m. consolidated
10. टेक्निशियन (संगीत व नाट्यशास्त्र) Rs. 12,000/- p.m. consolidated
11. तात्पुरते समन्वयक Rs. 32,000/- p.m. consolidated

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
PDF जाहिरात I

PDF जाहिरात II
PDF जाहिरात III
PDF जाहिरात IV
PDF जाहिरात V
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : ऐकू येत नव्हतं पण ध्येय ठरलं होतं; नाशिकचा आशिष NEETमध्ये देशात ठरला अव्वल; असा केला अभ्यास

Success Story of Ashish Bharadia

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी घेतल्या (Success Story) जाणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या NEET परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकचा आशिष भराडीया हा विद्यार्थी दिव्यांगामध्ये देशात प्रथम आला आहे. तर जनरल कॅटेगिरीमध्ये देशात त्याचा 722 वा रँक आला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे नाशिकसह जिल्हाभरात त्याचे कौतुक होत आहे.
नीट परीक्षेला यावर्षी देशभरातून 21 लाख विद्यार्थी बसले होते. देशातील 499 शहरांमध्ये व परदेशातील 14 शहरांमध्ये ही परिक्षा पार पडली. एकूण 13 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.

डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा (Success Story)
मे महिन्यात घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून या परीक्षेत आशिष भराडीया हा विद्यार्थी अपंगांमध्ये देशात प्रथम आला. आशिष हा नाशिक येथील सुप्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद भराडीया आणि डॉ. वैशाली भराडीया यांचा मुलगा आहे.

दिव्यांगावर केली मात
नीट परीक्षेला यावर्षी देशभरातून 21 लाख विद्यार्थी बसले होते. देशातील 499 शहरांमध्ये व परदेशातील 14 शहरांमध्ये ही परिक्षा घेण्यात आली. यासाठी आशिष देखील दिव्यांग कॅटेगीरीतुन परीक्षेला बसलेला होता. तो या परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेत होता. जिद्दीच्या जोरावर त्याने हे दैदिप्यमान (Success Story) यश मिळवले आहे. आशिष भराडीया लहान असल्यापासून त्याला ऐकण्यास येत नव्हते; त्यामुळे त्याच्या कानावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्याने आपल्या अभ्यासात सातत्य ठेवत, दिव्यांगावर मात करत देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.

दोघा भावांची परिक्षेत आघाडी
आशिषचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या फ्रावशी इंटरनॅशनल स्कुलमध्ये झाले आहे. बारावीच्या परीक्षेत त्याला 85 टक्के गुण मिळाले आहेत. तर नीट परीक्षेत (Success Story) त्याला 720 पैकी 690 गुण मिळाले आहेत. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे आशिषचा भाऊ विश्वेश भराडीया यानेही यापूर्वी अशाच प्रवेश परीक्षेत मोठं यश मिळवत देशात 51 वा क्रमांक पटकावला होता. सध्या तो दिल्लीतील एम्सममध्ये कार्यरत आहेत.

दररोज आठ तास अभ्यास (Success Story)
दरवर्षी देशभरातून NEET परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात. त्यासाठी प्रचंड मेहनत देखील विद्यार्थ्यांकडून घेतली जाते. आशिषने देखील नीट परिक्षेच्या तयारीसाठी प्रचंड मेहनत घेतली. आशिषने खासगी क्लासही लावला होता. तो दररोज किमान आठ तास अभ्यास करत असायचा. अभ्यासातील सातत्यामुळे त्याला हे यश मिळाल्याचे तो सांगतो.
देशभरातून 2038596 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातील 1145976 विद्यार्थी हे पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे सर्वाधिक 1,39,961 विद्यार्थी परीक्षेच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Degree Admission 2023 : B.A., B.SC. ची डिग्री आता 4 वर्षांत मिळणार; ‘या’ विद्यापीठांमध्ये सुरू होणार अभ्यासक्रम

Degree Admission 2023

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (Degree Admission 2023) नवीन धोरणानुसार देशातील 19 केंद्रीय विद्यापीठांसह एकूण 105 विद्यापीठे येत्या शैक्षणिक सत्रापासून 4 वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम सुरु करणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत यूजी कोर्स पॅटर्नमध्ये हा बदल करण्यात आला आहे. याआधीही UGC ने NEP 2020 अंतर्गत अनेक बदल जाहीर केले आहेत.

या विद्यापीठांचा समावेश (Degree Admission 2023)
चार वर्षांच्या यूजी अभ्यासक्रमांसाठी निवडणाऱ्या केंद्रीय विद्यापीठांमध्ये दिल्ली विद्यापीठ, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, विश्व भारती विद्यापीठ, आसाम विद्यापीठ, तेजपूर विद्यापीठ, जम्मू केंद्रीय विद्यापीठ, सिक्कीम विद्यापीठ, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ आणि मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ यांचा समावेश आहे.
तसेच श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, इंग्रजी (Degree Admission 2023) आणि परदेशी भाषा विद्यापीठ, हेमवती नंदन बहुगुणा, गढवाल विद्यापीठ, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, राजीव गांधी विद्यापीठ आणि हरियाणा, दक्षिण बिहार आणि तामिळनाडूची केंद्रीय विद्यापीठे देखील या यादीत आहेत. इतर विद्यापीठांमध्ये 40 पेक्षा जास्त डीम्ड-टू-बी विद्यापीठे, 18 राज्य खाजगी विद्यापीठे आणि 22 राज्य विद्यापीठे समाविष्ट आहेत.

NEP 2020 ने शिफारस केली होती की अंडरग्रॅज्युएट पदवी ही एकतर तीन किंवा चार वर्षांच्या कालावधीची असावी. तसेच या कालावधीत UG डिप्लोमा त्यानंतर दोन वर्षांचा अभ्यास (Degree Admission 2023) किंवा बॅचलर पदवी त्यानंतर तीन वर्षांचा कार्यक्रम असावा. NEP 2020 अंतर्गत, UGC ने UG आणि PG अभ्यासक्रमांमध्ये बरेच बदल केले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाकडूनही पतपुरवठा प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत, आवश्यक क्रेडिट्स मिळाल्यावर, विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपूर्वीच पदवी मिळू शकते.
DU आणि BHUने UG अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. CUET UG परीक्षेला बसलेले विद्यार्थी संबंधित विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवरून नोंदणी करू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NEET Latur Pattern : लातूर पॅटर्नचा पुन्हा बोलबाला!! ‘NEET’मध्ये 1200 हून जास्त विद्यार्थ्यांना 500 पेक्षा जास्त मार्क्स; एक जिल्हा अन् तयार होणार दोन-अडीच हजार डॉक्टर

NEET Latur Pattern (1)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक वर्षापासून 10वी आणि 12वीच्या (NEET Latur Pattern) परीक्षेचा लातूर पॅटर्न राज्यभरात गाजतोय, त्याच्या जोडीला आता ‘NEET’चाही लातूर पॅटर्न चर्चेत आला आहे. लातूर या एकाच जिल्ह्यातून तब्बल दोन-अडीच हजार मुलं आता डॉक्टर होण्याच्या मार्गावर आहेत. नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. त्यामुळे नीटमध्येही आता ‘लातूर पॅटर्न’चा बोलबाला झाला आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमात पूर्व परीक्षांचा निकाल कोरोना काळानंतर काही प्रमाणात मंदावला होता. मात्र यावर्षी निकालाने सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. यावर्षी नीट परीक्षेत दोन हजार पेक्षा जास्त मुले ही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतील, तेवढ्या गुणांची त्यांनी कमाई केली आहे.

एकाच शहरातील हाताच्या बोटावर मोजता येथील एवढ्या कॉलेजमधून थोडी थोडकी नव्हे तर चक्क 1200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा जास्त गुण घेत नीट परीक्षेत यश (NEET Latur Pattern) मिळवले आहे. एकूण 720 गुणांपैकी 700 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही चार इतकी आहे. तर 650 पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 55 पेक्षा अधिक आहे. 600 गुण घेणारे 223 पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. या आकडेवारीत अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे.

नीटच्या 6400 जागांसाठीचा निकाल हा मंगळवारी रात्री लागला आहे. त्यामध्ये एकट्या लातूर जिल्ह्यातून 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याचं स्पष्ट आहे. या परीक्षेचा निकाल (NEET Latur Pattern) अद्याप अपडेट केला जात आहे. त्यामुळे या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एकाच शहरातील या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने प्रवेश घेण्यासाठी पात्र होण्याचा विक्रम रचला आहे.

लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली असून त्यामध्ये 500 ते सातशे गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 431 इतकी आहे.
1. 500 गुण पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या – 431
2. 550 गुण पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या – 260
3. 600 गुण पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या – 119
4. 650 गुण पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या – 35
5. 700 गुण पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या – 01

कोचिंग क्लासलाही भरघोस यश (NEET Latur Pattern)
राजर्षी शाहू महाविद्यालयातील 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळेल असा विश्वास सीईटी सेलचे संचालक दिलीप देशमुख यांनी व्यक्त केला आहे. कोविड काळानंतर लागलेला हा विक्रमी निकाल आहे. 2018 साली जे भरघोस यश मिळालं होतं त्यानंतरचा हा सर्वोत्कृष्ट निकाल आहे. एकट्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचाच नव्हे तर लातूर मधील अनेक महाविद्यालय त्याचबरोबर (NEET Latur Pattern) इथल्या कोचिंग क्लासेस यांनाही यावर्षी भरघोस यश मिळालं आहे. लातूर पॅटर्नचा दबदबा पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे. यासाठी इथले प्रत्येक महाविद्यालय, इथले शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि वेगवेगळ्या पद्धतीने काम करणारे क्लास स्टाफ यांनी जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीचे हे फळ आहे; असं मत दिलीप देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.

लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय आणि रिलायन्स लातूर पॅटर्न सारख्या महाविद्यालयाने घवघवीत यश मिळवलं आहे. तसेच लातूर शहरामधील (NEET Latur Pattern) खासगी कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्तीर्ण झाले आहेत. निकाल जाहीर झाल्यापासून येथे ठिकठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक जल्लोष साजरा करताना दिसत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Gramsevak : राज्यातील ग्रामसेवकांच्या मानधनात मोठी वाढ!! सरकारने ‘इतके’ रुपये वाढवले

Gramsevak

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत (Gramsevak) आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या कॅबिनेट मीटिंगमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठकीमधून कंत्राटी ग्रामसेवकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. कंत्राटी ग्रामसेवकांचं मानधन थेट 10,000 रुपयांनी वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे ग्रामसेवकांसाठी हा मोठा दिलासाच म्हणावा लागेल.
तसंच कॅबिनेटच्या या बैठकीमध्ये इतरही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना दिलासा देणारे काही निर्णय या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासह 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीही वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार लातूर इथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार (Gramsevak) असल्याचा निर्णय मंजूर करण्यात आला आहे. पुणे इथे चार अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयं स्थापन करणार असल्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढवली जाणार आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार असून 1500 कोटींची मदत देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : ‘इतक्या’ हजार तरुणांना मिळाली सरकारी नोकरी; पंतप्रधान मोदींनी दिले नियुक्ती पत्र

Government Jobs (46)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारने देशातील तरुणांना रोजगार (Government Jobs) देण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे. देशातील विविध राज्यातील अनेक तरुणांच्या सरकारी नोकरीचे स्वप्न यामुळे पूर्ण झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार तरुणांना नियुक्ती पत्र दिले आहे. त्यासाठी देशभरात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार 126 तरुणांना नियुक्ती पत्र दिले. या तरुणांना सरकारच्या विविध विभागात नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार दि. 13 जून रोजी  सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे हे नियुक्ती पत्र दिले आहे.

43 ठिकाणी रोजगार मेळावा
देशात आज एकाचवेळी 43 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. रोजगार मेळावा हे केंद्र सरकारचं महत्वपूर्ण पाऊल आहे. या माध्यमातून तरुणांना (Government Jobs) त्वरीत आणि कोणत्याही चिंतेशिवाय तात्काळ नियुक्ती पत्र देण्यात येते. केंद्र सरकारला आशा आहे की, हे मेळावे रोजगार देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावतील. तसेच यामाध्यमातून देशाचा सर्वांगीण विकास करण्यात तरुणांचा मोठा हातभार लागेल.

‘या’ विभागात नोकरी (Government Jobs)
केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील अनेक विभागात या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्ती पत्रांचं वाटप करण्यात आलं. वित्तीय सेवा, टपाल खाते, शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण विभाग, महसूल विभाग, समाज कल्याण, अणू ऊर्जा विभाग, रेल्वे विभाग, लेखा परीक्षा आणि लेखा विभाग, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय विभागात कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
रोजगार मेळाव्या अंतर्गत आतापर्यंत 10 लाख (Government Jobs) तरुणांना रोजगार देण्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. या सर्व तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तर SSC, UPSC आणि Railway अंतर्गत आतापर्यंत 8 लाख 82 हजार तरुणांना नोकरी देण्यात आली आहे.

मोठ-मोठ्या कंपन्यांची भारतात गुंतवणूक (Government Jobs)
जागतिक मंदीच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्था गतिमान आहे. देशात गुंतवणुक कऱ्यासाठी मोठ-मोठ्या कंपन्या येत आहेत. येत्या काळात भारतात मोठ्या प्रमाणावर (Government Jobs) रोजगार निर्मिती होईल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ITBP Recruitment 2023 : 10 वी पाससाठी खुषखबर!! इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात 458 पदांवर भरती

ITBP Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (ITBP Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांच्या एकूण 458 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक 27 जून 2023 पासून सुरु होईल, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 आहे.

संस्था – इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल (ITBP)
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)
पद संख्या – 458 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्जाची लिंक सुरु होण्याची तारीख – 27 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज फी – Rs. 100/-
वय मर्यादा – 21 ते 27 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ITBP Recruitment 2023)
1. Matriculation or 10th pass from a recognized Board or Institution or equivalent;
2. Must possess a valid Heavy Vehicle Driving License.
मिळणारे वेतन – Rs. 21,700/- ते 69,100/- (Level- 3) दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेली ऑनलाइन लिंक वापरु शकतात.
3. कोणताही ऑफलाईन (ITBP Recruitment 2023) अर्ज स्वीकारला जाणार नाही.
4. पदाच्या आवश्यकतेनुसार सर्व आवश्यक तपशील ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये नमूद करायचे आहेत.
भरतीचा तपशील –

निवड प्रक्रिया – (ITBP Recruitment 2023)
The selection process will consist of following Stages:
1. Physical Efficiency Test (PET)
2. Physical Standard Test (PST)
3. Written Test (ITBP Recruitment 2023)
4. Practical Examination
5. Detailed Medical Examination (DME)/ Review Medical Examination (RME).

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – recruitment.itbpolice.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AI Courses : मायक्रोसॉफ्टचं मोठं सरप्राईज!! आणले आहेत आर्टीफिशियल इंटेलिजंसमध्ये फ्री कोर्सेस

AI Courses

करिअरनामा ऑनलाईन । AI तंत्रज्ञान सध्या करिअरची नवी (AI Courses) संधी म्हणून उदयास येत आहे. म्हणूनच मायक्रोसॉफ्टकडून नवे AI कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींना नोकरीसाठी कौशल्य आणि कलात्मक गुणांची गरज आहे त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टने नवे AI कोर्सेस सुरू केले आहेत. हा कोर्स 12 आठवड्यांचा असेल. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. विद्यार्थी तसेच नवोदित तरुण सर्वांनाच या तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे.

असे आहेत मायक्रोसॉफ्टचे कोर्सेस (AI Courses)
मायक्रोसॉफ्टने 12 आठड्यांसाठी 24 वेगवेगळ्या विषयांचा अभ्यासक्रम सुरु केला आहे.
हे कोर्सेस मोफत आहेत.
विविध AI संकल्पनांना परिचय करून देण्यासाठी मदत होणार आहे.
AI आणि मशीन लर्निंग यातला फरक, त्यांचा उपयोग यासारख्या अभ्यासक्रमांचा कोर्सेसमध्ये समावेश.
AI क्षेत्रातील (AI Courses) अभ्यासक्रमांविषयी देखील प्रशिक्षण देणार.
जनरेटिव्ह AI समजून घेण्यासाठी आणि त्याचा वापर कसा करावा, हे समजून घेण्यासाठी या कोर्सेसची सुरूवात करण्यात आली आहे.
या कोर्सेसची माहिती मायक्रोसॉफ्ट क्लाउडवरुन घेता येईल. सध्या अनेक अभ्यासक्रमांमध्ये डेटा सायन्स, मशीन लर्गिंग, AI आणि अॅनालिटीक्स विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MBBS Education : आता MBBS कोर्स 9 वर्षात पूर्ण करावा लागणार; जाणून घ्या काय आहेत कोर्सचे नवे नियम

MBBS Education (1)

करिअरनामा ऑनलाईन । NEET-UG गुणवत्ता यादीच्या (MBBS Education) आधारे, देशातील सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक समुपदेशन केले जाईल. अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की; कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्याला प्रथम वर्ष (MBBS) साठी चारपेक्षा जास्त प्रयत्न करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आता प्रवेशाच्या तारखेपासून नऊ वर्षांच्या आत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे, तर त्यांना प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी (MBBS Education) फक्त चार प्रयत्न मिळतील. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) NEET चा निकाल जाहीर होण्यापूर्वी वैद्यकीय अभ्यासाशी संबंधित नवीन नियम जारी केले आहेत.

अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 9 वर्षाचा कालावधी 
ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन 2023 म्हणजेच GMER-23 नुसार, NEET-UG मेरिट लिस्टच्या आधारे देशातील सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक सामाईक समुपदेशन असेल. 2 जून रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, महापालिकेने म्हटले (MBBS Education) आहे की कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही विद्यार्थ्याला अभ्यासक्रमात प्रवेश मिळाल्याच्या तारखेपासून नऊ वर्षांनंतर प्रथम वर्ष (एमबीबीएस) आणि पदवीधर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी चारपेक्षा जास्त प्रयत्न करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

इंटर्नशिप पूर्ण करणे आवश्यक
अनिवार्य रोटेटिंग मेडिकल इंटर्नशिप रेग्युलेशन, 2021 नुसार, ग्रॅज्युएट मेडिकल कोर्स प्रोग्राममध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने त्याची फिरती वैद्यकीय इंटर्नशिप पूर्ण करेपर्यंत (MBBS Education) पदवी पूर्ण केली आहे असे मानले जाणार नाही. एनएमसीने म्हटले आहे की NEET-UG च्या गुणवत्ता यादीच्या आधारे देशातील सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये वैद्यकीय पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक समुपदेशन केले जाईल.

महापालिकेच्या जागांवर समुपदेशन होणार आहे
अधिसूचनेनुसार समुपदेशन पूर्णपणे महापालिकेने दिलेल्या जागांवर आधारित असेल. आवश्यकतेनुसार सामान्य समुपदेशनाचे अनेक टप्पे असू शकतात. अंडर-ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड (UGMEB) सामान्य समुपदेशन आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक (MBBS Education) तत्त्वे जारी करेल आणि नियुक्त अधिकारी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार समुपदेशन आयोजित करतील. सरकार समुपदेशनासाठी प्राधिकरण नियुक्त करेल. कोणतीही वैद्यकीय संस्था या नियमांचे उल्लंघन करून पदवीधर वैद्यकीय शिक्षण (GME) अभ्यासक्रमासाठी कोणत्याही उमेदवाराला प्रवेश देणार नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com