JMI Admission 2024 : जामिया मिलिया इस्लामिया केंद्रीय विद्यापीठातून मिळवा पदवी; असा मिळवा प्रवेश… कोणाला मिळते प्राधान्य?

करिअरनामा ऑनलाईन । देशातील केंद्रीय विद्यापीठातून पदवी (JMI Admission 2024) मिळवण्याचे बहुतांश विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. यापैकी एक विद्यापीठ आहे दिल्ली येथे स्थित ‘जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ’ आहे. या विद्यापीठाने सध्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. जर तुम्ही JME विद्यापीठाच्या प्रवेशासाठी नोंदणी करण्यासाठी इच्छुक असाल तर अधिक माहितीसाठी पुढे वाचा….

प्रवेश परीक्षा
जामियामध्ये प्रवेशासाठी जागा मर्यादित असतात पण प्रवेश (JMI Admission 2024) मिळवण्यासाठी स्पर्धा मोठी असते. अशा परिस्थितीत, केवळ तेच विद्यार्थी या शर्यतीत टिकून राहतात जे सर्व पात्रतेच्या अटी पूर्ण करतात. यासह विद्यापीठाकडून घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जामियाच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध परीक्षा द्याव्या लागतात.
तसेच अनेक बॅचलर पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश हे CUET (CUET) स्कोअरवर आधारित असतात, तर काहींसाठी विद्यापीठ स्वतः प्रवेश परीक्षा घेते. तसेच जेईई (JEE) सारख्या अनेक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण देखील विशिष्ट विषयाच्या प्रवेशासाठी वैध ठरतात.

आरक्षणात कोणाला मिळते प्राधान्य?
जामियामध्ये, मुस्लिम समाजातील विद्यार्थी, काही श्रेणी आणि महिला (JMI Admission 2024) उमेदवारांसाठी आरक्षण कोटा निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 30 टक्के जागा मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तसेच 10 टक्के जागा ओबीसी आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवल्या जातात. 3 टक्के जागा PH उमेदवारांसाठी आणि 10 टक्के जागा मुस्लिम महिलांसाठी राखीव आहेत.

प्रवेशात कोणत्या विद्यार्थ्यांना मिळते प्राधान्य (JMI Admission 2024)
याशिवाय काही टक्के जागा जेएमआयच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक अभ्यासक्रमाच्या ५ टक्के जागा राखीव आहेत. तर काश्मीर स्थलांतरितांसाठीही ५ टक्के जागांचा कोटा राखीव आहे.

विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला https://jmi.ac.in/ भेट द्यावी. केवळ वेबसाइटवर उपलब्ध असलेली माहिती लागू असेल, परंतु प्रवेशाच्या वेळी काही अटी व शर्ती जोडल्या जातात. तसेच काही अंशकालीन आणि पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षण कोटा लागू होत नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com