Home Blog Page 143

Career After 12th : 12 वी नंतर टुरिझम क्षेत्रात करा ‘हे’ कोर्स; मिळेल चांगली नोकरी अन् भरघोस पगार

Career After 12th (5)

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना देश विदेशातील वेगवेगळी (Career After 12th) ठिकाणे पाहण्याची आणि प्रवास करण्याची आवड असेल; अशा तरुणांना टुरिझम क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही यूजी किंवा डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स करू शकता. उच्च शिक्षण घेण्यासाठी तुम्ही या क्षेत्रात उपलब्ध असलेले पीजी पदवी किंवा पीजी डिप्लोमा कोर्स देखील करू शकता. या क्षेत्रात करिअर करण्यासोबतच तुम्हाला लाखात पगार मिळू शकतो. पाहूया या क्षेत्रातील करिअरच्या संधीविषयी…

12 वी नंतर घेता येईल शिक्षण (Career After 12th)
जर तुम्हीही नवीन ठिकाणांना भेट देण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही पर्यटनाच्या (Travel and Tourism) क्षेत्रात तुमचे करिअर घडवू शकता. पर्यटन क्षेत्रात उत्तम करिअर घडवण्यासोबतच तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही बारावीनंतरच पर्यटन क्षेत्रात शिक्षण घेण्यास सुरुवात करू शकता. 12वी नंतर, तुम्ही या क्षेत्रातील विविध अंडर ग्रॅज्युएट (यूजी) कोर्सेस/डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊन त्याची सुरुवात करू शकता. उच्च शिक्षणासाठी तुम्ही यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पीजी डिप्लोमा कोर्सही करू शकता. या क्षेत्रातील काही प्रमुख अभ्यासक्रम पुढे दिले आहेत…

1. बैचलर डिग्री इन ट्रॅव्हल अँड टुरिझम
2. बैचलर ऑफ टुरिझम एडमिनिस्ट्रेशन
3. बैचलर ऑफ टुरिझम स्टडीज
4.. सर्टिफिकेट कोर्स इन टूरिस्ट गाइड
5. सर्टिफिकेट इन ट्रॅव्हल मॅनेजमेंट (Career After 12th)
6. एमबीए इन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट
7. मास्टर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन इन टुरिझम अँड हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट
8. एम. ए. इन टुरिझम मॅनेजमेंट
9. डिप्लोमा इन ट्रॅव्हल मॅनेजमेंट अँड एयरपोर्ट मॅनेजमेंट

कोणत्या पदावर मिळेल नोकरी?
हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हल गाइड, ट्रॅव्हल एजंट, टूर मॅनेजर, ट्रॅव्हल कन्सल्टंट, ट्रॅव्हल स्पेशालिस्ट, टुरिझम ऑफिसर अशा पदांवर नोकरी मिळवू शकता. या पदांवर टूर आणि (Career After 12th) ट्रॅव्हलशी संबंधित विविध कंपन्यांमध्ये नोकऱ्या दिल्या जातात. सुरुवातीला तुम्हाला 3 लाख ते 7 लाख रुपये पगार मिळू शकतो पण वेळ आणि अनुभवानुसार पगारामध्ये वाढ होत जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

10 th Board Exam 2024 : दहावी बोर्डाची परीक्षा आजपासून; मराठी विषयाने परीक्षेचा ‘श्री गणेशा’

10 th Board Exam 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यात आजपासून 10 वी बोर्डाच्या (10 th Board Exam 2024) परीक्षेला सुरुवात झाली आहे. यावर्षी तब्बल 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यभरात सुमारे 5 हजार 86 केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेवून परीक्षेसंदर्भातील सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली. परीक्षेच्या पहिल्या दिवशी मराठी विषयाचा पेपर होणार आहे.

26 मार्च पर्यंत चालणार परीक्षा (10 th Board Exam 2024)
उद्या दहावीचा पहिला पेपर होत आहे. ही परीक्षा दि. 1 ते 26 मार्च दरम्यान होणार आहे. परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दहावीनंतर (10 th Board Exam 2024) विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या व भावी जीवनाच्या दिशा स्पष्ट होतात त्यामुळे दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा समजला जातो.

10 मिनिटाचा जादा वेळ मिळणार
यापूर्वी परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जाणारी 10 अतिरिक्त मिनिटे यंदा बोर्डाकडून दिली जाणार नाहीत. याउलट आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शेवटी प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 10 मिनिटे वेळ मिळणार आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच मार्च 2024 परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत.

16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा
यावर्षी १६ लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होण्याची शक्यता असते त्यामुळे राज्यभर भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार करणाऱ्यावर (10 th Board Exam 2024) कठोर कारवाई केली जाणार आहे. परीक्षा अत्यंत तणावमुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी परीक्षा मंडळाने सर्व उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. परीक्षा काळात मोबाइलवर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आलं आहे.
– नोंदणी केलेले विद्यार्थी संख्या –
– विद्यार्थी संख्या – ८,५९,४७८
– विद्यार्थिनी संख्या – ७,४९,९११
तृतीयपंथी – ५६ (10 th Board Exam 2024)
– एकूण विद्यार्थी संख्या – १६,०९,४४५
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : ‘ऑक्सफर्ड हिंदी शब्द’ म्हणून कोणता शब्द निवडला गेला आहे?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न- अशोकाची आज्ञापत्रे कोणत्या भाषेत लिहिली आहेत?
1. संस्कृत
2. पारसी (GK Updates )
3. ब्राह्मी
4. ओडिसी
उत्तर- अशोकाचे शिलालेख प्राकृत भाषेत लिहिलेले असून त्यांची लिपी ब्राह्मी व खरोस्ती आहे. मध्ययुगीन भाषांना एकत्रितपणे प्राकृत भाषा म्हणतात, त्यापैकी मगधी भाषा ही बहुतेक शिलालेखांची मुख्य भाषा आहे, ज्यामध्ये ब्राह्मी लिपी वापरली गेली आहे.

प्रश्न- पंडित जसराज कोणत्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत?
1. शास्त्रीय संगीत
2. लोकगीत (GK Updates )
3. लोकनृत्य
4. कविता
उत्तर 1- पंडित जसराज हे शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. ते मेवाती घराण्याचे (संगीत वंश) होते. आपल्या 75 वर्षांच्या शास्त्रीय संगीत कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठे पुरस्कार आणि सन्मान मिळवले आहेत.

प्रश्न – खालीलपैकी कोणती भारताची अभिजात भाषा नाही?
1. संस्कृत
2. पाली
3. तमिळ
4. मल्याळम
उत्तर- 2. पाली ही भारताची अभिजात भाषा नसून प्राचीन भाषा आहे. सध्या संस्कृत, तेलगू, तमिळ, उडिया, मल्याळम आणि कन्नड या सहा भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला आहे.

प्रश्न- (GK Updates ) 2020 चा ‘ऑक्सफर्ड हिंदी शब्द’ म्हणून खालीलपैकी कोणता शब्द निवडला गेला आहे?
1. आधार
2. संविधान
3. आत्मनिर्भरता
4. महामारी
उत्तर- 3. आत्मनिर्भरता, हा हिंदी शब्द 2020 चा ‘ऑक्सफर्ड हिंदी शब्द’ म्हणून निवडला गेला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2024 : MPSC ने जाहीर केली ‘या’ पदांवर भरती; सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका…

MPSC Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत (MPSC Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 01 मार्च 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज करुन या भरती प्रक्रियेत सहभागी होणं हिताचं ठरणार आहे.

MPSC च्या भरतीकडे राज्यातील उमेदवारांचे लक्ष लागून राहिलेले असते; अशा उमेदवारांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. आयोगाने काढलेल्या या अधिसूचनेत सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ पदांच्या (MPSC Recruitment 2024) एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी पुढे वाचा…

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
भरले जाणारे पद – सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ
पद संख्या – 39 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 01 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
वय मर्यादा – 18 ते 45 वर्षे

अर्ज फी – (MPSC Recruitment 2024)
1. अराखीव (खुला)- रुपये ७१९/-
2. मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग – रुपये ४४९/-
भरतीचा तपशील –

पदाचे नावपद संख्या 
सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ39 पदे

मिळणारे वेतन –

पदवेतन
सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अरु. १,३१,४००/- ते रु. २,१७,१००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
3. अर्जामध्ये माहिती (MPSC Recruitment 2024) अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. उमर्दवरांनी संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
5. अर्ज प्रक्रिया 01 मार्च 2024 पासून सुरु होईल.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (MPSC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NBCC Recruitment 2024 : चीफ ऍडमिनिस्ट्रेटर, ज्युनिअर इंजिनिअरसह अनेक पदांवर नोकरी; NBCC इंडिया लिमिटेड मध्ये नवीन भरती सुरु

NBCC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC Recruitment 2024) इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सरव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, उप. व्यवस्थापक, उप. प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण 93 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.

संस्था – नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड
भरली जाणारी पदे – सरव्यवस्थापक, अतिरिक्त. महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, उप. व्यवस्थापक, उप. प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अभियंता
पद संख्या – 93 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2024
वय मर्यादा – 28 ते 59 वर्षे
अर्ज फी – रु. 1000/-

भरतीचा तपशील – (NBCC Recruitment 2024)

पदपद संख्या 
सरव्यवस्थापक03
अतिरिक्त. महाव्यवस्थापक02
उप. महाव्यवस्थापक01
व्यवस्थापक02
प्रकल्प व्यवस्थापक03
उप. व्यवस्थापक06
उप. प्रकल्प व्यवस्थापक02
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी30
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी04
कनिष्ठ अभियंता40


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
सरव्यवस्थापकFull time Degree in Civil Engineering or equivalent from Government recognized University/Institute with 60% aggregate marks
अतिरिक्त. महाव्यवस्थापकFull time Degree in Architecture from Government recognized Institute/ University.
उप. महाव्यवस्थापकFull time Degree in Civil Engineering or equivalent from Government recognized University/Institute with 60% aggregate marks
व्यवस्थापकFull time Degree in Architecture from Government recognized Institute/ University with 60% aggregate marks.
प्रकल्प व्यवस्थापकFull time Degree in Civil Engineering or equivalent from Government recognized University/Institute with 60% aggregate marks
उप. व्यवस्थापकFull time MBA / MSW / two years Post Graduate Degree/ Post Graduate Diploma in management from Government recognized University / Institute with Specialization in HRM / PM/ IR as major subject with 60% aggregate marks (NBCC Recruitment 2024)
उप. प्रकल्प व्यवस्थापकFull time Degree in Civil Engineering or equivalent from Government recognized University /Institute with 60% aggregate marks.
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारीFull time Degree in Civil Engineering or equivalent from Government recognized University/Institute with 60% aggregate marks
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीFull time Bachelor degree in Law (LLB) with minimum 50% marks from Government recognized Institute /University.
कनिष्ठ अभियंताThree years full time Diploma in Civil Engineering from Govt. recognized Institute/ University with 60% aggregate marks


मिळणारे वेतन –

पदवेतन
सरव्यवस्थापकRs. 90,000- 2,40,000/-
अतिरिक्त. महाव्यवस्थापकRs. 80,000- 2,20,000/-
उप. महाव्यवस्थापकRs. 70,000- 2,00,000/-
व्यवस्थापकRs. 60,000- 1,80,000/-
प्रकल्प व्यवस्थापकRs. 60,000- 1,80,000/-
उप. व्यवस्थापकRs. 50,000- 1,60,000/-
उप. प्रकल्प व्यवस्थापकRs. 50,000- 1,60,000/-
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारीRs. 40,000 – 1,40,000/-
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीRs. 40,000 -1,40,000/-
कनिष्ठ अभियंताRs. 27,270/-

असा करा अर्ज – (NBCC Recruitment 2024)
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
3. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा.
4. अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
6. अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
7. अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nbccindia.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SRPF Recruitment 2024 : सशस्त्र पोलीस शिपाई पदावर बंपर भरती!! 12 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

SRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF Recruitment 2024) ग्रुप 15 गोंदिया पोलीस विभाग अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 133 पदे भरली जाणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण होत आले की अनेक तरुण उमेदवार नोकरीच्या शोधात असतात. या उमेदवारांसाठी राज्य राखीव पोलीस बलाने नोकरीची चांगली संधी निर्माण केली आहे. 12 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 5 मार्च 2024 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल, ग्रुप 15, गोंदिया पोलीस विभाग
भरले जाणारे पद – सशस्त्र पोलीस शिपाई
पद संख्या – 133 पदे (SRPF Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 5th मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12th वी पास

नोकरी करण्याचे ठिकाण – SRPF गोंदिया
वय मर्यादा –
1. खुला वर्ग – 18 ते 28 वर्षे
2. मागासवर्गीय -18 ते 33 वर्षे
अर्ज फी –
1. खुला प्रवर्ग – रु. 450 /-
2. मागास प्रवर्ग – रु. 350 /-

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SRPF Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
सशस्त्र पोलीस शिपाई12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

शारीरिक पात्रता –

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
अशी होईल निवड –
1. शारीरिक चाचणी
2. लेखी परीक्षा (SRPF Recruitment 2024)
3. चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी
4. वैद्यकीय चाचणी

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PCMC Recruitment 2024 : महिन्याचा 70 हजार एवढा पगार; पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी

PCMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदे (PCMC Recruitment 2024) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सल्लागार पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.

संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका
भरले जाणारे पद – सल्लागार
पद संख्या – 01 पद (PCMC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त यांचे नावे पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कै. नारायण मेघाजी लोखंडे, सभागृह (कामगार भवन) नेहरुनगर रोड, पिंपरी – 18.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (PCMC Recruitment 2024)
1. रेप टाईल्स आणि ऍम्पीबिअन व एव्हेरी (Reptile and Amphibians, Aviary) मधील कामकाजाचा किमान 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
2. उमेदवाराकडे शासकीय स्तरावर वन्य जीव सल्लागार विषयक कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक.
3. वन्य जीव व सर्प क्षेत्रात Naturalist म्हणून कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक.
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 70,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत (PCMC Recruitment 2024)
मुलाखतीचा पत्ता – मा. स्थायी समिती समिती सभागृह, तिसरा मजला, महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत, जुना पुणे- मुंबई रोड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी – 18.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Big News : कडक नियम!! मराठी शिकवणं सक्तीचं; अन्यथा शाळांची मान्यता होणार रद्द

Big News (5)

करिअरनामा ऑनलाईन । ज्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय (Big News) शिकवला जात नाही, अशा शाळेची मान्यता किंवा ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची मोठी तरतूद मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमातील कलम 4 मध्ये करण्यात आली आहे. जर शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकविला जात नसल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या निदर्शनास आल्यास तसा अहवाल शासनास सादर करावा, शासनास अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनस्तरावरुन संबंधित शाळेवर कार्यवाही करण्यात येईल. परिणामी ज्या शांळामध्ये मराठी विषय शिकवला जणार नाही त्या शाळांची मान्यता रद्द होणार आहे; असे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या (Big News) शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांनी तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागामार्फत जारी करण्यात आले आहे.

कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शाळा नियमित सुरु नसल्याने राज्य मंडळाच्या शाळा वगळून इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये सन 2022-23 ची आठवीची बॅच 2023-24 ला नववी मध्ये व 2024-25 ला दहावीला जाईल त्यांना एकवेळची बाब म्हणून मराठी विषयाची परीक्षा गुणांकनाची न ठेवता श्रेणी स्वरुपात मूल्यांकन करण्याबाबत दिनांक 19 एप्रिल, 2023 च्या शासन निर्णयाद्वारे (Big News) सवलत दिली आहे. ही सवलत दिली असली तरीही राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे आहे. त्यामुळे मराठी भाषा विषयाचे श्रेणी स्वरूपात करण्यात आलेल्या मूल्यांकनाच्या नोंदी संबंधित शाळांनी ठेवाव्यात व त्याबाबतचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा.
तसेच दिनांक 19 एप्रिल, 2023 च्या शासन निर्णयाद्वारे श्रेणी स्वरुपात मूल्यांकन करण्याबाबतच्या सवलतीचा चुकीचा अर्थ लावून मराठी भाषा पुरेशा गांभीर्याने शिकविली जात नसल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. या सवलतीचा गैरवापर होत असल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा; असे निर्देशही देण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची (Big News)
राज्य शासनाच्या प्रचलित भाषा सूत्रानुसार व महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2020 पासून करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या अधिनियमाची सन 2020-21 पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सन 2022-23 च्या आठवीच्या बॅचला एकवेळची बाब म्हणून मराठी विषयाची परीक्षा गुणांकनाची न ठेवता श्रेणी स्वरुपात मूल्यांकन करण्याबाबत सवलत देण्यात आली. ही सवलत फक्त एका बॅचपूरतीच मर्यादित होती. तसेच ही सवलत दिली असली तरीही राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये (Big News) मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या सवलतीचा चुकीचा अर्थ लावून मराठी भाषा पुरेशा गांभीर्याने शिकविली जात नसल्याचे काही ठिकाणी दिसून येत असल्याने याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

10 th Board Exam 2024 : मनात धाकधूक!! उद्यापासून 10 वीची परीक्षा सुरु; 16 लाख विद्यार्थी बसले परीक्षेला

10 th Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या (10 th Board Exam 2024) विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. संपूर्ण राज्यात उद्यापासून 10 वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. यावर्षी तब्बल 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यभरात सुमारे 5 हजार 86 केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. आज माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंबंधी पत्रकार परिषद घेवून परीक्षेसंदर्भातील सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली.

26 तारखेपर्यंत चालणार परीक्षा (10 th Board Exam 2024)
उद्या दहावीचा पहिला पेपर होत आहे. ही परीक्षा दि. 1 ते 26 मार्च दरम्यान होणार आहे. परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दहावीनंतर (10 th Board Exam 2024) विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या व भावी जीवनाच्या दिशा स्पष्ट होतात त्यामुळे दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा समजला जातो.

16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा
यावर्षी १६ लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होण्याची शक्यता असते त्यामुळे राज्यभर भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार करणाऱ्यावर (10 th Board Exam 2024) कठोर कारवाई केली जाणार आहे. परीक्षा अत्यंत तणावमुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी परीक्षा मंडळाने सर्व उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. परीक्षा काळात मोबाइलवर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

JMI Admission 2024 : जामिया मिलिया इस्लामिया केंद्रीय विद्यापीठातून मिळवा पदवी; असा मिळवा प्रवेश… कोणाला मिळते प्राधान्य?

JMI Admission 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । देशातील केंद्रीय विद्यापीठातून पदवी (JMI Admission 2024) मिळवण्याचे बहुतांश विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. यापैकी एक विद्यापीठ आहे दिल्ली येथे स्थित ‘जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ’ आहे. या विद्यापीठाने सध्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. जर तुम्ही JME विद्यापीठाच्या प्रवेशासाठी नोंदणी करण्यासाठी इच्छुक असाल तर अधिक माहितीसाठी पुढे वाचा….

प्रवेश परीक्षा
जामियामध्ये प्रवेशासाठी जागा मर्यादित असतात पण प्रवेश (JMI Admission 2024) मिळवण्यासाठी स्पर्धा मोठी असते. अशा परिस्थितीत, केवळ तेच विद्यार्थी या शर्यतीत टिकून राहतात जे सर्व पात्रतेच्या अटी पूर्ण करतात. यासह विद्यापीठाकडून घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जामियाच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध परीक्षा द्याव्या लागतात.
तसेच अनेक बॅचलर पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश हे CUET (CUET) स्कोअरवर आधारित असतात, तर काहींसाठी विद्यापीठ स्वतः प्रवेश परीक्षा घेते. तसेच जेईई (JEE) सारख्या अनेक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण देखील विशिष्ट विषयाच्या प्रवेशासाठी वैध ठरतात.

आरक्षणात कोणाला मिळते प्राधान्य?
जामियामध्ये, मुस्लिम समाजातील विद्यार्थी, काही श्रेणी आणि महिला (JMI Admission 2024) उमेदवारांसाठी आरक्षण कोटा निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 30 टक्के जागा मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तसेच 10 टक्के जागा ओबीसी आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवल्या जातात. 3 टक्के जागा PH उमेदवारांसाठी आणि 10 टक्के जागा मुस्लिम महिलांसाठी राखीव आहेत.

प्रवेशात कोणत्या विद्यार्थ्यांना मिळते प्राधान्य (JMI Admission 2024)
याशिवाय काही टक्के जागा जेएमआयच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक अभ्यासक्रमाच्या ५ टक्के जागा राखीव आहेत. तर काश्मीर स्थलांतरितांसाठीही ५ टक्के जागांचा कोटा राखीव आहे.

विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला https://jmi.ac.in/ भेट द्यावी. केवळ वेबसाइटवर उपलब्ध असलेली माहिती लागू असेल, परंतु प्रवेशाच्या वेळी काही अटी व शर्ती जोडल्या जातात. तसेच काही अंशकालीन आणि पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षण कोटा लागू होत नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com