Home Blog Page 188

Success Story : तिचे खाण्या-पिण्याचे होते वांदे; मेहनतीने सेल्फ स्टडी केला अन् अधिकारी झाली; आईलाही दिलं उत्तम शिक्षण

Success Story of ARTO Ijya Tiwari

करिअरनामा ऑनलाईन । तुमच्या मनात काहीही (Success Story) करण्याची जिद्द असेल आणि परिश्रम घेण्याची तयारी असेल तर यश मिळवणं अवघड नाही. इज्या तिवारी यांनी हे म्हणणं त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध केलं आहे. आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जात त्यांनी मेहनतीच्या बळावर आई आणि वडिलांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. इज्या यांची जिल्ह्यात पहिली  महिला एआरटीओ (ARTO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज आपण त्यांची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया.

घर गेले आणि बचतीचे पैसेही संपले
लखनौ येथील रहिवासी असलेल्या इज्या तिवारी यांची जिल्ह्यात प्रथमच परिवहन विभागाची महिला अधिकारी म्हणजेच एआरटीओ (ARTO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यावेळी इज्या तिवारी ८वीत शिकत होत्या. वडिलांच्या आजारपणात घरातील सर्व बचत खर्च झाली. एक वेळ अशी आली की आपलीच माणसे आपल्याला सोडून गेली आणि वडिलोपार्जित घरही राहिले नाही. त्यांच्या कुटुंबाला भाड्याच्या घरात रहावे लागले. वडील गेल्यानंतर आईची मनस्थिती पूर्ण बिघडली होती. घरात जेवणासाठीही पैसे नव्हते. ही परिस्थिती मुलगी स्वतः आईचा आधार बनली. इज्या तिवारी ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे.

नोकरी करत असताना केला अभ्यास (Success Story)
इज्या सांगते; “आयुष्याचे सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. वडील गेल्यानंतर सर्व काही बदलले आणि मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. आमच्या जवळचे बरेच लोक आम्हाला सोडून गेले. पण मी हार मानली नाही. ब्राइट लाइन इंटर कॉलेजमध्ये शिक्षक असलेल्या माझ्या गुरूंनी माझ्याकडे पैसे नसतानाही मला मोफत शिक्षण दिले. मला लिहायला आणि वाचायला आवडायचे. वयाच्या 12 व्या वर्षी माझा संघर्ष सुरू झाला. खूप कष्ट करून बँकेत नोकरी लागली. यानंतरही मी माझा अभ्यास सुरू ठेवला. दिवसभर काम करुन बँकेतून घरी आल्यानंतर मी रात्री तासनतास अभ्यास करायचे. मी 4 वर्षे खूप मेहनत घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले.”

सेल्फ स्टडीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात मिळाले यश
कॉलेज करत असताना इज्या शिकवण्या घेत असे. तिने तिच्या आईलाही पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. ती संगते; “माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. वडिलांच्या मृत्यूनंतर आई उद्ध्वस्त झाली होती. मी अनेक संकटांना तोंड देत आईची काळजी घेतली. मुली ऐवजी आई बनूनच आईची सेवा केली. 2014 मध्ये बँकेत नोकरी मिळाली. पण माझं एवढयावर समाधान होत नव्हतं. मला सरकारी सेवेत सामील (Success Story) व्हायचं होतं. यासाठी मी UPPCS परीक्षेची तयारी सुरू केली. मी कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लास लावला नाही. माझा सेल्फ स्टडीवर भर होता. तसेच ऑनलाईनन आणि इतर सोर्सचा  आधार घेवून अभ्यास सुरु ठेवला. याचा परिणाम म्हणून 2018 च्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले.”

सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगते
इज्या तिवारी सांगतात की उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची किंवा कोणत्याही सरकारी परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना काही गोष्टींची विशेष काळजी (Success Story) घ्यावी लागते. उमेदवारांनी अभ्यास करताना वेळेचे योग्य नियोजन करावे. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले पण त्यांनी अभ्यास चालूच ठेवला. घरची जबाबदारी पार पाडत नोकरी करत असताना त्यांनी दिवसातील 5 ते 6 तास मन लावून अभ्यास केला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत निराश न होता पूर्ण समर्पण आणि मनापासून तयारी करा; यश नक्कीच मिळेल; असा सल्ला त्या देतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maharashtra News : धक्कादायक!! चक्क बेंचवर मोबाईल ठेवून सुरु होती कॉपी; राज्यातील ‘या’ कॉलेजमधील प्रकार उघड

Maharashtra News (3)

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण क्षेत्रातील धक्कादायक (Maharashtra News) घटना महाराष्ट्रात उघड झाली आहे. कॉपी करण्याची ही घटना एखाद्या चित्रपटातील कथा वाटावी, या पद्धतीने सुरु आहे. कॉपी करणारे विद्यार्थी शाळेत विद्यार्थी नसून ते चक्क  इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार मराठवाड्यातून समोर आला आहे. मराठवाड्यातील परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सामूहिक कॉफीचा प्रकार उघड झाला आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

चक्क मोबाईल बाकावर ठेवून सुरु होती कॉपी
परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात चक्क मोबाईल समोर ठेवून कॉपी सुरु होती. सामूहिक कॉपीचा हा प्रकार नुकताच उघड झाला आहे. वर्गातील अनेक परीक्षार्थी कॉपी करताना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले पाहायला मिळत आहेत. कॉपीचा हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयातील जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. परिणामी परीक्षा केंद्रावरील केंद्र प्रमुखाला तातडीने कार्यमुक्त करण्यात आले आहे. नागनाथ आप्पा हलगी या महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

शंभर ते दीडशे मोबाईल जप्त करण्यात आले
नागनाथ हालगे आप्पा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट तपासल्यानंतर बहुतांश डमी विद्यार्थी परीक्षेला बसल्याचे दिसून आले. बहुतांश विद्यार्थ्यांकडे (Maharashtra News) मोबाईल असल्याचे आढळून आले. या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दरम्यान सर्रास मोबाईलचा वापर केला. सुमारे शंभर ते दीडशे मोबाईल सकाळच्या सत्रात जप्त करण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये प्रत्येक हॉल तपासणी करत असताना सर्रास मोबाईलचा प्रकार आढळून आला.

प्राध्यापकांसमोरच सुरु होती कॉपी (Maharashtra News)
परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरावर बंदी असून सुद्धा येथे चक्क प्राध्यापकांच्या समोर विद्यार्थी मोबाईलचा वापर करत होते.  कॉलेजचे प्राध्यापक, प्राचार्य आणि कॉलेजचा चिप्स सुप्रीडेंट यांना हा प्रकार माहिती असूनही कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर  कोणतीही कारवाई केली गेली नाही; हे विशेष. तसेच दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा प्रत्येक हॉलमध्ये दोन, तीन डमी विद्यार्थी होते. हा सर्व प्रकार विद्यापीठाने नियुक्त केलेले सहकेंद्र प्रमुख प्रा.दशरथ रोडे यांनी उघड केला आहे.

नागनाथ हालगे आप्पा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, परळी कॉलेजमध्ये सुरु असलेला कॉपीचा प्रकार पहा –pic.twitter.com/2P73LSLB7d

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

How to Become Lawyer : वकिली क्षेत्रात होवू शकते उत्तम करिअर; कसं व्हायचं वकील? काय असते पात्रता?

How to Become Lawyer

करिअरनामा ऑनलाईन । वकिली क्षेत्रात उत्तम करिअर (How to Become Lawyer) होवू शकते. आपल्या देशात वकिली करणे हा उत्तम व्यवसाय मानला जातो. चाणाक्ष आणि प्रसिध्द वकील होण्याचे स्वप्न लाखो तरुण उराशी बाळगतात. तुम्‍हीही असे स्‍वप्‍न पाहत असाल आणि लोकांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी तुम्हाला लढायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही 12वी झाल्या नंतरच या क्षेत्रात करिअर करण्‍याचा विचार करू शकता. जर तुम्ही बॅचलर डिग्री मिळवली असेल तर तुम्ही कायद्याचा अभ्यास करु शकता. जर तुमचेही लोकांना हक्क आणि न्याय मिळवून देण्याचे स्वप्न असेल तर तुम्ही या क्षेत्रात तुमचे करिअर घडवू शकता. पाहूया अधिक माहिती…

वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी अशी आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
वकील होण्यासाठी तुम्ही 12वी किंवा कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. बारावीनंतर विद्यार्थ्यांना पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल, तर पदवीनंतर तीन (How to Become Lawyer) वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. जर
12वीनंतर सुरु करता येईल अभ्यास
कायद्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही बारावी पास असणे आवश्यक आहे. बारावीनंतर तुम्ही पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता. तुम्हाला BA LLB, BBA LLB, B.Tech LLB, B.Com LLB आणि B.Sc LLB मध्ये प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेत सहभागी व्हावे लागते. पाच वर्षांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी, तुम्हाला CLAT, LSAT India, AILET किंवा SET साठी हजर रहावे लागेल.

तीन वर्षे LLB करण्यासाठी ही आहे पात्रता (How to Become Lawyer)
तुम्ही जरी 12वी पूर्ण केली असेल आणि ग्रॅज्युएशन पूर्ण करणार असाल तरीही तुम्ही कायद्याचा अभ्यास करू शकता. पदवीनंतर तुम्ही एलएलबीच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता. LLB अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, तुम्ही LSAT India, DU LLB, MHT CET किंवा BHU LLB सारख्या प्रवेश परीक्षांमध्ये भाग घेऊ शकता.
प्रवेश प्रक्रियेविषयी
तसेच अनेक खाजगी आणि सरकारी विद्यापीठे या अभ्यासक्रमांना (How to Become Lawyer) थेट किंवा विद्यापीठ स्तरावरील प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश देतात. जर तुम्ही वर सांगितलेल्या परीक्षेत यशस्वी झाला नाही, तरी तुम्ही थेट पद्धतीने किंवा विद्यापीठ स्तरावर आयोजित केलेल्या प्रक्रियेद्वारे प्रवेश घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SNDT Recruitment 2024 : मुंबईत नोकरीची संधी!! SNDT महिला विद्यापीठात विविध पदांवर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी अंतर्गत विविध (SNDT Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, उप ग्रंथपाल, सहाय्यक संचालक, प्राचार्य, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, सहायक संचालक पदांच्या एकूण 85 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

संस्था – SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी
भरली जाणारी पदे –
1. प्राध्यापक
2. सहयोगी प्राध्यापक
3. उप ग्रंथपाल
4. सहाय्यक संचालक
5. प्राचार्य
6. सहायक प्राध्यापक
7. प्रकल्प अधिकारी
8. सहाय्यक ग्रंथपाल
9. सहायक संचालक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024
पद संख्या – 85 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

भरतीचा तपशील – (SNDT Recruitment 2024)

पद पद संख्या 
प्राध्यापक 10
सहयोगी प्राध्यापक 16
उप ग्रंथपाल 01
सहाय्यक संचालक 02
प्राचार्य 03
सहायक प्राध्यापक 49
प्रकल्प अधिकारी 02
सहाय्यक ग्रंथपाल 01
सहायक संचालक 01

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जासोबत आवशक (SNDT Recruitment 2024) कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

SNDT Recruitment 2024

काही महत्वाच्या लिंक्स – (SNDT Recruitment 2024)
अधिकृत वेबसाईट – https://sndt.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC News : MPSC पेपरफुटी रोखण्यासाठी समितीची स्थापना; शासनाचा मोठा निर्णय!!

MPSC News (10)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात वाढत चाललेल्या (MPSC News) स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटी प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनातील पदे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सरकारी परीक्षांची कार्यपद्धती संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीला तीन महिन्याच्या आत यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सेवानिवृत्त अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. विशेष म्हणजे या समितीत सुरेश काकानी, डॉ शहाजी सोळुंके, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव असणार आहेत.

शासन निर्णयात काय म्हटलं आहे (MPSC News)
या समितीकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची कार्यपध्दती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी तसेच पेपरफुटी व इतर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासकीय व कायदेशीर उपाययोजना सुचवल्या जातील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतील परीक्षा वगळता इतर विभागांतर्गत विविध संवर्गाच्या परीक्षांची कार्यपध्दती व सदर परीक्षांसंदर्भात पेपरफुटी तसेच इतर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासकीय व कायदेशीर उपाययोजना सुद्धा समितीकडून सुचवल्या जाणार आहेत. प्रस्तुत शासन निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून तीन महिन्याच्या आत समिती आपला अहवाल शासनास सादर करेल, असेही शासन निर्णयात म्हटले आहे.

काय म्हणाले आ. रोहित पवार
पेपर फुटी प्रकरणानंतर राज्य सरकारने समिती स्थापन करण्याचा (MPSC News) निर्णय घेतल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी म्हटलं आहे; “प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या पेपरफुटीसंदर्भात कायदा करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार! हे निश्चितपणे ‘युवा संघर्ष यात्रे’चं यश आहे. अपेक्षा फक्त एकच की, संबंधित समितीला अहवाल देण्यासाठी एक कालावधी निर्धारीत करावा आणि याच कालावधीत समितीनेही अहवाल द्यावा.” असे रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSRLM Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ‘कृषी व्यवस्थापक’, ‘पशू व्यवस्थापक’ पदांवर भरती सुरु

MSRLM Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती तालुका (MSRLM Recruitment 2023) अभियान व्यवस्थापन कक्ष, बार्शी अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कृषी व्यवस्थापक, पशू व्यवस्थापक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, बार्शी
भरले जाणारे पद – कृषी व्यवस्थापक, पशू व्यवस्थापक
पद संख्या – 05 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष बार्शी
नोकरी करण्याचे ठिकाण – बार्शी, सोलापूर

भरतीचा तपशील – (MSRLM Recruitment 2023)

पद पद संख्या 
कृषी व्यवस्थापक 04
पशू व्यवस्थापक 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
कृषी व्यवस्थापक
  • कृषी डिप्लोमा, कृषी पदविका
  • सामाजिक कार्य अनुभव
पशू व्यवस्थापक
  • पशू डिप्लोमा, पशू पदविका
  • सामाजिक कार्य अनुभव

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. इच्छुक उमेदवारांनी (MSRLM Recruitment 2023) अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
5. अर्ज करताना संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://solapur.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी खुषखबर!! युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी अंतर्गत सहाय्यक पदावर भरती सुरु

Government Job (36)

करिअरनामा ऑनलाईन । युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. अंतर्गत (Government Job) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 16 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2024 आहे.

संस्था – युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
भरले जाणारे पद – सहाय्यक
पद संख्या – 300 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 16 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जानेवारी 2024

वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे
अर्ज फी –
1. SC / ST / PwBD, Permanent Employees of COMPANY – Rs.1000/-
2. SC / ST / Persons with Benchmark Disability (PwBD), Permanent Employees of COMPANY – Rs.250/- (Government Job)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Graduate from a recognized University AND
Knowledge of Reading, Writing and Speaking of Regional language of the State of Recruitment is essential.

मिळणारे वेतन – Rs. 22405-1305(1)-23710-1425(2)-26560-1605(5)-34585-1855(2)- 38295-2260(3)-45075-2345(2)-49765-2500(5)-62265
असा करा अर्ज – (Government Job)
1. याभरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज प्रक्रिया 16 डिसेंबर 2023 पासून सुरु होईल.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://uiic.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti : पोलीस भरतीबाबत मोठी खुषखबर!! राज्यात 23 हजार 628 पदे भरणार; देवेंद्र फडणवीस यांनी केलं जाहीर

Police Bharti (2)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागून (Police Bharti) राहिलेल्या राज्यातील युवकांसाठी आनंदाची बातमीआहे.  महाराष्ट्र पोलीस दलात मेगाभरती होणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली. नवीन आकृतीबंध तयार केल्यामुळे ही भरती होणार आहे. विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती; त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. नवीन आकृतीबंधामुळे आता 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार आहेत. वाढत्या लोकसंख्येनुसार ही भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

70 वर्षाने केला नवीन आकृतीबंध (Police Bharti)
गेल्या ७० वर्षांत आकृतीबंध झाला नव्हता त्यामुळे जून महिन्यात राज्याचा आकृतीबंध करण्यात आला. यामुळे राज्यात पोलिसांची संख्या किती आहे आणि किती भरण्याची गरज आहे, त्याची माहिती मिळाली, असे सतेज पाटील यांनी सांगितले. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, राज्याच्या गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली जात होती. पोलीस दलात भरतीची प्रक्रिया सुरु आहे. परंतु नवीन आकृतीबंधानुसार जागा वाढल्या आहेत.  यामुळे नवीन आकृतीबंधानुसार पोलीस भरती होणार आहे. यासाठी गृहमंत्रालयाने निधी उपलब्ध केला आहे.

दोन पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर पाहिजे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किती कर्मचारी असले पाहिजे, असा सर्व आकृतीबंध झाला आहे. मागील दोन वर्षांत कोरोना साथीमुळे भरती झाली नव्हती. त्यानंतर ही भरती सुरु झाली आहे. त्याकाळात देण्यात आलेली वयोमर्यादेच्या वाढीची मुदत आता (Police Bharti) संपणार आहे. ती संपण्याच्या आत नवीन भरती करता येईल का? हा विचार करण्यात येणार आहे. यासाठी आधी जाहिरात काढून हवे तर नंतर भरती करता येईल का? हा निर्णय गृहविभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MADC Recruitment 2023 : MADC अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; ग्रॅज्युएट असाल तर ही संधी सोडू नका

MADC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र विमानतळ विकास (MADC Recruitment 2023) कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक, सल्लागार, सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उप अग्निशमन अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कायदा अधिकारी, सल्लागार (प्रशासन), सल्लागार- लेखा, वरिष्ठ व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापक, एअरसाइड पर्यवेक्षक, कार्यकारी अभियंता, तंत्रज्ञ, विमानतळ संचालक, सहायक नियोजक, अग्निशमन अधिकारी, कंपनी सचिव पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद – सहाय्यक, सल्लागार, सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उप अग्निशमन अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कायदा अधिकारी, सल्लागार (प्रशासन), सल्लागार- लेखा, वरिष्ठ व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापक, एअरसाइड पर्यवेक्षक, कार्यकारी अभियंता, तंत्रज्ञ, विमानतळ संचालक, सहायक नियोजक, अग्निशमन अधिकारी, कंपनी सचिव
पद संख्या – 37 पदे (MADC Recruitment 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. 8वा मजला, केंद्र-1, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई- 400005

नोकरीचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – ३६ ते ६० वर्षे
भरतीचा तपशील – (MADC Recruitment 2023)

पद पद संख्या 
Assistant 01
Consultant 01
Assistant Executive Engineer 04
Assistant Engineer 01
Sub Fire Officer 02
Chief Security Officer 01
Junior Engineer 02
Law Officer 01
Consultant (Administration) 01
Consultant- Accounts 01
Senior Manager 04
Assistant Manager 05
Manager 01
Airside Supervisor 02
Executive Engineer 01
Technician 02
Airport Director 02
Assistant Planner 01
Manager Airside 01
Fire Officer 02
Company Secretary 01

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
Assistant Graduation in any faculty.
Consultant Full time bachelor’s degree in electrical engineering from a recognized University
Assistant Executive Engineer Full time bachelor’s degree in electrical engineering.
Assistant Engineer Full time bachelor’s degree in electrical.
Sub Fire Officer Graduation in any discipline
Chief Security Officer Graduation in any faculty from recognized university.
Junior Engineer Full time Diploma/Bachelor’s Degree in Telecommunication
Law Officer Degree in Law of recognized University, Post Graduation in Law
Consultant (Administration) Graduation in any faculty
Consultant- Accounts Graduation in any faculty
Senior Manager Bachelor’s Degree from recognized university.
Assistant Manager Bachelor’s Degree from recognized university.
Manager Bachelor’s Degree.
Airside Supervisor Bachelor’s Degree.
Executive Engineer B.E (Civil) in 1st Class.
Technician ITI electrical
Airport Director Bachelor’s Degree and having professional experience in Airport Management
Assistant Planner Postgraduate
Manager Airside Bachelor’s Degree.
Fire Officer Bachelor’s Degree and professional experience in Airport Fire Services.
Company Secretary Member of Institute of Company Secretary (ICSI).

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. भरतीचा तपशील www.madcindia.org या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे..
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
5. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.madcindia.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Hiring in 2024 : नव्या वर्षात नोकऱ्यांचा धुमधडाका!! पहा कोणकोणत्या क्षेत्रात होणार बंपर भरती 

Job Hiring in 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशातील कंपन्या आता पुन्हा एकदा (Job Hiring in 2024) मेगाभरती करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये देशातील सुमारे 37 टक्के कंपन्या नोकर भरती करणार आहेत, असं एका सर्व्हेमधून समोर आलं आहे. यातील सर्वात जास्त नोकऱ्या फायनान्स आणि रिअल इस्टेट क्षेत्रात उपलब्ध होतील. तसंच मार्च 2024 पर्यंत देशात सतत नव्या नेमणुका सुरु राहतील; असंही या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे.
कोरोनातून उभारी घेत देश सध्या मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. शेअर मार्केट देखील दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत आहे. देशाच्या जीडीपीबाबत (GDP) देखील आंतरराष्ट्रीय संस्था चांगले अंदाज वर्तवत आहेत. या सगळ्या सकारात्मक परिस्थितीत आता रोजगरची चांगली संधी निर्माण होणार; असं चित्र आहे.

अनेक कंपन्या नोकरी देण्यासाठी सज्ज
देशात नोकरी देण्यासाठी सज्ज असणाऱ्या कंपन्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. यासोबतच जगभरातील कंपन्यांच्या तुलनेत भारतात यावर्षी सर्वाधिक हायरिंग होणार असल्याचा अंदाजही या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.
भारत नंबर वन (Job Hiring in 2024)
रोजगार निर्मितीच्या बाबतीत भारत आणि नेदरलँड्स सर्वात पुढे आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोस्टारिका आणि अमेरिकेचा नंबर लागतो. सर्वाधिक नोकऱ्या फायनान्स (Job Hiring in 2024) आणि रिअल इस्टेट क्षेत्रात निर्माण होणार असून, त्याखालोखाल आयटी, कंझ्यूमर गुड्स आणि सर्व्हिसेस सेक्टरचा क्रमांक लागतो. एनर्जी किंवा युटिलिटी सेक्टरमध्ये जास्त नोकऱ्या तयार होण्याची शक्यता नसल्याचं या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.

लेऑफ करण्यापेक्षा नोकऱ्या देण्यावर भर
या सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे, की लेऑफ करण्याच्या विचारात असणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत नोकरी देण्याचा विचार करणाऱ्या कंपन्या अधिक आहेत. मॅनपॉवर ग्रुपचे एमडी संदीप गुलाटी यांच्यामते स्थानिक मागणी वाढत आहे. परदेशी गुंतवणूक भारतात येत आहे, आणि राजकीय स्थैर्य निर्माण होत आहे. त्यामुळे भारत प्रगती पथ्यावर आहे; असंही ते म्हणाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com