Mahatransco Recruitment 2023 : 10 वी पास/ ITI उत्तीर्णांसाठी महापारेषण देणार नोकरी; ऑनलाईन करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (Mahatransco Recruitment 2023) पारेषण कंपनी लिमिटेड, पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, पुणे
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पद संख्या – 10 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिल)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – (Mahatransco Recruitment 2023)
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागु राहिल.

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. उमेदवारांनी इयत्ता १० वी उत्तीर्ण चे गुणपत्रक (Marksheet) व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय (वीजतंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.
5. अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या www.apprenticeshipindia.org या वेबसाईवर नोंदणी करणे बंधन कारक असून दिनांक दि. 31 जुलै पर्यंत https://apprenticeshipindia.gov.inapprenticeship/opportunity या लिंकवरुन (Estb.code) E09162701362 या आस्थापनेवर आवश्यक माहिती नमूद करुन अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
6. दि.31 जुलै 2023नंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या (Mahatransco Recruitment 2023) उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

काही महत्वाच्या लिंक्स – (Mahatransco Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com