Government Jobs : ‘इतक्या’ हजार तरुणांना मिळाली सरकारी नोकरी; पंतप्रधान मोदींनी दिले नियुक्ती पत्र

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारने देशातील तरुणांना रोजगार (Government Jobs) देण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे. देशातील विविध राज्यातील अनेक तरुणांच्या सरकारी नोकरीचे स्वप्न यामुळे पूर्ण झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार तरुणांना नियुक्ती पत्र दिले आहे. त्यासाठी देशभरात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार 126 तरुणांना नियुक्ती पत्र दिले. या तरुणांना सरकारच्या विविध विभागात नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार दि. 13 जून रोजी  सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे हे नियुक्ती पत्र दिले आहे.

43 ठिकाणी रोजगार मेळावा
देशात आज एकाचवेळी 43 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. रोजगार मेळावा हे केंद्र सरकारचं महत्वपूर्ण पाऊल आहे. या माध्यमातून तरुणांना (Government Jobs) त्वरीत आणि कोणत्याही चिंतेशिवाय तात्काळ नियुक्ती पत्र देण्यात येते. केंद्र सरकारला आशा आहे की, हे मेळावे रोजगार देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावतील. तसेच यामाध्यमातून देशाचा सर्वांगीण विकास करण्यात तरुणांचा मोठा हातभार लागेल.

‘या’ विभागात नोकरी (Government Jobs)
केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील अनेक विभागात या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्ती पत्रांचं वाटप करण्यात आलं. वित्तीय सेवा, टपाल खाते, शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण विभाग, महसूल विभाग, समाज कल्याण, अणू ऊर्जा विभाग, रेल्वे विभाग, लेखा परीक्षा आणि लेखा विभाग, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय विभागात कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
रोजगार मेळाव्या अंतर्गत आतापर्यंत 10 लाख (Government Jobs) तरुणांना रोजगार देण्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. या सर्व तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तर SSC, UPSC आणि Railway अंतर्गत आतापर्यंत 8 लाख 82 हजार तरुणांना नोकरी देण्यात आली आहे.

मोठ-मोठ्या कंपन्यांची भारतात गुंतवणूक (Government Jobs)
जागतिक मंदीच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्था गतिमान आहे. देशात गुंतवणुक कऱ्यासाठी मोठ-मोठ्या कंपन्या येत आहेत. येत्या काळात भारतात मोठ्या प्रमाणावर (Government Jobs) रोजगार निर्मिती होईल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com