Home Blog Page 142

UPSC Success Story : शाळेसाठी रोजचा 70 की.मी.चा प्रवास; अनेकवेळा हरला पण थांबला नाही; चहा विकणारा तरुण असा बनला IAS

UPSC Success Story of IAS Himanshu Gupta

करिअरनामा ऑनलाईन । आज आपण अशा एका तरुणाची यशोगाथा (UPSC Success Story) पाहणार आहोत जो तरुण अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करुन अधिकारी बनला आहे. ही कथा आहे उत्तराखंडमधील हिमांशू गुप्ता यांची. करिअर घडवताना यांचा खडतर प्रवास कसा होता याची माहिती आपण घेणार आहोत. चहा विक्रीचा व्यवसाय करुन ते आधी IPS आणि नंतर IAS झाले आहेत.

वडिलांनी मुलांचं शिक्षण बंद पडू दिलं नाही
हिमांशू (IAS Himanshu Gupta) यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. त्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज 70 कि. मी. प्रवास कारावा लागत होता. एवढेच नाही तर वडिलांना हातभार लावण्यासाठी त्यांनी चहाच्या दुकानात कामही केले होते. शाळा, काम. अभ्यास अशी तारेवरची कसरत सुरु असताना त्यांनी परिस्थितीपुढे कधीच हार मानली नाही. हिमांशू आपल्या मेहनतीच्या बळावर UPSC परीक्षा पास झाले आहेत. आज ते IAS अधिकारी बनले आहेत. हिमांशू गुप्ता यांचे वडील रोजंदारीवर काम करायचे. तसेच जास्तीचे पैसे मिळवण्यासाठी ते चहा देखील विकत होते. तरीही त्यांनी आपल्या मुला-मुलींना शाळेत पाठवण्यासाठी कशाचीही कमी पडू दिली नाही.

चहाच्या दुकानात वडिलांना केली मदत (UPSC Success Story)
घरापासून हिमांशू यांची शाळा 35 किमी अंतरावर होती. त्यामुळे दररोज शाळेत येण्या-जाण्याचे अंतर 70 किमी एवढे होते. हिमांशू शाळेत जाण्यापूर्वी काही वेळ वडिलांसोबत चहाच्या दुकानावर काम करायचे. घरखर्च चालवण्यासाठी हिमांशू आणि त्यांचे वडील दोघे मिळून दिवसाला 400 रुपये कमवायचे. त्यांचे वर्गमित्र त्यांना ‘चायवाला’ म्हणून हिणवायचे. पण त्यांनी याकडे लक्ष देण्याऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.

इंग्रजी शिकण्यासाठी DVD विकत घेतल्या
हिमांशू सांगतात; “माझी स्वप्ने मोठी होती. मी शहरात राहण्याचे आणि माझे आणि माझ्या कुटुंबासाठी चांगले जीवन जगण्याचे स्वप्न पाहिले होते. स्वप्न सत्यात उतरवायचे असेल तर अभ्यास (UPSC Success Story) कर असे वडील सांगायचे. जर मी कठोर अभ्यास केला तर मला प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश मिळणार होता. पण मला इंग्रजी येत नव्हते, म्हणून मी इंग्रजी चित्रपटांच्या डीव्हीडी विकत घ्यायचो आणि शिकण्यासाठी त्या बघायचो. मी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले आणि मला हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.”

कुटुंबासाठी परदेशातील शिक्षणाची संधी नाकारली
“माझ्यामध्ये शिकण्याची भूक मोठी होती. मी माझ्या शिक्षणाचा खर्च पालकांवर लादला नाही. मी माझ्या कुटुंबात पदवीधर होणारा पहिला व्यक्ती आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण करताना (UPSC Success Story) मी माझ्या विद्यापीठात अव्वल आलो होतो. त्यामुळं मला परदेशात पीएचडी (PHD) करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. पण मी ती शिष्यवृत्ती नाकारली. कारण मी माझ्या कुटुंबापासून लांब राहू शकत नव्हतो. हा माझा सर्वात कठीण निर्णय होता; पण मी देशातच राहिलो आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये रुजू होण्याचा निर्णय घेतला.”

अनेक अपयशानंतर मिळवलं यश
सुरुवातीला हिमांशू गुप्ता यांनी UPSC चा अभ्यास करण्यासाठी (UPSC Success Story) कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लास लावला नाही. UPSCच्या पहिल्या प्रयत्नात ते अयशस्वी झाले. परंतू, आयएएस अधिकारी बनण्याचा त्यांनी चंग बांधला होता. त्यांनी दुप्पट मेहनत केली आणि परीक्षेसाठी आणखी 3 प्रयत्न केले. अखेर चौथ्या प्रयत्नात ते आयएएस (IAS) अधिकारी झाले.

IRTS, IPS अन् नंतर झाले IAS (UPSC Success Story)
हिमांशू (IAS Himanshu Gupta) यांनी 2018 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा पास केली; तेव्हा त्यांची भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) साठी निवड झाली. त्यांनी 2019 मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात भारतीय पोलिस सेवेसाठी म्हणजेच IPS पदावर त्यांची निवड झाली. यावर ते समाधानी नव्हते. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि 2020 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत IAS अधिकारी म्हणून निवड झाली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

National Overseas Scholarship 2024 : US/UK मध्ये शिकायचंय? सरकार देतंय 14 लाखांची स्कॉलरशिप; 31 मार्चपर्यंत करता येणार अर्ज

National Overseas Scholarship 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारच्या सामाजिक (National Overseas Scholarship 2024) न्याय आणि सक्षमीकरण विभागामार्फत परदेशी शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ‘राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती’ म्हणजेच ‘नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप 2024’ असं या शिष्यवृत्तीचं नांव आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना यूएस (US) आणि यूकेमध्ये (UK) मास्टर्स आणि पीएचडीचा अभ्यास करण्यासाठी शुल्कासह तब्बल 14 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते.

परदेशात जावून शिक्षण घ्यायला कोणाला आवडणार नाही? जर तुम्हाला परदेशात जावून शिक्षण घ्यायचं आहे परंतु कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे तुमचे स्वप्न तुम्हाला पूर्ण करता येत नसेल (National Overseas Scholarship 2024) तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकारकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. गरजू विद्यार्थ्यांना या योजनेतून परदेशी शिक्षण घेता येणार आहे.

फीसह 11 ते 14 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार (National Overseas Scholarship 2024)
आवश्यक पात्रता असलेले उमेदवार नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये निवड झाल्यास, कोर्स फी व्यतिरिक्त केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांना 11 ते 14 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही आर्थिक मदत वार्षिक पोटगी, वार्षिक आकस्मिक निधी आणि इतर खर्चासाठी दिली जाते. याशिवाय ट्यूशन फी, राउंड ट्रिपचे विमान भाडे, वैद्यकीय विमा आदी विविध सोयी सवलती विद्यार्थ्यांना दिले जातात.

कोण करू शकतात अर्ज?
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने जारी केलेल्या राष्ट्रीय स्थलांतरित शिष्यवृत्ती 2024 च्या अधिसूचनेनुसार, एकूण 125 विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या या शिष्यवृत्तीपैकी 115 अनुसूचित जातीतील आहेत; 6 विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती; आणि 4 भूमिहीन शेतमजूर आणि पारंपरिक कारागीर (National Overseas Scholarship 2024) कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिपसाठी पात्र होण्यासाठी, विद्यार्थ्याने यूएस किंवा यूके संस्थेकडून मास्टर्स किंवा पीएचडी प्रवेशासाठी ऑफर लेटर प्राप्त केले पाहिजे जे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 च्या टॉप 500 मध्ये आहे. यासह विद्यार्थ्यांनी पात्रता परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशासाठी, विद्यार्थ्यांनी बॅचलर पदवी आणि पीएचडीसाठी, मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

असा करा अर्ज
‘नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप 2024’ साठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांना (National Overseas Scholarship 2024) या शिष्यवृत्तीसाठी सुरू करण्यात आलेल्या या https://nosmsje.gov.in/nosmsje/ या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल. या पोर्टलवर प्रथम नोंदणी करून आणि नंतर नोंदणीकृत तपशीलांसह लॉग इन करून विद्यार्थी त्यांचे अर्जसादर करू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NATA Exam 2024 : आर्किटेक्चर होणाऱ्यांसाठी NATA 2024 परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू; ‘या’ तारखेला परीक्षा

NATA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । आर्किटेक्चर होवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (NATA Exam 2024) महत्वाची अपडेट आहे. नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षा (NATA) 2024 साठी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर ने नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या परीक्षेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार www.nata.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

या तारखेला होणार परीक्षा
NATA परीक्षा एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीत सर्व शनिवार (NATA Exam 2024) आणि रविवारी दोन सत्रात घेतली जाईल. या NATA परीक्षेचे गुण 2 शैक्षणिक वर्षांच्या कालावधीसाठी वैध असतील. NATA 2024 ची परीक्षा येत्या दि. 6 एप्रिल रोजी होणार आहे. ही परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार आहे. पहिले सत्र सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत असेल, तर दुसरे सत्र दुपारी 1.30 ते 4.30 या वेळेत होणार आहे.

असा करा अर्ज (NATA Exam 2024)
या परीक्षेसाठी अर्ज करताना, उमेदवारांना त्यांचे तपशील आणि शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करावी लागेल. या व्यतिरिक्त उमेदवारांना त्यांचे नवीन फोटो अपलोड करावे लागतील. उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी jpg/jpeg मध्ये असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : विना परीक्षा थेट मुलाखत; कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयात ‘या’ पदासाठी भरती

Government Job (51)

करिअरनामा ऑनलाईन । कांदा आणि लसूण संशोधन (Government Job) संचालनालय, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), प्रोजेक्ट असिस्टंट पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख लवकरच उपलब्ध करण्यात येईल.

संस्था – कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे
भरले जाणारे पद –
1. ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)
2. प्रोजेक्ट असिस्टंट
पद संख्या – 02 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध होईल
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भाकृअनुप-प्याज एवं लहसुन अनुसंधान निदेशालय, राजगुरुनगर, पुणे, महाराष्ट्र 410505
निवड प्रक्रिया – मुलाखत

असा करा अर्ज – (Government Job)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
3. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध करण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://dogr.icar.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SCI Recruitment 2024 : मुंबईत नोकरी; शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

SCI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (SCI Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून करारावर सचिवीय अधिकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024 आहे.

संस्था – शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद – करारावर सचिवीय अधिकारी (Secretarial Officer)
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –12 मार्च 2024
नोकरीचे ठिकाण – मुंबई

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SCI Recruitment 2024)
Qualified Company Secretary having Associate/Fellow membership of the Institute of Company Secretaries of India (ICSI)
मिळणारे वेतन –
A consolidated monthly pay of Rs. 50,000/- will be paid. No other perks / benefits / allowances shall be applicable. Income tax will be deducted as per rules.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवशक (SCI Recruitment 2024) कागदपत्र सादर करावेत.
4. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर पाठवायचे आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.shipindia.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : प्राध्यापक, कार्यालयीन सहाय्यक पदावर नोकरीची संधी; लगेच करा APPLY

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन बँक अंतर्गत प्राध्यापक, कार्यालयीन (Job Alert) सहाय्यक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2024 आहे.

संस्था – इंडियन बँक
भरली जाणारी पदे – प्राध्यापक, कार्यालयीन सहाय्यक
पद संख्या – 02 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – (PDF पहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2024
निवड प्रक्रिया – मुलाखत
वय मर्यादा – 22 ते 40 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्राध्यापकShall be a Graduate / Post Graduate viz. MSW/MA in Rural Development / MA in Sociology/Psychology/B.Sc. (Veterinary), B.Sc. (Horticulture), B.Sc. (Agri.), B.Sc. (Agri. Marketing)/ B.A. with B.Ed. etc. Shall have a flair for teaching and possess sound Computer Knowledge
कार्यालयीन सहाय्यकShall be a graduate viz., (BSW/ BA/B.com/ with computer knowledge.) Knowledge in basic accounting is a preferred qualification

मिळणारे वेतन – (Job Alert)

पदवेतन
प्राध्यापकRs. 20000 per moth
कार्यालयीन सहाय्यकRs. 12000 per moth

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Job Alert) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
4. दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.indianbank.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NALCO Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी इथे आहे सरकारी नोकरीची संधी; 1 लाखाच्यावर मिळेल पगार

NALCO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये विविध (NALCO Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे.

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना अनेक उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात असतात. अशा उमेदवारांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी पदाच्या एकूण 277 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांनी इथे दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन अर्ज करुन या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे. पाहूया भरतीचा तपशील….

संस्था – नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि.
भरले जाणारे पद – ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (GET)
पद संख्या – 277 पदे
भरतीचा तपशील – (NALCO Recruitment 2024)
1) मेकॅनिकल 127 पदे
2) इलेक्ट्रिकल 100 पदे
3) इंस्ट्रुमेंटेशन 20 पदे
4) मेटलर्जी 10 पदे
5) केमिकल 13 पदे
8) केमिस्ट्री (CY) 07 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 एप्रिल 2024 (04:00 PM)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – B.E/B.Tech किंवा M.Sc. (Chemistry)
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 एप्रिल 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत
2. SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी/EWS – ₹500/-
SC/ST/PWD: ₹100/- (NALCO Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – भुवनेश्वर

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nalcoindia.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

10 th Board Exam 2024 : मुलांनो… परीक्षेचे टेन्शन घेवू नका; 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर; इथे फोन करून तणाव करा दूर

10 th Board Exam 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च (10 th Board Exam 2024) माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी 10 वी ची परीक्षा आजपासून (ता.1 मार्च) सुरु झाली आहे. राज्यभरातून सुमारे 16 लाख विद्यार्थी या परीक्षेस बसले आहेत. मराठी विषयाच्या पेपरने या परीक्षेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी 10 वी ची परीक्षा म्हणजे आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा १० ते २९ तारखेदरम्यान घेण्यात आल्या होत्या तर लेखी परीक्षा १ मार्च ते २६ मार्च दरम्यान होणार आहेत.

समुपदेशनासाठी विभागनिहाय क्रमांक (10 th Board Exam 2024)
परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण असतो. त्यामुळे यादरम्यान विद्यार्थ्याला नैराश्‍य येण्याची शक्यता असते. याचा उत्तर लेखनावर परिणाम होवू शकतो. त्यासाठी बोर्डाच्या वतीने विभागनिहाय समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आले आहेत. यामध्ये उपलब्ध असलेल्या समुपदेशकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन केले जाईल. नागपुरात विद्यार्थी ९८२२६९२१०३, ८८३०४५८१०९, ९६७३१६३५२१, ८३०८००७६१३ या क्रमांकावर संपर्क करू शकतात. अधिक माहितीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षण मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाईटला भेट द्यायची आहे.

प्रत्येक जिल्ह्यात पाच भरारी पथके तैनात
परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने विविध उपाययोजना केल्या आहेत. यंदा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पाच भरारी पथके ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्राथमिक (10 th Board Exam 2024) शिक्षण, माध्यमिक शिक्षण, राज्य शिक्षण व प्रशिक्षण, योजना आणि उपशिक्षणाधिकारी यांच्या भरारी पथकांचा समावेश राहणार आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील महसूल विभागाचे भरारी पथकही परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti : पोलीस शिपाई आणि चालक पदावर भरती सुरु; पुणे ग्रामीण पोलीस विभागाची जाहिरात

Police Bharti (3)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत (Police Bharti) पोलीस शिपाई व चालक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 496 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

पोलिस भरती हा तरुणांचा एकदम जिव्हाळ्याचा विषय. विशेषतः ग्रामीण भागातील तरुण या भरतीची आतुरतेने वाट पाहत असतो. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना शास्वत सरकारी नोकरी मिळण्याची खात्री असते. त्यामुळे उमेदवार पोलिस भरतीत पात्र होण्यासाठी कसून मेहनत घेताना दिसतात. अशा तरुणांसाठी ही भरती महत्वाची ठरणार आहे. या भरतीमध्ये उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो; याची उमेदवारांनी नोंद घ्यावी; असं आवाहन करण्यात आलं आहे. पाहूया अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर….

विभाग – पुणे ग्रामीण पोलीस विभाग
भरले जाणारे पद – पोलीस शिपाई व चालक
पद संख्या – 496 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – ५ मार्च २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२४

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12 वी पास
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे ग्रामीण
वय मर्यादा – (Police Bharti)
1. खुला वर्ग – 18 ते 28 वर्षे
2. मागासवर्गीय – 18 ते 33 वर्षे
अर्ज फी –
1. खुला प्रवर्ग – रु. 450 /-
2. मागास प्रवर्ग – रु. 350 /-

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
पोलीस शिपाई448  पदे
पोलीस चालक48  पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे (Police Bharti) आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}
पोलीस शिपाई चालक12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

शारीरिक निकष –

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.
निवड प्रक्रिया – (Police Bharti)
1. शारीरिक चाचणी
2. लेखी परीक्षा
3. चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी
4. वैद्यकीय चाचणी इ.

काही महत्वाच्या लिंक्स – (Police Bharti)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – puneruralpolice.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : पार्ट टाईम नोकरीसह जिद्दीने केला अभ्यास; अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of IAS Sonal Goel

करिअरनामा ऑनलाईन । ही तडफदार महिला 2008 च्या बॅचची (UPSC Success Story) IAS अधिकारी आहे. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाणारी UPSC परीक्षा तिने अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात पास केली आहे आणि ते ही नोकरी करत असताना. परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात तिला सामान्य अध्ययन विषयात कमी मार्क मिळाले. यामुळे तिची अंतिम निवड होऊ शकली नाही. पण तिने थांबायचं नाव घेतलं नाही. अभ्यासामध्ये सातत्य ठेवून तिने आपला प्रवास सुरुच ठेवला. महिला अधिकाऱ्याची ही कहाणी खूपच प्रेरणादायी आहे.

नोकरीसह UPSC सारखी परीक्षा उत्तीर्ण करणे तसे सोपे नाही. पण आज आपण अशा एका महिला अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत जिने नोकरीसोबत अभ्यास करुन UPSC परीक्षा (UPSC Success Story) पास केली आहे. सोनल गोयल असं या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. सोनलने दुसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा पास केली आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर तिच्या मुख्य परीक्षेची मार्कशीट शेअर केली; जे पाहून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. IAS सोनल गोयल (IAS Sonal Goel) देखील अशाच सक्षम महिला अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया साइटवर देखील खूप सक्रिय आहेत.

मला नॉस्टॅल्जिक वाटते (UPSC Success Story)
सोनल (IAS Sonal Goel) 2008 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाणारी UPSC परीक्षा त्यांनी अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात पास केली. याबद्दल माहिती देताना सोनल सांगते; “जेव्हाही मी माझी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस 2007 ची मुख्य मार्कशीट पाहते तेव्हा मला नॉस्टॅल्जिक वाटते. ही मार्कशीट पाहून मला परीक्षा, मी केलेले प्रयत्न आणि मिळवलेले यश आठवते.” UPSC च्या पहिल्या प्रयत्नात मला सामान्य अध्ययन विषयात कमी गुण मिळाले होते. यामुळे माझी वड होऊ शकली नाही; पण मी हार मानली नाही. शेवटी मी यश मिळवलेच.”

LLB, पार्ट टाईम नोकरी आणि UPSC चा अभ्यास
सोनल गोयलचा जन्म हरियाणातील पानिपत येथे झाला (UPSC Success Story) आणि शिक्षण दिल्लीत घेतले. IAS अधिकारी सोनल गोयल म्हणतात, की “मी दिल्ली विद्यापीठातून LLB करत असताना आणि सीएस – कंपनी सेक्रेटरी म्हणून पार्ट टाईम नोकरी करत असताना परीक्षेची तयारी केली आहे. मी घेतलेले परिश्रम आणि दृढनिश्चयाचा परिणाम म्हणजे मी केवळ परीक्षा पास झाले नाही तर मी ज्या विषयाच्या तयारीसाठी वेळ दिला त्यामध्ये मी जास्त मार्क मिळवले.”

पास होण्यासाठी 2 प्रयत्न पुरेसे (UPSC Success Story)
नागरी सेवा परीक्षा देणाऱ्या तून उमेदवारांना सल्ला देताना सोनल म्हणतात; “नागरी सेवा परीक्षेसाठी दोन प्रयत्न पुरेसे आहेत. जर तुम्ही पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर तुम्हाला तुमच्या चुका समजतात, ज्या दुस-या प्रयत्नात सुधारल्या जाऊ शकतात ज्यामुळे दुसऱ्या प्रयत्नात तुम्हाला यश मिळवणे सोपे होवू शकते. तरुण उमेदवारांकडे ‘प्लॅन बी’ तयार असावा. हा विचार करुन मी माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून एलएलबी केले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com