Home Blog Page 190

Shikshak Bharti 2023 : शिक्षकांसाठी महत्वाची बातमी!! दोन महिन्यांत शिक्षक भरती प्रक्रिया सुरु होणार

Shikshak Bharti 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । येत्या दोन महिन्यांत राज्यात (Shikshak Bharti 2023) शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल; असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. शाळा बंद करण्याचे सरकारचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे शाळा बंद होणार नाहीत. अंगणवाडी असलेल्या ठिकाणी ज्युनिअर केजी, सीनिअर केजी सुरु केली जाणार आहे; असंही त्यांनी सांगितलं.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी राज्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री केसरकर बोलत होते. जयंत पाटील यांनी लहान शाळा, एक शिक्षकी शाळा बंद करण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप केला होता. शाळा बंद केल्यास शाळाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. सत्ताधारी भाजपचे ॲड. आशिष शेलार यांनीही फक्त पंधरा दिवसांत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आल्याकडे लक्ष वेधले.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी शिक्षकांची पदे कधी भरणार, असा प्रश्न उपस्थित केला. यशोमती ठाकूर यांनी स्थलांतरित मुलांचाही प्रश्न उपस्थित केला. राज्यात 3 ते 18 वर्षे वयोगटातील (Shikshak Bharti 2023) शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात ‘शाळेत चला अभियान’ राबविण्यात येईल, असेही केसरकर यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CSIR Recruitment 2024 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी CSIR अंतर्गत नोकरीची संधी; 444 पदे रिक्त

CSIR Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन (CSIR Recruitment 2024) परिषदेने विभाग अधिकारी आणि सहाय्यक विभाग अधिकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीच्या माध्यमातून 444 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

संस्था – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद
भरली जाणारी पदे –
1. सेक्शन ऑफिसर (SO) – 76 पदे
2. असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) – 368 पदे
पद संख्या – 444 पदे (CSIR Recruitment 2024)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
वय मर्यादा –
खुला 18 ते 33 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट
मागासवर्गीय 05 वर्षे सूट
फी – (CSIR Recruitment 2024)
1. खुला/ ओबीसी/ EWS – 500/- रुपये.
2. मागासवर्गीय/ माजी सैनिक/ PwD/ – फी नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.csir.res.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Fair 2023 : सातारा जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात होतोय रोजगार मेळावा; 1200 उमेदवारांना मिळणार नोकरी

Job Fair 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील बेरोजगार (Job Fair 2023) उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 15 डिसेंबर 2023 रोजी हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यातून सुमारे 1 हजार 200 पेक्षा जास्त रिक्त पदे भरली जाणार आहेत. पाहूया तपशील…

संस्था – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा
मेळावा – पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
पद संख्या – 1200 पदे (Job Fair 2023)
मेळाव्याची तारीख – दि. 15 डिसेंबर 2023
मेळाव्याचा पत्ता – (Job Fair 2023)
कृष्णाकाठ इन्स्ट्ट्यिुट फॉर स्किल डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्च, कराड नगरपरिषद जवळ, कराड

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 8 वी, 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर, कुशल, अर्धकुशल कामगार
संपर्क क्रमांक – (02162) 239938
(सूचना – इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थितरहायचे आहे. काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवहनही जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.)

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिकृत वेबसाईट – https://rojgar.mahaswayam.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CBSE Board Exam Time Table : ‘या’ तारखेला होणार इयत्ता 10 वी बोर्डाची परीक्षा

CBSE Board Exam Time Table

 

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाने इयत्ता 10 वीच्या (CBSE Board Exam Time Table) बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दि. 15 फेब्रुवारी 2024 पासून या परीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचं वेळापत्रकही CBSE कडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. विद्यार्थी CBSE च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वेळापत्रक तपासू शकतात.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HAL Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! HAL अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; ताबडतोब करा अर्ज

HAL Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत अभियंता (ग्राहक सेवा) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited)
भरले जाणारे पद – अभियंता (ग्राहक सेवा)
पद संख्या – 04 पदे (HAL Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक (एचआर), एचआर विभाग, दुरुस्ती विभाग, बंगलोर कॉम्प्लेक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, पोस्ट बॅग क्रमांक १७८६, बंगलोर – ५६० ०१७.

वय मर्यादा – 35 ते 38 वर्षे
अर्ज फी – Rs.500/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (HAL Recruitment 2023)
A degree in Engineering/ Technology or its equivalent in Mechanical Discipline from Institutes / Universities recognized by appropriate statutory Authorities
मिळणारे वेतन – Rs.40,000/- ते 1,40,000/- दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाच्या नमुन्यासाठी येथे CLICK करा – CLICK
अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SAIL Recruitment 2023 : 10 वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये नोकरीची मोठी संधी!!

SAIL Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत (SAIL Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) पदांच्या एकूण 92 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक)
पद संख्या – 92 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023
वय मर्यादा –
SC/ST – 33 वर्षे
OBC (NCL) – 31वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SAIL Recruitment 2023)
Degree in Engineering with 65% marks (average of all semesters, irrespective of the weightage given to any particular year by the Institute/ University), in relevant Engineering discipline of Chemical, Civil, Electrical, Instrumentation, Mechanical, Metallurgy and Mining.
Salary Details For SAIL MT Notification 2023
मिळणारे वेतन –
Will be offered Basic Pay of Rs. 50,000/- p.m. in the pay scale of Rs. 50000-1,60000/-. On successful completion of training of one year, the Management Trainees (Technical) will be designated as Assistant Manager in El grade and placed in the scale of pay of Rs. 60,000-1,80,000/-.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही मध्यमातून (SAIL Recruitment 2023) आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.sail.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maha Food Recruitment 2023 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!! राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात भरती सुरु

Maha Food Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी (Maha Food Recruitment 2023) पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 345 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग
पद संख्या – 345 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. पुरवठा निरीक्षक, गट-क – 324 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर, अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
2. उच्चस्तर लिपिक, गट-क – 21 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक)
वय मर्यादा – (Maha Food Recruitment 2023)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.
2. मागासवर्गीय/अनाथ/आर्थिक दुर्बल घटक – 05 वर्षे सूट

परीक्षा फी –
अराखीव – ₹1000/-
मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ – ₹900/-
माजी सैनिक – फी नाही (Maha Food Recruitment 2023)
मिळणारे वेतन –
1. पुरवठा निरीक्षक, गट-क – रु. 29, 200/- ते 92, 300/- दरमहा
2. उच्चस्तर लिपिक, गट-क – रु 25,500/- ते 81,100/- दरमहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – mahafood.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Success Story : सामान्य शेतकऱ्याचा मुलगा बनला कृषी अधिकारी; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली MPSC

MPSC Success Story of Aadesh Khatik

करिअरनामा ऑनलाईन । मनात जिद्द आणि मेहनत (MPSC Success Story) करायची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागत नाही. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत या तरुणाने मनाशी पक्कं ठरवलं आणि अधिकारी होण्यासाठी त्याने MPSC च्या परीक्षेचा फॉर्म भरला. त्याचे प्रयत्न इतके प्रामाणिक होते की त्यामुळे तो परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात पास झाला आणि अधिकारी बनला.

पहिल्या प्रयत्नात बनला तालुका कृषी अधिकारी
बाभूळगाव (ता.येवला) येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी घातली. आदेश नंदकुमार खाटीक असं या तरुणाचं नांव आहे. तो जगदंबा शिक्षण संस्थेच्या बाभूळगाव कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.

 पालक आहेत सामान्य शेतकरी (MPSC Success Story)
त्याची MPSC मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी विभागात तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. आदेश हा मुळचा पाथरवाला (ता. नेवासा जि. अहमदनगर) येथील रहिवासी असून त्याचे पालक शेती करतात. आदेशने कृषी महाविद्यालय, बाभूळगाव येथून कृषी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सध्या तो कृषी महाविद्यालय,पुणे येथे कृषी किटकशास्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. बाभूळगाव येथे शिक्षण घेत असतानाच पदवीच्या तिसऱ्या वर्षापासून तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवेचा अभ्यास करत होता. पुणे येथे M. Sc. ॲग्रीची तयारी करतानाच त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. यादरम्यान त्याने स्पर्धा परीक्षा देऊन त्याने MPSCमध्ये मोठं यश मिळवलं आहे.

आदेशच्या यशामुळे जगदंबा संस्थेच्या नावलौकिकात (MPSC Success Story) भर पडली आहे. आदेशच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, संचालक रूपेश दराडे, कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.व्ही.डी. शेंडे, प्राचार्य डॉ. डी.पी. कुळधर, उपप्राचार्य डॉ. एस. डी. म्हस्के व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UK Scholarship 2024 : तुम्हालाही लंडनमध्ये अभ्यास करायचाय?? तर मग अशी मिळवा 5.21 लाखाची स्कॉलरशीप

UK Scholarship 2024

करिअरनामा ऑनलाईन । जर तुमचेही लंडनमधून (UK Scholarship 2024) शिक्षण घेण्याचे स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. ब्रिटनमधील दुसरे सर्वात मोठे विद्यापीठ, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन (UCL) ने 100 भारतीय विद्यार्थ्यांना भरघोस अशी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 5000 पौंड म्हणजेच 5.21 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे. नुकतीच नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयात UCL द्वारे या शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे.

असं आहे स्कॉलरशीपचे स्वरुप
‘यूसीएल इंडिया एक्सलन्स स्कॉलरशिप’ या नावाने सुरु झालेल्या या शिष्यवृत्तीअंतर्गत 100 भारतीय विद्यार्थ्यांना लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 5000 पौंड (म्हणजे 5.21 लाख रुपये) आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनतर्फे देण्यात येणारी ही शिष्यवृत्ती केवळ त्या विद्यार्थ्यांनाच दिली जाईल जे विद्यापीठाच्या पीजी (PG) अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. ही शिष्यवृत्ती 3 वर्षात दिली जाईल यापैकी पहिल्या वर्षासाठी म्हणजेच 2024-25 साठी, 33 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल, तर उर्वरित 67 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुढील 2 शैक्षणिक वर्षांसाठी दिली जाईल.

‘या’ विद्यार्थ्यांना घेता येणार लाभ (UK Scholarship 2024)
युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनतर्फे देण्यात येणारी ही शिष्यवृत्ती केवळ त्या विद्यार्थ्यांनाच दिली जाईल जे विद्यापीठाच्या पीजी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. विद्यार्थ्यांना मदतीची रक्कम एका वर्षात दिली जाईल, मात्र अभ्यासक्रमाचा कालावधी 2 वर्षांचा असेल तर ही रक्कम दोन्ही वर्षांत 50-50 टक्के दिली जाईल. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की ही शिष्यवृत्ती UCL मधील दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांसाठी वैध नाही आणि त्यांना अभ्यासासाठी लंडन कॅम्पसमध्ये जावे लागेल.

ही आहे आवश्यक पात्रता
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या NIRF रँकिंगमध्ये पहिल्या 100 मध्ये असलेल्या संस्थेतून बॅचलर पदवी मिळवलेले किंवा या वर्षी अंतिम वर्ष/सेमिस्टरमध्ये असलेले (UK Scholarship 2024) फक्त तेच भारतीय नागरिक विद्यार्थी CL India Excellence Scholarship साठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी आणि इतर तपशीलांसाठीअधिकृत वेबसाइटला भेट द्या.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करायचा?
ज्या विद्यार्थ्यांना UCL शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा आहे ते युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या अधिकृत वेबसाईट ucl.ac.uk वर प्रदान केलेल्या ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रिया 1 डिसेंबर 2023 पासून सुरु झाली असून इच्छुक विद्यार्थी दि. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करु शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

How to Become TTE in Railway : रेल्वेमध्ये TTE कसे व्हायचे? काय आहे पात्रता आणि किती मिळतो पगार?

How to Become TTE in Railway

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेची नोकरी मिळाली म्हणजे (How to Become TTE in Railway) आयुष्यभराची चिंता मिटल्यासारखे आहे. ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक म्हणजेच TTE पदावर सरकारी नोकरी मिळवणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. तुम्हालाही रेल्वेमध्ये TTE होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर त्यासाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे.

आपल्या देशात रेल्वेत नोकरी करणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते. बहुतांश (How to Become TTE in Railway) तरुणांचे रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. दरवर्षी रेल्वेत विविध विभागांतर्गत भरती केली जाते. यापैकी एक पद टीटीईचे आहे. TTE हे पद प्रवासी तिकीट परीक्षक म्हणूनही ओळखले जाते. तुम्हालाही टीटीई व्हायचे असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.

TTE (Travelling Ticket Examiner) होण्यासाठी काय आहे आवश्यक पात्रता
1. प्रवासी तिकीट परीक्षक (TTE) पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
2. TTE होण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह 12वी पास केलेली असावी.
उमेदवाराने किमान 50 टक्के गुणांसह देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
3. शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्यासोबतच, अर्ज करताना उमेदवाराचे किमान वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

अशी होणार निवड (How to Become TTE in Railway)
टीटीई होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेत सहभागी व्हावे लागते.
या परीक्षेत उमेदवारांकडून एकूण 150 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
प्रश्नपत्रिकेत गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि सामान्य तर्क या विषयांचे प्रश्न विचारले जातील. परीक्षेतील कामगिरीच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी इत्यादींमध्ये भाग घ्यावा लागेल.
एवढा मिळतो पगार
TTE पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार 9,400 रुपये ते 35,000 रुपये दरमहा पगार दिला जातो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com