MPCB Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी नोकरी; राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळात भरतीसाठी अर्ज सुरु

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई (MPCB Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई
पद संख्या – 4 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2023
नोकरीचे ठिकाण – मुंबई

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MPCB Recruitment 2023)
1. वातावरणीय वित्त तज्ञ
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लायमेट फायनान्समधील स्पेशलायझेशनसह अर्थशास्त्र/फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष
2. वातावरणीय शमन तज्ञ
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकी / पर्यावरण विज्ञान / हवामान बदल किंवा आपत्ती विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष.
3. वातावरणीय अनुकूलन तज्ञ
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकी/पर्यावरण विज्ञान,/स्थापत्य अभियांत्रिकी/शाश्वत विकास/हवामान बदल विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष.
4. प्रकल्प सल्लागार / अधिकारी
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पर्यावरण विज्ञान / पर्यावरणशास्त्र / जैवविविधता / रसायनशास्त्र / हवामान बदल / पृथ्वी विज्ञान विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष.

वय मर्यादा – जास्तीत जास्त ४० वर्षे
परीक्षा फी – फी नाही (MPCB Recruitment 2023)
मिळणारे वेतन –
1. वातावरणीय वित्त तज्ञ- 1,00,000/- रुपये दरमहा
2. वातावरणीय शमन तज्ञ – 75,900/- रुपये दरमहा
3. वातावरणीय अनुकूलन तज्ञ – 75,900/- रुपये दरमहा
4. प्रकल्प सल्लागार / अधिकारी – 75,900/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – mpcb.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com