Home Blog Page 228

BDL Recruitment 2023 : भारत डायनामिक्स मध्ये ‘या’ पदावर नोकरी; 119 पदे रिक्त

BDL Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL Recruitment 2023) अंतर्गत पदवीधर आणि तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार  पदांच्या एकूण 119 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – भारत डायनॅमिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद – पदवीधर आणि तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 119 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2023

भरतीचा तपशील – (BDL Recruitment 2023)

पद पद संख्या 
पदवीधर शिकाऊ उमेदवार 83 पदे
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार 36 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदवीधर शिकाऊ उमेदवार A degree in Engineering or Technology granted by statutory University.
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार A Diploma in Engineering or Technology granted by a State Council or Board of Technical Education established by a State Government in relevant discipline.


काही महत्वाच्या तारखा –
BDL Bharti 2023

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
3. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे. (BDL Recruitment 2023)
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bdl-india.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : ग्रॅज्युएट्ससाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी; ताबडतोब करा अर्ज

Government Job (17)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने (Government Job) भरतीची जाहिरात काढली आहे. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
भरले जाणारे पद – कार्यालयीन सहाय्यक
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केली असावी.
वय मर्यादा –  अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी – फी नाही (Government Job)
मिळणारे वेतन – 25,000/- दरमहा

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.
काही महत्वाच्या लिंक्स – (Government Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : मुलाला अधिकारी व्हायचं होतं; आईने शालेय पोषण आहार बनवून घर चालवलं; तीन कठीण परीक्षा पास करुन हा तरुण झाला IAS

Career Success Story of IAS Dongre Revaiah

करिअरनामा ऑनलाईन । ही कथा आहे IAS अधिकारी (Career Success Story) डोंगरे रेवैय्या आणि त्यांच्या आईच्या संघर्षाची. डोंगरे रेवैया हे तेलंगणाचे रहिवासी आहेत. वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. मुलांचे संगोपन करण्यासाठी त्यांच्या आईने शालेय पोषण आहार तयार करुन पैसे कमावले आणि मुलांचे शिक्षण पूर्ण केले. डोंगरे रेवैय्या यांनी एक, दोन नव्हे; तर भारतातील तीन कठीण परीक्षा पास केल्या आहेत. त्यांनी जेईई (JEE), गेट (GATE) आणि यूपीएससी (UPSC) परीक्षा पास होवून आपल्या आईचं नांव उज्ज्वल केलं आहे.

1500 रुपये पगारात घर चालवायचे (Career Success Story)
आई, दोन भाऊ आणि बहिणी असं डोंगरे रेवैय्या यांचे कुटुंब. लहान असताना त्यांच्या वडिलांचे आकस्मित निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर डोंगरे रेवैय्याच्या आईने शाळांमध्ये माध्यान्ह भोजन तयार करण्यास सुरुवात केली. या कामाच्या मोबदल्यात त्यांना 1500 रुपये पगार मिळायचा. मुलांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. डोंगरे रेवैय्या यांना आईच्या कष्टाची पूर्ण जाणीव होती. या जाणिवेतून त्यांनी आईला चांगले आयुष्य देण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.
IIT मद्रासमध्ये मिळवला प्रवेश
डोंगरे रेवैया हे तेलंगणातील कुमुराम भीम आसिफाबाद येथील तुंगाडा गावचे रहिवासी आहेत. कुटुंबातील आर्थिक अडचणींमुळे त्यांना शहरात जाऊन शिक्षण घेता आले नाही. गावातीलच (Career Success Story) सरकारी शाळेतून त्यांनी 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना अभियंता व्हायचे होते आणि म्हणूनच 12वी नंतर त्यांनी इंजिनियरिंगसाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि IIT मद्रासमध्ये प्रवेश मिळवला.

फी भरण्यासाठी नव्हते पैसे
आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश घेतल्यानंतर, डोंगरे रेवैया यांना फी भरण्यासाठी 20,000 रुपयांची कमतरता निर्माण झाली. त्याचवेळी तुंगडा गावातील गावकऱ्यांचा युक्तिवाद ऐकण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अशोककुमार तेथे आले होते. यावेळी त्यांनी डोंगरे रेवैया यांची युनिव्हर्सिटी आणि आयआयटी मद्रासची मार्कलिस्ट पाहिली. त्यांची कामगिरी पाहून IAS अशोक कुमार यांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला.
ONGC मध्ये मिळाली सरकारी नोकरी
डोंगरे रेवैया यांनी 2017 मध्ये IIT मद्रासमधून केमिकल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम केला. यानंतर त्यांनी GATE परीक्षा उत्तीर्ण केली, जी जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. यामध्ये त्यांचा क्रमांक 70 वा होता; त्यामुळे त्यांना मुंबई ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) मध्ये सरकारी नोकरी मिळाली. पण तो इथेच थांबला नाही. IAS अधिकारी होण्याचे स्वप्न त्याला पूर्ण करायचे होते.

IAS होण्याचे स्वप्न पूर्ण
डोंगरे रेवैया यांनी लहानपणापासून आईचे कष्ट पाहिले होते म्हणूनच त्यांना आयएएस होऊन आपली आणि आईची सर्व स्वप्ने पूर्ण करायची होती. 2020 मध्ये, सरकारी नोकरीसोबत त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 2021 मध्ये परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात त्यांना केवळ 2 मार्कने अपयश आले. त्यानंतर संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. जिद्दीने अभ्यास केला अन्  ते 2022 मध्ये 410 व्या क्रमांकासह IAS अधिकारी बनले.

UPSC मध्ये इतके मिळाले मार्क (Career Success Story)
डोंगरे रेवैया सध्या मसुरी येथील LBSNAA येथे IAS चे प्रशिक्षण घेत आहेत. डोंगरे रेवैया यांनी त्यांची UPSC मार्कशीट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यांना निबंधात 115 गुण, GS 1 मध्ये 109, GS 2 मध्ये 99, GS 3 मध्ये 73, GS 4 मध्ये 117, पर्यायी गणित 1 मध्ये 143, पर्यायी गणित 2 (UPSC पर्यायी विषय) मध्ये 159 आणि Personality Test मध्ये 146 गुण मिळवले होते. त्यांच्या एकूण गुणांची बेरीज 961 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : शरीराच्या कोणत्या भागात आयोडीन साठवले जाते? कोणता प्राणी जन्मानंतर बाळासारखा रडतो? पहा असे काही भन्नाट प्रश्न 

GK Updates 13 Oct.

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा कोणत्या आहेत?
उत्तर- संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंग्रजी, फ्रेंच, अरबी, चिनी, रशियन आणि स्पॅनिश या सहा अधिकृत भाषा आहेत.
प्रश्न  2 – आपल्या शरीराच्या कोणत्या भागात आयोडीन साठवले जाते?
उत्तर – आयोडीन आपल्या शरीरातील थायरॉईड ग्रंथीमध्ये साठवले जाते.
प्रश्न 3 – आपल्या शरीराच्या कोणत्या भागात सर्वात सक्रिय स्नायू आहेत?
उत्तर – आपल्या शरीरातील डोळ्याचे स्नायू सर्वात सक्रिय असतात.

प्रश्न 4 – कोणत्या ठिकाणी पाळीव कुत्रा पाळणे कायद्याच्या विरोधात आहे?
उत्तर- आईसलँडमध्ये कुत्रा पाळणे कायद्याच्या विरोधात आहे.
प्रश्न 5 – कोणता प्राणी आणि मानवी शरीराची हाडे समान आहेत?
उत्तर – मनुष्य व जिराफ यांच्या शरीरात समान हाडे असतात.
प्रश्न 6 – कोणता प्राणी जन्मानंतर बाळासारखा रडतो?
उत्तर – अस्वल जन्मानंतर बाळासारखे रडते.

प्रश्न 7 – जगातील सर्वात लांब नदी कोणती? (GK Updates)
उत्तर – जगातील सर्वात लांब नदी म्हणजे नाईल नदी.
प्रश्न 8 – एका मिनिटात हत्तीचे हृदय सरासरी किती वेळा धडधडते?
उत्तर- एका मिनिटात हत्तीचे हृदय सरासरी ३०० वेळा धडधडते.
प्रश्न 9 – सोन्याची शुद्धता (GK Updates) कोणत्या प्रमाणात परिभाषित केली आहे?
उत्तर- सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये परिभाषित केली जाते.
प्रश्न 10 – भारतातील कोणत्या राज्याला ‘मंदिरांची पवित्र भूमी’ म्हणतात?
उत्तर- तामिळनाडूला ‘मंदिरांची पवित्र भूमी’ म्हटले जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Israel-Hamas News : इस्राइलमध्ये भारतीयांची मागणी वाढतेय; एवढ्या मोठ्या पगारासाठी करायचं आहे फक्त ‘हे’ काम 

Israel-Hamas News (1)

करिअरनामा ऑनलाईन ।  दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय (Israel-Hamas News) पाश्चिमात्य देशात नोकरीसाठी जातात. इस्राइलमध्ये नोकरीसाठी जाणारे भारतीय देखील मोठ्या प्रमाणात आहेत. इथे IT क्षेत्रात नव्हे तर एका वेगळ्याच जॉबसाठी भारतीयांना खूप मोठी मागणी आहे. या कामाच्या मोबदल्यात भारतीयांना पगार देखील भरघोस दिला जातोय. येथे येवून तुम्हाला ‘केअरगिव्हर’चे काम करायचं आहे. हे काम कसं असेल; यासाठी पगार किती मिळतो हे आज आपण पाहणार आहोत.

वृध्द लोकांसाठी कुटुंबाला वेळ नाही
आपण पाहतो की, लोकांकडे जसे पैसे जास्त येतील; तसं ते आधुनिक होतात. परिणामी त्यांच्याकडे कुटुंबाला देण्यासाठी वेळ उरत नाही. अमेरिका, जपान या देशांसह इस्राइलला देखील ही गोष्ट लागू पडते. इस्राइलमध्ये सध्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडे वेळ नाही. येथील लोकांकडे पैसे आहेत पण वेळ नाही. त्यामुळे या लोकांना त्यांच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सेवा शुश्रूषेसाठी नर्सेसची गरज भासते. आपल्या घरातील ज्येष्ठांना सांभाळण्यासाठी तेथे भारतीय लोकांची मागणी वाढत आहे. त्यांना हे ‘केअरगिव्हर’ त्यांच्या घरातील ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी हवे असतात.

काय आहे काम (Israel-Hamas News)
इस्राइलमध्ये जेष्ठ नागरिकांची लोकसंख्या खूप वाढली आहे. युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक कमिशन फॉर युरोपच्या मते इस्राइलमध्ये साल 1950 नंतर 65 वयानंतरच्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. इथल्या घरामधील वृध्द व्यक्तींच्या देखभालीसाठी इस्राइल कुटुंबे ‘केअरगिव्हर’ भाड्याने घेत आहेत. यात भारतीय ‘केअरगिव्हर’ना जास्त मागणी आहे.  भारतीयांमधील संयम आणि व्यावसायिक कौशल्य गुणांमुळे ते भारतीय लोकांना पहिली पसंती देतात. सध्या येथे 14 हजार भारतीय हेच काम करीत आहेत.

मिळतो इतका पगार
इस्राइलमध्ये इंडीयन केअरगिव्हरना खूप मागणी आहे. त्यांना येथे सव्वा लाख ते तीन लाखापर्यंत पगार देण्यात येतो. येथे प्रत्येक तासाला किमान 900 रु.पगार दिला जातो. यासोबत राहण्याचा आणि खाण्याचा खर्च वेगळाच. शिवाय वैद्यकीय खर्चही मिळतो. येथे केवळ शुक्रवार दुपार ते शनिवार (Israel-Hamas News) दुपारपर्यंत सुटी मिळते. इतर देशांसाठी केअर गिव्हरसाठी नर्सिंगमध्ये ग्रॅज्युएशन आवश्यक असते. परंतू भारतीयांना यामध्ये सूट आहे. येथे त्यांना संवादासाठी केवळ हिब्रु भाषा शिकविण्यात येते. इतर देशात कोणत्याही देशात इंग्रजी भाषा येने गरजेचे असते. येथे तसे नाही. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक भारतीय येथे नोकरीला आहेत.

काही दिवसापूर्वी  इस्राइलवर पॅलेस्टाईनची अतिरेकी संघटना हमासने हल्ला केल्याने तेथे राहणारे भारतीय देखील संकटात आले आहेत. हे युद्ध जर लांबले तर (Israel-Hamas News) भारतीयांना देशात आणण्यासाठी वेगळी मोहिम राबवावी लागणार आहे. त्यामुळे तेल अवीव स्थित भारतीय दूतावास आता सतर्क झाला आहे. भारतीय नागरिकांना सुरक्षेचे आश्वासन दिले असून भारतीय दुतावासाने नागरिकांना कायम संपर्कात रहाण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Opportunities in Intelligence Bureau : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ‘या’ पदावर घडवता येईल करिअर; पहा निवड प्रक्रिया आणि पात्रतेविषयी… 

Career Opportunities in Intelligence Bureau

करिअरनामा ऑनलाईन । ज्या तरुण-तरुणींना (Career Opportunities in Intelligence Bureau) देशसेवा करायची आहे ते आर्मी, नेव्ही, एअर फोर्स या सेवेत सामील होण्यासाठी प्राधान्य देतात. अनेकांना माहित आहे की देशाच्या इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच गुप्तचर विभागात नोकरी मिळवणं हा तरुणांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुमच्यातही देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द आणि ध्यास असेल आणि अशा क्षेत्रात करिअर करायचे असेल ज्यामध्ये तुम्हाला उत्तम पगरासोबतच देशसेवा करण्याची संधी मिळेल, तर इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IB विभाग हा देशातील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी मिळवून तुम्हाला देशसेवेबरोबरच प्रसिद्धीही मिळवता येते. IB मध्ये अनेक पदांवर थेट भरती केली जाते ज्यामध्ये तुम्ही सहभागी होऊन या क्षेत्रात तुमचे करिअर घडवू शकता. पाहूया या विभागात कोणत्या पदावर भरती होते, यासाठी कोणती पात्रता आवश्यक असते याविषयी…

या पदांवर थेट होते भरती
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये एक कार्यकारी म्हणून सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO) या पदासाठी थेट भरती केली जाते. या भरतीमध्ये सहभागी होऊन तुम्ही इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी मिळवू शकता. या व्यतिरिक्त, उमेदवारांना एसएससी (SSC) द्वारे दरवर्षी आयोजित केलेल्या संयुक्त पदवी स्तर (CGL) भरती परीक्षेद्वारे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी देखील मिळू शकते.

IB ACIO भरती (Career Opportunities in Intelligence Bureau)
हे अधिकारी स्तरावरील पद आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराने किमान पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे. वयाची मर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षे निश्चित केले आहे. तर राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते. निवड प्रक्रिया पार करत असताना टियर 1 आणि टियर 2 या परीक्षा द्याव्या लागतात. दोन्ही टप्प्यांतील यशस्वी उमेदवारांना मुलाखत फेरी पार करावी लागते.
IB ASO भरती
SSO च्या पदांवर निवड होण्यासाठी, उमेदवारांना एकत्रित पदवी स्तर (CGL) परीक्षेत सहभागी व्हावे लागेल. ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते. या परीक्षेला पात्र होण्यासाठी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान (Career Opportunities in Intelligence Bureau) असावे. नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाते.
या भरतीमध्ये निवड होण्यासाठी, उमेदवारांना प्रथम टियर 1 परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यानंतर टियर 2 परीक्षेत सहभागी व्हावे लागेल. शेवटी उमेदवारांना मुलाखत प्रक्रियेत हजर राहावे लागते. सर्व प्रक्रियेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्ती केली जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : प्राध्यापकांसाठी राज्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात नवीन भरती सुरु; लगेच करा APPLY

Job Alert (72)

करिअरनामा ऑनलाईन । स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय (Job Alert) महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – स्वामी रामानंद तीर्थ सरकार वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई
भरले जाणारे पद –
1. प्राध्यापक
2. सहयोगी प्राध्यापक
पद संख्या – 14 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – PDF पहा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2023
E-Mail ID – [email protected]

नोकरी करण्याचे ठिकाण – बीड
भरतीचा तपशील – (Job Alert)

पद पद संख्या 
प्राध्यापक 05 पदे
सहयोगी प्राध्यापक 09 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक M.D./ M.S.
सहयोगी प्राध्यापक M.D./ M.S./ DNB

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन (दरमहा)
प्राध्यापक रु.२,००,०००/-
सहयोगी प्राध्यापक रु.१,८५,०००/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी (Job Alert) आवश्यक कागदपत्रासह अर्ज पाठवायचा आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://srtrmca.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPCB Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी नोकरी; राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळात भरतीसाठी अर्ज सुरु

MPCB Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई (MPCB Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई
पद संख्या – 4 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2023
नोकरीचे ठिकाण – मुंबई

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MPCB Recruitment 2023)
1. वातावरणीय वित्त तज्ञ
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लायमेट फायनान्समधील स्पेशलायझेशनसह अर्थशास्त्र/फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष
2. वातावरणीय शमन तज्ञ
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकी / पर्यावरण विज्ञान / हवामान बदल किंवा आपत्ती विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष.
3. वातावरणीय अनुकूलन तज्ञ
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकी/पर्यावरण विज्ञान,/स्थापत्य अभियांत्रिकी/शाश्वत विकास/हवामान बदल विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष.
4. प्रकल्प सल्लागार / अधिकारी
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पर्यावरण विज्ञान / पर्यावरणशास्त्र / जैवविविधता / रसायनशास्त्र / हवामान बदल / पृथ्वी विज्ञान विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष.

वय मर्यादा – जास्तीत जास्त ४० वर्षे
परीक्षा फी – फी नाही (MPCB Recruitment 2023)
मिळणारे वेतन –
1. वातावरणीय वित्त तज्ञ- 1,00,000/- रुपये दरमहा
2. वातावरणीय शमन तज्ञ – 75,900/- रुपये दरमहा
3. वातावरणीय अनुकूलन तज्ञ – 75,900/- रुपये दरमहा
4. प्रकल्प सल्लागार / अधिकारी – 75,900/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – mpcb.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahapareshan Recruitment 2023 : 10 वी, NCVT पास उमेदवारांना महापारेषण मध्ये नोकरीची संधी; त्वरीत करा अर्ज

Mahapareshan Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत (Mahapareshan Recruitment 2023) मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, वर्धा अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ (इलेक्ट्रीशियन), वायरमन, कोपा पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, वर्धा
भरले जाणारे पद –
1. शिकाऊ (इलेक्ट्रीशियन)
2. वायरमन
3. कोपा
पद संख्या – 57 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – आर्वी जि. वर्धा
वय मर्यादा – १८ ते ३८ वर्षे
भरतीचा तपशील – (Mahapareshan Recruitment 2023)

पद पद संख्या 
शिकाऊ (इलेक्ट्रीशियन) 22 पदे
वायरमन 22 पदे
कोपा 13 पदे


असा करा अर्ज –

1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Mahapareshan Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गत ‘ही’ पदे रिक्त

Job Notification (100)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, वित्त/संचालक, उपक्रम/संशोधन अधिकारी,अवर सचिव, स्वीय्य सहायक पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन
भरले जाणारे पद – संचालक, वित्त/संचालक, उपक्रम/संशोधन अधिकारी, अवर सचिव, स्वीय सहायक
पद संख्या – 14 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2023
E-Mail ID – [email protected]

भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
संचालक, वित्त 01
संचालक, उपक्रम 01
संशोधन अधिकारी 03
अवर सचिव 04
स्वीय सहायक 05

 

असा करा अर्ज –
1. या भरतीकरितासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या E-Mail ID वर सादर करावे.
3. अर्ज करण्यापुर्वी (Job Notification) उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mahades.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com