Home Blog Page 217

NTPC Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी NTPC देतंय नोकरीची संधी; ‘या’ पदांवर भरतीसाठी लगेच करा अर्ज

NTPC Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC Recruitment 2023) येथे कार्यकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – कार्यकारी
पद संख्या – 50 पदे
वय मर्यादा – 35 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech in EEE/ ECE/ Mechanical/ Instrumentation Engineering from any of the recognized boards or Universities
NTPC Vacancy 2023

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. (NTPC Recruitment 2023)
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
6. उमेदवारांनी आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्यायची आहे. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.ntpc.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MWRRA Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी MWRRA अंतर्गत भरती सुरु; ताबडतोब करा अर्ज

MWRRA Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र जल संसाधन नियामक (MWRRA Recruitment 2023) प्राधिकरण, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सदस्य (जल संसाधन अभियांत्रिकी) पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण, मुंबई
भरले जाणारे पद – सदस्य (जल संसाधन अभियांत्रिकी)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग आणि सदस्य सचिव, निवड समिती, तिसरा मजला, मंत्रालय, मुंबई-400 032
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – (MWRRA Recruitment 2023) 67 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – He/She has acquired a minimum educational qualification of bachelor’s degree of any recognized university or institute and experience of not less than twenty years with proven track record in their respective fields
मिळणारे वेतन – 1,82,200/- रुपये दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे (MWRRA Recruitment 2023) अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
5. मुदती नंतर प्राप्त झालेले अर्ज बाद ठरवण्यात येतील.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mwrra.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ESIC Recruitment 2023 : सरकारची मेगाभरती!! तब्बल 17,710 पदे भरणार; ESIC अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

ESIC Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (ESIC Recruitment 2023) अंतर्गत मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून बहु-कार्यकारी कर्मचारी, निम्न विभाग लिपिक, उच्च विभाग लिपिक/ उच्च विभाग लिपिक कॅशियर, मुख्य लिपिक/ सहाय्यक आणि सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक श्रेणी II/ अधीक्षक या पदांच्या तब्बल 17,710 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी
भरले जाणारे पद – बहु-कार्यकारी कर्मचारी, निम्न विभाग लिपिक, उच्च विभाग लिपिक/ उच्च विभाग लिपिक कॅशियर, मुख्य लिपिक/ सहाय्यक आणि सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक श्रेणी II/ अधीक्षक
पद संख्या – 17,710 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल)
E-Mail ID – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – निशांत कुमार, उपसंचालक, DPC सेल, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पंचदीप भवन, CIG रोड, नवी दिल्ली-110002.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2023 (जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसांच्या आत)
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे

भरतीचा तपशील – (ESIC Recruitment 2023)

पद पद संख्या 
बहु-कार्यकारी कर्मचारी 3341 पदे
निम्न विभाग लिपिक 1923 पदे
उच्च विभाग लिपिक/ उच्च विभाग लिपिक कॅशियर 6435 पदे
मुख्य लिपिक/ सहाय्यक 3415 पदे
सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक श्रेणी II/ अधीक्षक 2596 पदे


आवश्यक शैक्षणिक पात्रता –
(ESIC Recruitment 2023)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
बहु-कार्यकारी कर्मचारी Matriculation or equivalent
निम्न विभाग लिपिक
उच्च विभाग लिपिक/ उच्च विभाग लिपिक कॅशियर Any Degree, Knowledge of computer
मुख्य लिपिक/ सहाय्यक
सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक श्रेणी II/ अधीक्षक Any Degree, Knowledge of computer

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (ESIC Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज करताना आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.esic.gov.in/, https://maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : मुंबईत नोकरी!! राज्य वस्त्रोद्योग महामंडळ अंतर्गत ‘या’ पदावर भरती

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ (Job Alert) मर्यादित, मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार (वस्त्रोद्योग) पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित, मुंबई
भरले जाणारे पद – वरिष्ठ सल्लागार (वस्त्रोद्योग)
पद संख्या – 01 पद
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2023 (Job Alert)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित, कार्यालय क्र. 1, तळमजला, रेवा चेंबर्स, 31, सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, न्यू मरिन लाईन्स, मुंबई 400001

निवड प्रक्रिया – मुलाखती
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 62 वर्षे
असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जा सोबत उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://mstc.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषद भरती परीक्षेचा तिसरा टप्पा ‘या’ तारखेपासून; पाच संवर्गासाठी होणार परीक्षा

ZP Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद भरतीचा (ZP Recruitment 2023) तिसरा टप्पा दि. 1 नोव्हेंबरपासून सुरु होत असून ही भरती परीक्षा दोन दिवस चालणार आहे. यामध्ये विविध विभागांतील पाच संवर्गासाठी परीक्षा होणार आहे. सातारा जिल्ह्यातही तीन केंद्रांवर या परीक्षा पार पडणार आहेत.

राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदेत नोकर भरती सुरु केली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून हजारो पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेतील सुमारे 1972 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी दि.7 ऑक्टोबरपासून परीक्षा सुरु झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात लेखा वरिष्ठ सहायक, दोरखंडवाला, कृषी आणि सांख्यिकी विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणी लघुलेखक, लेखा कनिष्ठ सहायक या पदांसाठी परीक्षा झाली. त्यानंतर परीक्षेचा दुसरा टप्पाही पार पडला. आता तिसरा टप्पा दि. 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

तिसऱ्या टप्प्यात ‘या’ पदांसाठी होणार परीक्षा (ZP Recruitment 2023)
भरतीच्या तिसऱ्या टप्प्यात दि. 1 नोव्हेंबरला कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी आणि कनिष्ठ आरेखक या पदांसाठी परीक्षा होणार आहेत. तर दि. 2 नोव्हेंबरला शिक्षण विस्तार अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी परीक्षा होत आहेत. सातारा जिल्ह्यात यासाठी सातारा शहरात दोन आणि कराड येथे एक परीक्षा केंद्र आहे. तसेच या परीक्षेसाठी राज्यातील कोणताही उमेदवार पसंदी दिलेल्या जिल्ह्यात जाऊन तेथील केंद्रावर जिल्हा परिषदेच्या पदासाठी भरती परीक्षा देऊ शकतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Business Success Story : बर्फ विकण्याची भन्नाट बिझनेस आयडिया; उभी राहिली करोडोंची कंपनी; वाचा दोन मित्रांची गोष्ट

Business Success Story of Dr Cubes

करिअरनामा ऑनलाईन । मित्रांनी एकत्र येवून एखादी गोष्ट (Business Success Story) करायचं ठरवलं की दुनिया इकडची तिकडे होवू शकते.  अशाच दोन मित्रांना आज आपण भेटणार आहोत. नावेद मुन्शी आणि प्रमोद तिरलापूर या दोन मित्रांची ही गोष्ट आहे. या दोघांनी मिळून आईस क्यूब्स कंपनी सुरू केली आणि आज ही कंपनी कोट्यवधींची उलाढाल करत आहे. त्यांच्या कंपनीचं नांव आहे. ‘Dr Cubes’. जाणून घेवूया, की या कंपनीच्या संस्थापकांनी केवळ बर्फ विकून कोट्यवधींची कंपनी कशी उभी केली याविषयी…
आज आपल्या देशात दररोज नवनवीन स्टार्टअप सुरू होत आहेत. हे पाहून इतरांनाही स्वत:चे स्टार्टअप सुरू करण्याची प्रेरणा मिळत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी स्टार्टअप्सच्या दुनियेची एक गोष्ट घेऊन आलो आहोत, ज्यात या स्टार्टअपच्या संस्थापकांनी बर्फ विकून कोट्यवधींची कंपनी उभी केली आहे. ‘Dr Cubes’ कंपनीचे व्हॅल्युएशन सुमारे 5.33 कोटी रुपये आहे.

कशी सुचली बिझनेस आयडिया? (Business Success Story)
‘Dr Cubes’ या स्टार्टअपची सुरुवात 2017 मध्ये दोन मित्रांनी केली होती. नावेद मुन्शी आणि प्रमोद तिरलापूर हे या कंपनीचे दोन संस्थापक आहेत. बाजारात कोणतीही कंपनी चांगल्या प्रतीच्या आणि स्वच्छ Ice Cubes पुरवत नव्हती; याची वस्तूची मागणी पाहून या दोघांनी Ice Cubes विकण्याचा विचार सुरु केला आणि या स्टार्टअपची सुरुवात झाली.
यावेळी या दोन मित्रांनी असा विचार केला की अशी कंपनी का सुरू करू नये ज्यामध्ये आपण लोकांना ताजे आणि स्वच्छ Ice Cubes देऊ शकू. या कल्पनेमुळे दोघांनी Dr Cubes कंपनी सुरू केली, जिथे त्यांनी ग्राहकांना ताजे आणि स्वच्छ बर्फाचे तुकडे देण्यास सुरवात केली. Dr Cubes ग्राहकांना विविध प्रकारचे Ice Cubes पुरवतात. ज्यामुळे ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण होतात; बर्फाच्या उत्तम दर्जमुळे त्यांचा ग्राहकही उत्पादनावर खुष आहे.

कंपनीचा करोडोंत आहे टर्नओव्हर
नावेद मुन्शी आणि प्रमोद तिरलापूर यांनी सांगितले की, त्यांनी 2019 मध्ये त्यांच्या व्यवसायातून  50 लाख रुपये कमावले होते. 2020 मध्ये ते 1.2 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले.कोरोना महामारीच्या (Business Success Story) काळात त्यांच्या व्यवसायावर प्रचंड परिणाम झाला असला तरी त्यांनी आर्थिक वर्ष 2022 मध्ये 1.10 कोटी रुपये कमावले.
2023 मध्ये 2.5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. कंपनीला आवश्यक फंड न मिळाल्यानंतरही त्यांनी आपले काम सुरुच ठेवले आहे. आज ही कंपनी खूप वेगाने वाढत आहे. तसेच आज डॉ. क्युब्स कंपनीचे मूल्य कोट्यवधी रुपये झाले आहे. एकूणच काय या दोन मित्रांनी सुरु केलेला बिझनेस अनेक तरुणांना प्रेरणा देणारा आहे.

‘शार्क टँक इंडिया शो’मध्ये सहभाग (Business Success Story)
आपणाला प्रसिद्ध शार्क टँक इंडिया शो (Shark Tank India Show) माहित आहेच. जिथे नवीन स्टार्टअप संस्थापक त्यांच्या व्यवसाय कल्पनांच्या मदतीने त्यांच्या स्टार्टअपसाठी निधी मिळवतात. नावेद मुन्शी आणि प्रमोद तिरलापूर हे दोघे या सहोमध्ये सहभागी झाले होते. या शो मध्ये आल्यानंतर या दोघांनी सर्व शार्कला त्यांच्या व्यवसायासाठी ८० लाख रुपयांचा निधी मागितला होता, त्यासाठी त्यांनी आपल्या कंपनीचा 15 टक्के हिस्सा शार्कला दिला होता. परंतु शार्क्सने तसे करण्यास नकार दिला. कारण देताना ते म्हणाले की हा एक नवीन व्यवसाय आहे आणि हा स्टार्टअप जगातील सर्व मोठ्या कंपन्या सहजपणे कॉपी करू शकतात आणि व्यवसायात आपल्याला मागे टाकू शकतात.

‘Dr Cubes’ हे नाव का दिलं?
बर्फाच्या उत्पादनाला Dr Cubes हे नाव देण्यात आलं आहे. ही कंपनी बर्फ तयार करताना स्वच्छता आणि शुद्धतेबाबत काळजी घेते. इथे तयार होणारे बर्फाचे तुकडे पेयासह इतर वापरासाठी देखील उच्च दर्जाचे आहेत याची खात्री करण्यासाठी या बर्फाच्या तुकड्यांना कठोर अशा तीन चाचण्या पार कराव्या लागतात. यामुळे या उत्पादनाला ‘Dr Cubes’ हे नाव देण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : 12 वी ते ग्रॅज्युएटसाठी राज्याच्या ‘या’ महापालिकेत नवीन भरती सुरु; पटापट पाठवा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । पनवेल महानगरपालिका येथे रिक्त (Job Notification) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून स्टाफ नर्स, हेल्थ केअर वर्कर, LHV, लॅब टेक्निशियन पदांच्या एकूण 53 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – पनवेल महानगरपालिका
भरले जाणारे पद – स्टाफ नर्स, हेल्थ केअर वर्कर, LHV, लॅब टेक्निशियन
पद संख्या – 53 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – पनवेल महानगरपालिका, आरोग्य विभाग, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – 410206
नोकरी करण्याचे ठिकाण – पनवेल

भरतीचा तपशील – (Job Notification)

पदाचे नाव पद संख्या
स्टाफ नर्स (महिला) 22
स्टाफ नर्स (पुरुष) 05
आरोग्य सेविका 20
LHV 01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 05

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. स्टाफ नर्स – B.Sc (नर्सिंग)/ GNM + MNC रेजिस्ट्रेशन.
2. आरोग्य सेविका – ANM + MNC रेजिस्ट्रेशन. (Job Notification)
3. LHV – B.Sc (नर्सिंग)/ GNM + MNC रेजिस्ट्रेशन.
4. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 12 वी + डिप्लोमा + महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल रेजिस्ट्रेशन.
वय मर्यादा – 21 ते 65 वर्षे.
फी –

प्रवर्ग
फी
खुला 150/- रुपये.
मागासवर्गीय 100/- रुपये.


काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.panvelcorporation.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

FSSAI Recruitment 2023 : 12वी ते डिग्री धारकांसाठी सरकारी नोकरी!! FSSAI मध्ये निघाली नवीन भरती

FSSAI Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक (FSSAI Recruitment 2023) प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खासगी सचिव, वैयक्तिक सचिव, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी), सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI)
भरले जाणारे पद – प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खासगी सचिव ग्रुप-बी, वैयक्तिक सचिव ग्रुप-बी, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) ग्रुप-बी, सहाय्यक, ग्रुप-बी, कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ ग्रुप सी
पद संख्या – 42 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 ऑक्टोबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2023
अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख – 04 डिसेंबर 2023
अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक (भरती), FSSAI मुख्यालय, 3रा मजला, FDA भवन, कोटला रोड, नवी दिल्ली

वय मर्यादा – 56 वर्षे
भरतीचा तपशील – (FSSAI Recruitment 2023)

पद पद संख्या 
प्रशासकीय अधिकारी 08 पदे
वरिष्ठ खासगी सचिव 03 पदे
वैयक्तिक सचिव 14 पदे
सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) 01 पदे
सहाय्यक 06 पदे
कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ 10 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारी
  • Bachelor’s Degree from a recognized University or Institution.
  • Desirable: – Master Degree or MBA (Personnel or Human Resource Management or Finance) or CA or CS or ICWA from recognized university or institution.
वरिष्ठ खासगी सचिव Bachelor’s Degree from a recognized University or Institution.
वैयक्तिक सचिव Bachelor’s Degree from a recognized University or Institution.
सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) possessing B.Tech or M.Tech in Computer Science or any other related Engineering Discipline or MCA or Bachelor’s Degree in Relevant field.
सहाय्यक Bachelor’s Degree from a recognized University or Institution
कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ 12th Standard or equivalent examination from a recognized Board or University.

 

मिळणारे वेतन – (FSSAI Recruitment 2023)

पद वेतन (दरमहा)
प्रशासकीय अधिकारी (Pay Level–8 of 7th CPC) (₹.47,600- 1,51,100)
वरिष्ठ खासगी सचिव (Pay Level -08 of 7th CPC) (₹. 47,600- 1,51,100)
वैयक्तिक सचिव (Pay Level-07 of 7th CPC) (₹ 44,900- 1,42,400)
सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) (Pay Level – 07 of 7th CPC) (₹ 44,900- 1,42,400)
सहाय्यक (Pay Level-06 of 7th CPC) (₹ 35,400 – 1,12,400)
कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ (Pay Level 02 of 7th CPC) (₹.19,900- 63,200)

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावा.
3. अर्ज सादर करण्याच्या (FSSAI Recruitment 2023) सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. ऑनलाईन अर्ज 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील.
5. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.
6. अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.fssai.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Satara Recruitment 2023 : सातारा जिल्हा परिषदेत ‘या’ पदांवर भरती; जाणून घ्या पात्रता

ZP Satara Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत (ZP Satara Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून IFC ब्लॉक अँकर सेवादाता पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली  दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, सातारा
भरले जाणारे पद – IFC ब्लॉक अँकर सेवादाता
पद संख्या – 02 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
वय मर्यादा – 43 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ZP Satara Recruitment 2023)
उमेदवाराकडे किमान कृषी व कृषी संलग्न पदवी जसे कि कृषी तंत्रज्ञान BSC Agriculture, Agriculture or or BSC Horiculture, or B. Tec . In BSc In Fishery, BSc in Forestry, Bachelor of veterinary science and Bachelor of science in Animal husbandry, Bachelor of Business Administration, पदवी धारक असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – 20,000/- रुपये दरमहा
असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे (ZP Satara Recruitment 2023) अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
5. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.zpsatara.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : अवघ्या 21 व्या वर्षी अमेरिका गाठली; आधी केलं वेटरचं काम; आता सांभाळते 2 लाख कोटींची कंपनी

Success Story of Yamini Rangan

करिअरनामा ऑनलाईन । यामिनी रंगन यांचे नाव तंत्रज्ञान क्षेत्रातील (Success Story) प्रतिष्ठित सीईओ म्हणून घेतले जाते. यामिनी अमेरिकेत 25.66 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2 लाख कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या कंपनीची प्रमुख आहे. त्या HubSpot या विकसक आणि सॉफ्टवेअर फर्मच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी अमेरिकेत पोहोचलेल्या यामिनीने यशाचा हा प्रवास कसा ठरवला ते जाणून घेऊया.

फुटबॉल स्टेडियमवर केलं वेटरचं काम (Success Story)
वयाच्या 21 व्या वर्षी यामिनी तिची मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भारतातील एका छोट्या गावातून अमेरिकेला गेली. तिने आज जे यश मिळवलं आहे त्याचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. यामिनी रंगनला करिअरच्या सुरुवातीच्या काळात खूप अडथळे पार करावे लागले आहेत. एक महिना अमेरिकेत राहिल्यानंतर यामिनीच्या पाकिटात फक्त $150 उरले होते.  आता तिला कोणत्याही परिस्थितीत काम मिळवण्याची गरज होती.
यामिनीने तिची पहिली नोकरी अटलांटामधील फुटबॉल स्टेडियममध्ये केली, जिथे तिने एका रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम केले. यामिनी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांना नेहमीच स्वतंत्रपणे राहायचे होते आणि आपल्या घरी परत जायचे नव्हते किंवा पालकांकडून पैशाची मदतही घ्यायची नव्हती.

उच्च शिक्षण अन् 1 वर्षातच मिळालं प्रमोशन 
यामिनी रंगन हिने भारथियार युनिव्हर्सिटी, कोईम्बतूर येथून (Success Story) कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यापूर्वी बर्कले येथून एमबीए केले. त्यांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत, त्यांनी SAP, Lucent, Workday आणि Dropbox सारख्या IT कंपन्यांसाबत काम केले. 2020 मध्ये, त्या HubSpot मध्ये मुख्य ग्राहक कार्यकारी म्हणून रुजू झाल्या. एका वर्षाच्या आत तिला 2021 मध्ये CEO पदावर पदोन्नती मिळाली आणि यामिनी रंगन जगातील यशस्वी महिला CEO च्या यादीत सामील झाल्या. त्यांनी 2019 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील व्यवसायातील सर्वात प्रभावशाली महिला यासारखे अनेक पुरस्कार जिंकले आहेत. यामिनी रंगन हे नाव तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठित सीईओ म्हणून घेतले जाते. यामिनी अमेरिकेमध्ये 25.66 अब्ज डॉलर म्हणजेच 2 लाख कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या कंपनीचे नेतृत्व करत आहेत.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com