Home Blog Page 187

SJVN Recruitment 2023 : ITI/डिप्लोमा/ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी!! एसजेव्हीएन अंतर्गत 400 पदांवर भरती सुरु

SJVN Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । एसजेव्हीएन लि. अंतर्गत विविध पदे (SJVN Recruitment 2023) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 400 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2024 आहे.

संस्था – एसजेव्हीएन लि.
पद संख्या – 400 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी 2024
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. पदवीधर प्रशिक्षणार्थी- 175 पदे (SJVN Recruitment 2023)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी
2. टेक्निशियन प्रशिक्षणार्थी – डिप्लोमा- – 100 पदे
मान्यताप्राप्त राज्याचे तांत्रिक शिक्षण संबंधित शाखा मध्ये इंजीनियरिंग / तंत्रज्ञान मध्ये पूर्णवेळ डिप्लोमा
3. टेक्निशियन प्रशिक्षणार्थी – आयटीआय – ITI – 125 पदे
मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित ट्रेंड मध्ये आयटीआय

वय मर्यादा – (SJVN Recruitment 2023)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन –
1. ग्रेजुएट प्रशिक्षणार्थी – 10,000/- रुपये दरमहा
2. टेक्निशियन प्रशिक्षणार्थी – डिप्लोमा – 8000/- रुपये दरमहा
3. टेक्निशियन प्रशिक्षणार्थी – आयटीआय – 7000/- रुपये दरमहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.sjvn.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : या तरुणाने स्वतःचं नशीब स्वतःच लिहलं; रस्त्यावर बूट विकणारा मुलगा असा झाला IAS

UPSC Success Story of IAS Shubham Gupta

करिअरनामा ऑनलाईन । जे गरिबीला मार्गातील सर्वात मोठा (UPSC Success Story) अडथळा मानतात त्यांच्यासाठी IAS शुभम गुप्ता हे उत्तम उदाहरण आहे . तुम्हाला पटणार नाही; शुभम हा त्याच्या वडिलांसोबत बूट आणि चप्पल विकण्याचे काम करायचा. हा मुलगा मोठा होऊन एक दिवस अधिकारी होईल, असे कुणाला वाटले नसेल; पण शुभमने ते करून दाखवले. त्याने   स्वतःचे नशीब स्वतः लिहिले आणि UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या कुटुंबाला अभिमान वाटेल; अशी कामगिरी केली.

सामान्य कुटुंबात झाला जन्म
शुभम महाराष्ट्र केडरचा IAS अधिकारी आहे. शुभम गुप्ता हा मूळचा राजस्थानचा आहे. त्याचा जन्म 11 ऑगस्ट 1993 रोजी सीकर जिल्ह्यातील भूडोली गावात एका सामान्य कुटुंबात झाला. वडील अनिल गुप्ता यांनी शुभमला सामान्य मुलाप्रमाणे वाढवले. शुभम आर्थिकदृष्ट्या संपन्न नव्हता. कंत्राटी कामावर त्याचा घरखर्च चालत होता.

शुभम असा झाला IAS अधिकारी (UPSC Success Story)
शुभम सातवीत शिकत होता, तेव्हा उत्पन्नाअभावी त्याच्या वडिलांना राजस्थानहून महाराष्ट्रात यावे लागले. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू रोडवर चप्पलचे दुकान थाटले. शाळा सुटल्यानंतर वडिलांना मदत करण्यासाठी शुभम दुकानावर जात असे.
दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकानाची संपूर्ण जबाबदारी शुभमच्या खांद्यावर होती. लहान वयात त्याला असे काम करताना पाहणाऱ्यांपैकी कोणाला वाटले नसेल की हा मुलगा मोठा होऊन IAS अधिकारी होईल. पण इथे शुभमची जिद्द कामी आली. असं म्हणतात की जे कष्ट करतात ते कधीच हारत नाहीत; ते लढतच राहतात; शुभमच्या बाबतीतही तेच घडलं.

3 वेळा अपयश पण चौथ्या प्रयत्नात मिळाले यश
शुभमने शिक्षण घेत काम केले. कामाचा ताण आला तरी कधी (UPSC Success Story) त्याने जिद्द सोडली नाही. समोर येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर मात करत त्याने अभ्यासही सुरू ठेवला. 2012 ते 2015 मध्ये दिल्ली विद्यापीठातून बीए आणि नंतर एमए पूर्ण केल्यानंतर, त्याने स्वत: ला UPSC परीक्षेसाठी तयार केले. पहिल्या 3 वेळेस त्याला अपयश आले मात्र चौथ्या प्रयत्नात त्याने यश खेचून आणले. आज तो देशातील एक सुप्रसिद्ध आयएएस (IAS) अधिकारी आहेत आणि तरुणांसाठी उर्जेचा स्त्रोत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Lifestyle : एका दिवसात किती वेळ काम केले पाहिजे? पहा तज्ञ काय सांगतात….

Lifestyle

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या धकाधकीच्या जीवनात (Lifestyle) लोक आपल्या आरोग्याची काळजी घेणे विसरले आहेत. विशेषत: जे काम करत आहेत, त्यांना स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे थोडे कठीण होत आहे. ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना कामाचा ताण तर असतोच, पण काही वेळा डेडलाईनमुळे कामाचे तासही वाढतात. याआधी प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती म्हणाले होते की, तरुणांनी आठवड्यातील 70 तास काम करावे. पण हे खरच शक्य आहे का? या वक्तव्याने तुमचीही भंबेरी उडाली असेल ना?

आपण पाहतोय की एका व्यक्तीने एका दिवसात किती तास काम करावे; यावर गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. आजच्या व्यस्त जिवनशैलीत व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचा समतोल साधणे कठीण झाले आहे. यासाठी एका दिवसात किती काम केले पाहिजे; हे आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

नारायण मूर्ती यांच्या या वक्तव्यामुळे एखाद्या व्यक्तीने एका (Lifestyle) दिवसात किंवा आठवड्यात किती काम करावे, यावर वाद सुरू झाला आहे. असं असलं तरी, कामाच्या प्रचंड ताणामुळे बहुतेक लोकांमध्ये तणाव आणि नैराश्य वाढत आहे. अशा परिस्थितीत माणसाने किती काम करावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
दिवसात किती तास काम करु शकता?
कोणतेही कार्यालय, कंपनी किंवा संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना कामाचे 8 ते 9 तास नेमून देते. परंतु कामाच्या जीवनात समतोल राखण्यासाठी, आपल्या क्षमतांचे मूल्यांकन करणे तसेच वैयक्तिक मर्यादा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कामाव्यतिरिक्त शारीरिक आणि मानसिक आरोग्यालाही प्राधान्य देणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राखणे महत्त्वाचे आहे.

योगासनही आहे महत्त्वाचे (Lifestyle)
या प्रश्नावर योगतज्ञ असेही सांगतात की, तुम्ही किती वेळ झोप घेता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली तर तुम्ही 8 किंवा 9 तासांपेक्षा जास्त वेळ काम करू शकता. पण उत्पादकता वाढवण्यासाठी झोपेसोबतच ताण व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत उत्पादकता वाढवण्यासाठी योगाभ्यास करणे खूप फायदेशीर ठरू शकते. याच्या मदतीने तुम्ही कामाच्या ठिकाणीही सक्रिय राहून तुमची सर्व कामे सहज पूर्ण करू शकाल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

JNVST Admission : अशी असते जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा; पहा पात्रता आणि परीक्षा पॅटर्न

JNVST Admission

करिअरनामा ऑनलाईन । शिकण्याची उमेद असणाऱ्या (JNVST Admission) ग्रामीण भागातील हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी ही प्रवेश परीक्षा जवाहर नवोदय विद्यालयाकडून घेतली जाते.
शहरी आणि ग्रामीण असा शैक्षणिक भेद दूर करणे आणि उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न जवाहर नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून केला जातो. जेएनव्हीएसटीची (JNVST) स्थापना ग्रामीण विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता ओळखण्याच्या आणि त्यांचे संगोपन करण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे. या विद्यालयाचे प्राथमिक उद्दिष्ट देशभरातील जवाहर नवोदय विद्यालयांच्या प्रवेशासाठी इयत्ता 6वीतील विद्यार्थ्यांची निवड करणे हा आहे. आज आपण प्रवेशा संदर्भात महत्वाची माहिती पाहणार आहोत….

प्रवेश प्रक्रिये संदर्भात महत्वाच्या तारखा –
1. इयत्ता 6वी – शनिवार दि. २० जानेवारी २०२४
2. इयत्ता 9वी – शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४
3. इयत्ता 11वी – शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४

1. 6वीसाठी आवश्यक पात्रता – (JNVST Admission)
– जवाहर नवोदय विद्यालय असलेल्या जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारच प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
– सहावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार १० ते १२ वयोगटातील असावा. हाच नियम अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींमधील (एसटी) उमेदवारांसह सर्वांना लागू होतो.
-इयत्ता सहावीला प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार सरकारी/अनुदानित/मान्यताप्राप्त शाळेतून तिसरी, चौथी आणि पाचवीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
इयत्ता सहावीचा पेपर पॅटर्न असा असेल –
(अनुक्रमे -: विषय – प्रश्नांची संख्या – गुण – वेळ)
1. मानसिक क्षमता – ४० – ५० – ६० मिनिटे
2. अंकगणित – २० – २५ – ३० मिनिटे
3. भाषा – २० – २५ – ३० मिनिटे
एकूण – ८० – १०० – २ तास

2. 9वीसाठी आवश्यक पात्रता
– नवोदय विद्यालयाचे रहिवासी आणि इयत्ता आठवीचा अभ्यास करत असलेले उमेदवारच नववीच्या प्रवेशासाठी पात्र आहेत.
-जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शाळा जेथे जवाहर नवोदय विद्यालय कार्यरत आहे आणि जेथे प्रवेश मागितला आहे, ते विद्यार्थी पात्र आहेत. (JNVST Admission)
– प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार प्रवेशाच्या वर्षाच्या १ मे रोजी १३-१५ वर्षे वयोगटातील असावा. हा नियम सर्व वर्गातील उमेदवारांना लागू आहे.
-परीक्षेसाठी भाषेचे माध्यम इंग्रजी/हिंदी आहे.
इयत्ता नववीचा पेपर पॅटर्न असा असेल –
(विषय – गुण)
1. इंग्रजी – १५
2. हिंदी – १५
3. गणित – ३५
4. विज्ञान – ३५
एकूण गुण – १००
एकूण वेळ – २.५ तास

3. इयत्ता 11वीसाठी आवश्यक पात्रता
– उमेदवाराने सीबीएसई किंवा इतर कोणत्याही राज्य शिक्षण मंडळाशी/इतर सरकार मान्यताप्राप्त मंडळाशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त शाळेतून दहावीचे शिक्षण घेतलेले असावे.
– भारतातून दहावीचे शिक्षण घेतलेले (JNVST Admission) भारतीय नागरिकच अर्ज करण्यास पात्र आहेत.
– निवड चाचणी सकाळी ११ ते दुपारी दीडपर्यंत अशी एकूण अडीच तासांची असेल. त्यात वस्तुनिष्ठ प्रश्नांचे ५ विभाग असतील. १०० गुणांसाठी एकूण १०० प्रश्न असतील.
(अनुक्रमे -: विषय – प्रश्नांची संख्या – गुण – वेळ)
1. मानसिक क्षमता – २० – २० – ३० मिनिटे
2. इंग्रजी – २० – २० – ३० मिनिटे
3. विज्ञान – २० – २० – ३० मिनिटे
4. सोशल सायन्स – २० – २० – ३० मिनिटे
5. गणित – २० – २० – ३० मिनिटे
एकूण – १०० – १०० – २ तास ३० मिनिटे
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : अमृतवाहिनी पॉलिटेक्निक अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; थेट द्या मुलाखत

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, अहमदनगर (Job Notification) अंतर्गत व्याख्याता पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, अहमदनगर
भरले जाणारे पद – व्याख्याता
पद संख्या – 03 पदे (Job Notification)
नोकरीचे ठिकाण – अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 डिसेंबर 2023
E-MAIL ID – [email protected]
अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, पी.ओ. संगमनेर (S.K.) 422608, ता. संगमनेर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – BE/ ME Information Technology/ Computer
असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.amrutpoly.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Satara Recruitment 2023 : NHM अंतर्गत निघाली नवीन भरतीची जाहिरात; लगेच करा APPLY

NHM Satara Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । 15 वा वित्त आयोग अंतर्गत नागरी (NHM Satara Recruitment 2023) आरोग्यवर्धिनी केंद्रद्वारे सातारा येथे रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी पदाच्या 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, सातारा (National Health Mission)
भरले जाणारे पद  – वैद्यकीय अधिकारी
नोकरीचे ठिकाण – सातारा
पद संख्या – 14 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय तळमजला, जि. प. सातारा
आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBBS

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (NHM Satara Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.
6. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

काही महत्वाच्या लिंक्स – (NHM Satara Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.zpsatara.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment 2023 : 10 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मोठी बातमी!! इंडियन नेव्हीमध्ये होणार मेगाभरती

Indian Navy Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन नेव्हीमध्ये भरती होण्याची (Indian Navy Recruitment 2023) इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  इंडियन नेव्ही अकादमी अंतर्गत चार्जमन, सिनियर ड्रॉफ्ट्समन, ट्रेड्समन मेट पदांच्या एकूण 910 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 18 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – इंडियन नेव्ही
भरले जाणारे पद – चार्जमन, सिनियर ड्रॉफ्ट्समन, ट्रेड्समन मेट
पद संख्या – 910 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 18 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023
वय मर्यादा –
1. चार्जमन – 18 ते 25 वर्षे
2. सिनियर ड्रॉफ्ट्समन – 18 ते 27 वर्षे
3. ट्रेड्समन मेट – 18 ते 25 वर्षे
अर्ज फी – Rs. 295/-

भरतीचा तपशील – (Indian Navy Recruitment 2023)

पद पद संख्या 
चार्जमन 42 पदे
सिनियर ड्रॉफ्ट्समन 258 पदे
ट्रेड्समन मेट 610 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
चार्जमन Bachelor of Science degree with Physics or Chemistry or Mathematics from a recognized University or Institution.
सिनियर ड्रॉफ्ट्समन Matriculation Pass or its equivalent from a recognized Institution or Board
ट्रेड्समन मेट 10th Standard pass from a recognised Board/ Institution

 

Indian Navy Bharti 2023

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. खाली दिलेल्या (Indian Navy Recruitment 2023) लिंकवरुन उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
4. अर्ज प्रक्रिया 18 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.joinindiannavy.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DPS DAE Recruitment 2023 : पदवीधारक करु शकतात अर्ज; DPS आणि DAE अंतर्गत नवीन भरती सुरु; पगारही उत्तम

DPS DAE Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । खरेदी आणि भांडार (DPS DAE Recruitment 2023) विभाग (DPS), अणुऊर्जा विभाग (DAE) अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ खरेदी सहाय्यक/कनिष्ठ स्टोअरकीपर पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – खरेदी आणि भांडार विभाग (DPS) आणि अणुऊर्जा विभाग (DAE)
भरले जाणारे पद –
कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअरकीपर (Junior Purchase Assistant/Junior Storekeeper)
पद संख्या – 62 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – १८ ते २७ वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (DPS DAE Recruitment 2023)
Graduate in Science with 60% marks. OR Commerce graduate with 60% marks. OR Diploma in Mechanical Engineering / Electrical Engineering/ Electronics / Computer Science with 60% marks from Government recognized universities/ institutions.
मिळणारे वेतन – Rs.25,500/- दरमहा

असा करा अर्ज – (DPS DAE Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
3. अर्ज करण्याची शेवटची (DPS DAE Recruitment 2023) तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
4. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करायचे आहेत; उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.dps.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : राज्यातील ‘ही’ महानगरपालिका देतेय नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता

Job Alert (95)

करिअरनामा ऑनलाईन । सोलापूर महानगरपालिकेत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 76 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – सोलापूर महानगरपालिका
पद संख्या – 76 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023 (11:55 PM)

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 47 पदे
स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी पदवी.
2. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 02 पदे
यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी पदवी.
3. कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) – 24 पदे
स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी डिप्लोमा.
4. केमिस्ट – 01 पद
रसायनशास्त्र विषयातील पदवी (BSc-केमिस्ट्री)
5. फिल्टर इन्स्पेक्टर – 02 पदे
रसायनशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी (BSc-केमिस्ट्री/माइक्रोबायोलॉजी)

वय मर्यादा –
18 ते 38 वर्षे (Job Alert)
(मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
परीक्षा फी –
खुला प्रवर्ग: ₹1000/-
(मागासवर्गीय: ₹900/-, माजी सैनिक/दिव्यांग: फी नाही)

मिळणारे वेतन –
1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 38,600/- रुपये दरमहा
2. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 38,600/- रुपये दरमहा
3. कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) – 29,200/- रुपये दरमहा
4. केमिस्ट – 29,200/- रुपये दरमहा
5. फिल्टर इन्स्पेक्टर- 25,500/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.solapurcorporation.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : तिचे खाण्या-पिण्याचे होते वांदे; मेहनतीने सेल्फ स्टडी केला अन् अधिकारी झाली; आईलाही दिलं उत्तम शिक्षण

Success Story of ARTO Ijya Tiwari

करिअरनामा ऑनलाईन । तुमच्या मनात काहीही (Success Story) करण्याची जिद्द असेल आणि परिश्रम घेण्याची तयारी असेल तर यश मिळवणं अवघड नाही. इज्या तिवारी यांनी हे म्हणणं त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध केलं आहे. आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जात त्यांनी मेहनतीच्या बळावर आई आणि वडिलांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. इज्या यांची जिल्ह्यात पहिली  महिला एआरटीओ (ARTO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज आपण त्यांची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया.

घर गेले आणि बचतीचे पैसेही संपले
लखनौ येथील रहिवासी असलेल्या इज्या तिवारी यांची जिल्ह्यात प्रथमच परिवहन विभागाची महिला अधिकारी म्हणजेच एआरटीओ (ARTO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यावेळी इज्या तिवारी ८वीत शिकत होत्या. वडिलांच्या आजारपणात घरातील सर्व बचत खर्च झाली. एक वेळ अशी आली की आपलीच माणसे आपल्याला सोडून गेली आणि वडिलोपार्जित घरही राहिले नाही. त्यांच्या कुटुंबाला भाड्याच्या घरात रहावे लागले. वडील गेल्यानंतर आईची मनस्थिती पूर्ण बिघडली होती. घरात जेवणासाठीही पैसे नव्हते. ही परिस्थिती मुलगी स्वतः आईचा आधार बनली. इज्या तिवारी ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे.

नोकरी करत असताना केला अभ्यास (Success Story)
इज्या सांगते; “आयुष्याचे सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. वडील गेल्यानंतर सर्व काही बदलले आणि मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. आमच्या जवळचे बरेच लोक आम्हाला सोडून गेले. पण मी हार मानली नाही. ब्राइट लाइन इंटर कॉलेजमध्ये शिक्षक असलेल्या माझ्या गुरूंनी माझ्याकडे पैसे नसतानाही मला मोफत शिक्षण दिले. मला लिहायला आणि वाचायला आवडायचे. वयाच्या 12 व्या वर्षी माझा संघर्ष सुरू झाला. खूप कष्ट करून बँकेत नोकरी लागली. यानंतरही मी माझा अभ्यास सुरू ठेवला. दिवसभर काम करुन बँकेतून घरी आल्यानंतर मी रात्री तासनतास अभ्यास करायचे. मी 4 वर्षे खूप मेहनत घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले.”

सेल्फ स्टडीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात मिळाले यश
कॉलेज करत असताना इज्या शिकवण्या घेत असे. तिने तिच्या आईलाही पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. ती संगते; “माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. वडिलांच्या मृत्यूनंतर आई उद्ध्वस्त झाली होती. मी अनेक संकटांना तोंड देत आईची काळजी घेतली. मुली ऐवजी आई बनूनच आईची सेवा केली. 2014 मध्ये बँकेत नोकरी मिळाली. पण माझं एवढयावर समाधान होत नव्हतं. मला सरकारी सेवेत सामील (Success Story) व्हायचं होतं. यासाठी मी UPPCS परीक्षेची तयारी सुरू केली. मी कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लास लावला नाही. माझा सेल्फ स्टडीवर भर होता. तसेच ऑनलाईनन आणि इतर सोर्सचा  आधार घेवून अभ्यास सुरु ठेवला. याचा परिणाम म्हणून 2018 च्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले.”

सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगते
इज्या तिवारी सांगतात की उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची किंवा कोणत्याही सरकारी परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना काही गोष्टींची विशेष काळजी (Success Story) घ्यावी लागते. उमेदवारांनी अभ्यास करताना वेळेचे योग्य नियोजन करावे. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले पण त्यांनी अभ्यास चालूच ठेवला. घरची जबाबदारी पार पाडत नोकरी करत असताना त्यांनी दिवसातील 5 ते 6 तास मन लावून अभ्यास केला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत निराश न होता पूर्ण समर्पण आणि मनापासून तयारी करा; यश नक्कीच मिळेल; असा सल्ला त्या देतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com