Home Blog Page 276

Talathi Bharti 2023 : अबब!! तलाठी भरतीच्या फी मधून सरकारच्या तिजोरीत 127 कोटी जमा; 4644 पदांसाठी आले 13 लाख अर्ज

Talathi Bharti 2023 (15)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकर भरतीची सगळेच तरुण (Talathi Bharti 2023) आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या राज्य सरकारने तलाठी भरती जाहिर केली आहे. या भरतीत लाखो तरुण आपले नशीब आजमावणार आहेत; कारण 4644 जागांसाठी तब्बल 13 लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत. या भरतीच्या परीक्षा फी पोटी शासनाच्या तिजोरीत 127 कोटी जमा झाले आहेत. पीएचडी धारक, इंजिनिअर, एमबीए झालेले उच्चशिक्षित तरुणही तलाठी व्हायला निघाले आहेत; ही बाब विशेष म्हणावी लागेल.

20 पेक्षा अधिक दिवस घ्यावी लागणार परीक्षा
4 वर्षापासून रखडलेल्या तलाठी भरतीला यावर्षी मुहूर्त लागला आहे. सरकारने 4644 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. २६ जूनपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. या भरतीसाठी आजपर्यंत 13 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. एकूण जागेच्या तुलनेत आलेल्या अर्जाचा विचार केला तर एका जागेसाठी 275 उमेदवार आहेत. त्यामुळे प्रचंड स्पर्धा या परीक्षेसाठी निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेली शासकीय भरती. म्हणूनच शासनाला ही परीक्षा 20 पेक्षा अधिक दिवस घ्यावी लागणार आहे.

फीमुळे महिन्याचे बजेट कोलमडलं (Talathi Bharti 2023)
तलाठी पदासाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये परीक्षा फी आकारण्यात आली आहे. २३ जुलैपर्यंत शासनाकडे १२ लाख ७७ हजार १०० अर्ज आले आहेत. ज्याची एकूण रक्कम तब्बल १२७ कोटी रुपये हे शासकीय तिजोरीत जमा झाले आहेत. महत्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात फी मिळूनही परीक्षा पारदर्शक होत नाहीत, हा मागच्या काही परीक्षांचा अनुभव आहे. उस्मानाबाद मधील (Talathi Bharti 2023) बाबासाहेब गाढवे यांनी आपल्यासह पत्नीचाही तलाठी परीक्षेसाठी अर्ज केला आहे. दोघांनी एकाचवेळी अर्ज केल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ठेवलेले दोन ते अडीच हजार रुपये फी साठी भरावे लागल्यामुळे खर्चाचा भुर्दंड त्यांना सहन करावा लागला आहे. उस्मानाबादच्या सह्याद्री रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करणारा रामेश्वर बाबासाहेब कांबळे हे ग्रॅज्युएट आहेत, आपल्या आई-वडिलांचे छत्र हरपल्याने स्वतः काम करून ते कुटुंब चालवतात. आता त्यांनी तलाठी पदासाठी फॉर्म भरला आहे, ज्यामुळे त्याला मिळणाऱ्या पगारातील दीड हजाराची पदरमोड करावी लागली आहे.

उच्च शिक्षित तरुणांनी केले अर्ज
राज्यात ७५ हजारांची पदभरती करण्याची घोषणा झाली, मात्र ही घोषणा हवेतच विरली. त्यानंतर होणारी ही पहिलीच भरती आहे. या भरतीमुळे वय वाढत चाललेल्या अनेक तरुणांना आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्यामुळेच तलाठी पदासाठी अनेक अभियांत्रिकी, व्यवस्थापन, संगणक शास्त्र, विज्ञान, कला, वाणिज्य, बीएस्सी ऍग्री, एमएसस्सी बायोटेक, LLB आदी शाखांमध्ये पदव्युत्तर पदवीधारकांनीही अर्ज केले (Talathi Bharti 2023) आहेत. वय वाढत असल्याने आयुष्यात काही ना काही तरी व्हावे म्हणून हा खटाटोप करत असल्याचे सांगून हे उच्चशिक्षित तरुण नोकर भरतीच्या अनुषंगे सरकारी धोरणावर संताप व्यक्त करत आहेत. एकूणच अनेक शासकीय कार्यालयांमध्ये हजारो पदे रिक्त असताना सरकार वर्षांनुवर्षे शासकीय भरती काढत नाहीत. अन् काढली की बेरोजगार तरुण ती मिळवण्यासाठी तुटून पडतात; असे सर्वत्र चित्र आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : प्राध्यापकांची विना परीक्षा थेट मुलाखत!! कोल्हापूरच्या ‘या’ महाविद्यालयात नवीन भरती; त्वरा करा

Job Notification (71)

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (Job Notification) अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,पेठ वडगाव, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे अध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 25 पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी 26 जुलै 2023 या दिवशी हजर रहायचे आहे.

संस्था – डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,पेठ वडगाव, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर
भरले जाणारे पद – अध्यापक
पद संख्या – 25 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पेठ वडगाव, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 26 जुलै 2023
मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगांव ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर-४१६११२

भरतीचा तपशील – (Job Notification)

मुलाखतीविषयी सूचना –
1. या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे.
3. आवश्यक कागदपत्रासह (Job Notification) मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे.
4. मुलाखतीची तारीख 26 जुलै 2023 आहे.
5. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : पदवीधारकांसाठी बंपर जॉब ओपनिंग!! एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथे नवीन भरती सुरु

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । एकलव्य मॉडेल निवासी शाळा (Government Job) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 6329 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये TGT, वसतिगृह वॉर्डन (पुरुष) आणि वसतिगृह वॉर्डन (महिला) अशी पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – एकलव्य मॉडेल निवासी शाळा
भरले जाणारे पद –
1. TGT – 5660 पदे
2. वसतिगृह वॉर्डन (पुरुष) – 335 पदे
3. वसतिगृह वॉर्डन (महिला) – 334 पदे
पद संख्या – 6329 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2023

वय मर्यादा – 35 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
EMRS कर्मचार्‍यांसाठी 55 वर्षांपर्यंत
अर्ज फी – (Government Job)
TGT – Rs. 1500/-
वसतिगृह वॉर्डन – Rs. 1000/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. TGT – Bachelor’s Degree from a recognized university /institute in a relevant field (Read PDF for complete details)
2. वसतिगृह वॉर्डन (पुरुष) – Four years integrated degree course of Regional College of Education of NCERT or other NCTE recognized institution in concerned subject. OR
Bachelor’s Degree from a recognized university /institute
3. वसतिगृह वॉर्डन (महिला) – Four years integrated degree course of Regional College of Education of NCERT or other NCTE recognized institution in concerned subject. OR
Bachelor’s Degree from a recognized university /institute

मिळणारे वेतन –
1. TGT – Level 7 (Rs.44900 – 142400/-)
2. वसतिगृह वॉर्डन (पुरुष) – Level 6 (Rs. 35400- 112400)
3. वसतिगृह वॉर्डन (महिला) – Level 5 (Rs. 29200 –92300)
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून करायचा आहे.
3. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी (Government Job) त्यांच्याकडे या पदासाठी आवश्यक पात्रता आणि अनुभव असल्याचे सुनिश्चित करायचे आहे.
3. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

निवड प्रक्रिया –
1. Written Exam
2. Document Verification
3. Medical Examination
भरतीचा तपशील –
Eklavya Model Residential School Bharti 2023

काही महत्वाच्या तारखा –
Eklavya Model Residential School Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – emrs.tribal.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Kotwal Bharti 2023 : राज्यात तब्बल 5 हजार कोतवाल पदे भरणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

Kotwal Bharti 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरात आता तब्बल 5 हजार (Kotwal Bharti 2023) कोतवाल पदे भरली जाणार आहेत. राज्य शासनाकडून भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता लेखी परीक्षा होणार आहे. रिक्त पदांच्या 80 टक्केपर्यंत मर्यादित कोतवाल पदे भरली जाणार आहेत. सध्या तलाठी भरती प्रक्रिया सुरु असून यानंतर कोतवाल भरती झाल्यास महसूल विभागाच्या कामास गती येणार आहे.

80 टक्के पदे भरणार
राज्यभरात गावांमध्ये महसूल विभागाचे व शासनाच्या बहुतांश कामांची पूर्तता करण्यासाठी कोतवाल पद महत्त्वाचे ठरले आहे. गेली अनेक वर्ष कोतवाल पदाची भरती व्हावी; अशी मागणी होत होती. राज्य शासनाने तलाठी भरती प्रक्रिया सुरू केली असतानाच कोतवाल भरती प्रक्रिया करण्यासंदर्भात भरती (Kotwal Bharti 2023) प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 21 जुलै रोजी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियोजनातून भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांच्या 80 टक्के पर्यंत मर्यादित ही कोतवाल पदे भरली जाणार आहेत. विशेष बाब म्हणून या भरतीला शासनाने मान्यता दिली आहे.
भरती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करून 15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरती प्रक्रिया पार पाडावी अशा लेखी सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरती प्रक्रिया करण्याच्या सूचना निगमित केल्या (Kotwal Bharti 2023) आहेत. यामुळे लवकरच कोतवाल पदे भरली जाणार असून महसूल विभागाच्या कामात सुसूत्रता व गतिमानता येईल आणि शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील अशी आशा आहे. दरम्यान, भरती प्रक्रियेत सज्ज्यानुसार भरती प्रक्रिया न घेता तालुका स्तरावर भरती घ्यावी, यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि गुणवत्तायुक्त विद्यार्थी भरती होतील, अशी मागणी होत आहे.

5 हजार पदे रिक्त (Kotwal Bharti 2023)
तब्बल सहा वर्षानंतर कोतवाल भरती होत आहे. राज्यात 12 हजार 667 पदे मंजूर असून 8 हजार पदे कार्यरत आहेत. सध्या सुमारे 5 हजार पदे भरण्यात येणार आहेत. तलाठी सज्जा पुनर्रचनेनुसार 16 हजार पदे भरणे अपेक्षित आहे. पुनर्रचना व रिक्त पदांनुसार 80 टक्के पदे भरली जाणार आहेत. अनेक कोतवाल कोरोना काळात कामावर असताना मृत्यूमुखी पडले आहेत. अशा कोतवालांच्या पाल्यांना अनुकंपाखाली सामावून घ्यावे; अशी मागणी कोतवाल संघटनेचे राज्याध्यक्ष शिवप्रसाद देवणे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BIS Recruitment 2023 : डिग्री/डिप्लोमा धारकांसाठी शासकीय नोकरी; भारतीय मानक ब्युरो अंतर्गत ‘या’ पदावर भरती

BIS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध रिक्त (BIS Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, उपसंचालक (मार्केटिंग आणि ग्राहक व्यवहार), उपसंचालक (प्रकाशन), उपसंचालक (ग्रंथालय) पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय मानक ब्युरो
भरले जाणारे पद –
1. संचालक – 01 पद
2. उपसंचालक (मार्केटिंग आणि ग्राहक व्यवहार) – 06 पदे
3. उपसंचालक (प्रकाशन) – 01 पद
4. उपसंचालक (ग्रंथालय) – 01 पद
पद संख्या – 09 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (आस्थापना), भारतीय मानक ब्युरो, माणक भवन, 9, बहादूर शाह जफर मार्ग, नवी दिल्ली- 110002

वय मर्यादा – 35 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BIS Recruitment 2023)
1. संचालक – Degree in Law, LLB
2. उपसंचालक – (मार्केटिंग आणि ग्राहक व्यवहार) Masters Degree, MBA in Marketing, Post Graduation Diploma in Mass Communication/ Social Work
3. उपसंचालक (प्रकाशन) – Diploma in Printing Technology/ Publication, Degree in Science/ Arts
4. उपसंचालक (ग्रंथालय) – Masters Degree/ Post Graduation Degree/ Diploma in Library Science/ Library

मिळणारे वेतन –
1. संचालक – Rs. 78,800 – 2,09,200/-
2. उपसंचालक (मार्केटिंग आणि ग्राहक व्यवहार) – Rs. 67,700 – 2,08,700/-
3. उपसंचालक (प्रकाशन) – Rs. 67,700 – 2,08,700/-
4. उपसंचालक (ग्रंथालय) – Rs. 67,700 – 2,08,700/-
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. उमेदवारांनी अर्ज वरील संबंधित पत्त्यांवर पाठवावे. (BIS Recruitment 2023)
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.bis.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ISRO Careers : तुम्हालाही इस्रोमध्ये करिअर करायचं आहे? तर निवडा ‘हे’ कोर्स

ISRO Careers

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच ISRO ही (ISRO Careers) जगातील सर्वात मोठ्या अंतराळ संस्थांपैकी एक आहे, जी तिच्या किफायतशीर प्रकल्प, वैज्ञानिक विकास आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. 15 ऑगस्ट 1969 रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली, त्याचे मुख्यालय बेंगळुरु, येथे आहे. ISRO ने आजवर अनेक मोहिमा यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्या आहेत. भारतीय अंतराळ संस्था विविध संस्था आणि विविध विभागांनी बनलेली आहे. ISRO ने INCOSPAR (Indian National Committee for Space Research) ची स्थापना 1962 मध्ये केली, ज्याचे भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई, हे भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे दोन संस्थापक आहेत.

भारतीय अंतराळ संस्था बनवणारे असंख्य गट आणि विभाग आहेत. अविरत प्रयत्न करून, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अनेक मोहिमा यशस्वीपणे सुरू केल्या आणि पूर्णही केल्या आहेत. ISRO मध्ये नोकरी कशी मिळवायची आणि या प्रतिष्ठित अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ होण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे लागेल; हे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. शास्त्रज्ञ होण्यासाठी 12 वी नंतर तुम्ही हे कोर्स करुन ISRO मध्ये करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.

1. कम्प्युटर सायन्स (Computer Science)
संगणक विज्ञान (Computer Science) म्हणजे संगणक आणि संगणकीय प्रणालींचा अभ्यास. इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर इंजिनीअर्सच्या विपरीत, कॉम्प्युटर शास्त्रज्ञ बहुतेक सॉफ्टवेअर (ISRO Careers) आणि सॉफ्टवेअर सिस्टमशी व्यवहार करतात; यामध्ये त्यांचा सिद्धांत, रचना, विकास आणि अनुप्रयोग समाविष्ट आहे. कॉम्प्युटर सायन्समधील अभ्यासाच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक प्रणाली आणि नेटवर्क, सुरक्षा, डेटाबेस प्रणाली, मानवी संगणक संवाद, दृष्टी आणि ग्राफिक्स, संख्यात्मक विश्लेषण, प्रोग्रामिंग भाषा, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, जैव सूचना विज्ञान आणि संगणनाचा सिद्धांत यांचा समावेश आहे.
संगणक शास्त्राच्या अभ्यासासाठी प्रोग्राम कसा करायचा हे जाणून घेणे आवश्यक असले तरी, ते या क्षेत्रातील केवळ एक घटक आहे. संगणक शास्त्रज्ञ प्रोग्राम्स सोडवण्यासाठी आणि संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी अल्गोरिदम डिझाइन आणि विश्लेषण करतात. संगणक शास्त्रज्ञांना ज्या समस्या येतात त्या अमूर्त– संगणकाद्वारे कोणत्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात आणि त्या सोडवणाऱ्या अल्गोरिदमची जटिलता- मूर्त- डिझाइनिंग ऍप्लिकेशन्स जे हँडहेल्ड डिव्हाइसेसवर चांगले कार्य हे इंजिनियर्स करतात. याबरोबरच, अंतराळ संशोधनासाठी आवश्यक असणाऱ्या सॉफ्टवेअर आणि प्रोग्रामसची निर्मिती, अल्गोरिदम तयार करणे आणि डेटा विश्लेषण करण्याचे कामही यांच्याकडे असते.

2. रिमोट सेन्सिंग (Remote Sensing)
‘रिमोट सेन्सिंग’ हा शब्द बरेचदा वापरला जातो. याचा अर्थ त्यातल्या शब्दांप्रमाणेच आहे. रिमोट म्हणजे दुरून आणि सेन्सिंग म्हणजे जाणणं, ओळखणं किंवा माहिती मिळवणं. “एखाद्या गोष्टीच्या थेट संपर्कात न येताच त्याविषयीची माहिती आणि मोजमापं मिळवण्याचं विज्ञान आणि कला अशी 1950च्या दशकात एव्हिलिन प्रुइट या अमेरिकन नौदलाच्या संशोधन संस्थेतल्या स्त्रीनं रिमोट सेन्सिंगची प्रथमच व्याख्या केली होती.
रिमोट सेन्सिंग हे तंत्रज्ञान आपण उपग्रहांवरून (Satellite) पृथ्वीविषयी, त्यातल्या पृष्ठभागाविषयी, जमिनीविषयी, समुद्र किंवा नद्यांविषयी, जंगलांविषयी, डोंगरांविषयी, त्यावरच्या साठलेल्या किंवा वितळत चालेल्या बर्फाविषयी किंवा अगदी माणसांविषयी आणि इतर वस्तूंविषयी माहिती मिळवण्यासाठी (ISRO Careers) वापरतो. यासाठी आपल्या उपग्रहांवर सेन्सर्स, स्कॅनर्स किंवा कॅमेरे अशा तऱ्हेची उपकरणं बसवलेली असतात. हे उपग्रह पृथ्वीपासून 650 ते 750 किलोमीटर उंचीवरून पोलर ऑर्बिटमध्ये फिरत असतात. हे सेन्सर्स पृथ्वीसंबंधी काही मोजमापं करून किंवा त्यावरचे स्कॅनर्स पृथ्वीचे सतत फोटो काढून ते पुन्हा पृथ्वीवर ऍनेलाईज करण्याकरता पाठवत असतात. यासंबंधीचे शिक्षण इथे दिले जाते.

3. एरोस्पेस इंजिनिअरिंग (Aerospace Engineering)
एरोस्पेस इंजिनियरिंग हे अइंजिनियरिंगचे प्राथमिक क्षेत्र आहे जे विमान, अंतराळ यान आणि संबंधित यंत्रणा आणि उपकरणे यांच्या डिझाइन, विकास, चाचणी आणि उत्पादनाशी संबंधित आहे. क्षेत्राने पारंपारिकपणे वायुमंडलीय आणि अंतराळ उड्डाणाशी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. याच्या दोन प्रमुख  शाखा आहेत. 1) Aeronautical Engineering आणि 2) Astronautical Engineering.
1) Aeronautical Engineering च्या अभ्यासात पृथ्वीच्या वातावरणातील उड्डाणाचा सिद्धांत, तंत्रज्ञान आणि सराव यावर विशेष लक्ष दिले जाते.
2) Astronautical Engineering मध्ये अंतराळवीर अभियांत्रिकी अंतराळयान आणि प्रक्षेपण वाहनांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील अभ्यासक्रम शिकवला जातो.

4. सिग्नल प्रोसेसिंग (Signal Processing)
सिग्नल प्रोसेसिंगमध्ये डेटाचे रूपांतर अशा प्रकारे केले जाते ज्यामुळे अशा गोष्टी पाहता येतात ज्या प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे शक्य होत नाहीत. सिग्नल प्रोसेसिंग अभियंते आणि शास्त्रज्ञांना वैज्ञानिक डेटा, ऑडिओ प्रवाह, प्रतिमा आणि व्हिडिओसह सिग्नलचे विश्लेषण, ऑप्टिमाइझ आणि दुरुस्त करण्याची परवानगी देते.

5. अनॅलिटीक्स आणि डेटा इंजिनिअरिंग (Analytics and Data Science)
ISRO मधील डेटा सायंटिस्ट पृथ्वीच्या पर्यावरणशास्त्र, हवामानाचा कल आणि मिशन नियोजनाचा अभ्यास करतात. ISRO चे उपग्रह आणि सेन्सर डेटा सायन्स आणि (ISRO Careers) विश्लेषणासाठी मोठ्या प्रमाणात डेटा कॅप्चर करतात. विश्लेषणात्मक पद्धती, मशीन लर्निंग अल्गोरिदम आणि सांख्यिकीय यांचा अभ्यास करून डेटासेटचे विश्लेषण करतात.

6. रोबोटिक्स आणि ऑटोमेशन (Robotics & Automation)
हे एक प्रकारचे स्वयंचलित यांत्रिक उपकरण आहे. जे संगणक प्रोग्रामिंग किंवा मशीन प्रोग्रामिंग भाषेच्या मदतीने कार्य करते. या प्रणालीमध्ये सेन्सर्स, कंट्रोल सिस्टीम, पॉवर सप्लाय आणि सॉफ्टवेअर यांसारख्या गोष्टी एकत्र काम करतात. जर आपण रोबोटिक्स अभियांत्रिकीबद्दल बोललो तर ते अनेक शाखांनी बनलेले आहे. यामध्ये संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक अभियंते आणि यांत्रिक अभियंते रोबोट डिझाइन, बांधकाम, वीजपुरवठा, माहिती प्रक्रिया आणि सॉफ्टवेअरवर एकत्रितपणे काम करतात.
हे शिक्षण अंतराळ संशोधन आणि मिशन ऑपरेशन्ससाठी महत्त्वपूर्ण आहेत. ISRO मधील रोबोटिक्स आणि ऑटोमेशन व्यावसायिक अंतराळ वाहने तयार करण्यात, देखरेख करण्यासाठी आणि एक्सप्लोर करण्यात मदत करतात. ते अचूक कामांसाठी स्पेस-रेडी रोबोट तयार करतात. अंतराळ मोहिमांमध्ये रोबोटिक्स आणि ऑटोमेशन तज्ज्ञाद्वारे डिझाइन केलेले आणि प्रोग्राम केलेले रोबोटिक शस्त्रे, रोव्हर्स आणि इतर (ISRO Careers) उपकरणे वापरतात. त्यांचा अनुभव जलद आणि अचूक कामाच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरतो. अवकाश संशोधनातील विविध कामांमध्ये हे रोबोट्स उपयुक्त ठरतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : सावली नसलेली वस्तू कोणती? पहा असे काही भन्नाट प्रश्न आणि त्याची उत्तरे

GK Updates 24 Jul

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. प्रश्न : जिल्हा गॅझेटियर म्हणजे काय?
उत्तर : इंग्रजांच्या काळात तो दरवर्षी तयार केला जायचा, त्यात संपूर्ण जिल्ह्याच्या नोंदी ठेवल्या जायच्या.
2. प्रश्न: सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात?
उत्तर : 7 रंग. (GK Updates)
3. प्रश्न : जर एखाद्या मुलाने मुलीला प्रपोज केले तर ते गुन्ह्याच्या कक्षेत येईल का?
उत्तर : नाही, कारण आयपीसीच्या कोणत्याही कलमात, प्रस्ताव मांडणे गुन्हा म्हणून वर्गीकृत केलेले नाही.

4. प्रश्न : मानवी डोळ्याचे वजन किती आहे?
उत्तर : डोळ्याचे वजन फक्त 8 ग्रॅम आहे.
5. प्रश्न : कोणता प्राणी असा आहे की त्याचे डोके कापल्यानंतरही तो बरेच दिवस जगू शकतो?
उत्तर : झुरळ.
6. प्रश्न : भारतातील सर्वात महागडे शहर कोणते आहे?
उत्तर : मुंबई.

7. प्रश्न : पेट्रोल पंपावर कोणत्या प्रकारचे कपडे घालू नयेत?
उत्तर : सिंथेटिक.
8. प्रश्न : रेल्वेमध्ये बसवलेल्या W/L बोर्डचा अर्थ काय आहे?
उत्तर : जिथे W/L बोर्ड बसवलेले असतात, तिथे ड्रायव्हरला हॉर्न वाजवावा लागतो.
9. प्रश्न (GK Updates) : सावली नसलेल्या वस्तूचे नाव सांगा?
उत्तर : रस्ता.
10. प्रश्न : असे काय आहे जे महासागरात घडते आणि तुमच्या घरात असते?
उत्तर : मीठ.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahatransco Recruitment 2023 : 10 वी पास/ ITI उत्तीर्णांसाठी महापारेषण देणार नोकरी; ऑनलाईन करा अर्ज

Mahatransco Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (Mahatransco Recruitment 2023) पारेषण कंपनी लिमिटेड, पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, पुणे
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पद संख्या – 10 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिल)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – (Mahatransco Recruitment 2023)
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागु राहिल.

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. उमेदवारांनी इयत्ता १० वी उत्तीर्ण चे गुणपत्रक (Marksheet) व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय (वीजतंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.
5. अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या www.apprenticeshipindia.org या वेबसाईवर नोंदणी करणे बंधन कारक असून दिनांक दि. 31 जुलै पर्यंत https://apprenticeshipindia.gov.inapprenticeship/opportunity या लिंकवरुन (Estb.code) E09162701362 या आस्थापनेवर आवश्यक माहिती नमूद करुन अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
6. दि.31 जुलै 2023नंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या (Mahatransco Recruitment 2023) उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

काही महत्वाच्या लिंक्स – (Mahatransco Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AAI Recruitment 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर जॉब ओपनिंग!! 342 पदे रिक्त; महिन्याचा 1,40,000 पगार

AAI Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत रिक्त (AAI Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग), कनिष्ठ कार्यकारी (वित्त), कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा), कनिष्ठ कार्यकारी (कायदा) पदांच्या एकूण 342 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India)
पदाचे नाव –
1. कनिष्ठ सहाय्यक – 09 पदे
2. वरिष्ठ सहाय्यक – 09 पदे
3. कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग) – 237 पदे
4. कनिष्ठ कार्यकारी (वित्त) – 66 पदे
5. कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा) – 03 पदे
6. कनिष्ठ कार्यकारी (कायदा) – 18 पदे
पद संख्या – 342 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (AAI Recruitment 2023)
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 5 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2023

वय मर्यादा –
1. कनिष्ठ सहाय्यक – 30 वर्ष
2. वरिष्ठ सहाय्यक – 30 वर्ष
3. कनिष्ठ कार्यकारी – 27 वर्ष
अर्ज फी – 1000/- रुपये
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 
1. कनिष्ठ सहाय्यक – Graduate
2. वरिष्ठ सहाय्यक – Graduate preferably B.Com
3. कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग) – Any graduate
4. कनिष्ठ कार्यकारी (वित्त) – B.Com with ICWA/CA/MBA (2 years’ duration) with specialization in Finance.
5. कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा) – Bachelor’s Degree in Engineering. /Tech. in Fire Engg./Mechanical Engg./Automobile Engg.
6. कनिष्ठ कार्यकारी (कायदा) – Professional degree in Law (3 years’ regular course after graduation OR 5 years’ integrated regular course after 10+2) and (AAI Recruitment 2023) candidate should be eligible to get himself enrolled as an Advocate in Bar Council of India to do practice in courts in India

मिळणारे वेतन –
1. कनिष्ठ सहाय्यक – Rs.40000-3%-140000
2. वरिष्ठ सहाय्यक – Rs.36000-3%-110000
3. कनिष्ठ कार्यकारी – Rs.31000-3%-92000
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (AAI Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK  करा (5 ऑगस्ट पासून) – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.aai.aero
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागात तब्बल 111 पदांवर भरती; दरमहा 1,22,800 पगार 

Government Jobs (52)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा (Government Jobs) विभागाअंतर्गत क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, शिपाई पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद –
1. क्रीडा अधिकारी – 59 पदे
2. क्रीडा मार्गदर्शक – 50 पदे
3. निम्न श्रेणीतील लघुलेखक – 01 पद
4. शिपाई – 01 पद
पद संख्या – 111 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2023

अर्ज फी – (Government Jobs)
अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
इतर प्रवर्ग – रु. 900/-
वय मर्यादा –
Directorate of Sports and Youth Services Recruitment 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. क्रीडा अधिकारी –

सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य / विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा
शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण. किंवा एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
2. क्रीडा मार्गदर्शक –
सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य/ विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी (Government Jobs) घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण आहे. किंवा एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.

3. निम्न श्रेणीतील लघुलेखक –
माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. 100 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही. इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
4. शिपाई – माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10वी) उत्तीर्ण.

मिळणारे वेतन – (Government Jobs)
1. क्रीडा अधिकारी – S-14 (38,600-1,22,800)
2. क्रीडा मार्गदर्शक – S-14 (38,600-1,22,800)
3. निम्न श्रेणीतील लघुलेखक – S-14 (38,600-1,22,800)
4. शिपाई – S-1 (1,5000-47,600)
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही मध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
4. कृपया ऑनलाइन अर्जामध्ये (Government Jobs) तुमची संपूर्ण शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव तपशील नमूद करा.
5. ऑनलाइन अर्ज सबमीट केल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवा.
6. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे.

निवड प्रक्रिया –
Selection Process For

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – sports.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com