Home Blog Page 118

Railway Recruitment 2024 : राज्यातील तरुणांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी; पात्रता फक्त 10 वी पास

Railway Recruitment 2024
xr:d:DAF2TZni6GE:1563,j:4127973797914422985,t:24041312

करिअरनामा ऑनलाईन ।रेल्वेमध्ये मोठी भरती निघाली (Railway Recruitment 2024) आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 861 रिक्त पदे भरली जाणार आहेत. याभरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

रेल्वेतील भरती ही महत्वाची भरती समजली जाते. रेल्वेत भरती होण्यासाठी देशातील अनेक तरुण-तरुणी इच्छुक असतात. अशा उमेदवारांसाठी ही भरती महत्वाची ठरणार आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे. जाणून घेवूया सविस्तर….

संस्था – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
पद संख्या – 861 पदे (Railway Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – 15 ते 24 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Applicants must have passed Matriculation or its equivalent with a minimum of 50% marks. Additionally, they should possess a National Trade Certificate (ITI) in the relevant trade.

भरतीचा तपशील – (Railway Recruitment 2024)

Trade NameTotal
For Nagpur Division
Fitter90
Carpenter30
Welder19
COPA114
Electrician185
Stenographer (English)/ Secretarial Assistant19
Plumber24
Painter40
Wireman60
Electronics Mechanic12
Diesel Mechanic90
Upholsterer (Trimmer)02
Machinist22
Turner10
Dental Laboratory Technician01
Hospital Waste Management Technician02
Health Sanitary Inspector02
Gas Cutter07
Stenographer (Hindi)08
Cable Jointer10
Digital Photographer00
Driver-cum-Mechanic (Light Motor Vehicle)02
Mechanic Machine Tool Maintenance12
Mason (Building Constructor)27
For Workshop Motibagh
Fitter35
Welder07
Carpenter04
Painter12
Turner02
Secretarial Steno (Eng) Practice03
Electrician

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खाली (Railway Recruitment 2024) दिलेल्या लिंक वरून करायचा आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.
5. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

काही महत्वाच्या लिंक्स – (Railway Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
secr.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CBIC Recruitment 2024 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! दरमहा 1,51,100 पगार

CBIC Recruitment 2024
xr:d:DAF2TZni6GE:1557,j:7784896688188065360,t:24041310

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा (CBIC Recruitment 2024) शुल्क मंडळ अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अतिरिक्त सहायक संचालक पदांच्या एकूण 110 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मे 2024 आहे.

संस्था – केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ
भरले जाणारे पद – अतिरिक्त सहायक संचालक
पद संख्या – 110 पदे (CBIC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक (सीसीए), डीजीपीएम मुख्यालय, पाचवा मजला, ड्रमच्या आकाराची इमारत, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली-110002
मिळणारे वेतन – Rs. 47600/- ते Rs. 1,51,100/- दरमहा

असा करा अर्ज – (CBIC Recruitment 2024)
1. या बरतींतही इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – dgpm.gov.in
अप्लिकेशन फॉर्मसाठी येथे CLICK करा – Form
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : शेतकऱ्याच्या मुलीने केला विक्रम!! सलग दोन वेळा क्रॅक केली UPSC; एक बहिण IAS तर दुसरी आहे IPS

Career Success Story of IAS Aishwarya Ramnathan
xr:d:DAF2TZni6GE:1550,j:1782724276310033744,t:24041308

करिअरनामा ऑनलाईन । काही लोक त्यांच्या आयुष्यात इतके दृढनिश्चयी (Career Success Story) आणि आत्मकेंद्रित असतात की अशी लोकं त्यांची स्वप्ने अगदी लहान वयातच पूर्ण करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मुलीबद्दल सांगणार आहोत, जिने लहान वयातच आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न जिद्दीने पूर्ण केले आहे. महिला IAS अधिकारी ऐश्वर्या रामनाथन यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा एकदा नव्हे तर दोनदा पास केली आहे. त्याचवेळी ऐश्वर्याच्या बहिणीलाही IPS पद मिळाले आहे.

अवघ्या २४ व्या वर्षी झाली IAS
IAS अधिकारी ऐश्वर्या रामनाथन यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत; ज्यांनी वयाच्या 24 व्या वर्षी UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दोनदा पास केली. ऐश्वर्या रामनाथन ही भारतातील सर्वात तरुण आयएएस (IAS) अधिकाऱ्यांपैकी एक आहे. जेव्हा त्यांचं वय फक्त 24 वर्षे होतं तेव्हा त्यांनी 2019 च्या UPSC परीक्षेत संपूर्ण भारतातून 47 व्या क्रमांकासह यश मिळविले. सध्या त्या तमिळनाडूतील तिरुवल्लूर येथे उपजिल्हाधिकारी पदावर तैनात आहेत.

जिल्हाधिकारी गगनदीपसिंग बेदी आहेत आदर्श
तामिळनाडूच्या किनारी जिल्ह्याच्या कुड्डालोर येथील (Career Success Story) असलेल्या ऐश्वर्या यांनी लहानपणापासूनच पूर, चक्रीवादळ आणि अतिवृष्टी यांसारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे. विशेषत: 2004 च्या सुनामीचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. या आपत्ती काळात जिल्हाधिकारी गगनदीपसिंग बेदी यांनी केलेले काम पाहून ऐश्वर्या प्रभावित झाल्या. आयएएस होण्यासाठी त्यांच्यासाठी ही मोठी प्रेरणा होती.

वडील आहेत शेतकरी (Career Success Story)
ऐश्वर्या या एका सामान्य कुटुंबातून आल्या आहेत. त्यांचे वडील आर. रामनाथन हे काजू शेतकरी आहेत. तर त्यांची आई सरकारी नोकर आहेत. त्यांच्या आईचं अगदी लहान वयात लग्न झालं; पण यानंतर त्यांनी प्रयत्न करून सरकारी नोकरी मिळवली. त्यांनी मुलीला कलेक्टर होण्यासाठी नेहमीच प्रेरणा दिली.

पहिल्याच प्रयत्नात मिळवली 630 वी रँक
मनात मोठी स्वप्ने घेऊन ऐश्वर्याने 2017 मध्ये चेन्नईच्या अण्णा विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी UPSC कोचिंग घेऊन नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी अखिल भारतीय 630 वी रँक मिळवली होती आणि रेल्वे लेखा सेवेसाठी निवड झाली. मात्र त्यांचं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न होतं; म्हणून त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या प्रयत्नात आयएएस होण्याचे स्वप्न केले पूर्ण
ऐश्वर्या यांची रेल्वे लेखा सेवेसाठी निवड झाली होती मात्र (Career Success Story) त्या या पदावर समाधानी नव्हत्या. त्यांनी 2019 मध्ये पुन्हा परीक्षा दिली. हा त्यांचा दूसरा प्रयत्न होता. यावेळी त्यांनी UPSC परीक्षा अखिल भारतीय 47 व्या रँकसह यशस्वीपणे पास केली आणि अखेर त्यांचे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. निकालानंतर एका मुलाखतीत ईश्वर्याने सांगितले की, आयएएस अधिकारी बनणे हे त्यांचे बालपणीचे स्वप्न होते; ज्यासाठी त्यांच्या आईने नेहमीच त्यांना प्रेरित केले होते.

एक बहिण IAS तर दुसरी IPS
ऐश्वर्या सोशल मीडियावर विशेषत: इंस्टाग्रामवर खूप (Career Success Story) सक्रिय आहे, जिथे तिचे एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे, ईश्वर्याची बहीण सुष्मिता रामनाथन हिनेही यूपीएससी उत्तीर्ण केली असून ती सध्या आयपीएस पदाची धुरा सांभाळत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

10 th and 12th Board Exam Results : मोठी बातमी!! ‘या’ तारखेला जाहीर होणार 10 वी/12 वी चा निकाल

10 th and 12th Board Exam Results
xr:d:DAF2TZni6GE:1544,j:6171482107389691148,t:24041307

करिअरनामा ऑनलाईन | यावर्षी 10वी आणि 12वीची परीक्षा (10 th and 12th Board Exam Results) कॉपीमुक्त होण्यासाठी बोर्डाने विशेष काळजी घेतली होती. यासाठी सगळ्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक करण्यात आले होते. आता याच पार्श्वभूमीवर जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वी-12वीच्या प्रत्येक परीक्षा केंद्राची तपासणी केली जाणार आहे. परीक्षा केंद्रावरचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत का? कॅमेऱ्यांना बॅकअप आहे का? याची पडताळणी देखील होणार आहे. जे परीक्षा केंद्र बोर्डाच्या आदेशानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार नाहीत; तेथील केंद्राची मान्यता देखील रद्द केली जाणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी होणार (10 th and 12th Board Exam Results)
यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणार आहेत. त्याचप्रमाणे जुलैपासून सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाही, याची देखील पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम कार्य करणार आहे. बोर्डाचे अधिकारी प्रत्येक केंद्राला भेट देऊन तेथील स्थितीचा अहवाल बोर्डाकडे सादर करणार आहेत.

कॉपी करण्याच्या प्रकाराला कायमस्वरूपी आळा बसणार
यावर्षी CBSE बोर्डाने देखील 10वीच्या परीक्षेसाठी Best of 5 ची पद्धत सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा फॉर्म्युला अवलंबला आहे. आता (10 th and 12th Board Exam Results) ओपनबुक परीक्षा पद्धत अंमल अवलंबण्याची CBSE बोर्डाची तयारी आहे. या नवीन पद्धतीमुळे कॉपी करण्याच्या प्रकाराला कायमस्वरूपी आळा बसणार आहे; असा विश्वास या निर्णयामागे असणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षांचे स्वरूप देखील बदलणार आहे. सेमिस्टर पद्धतीने ही परीक्षा होऊ शकते; असे शिक्षक तज्ञांनी सांगितले आहे.

85 टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण
इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर त्यांच्या उत्तर पत्रिकांची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत या दोन्ही वर्गाच्या 85 टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे (10 th and 12th Board Exam Results) प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण शाळांनी ऑनलाईन पद्धतीने बोर्डाला देखील पाठवलेले आहेत. दरवर्षी आपण पाहिले तर 12वीचा बोर्डाचा निकाल हा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. तर 10वीच्या बोर्डाचा निकाल हा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो. परंतु आता यावर्षी दहावी आणि बारावीचे निकाल हे 5 जून पूर्वीच लागणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Medical Seats in Maharashtra : मेडिकल शिक्षण घेण्यासाठी स्पर्धा वाढली; राज्यात 11 हजारपेक्षा जास्त जागा उपलब्ध

Medical Seats in Maharashtra
xr:d:DAF2TZni6GE:1540,j:2002274747711655424,t:24041306

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक तरुण तरुणींना वैद्यकीय (Medical Seats in Maharashtra) क्षेत्रात अभ्यास करुन डॉक्टर होण्याची इच्छा असते. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेवून सर्वोत्तम शिक्षण शिक्षण घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र या क्षेत्रात दरवर्षी उमेदवारांची संख्या वाढत असल्याने मेडिकल क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली आहे. समान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात जात आहे. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात यश न मिळाल्यास दुसऱ्या आणि तिसऱ्या संधीसाठी विद्यार्थी नेहमीच तयार असतात.

वैद्यकीय प्रवेशासाठी स्पर्धा वाढली (Medical Seats in Maharashtra)
गेल्या वर्षी देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी शाखा अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या १ लाख २५ हजार होती. या जागांवर प्रवेशासाठी तब्बल २१ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी नीट (NEET) परीक्षा दिली. यावेळी विद्यार्थ्यांची संख्या २४ लाखांवर जाणार आहे. जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी स्पर्धा वाढली आहे.

प्रवेशासाठी अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना नीटने आणखी २ दिवस दिले होते. याआधी अर्ज करणाऱ्यांची संख्या २३ लाख ८१ हजार ९३३ होती. आता ती २४ लाखांच्या (Medical Seats in Maharashtra) पुढे जाणार असल्याचा अंदाज आहे. सध्या २५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तर ४ शासकीय दंत महाविद्यालये आहेत. येत्या काही दिवसात ही संख्या ३२ होईल.

वैद्यकीय शिक्षणातील वाढत्या स्पर्धेमुळे महाराष्ट्रात एमबीबीएसच्या (MBBS) जागाही वाढल्या आहेत. यावेळी राज्यात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाचे प्रवेश दिले जाणार आहेत. राज्यातील ३२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत ५ हजार १२५ जागा आहेत. यामध्ये नागपूर एम्स, पुणे (Medical Seats in Maharashtra) एएफएमसी आणि मुंबई महापालिकेच्या महाविद्यालयांचा समावेश आहे. तर खासगी महाविद्यालयांमध्ये ३ हजार ५१० जागा आहेत. तर अभिमत विद्यापीठांमध्ये २ हजार ५१० जागा आहेत. सध्या राज्यात एकूण ११ हजार १४५ जागा उपलब्ध आहेत. बहुतांश विद्यार्थी शासकीय महाविद्यालयांकडे धाव घेतात. परंतु त्यासाठी उच्चांकी गुणांची आवश्यकता असते. यामुळेच ४० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी दुसऱ्यांदा प्रवेश परीक्षा देतात.

अशी आहे विद्यार्थी संख्या –
वैद्यकीय ‘नीट’ चाळणी परीक्षेसाठी – २४ लाख विद्यार्थी
खासगी वैद्यकीय महाविद्यालय – ३,५१० जागा
अभिमत विद्यापीठ – २,५१० जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – ५,१२५ जागा
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Pune Recruitment 2024 : पुणे जिल्हा परिषदेत ‘या’ पदावर नोकरीची मोठी संधी; त्वरा करा

ZP Pune Recruitment 2024
xr:d:DAF2TZni6GE:1536,j:2796034002459040191,t:24041112

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी (ZP Pune Recruitment 2024) एक महत्वाची अपडेट आहे. तुम्ही जर पुण्यात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठीच मोठी बातमी आहे. पुणे जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषद अंतर्गत ‘वकिल पॅनल’ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. जाणून घेवूया भरती विषयी सविस्तर…

संस्था – पुणे जिल्हा परिषद, पुणे
भरले जाणारे पद – वकिल पॅनल
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ZP Pune Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

असा करा अर्ज – (ZP Pune Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
3. उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://www.zppune.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Update : महिला उमेदवारांना मोठा दिलासा!! MPSC ने PSI पदासाठी होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलली

MPSC Update
xr:d:DAF2TZni6GE:1530,j:4242815360401177564,t:24041107

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक (MPSC Update) मोठी अपडेट जारी केली आहे. पोलिस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी अखेरीस पुढे ढकलण्यात आली आहे. तयारीसाठी अपुरा कालावधी आणि उन्हाचा वाढता तडाखा आणि महिला उमेदवारांसाठी बदललेल्या निकषामुळे तयारीसाठी पुरेशा वेळेची मागणी करण्यात आली होती; या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

महिला उमेदवारांना दिलासा
शारीरिक चाचणी पुढे ढकलल्याने महिला उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. MPSCकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ या परीक्षेतीस पोलीस उपनिरीक्षक (PSI) संवर्गाकरीता १५ एप्रिल २०२४ ते २ मे २०२४ या कालावधीत शारीरिक चाचणी आयोजित केली होती; परंतु लोकसभा (MPSC Update) निवडणुकीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे MPSC ने जाहीर केले आहे. मात्र शारीरिक चाचणी कधी घेतली जाणार याबाबत तारीख मात्र जाहिर केली नाही. सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल; असे MPSCने जाहीर केलेल्या घोषणा पत्रकात नमूद केले आहे.

पीएसआयच्या शारीरिक चाचणीच्या निकषांमध्ये २०२१ मध्ये बदल करण्यात आला होता. उमेदवारांना तयारीसाठी एक वर्ष मिळाले असतानाही त्यावर्षी ११२ जागांपैकी फक्त ६४ मुली पात्र ठरल्या होत्या. आता तर फक्त एक महिन्याचाच कालावधी मिळाला आहे. १३ मार्च रोजी मुख्य परीक्षेचा निकाल लागला होता.

उनाच्या तडाख्यात मैदानी चाचणीची तयारी करणे अशक्य (MPSC Update)
एका महिन्यातच शारीरिक चाचणीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नवे निकष महिला उमेदवारांसाठी बदलले असून, इतर राज्यांच्या तुलनेत ते अवघड आहे. अपुऱ्या वेळेत आणि वाढत्या उन्हाळ्यात ही तयारी करणे जवळपास अशक्य आहे. महिला उमेदवारांचा मागील भरतीत टक्का घसरला आहे. तसेच २०१५ ते २०२१ या दरम्यान कधीही एमपीएससीने भर उन्हाळ्यात अशा प्रकारची परीक्षा घेतली नाही. परीक्षा कालावधी जरी सकाळचा असला तरीही त्यासाठी लागणारा सराव दररोज उन्हात करावा लागत आहे, असेही उमेदवारांचे म्हणणे होते.

अवघ्या एका महिन्यात मैदानी चाचणी होणार होती, त्यामुळे आता ही चाचणी पुढे ढकलल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. एमपीएससीने विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करण्यासाठी पुढे ढकलेल्या परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात; अशी मागणी उमेदवारांमधून होत आहे.

एमपीएससीने यापूर्वी लोकसभा निवडणुकांमुळे PSIची शारीरिक चाचणीची १५ ते २७ एप्रिल दरम्यान आयोजित केली होती. तसेच १९, २६ आणि २७ एप्रिल रोजी होणारी शारीरिक (MPSC Update) चाचणीची परिक्षा ही २९, ३० एप्रिल आणि ०२ मे २०२४ रोजी पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे होणार असल्याचे जाहीर केले होते. यावर उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्याचे कारण देत ती पुढे ढकलली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पोलिसांसह सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामकाज दिले जाते. याची प्रत्येक विभागाल माहिती असते. तरी देखील एमपीएससीने कोणतेही नियोजन न करता सरसकट ताराख जाहीर करुन ढिसाळ नियोजनाचे प्रदर्शन केले; असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

पीएसआय पदाची मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी महिला (MPSC Update) उमेदवारांनी केली होती. त्याला नकार देत एमपीएससीने नवीन तारखा जाहीर केल्या होत्या. मात्र विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या आदेशाने का होईना मैदानी चाचणी पुढे ढकलली, यामुळे तरी आता या उमेदवारांना मोठा दिलासा मिळेल; असा विश्वास स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी व्यक्त केला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC CDS Exam 2024 : UPSC CDS परीक्षा ‘या’ तारखेला होणार; पहा सविस्तर

UPSC CDS Exam 2024
xr:d:DAF2TZni6GE:1524,j:5378848361620220596,t:24041106

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत (UPSC CDS Exam 2024) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा 21 एप्रिल 2024 रोजी घेतली जाणार आहे. ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहे. ही परीक्षा पास करणाऱ्या उमेदवारांना इंडियन मिलिटरी अकादमी, इंडियन नेव्हल अकादमी आणि एअर फोर्स अकादमीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या परीक्षेचा कालावधी 6 तासांचा असेल. तर इंडियन मिलिटरी ट्रेनिंग अकादमीसाठी लेखी परीक्षेचा कालावधी 4 तासांचा असेल.

UPSC CDS परीक्षेची तारीख
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) CDS 2024 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. 21 एप्रिल 2024 रोजी ही परीक्षा होणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही UPSC ची अधिकृत वेबसाईट https://upsc.gov.in/ ला भेट देऊ शकता.

परीक्षेसंदर्भात महत्वाचे – (UPSC CDS Exam 2024)
परीक्षा सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्राचे दरवाजे नियोजित वेळेच्या 10 मिनिटे आधी बंद होतील. इंग्रजीचा पेपर सकाळी 9 ते 11 या वेळेत होईल. GKचा पेपर दुपारी 12 ते 2 या वेळेत होणार आहे. तर दुपारी ३ ते ५ या वेळेत प्राथमिक गणिताचा पेपर होईल.

अशी आहे निवड प्रक्रिया
UPSC CDS साठी निवड प्रक्रिया दोन टप्प्यात केली जाईल. परीक्षा प्रक्रियेचा तपशील खाली दिला आहे.
1. भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षा 600 गुणांच्या परीक्षेत प्रत्येकी 200 गुणांचे तीन वेगवेगळे पेपर असतात. 2. एसएसबी परीक्षेसाठी निवड यादी लेखी परीक्षेत (UPSC CDS Exam 2024) मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे तयार केली जाईल.
3. सर्व विषयांचा पेपर १०० गुणांचा असून तो पूर्ण करण्यासाठी २ तासांचा अवधी देण्यात आला आहे.

UPSC CDS निवड प्रक्रिया
1. SSB प्रक्रियेमध्ये फेज I आणि फेज II अशा 2 टप्प्यांची निवड प्रक्रिया समाविष्ट आहे. ज्या उमेदवारांनी पहिला टप्पा पार केला आहे त्यांनाच दुसऱ्या टप्प्यासाठी (UPSC CDS Exam 2024) उपस्थित राहण्याची परवानगी आहे.
2. स्टेज I मध्ये ऑफिसर इंटेलिजेंस रेटिंग (OIR) टेस्ट, पिक्चर पर्सेप्शन वर्णन टेस्ट (PP&DT) यांचा समावेश होतो. OIR चाचणी आणि PP&DT मधील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.
3. स्टेज II मध्ये मुलाखत, गट चाचणी अधिकारी कार्य, मानसशास्त्रीय चाचणी आणि परिषद समाविष्ट आहे. या चाचण्या ४ दिवसांत घेतल्या जातात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC General Merit List 2024 : MPSC कडून PSI पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर; अजय कळसकर ठरला अव्वल

MPSC General Merit List 2024
xr:d:DAF2TZni6GE:1518,j:5642308871171949829,t:24041014

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC General Merit List 2024) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021 पोलीस उपनिरीक्षक (PSI) संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अजय कळसकर यांनी 329.50 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे; तर बाळासाहेब दराडे यांनी 326.50 गुण मिळवत द्वितीय तर सागर भाबड आणि रशीद शेख यांनी 323 गुण मिळवत संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला आहे. आयोगातर्फे 585 उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

खेळाडू प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडा विषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिका-यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा (MPSC General Merit List 2024) तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे व त्यांचा तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या गुणवत्ता यादीत न्यायालयात / मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे; असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०२१ या (MPSC General Merit List 2024) परीक्षेतील पोलीस उप निरीक्षक संवर्गाच्या अनाथ आरक्षणासंदर्भात मूळ अर्ज क्रमांक ३९६/२०२४ प्रकरणावरील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांच्या दिनांक ५ एप्रिल, २०२४ रोजीच्या आदेशानुसार अनाथांची २ पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये समाविष्ट करून एकूण ३७८ पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणी नंतर काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये/शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : ‘या’ जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची मोठी संधी!! पहा भरतीचा तपशील

Government Job
xr:d:DAF2w5xVX7c:279,j:4805765236488027884,t:24041013

करिअरनामा ऑनलाईन | जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे (Government Job) विविध पदावर भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सध्या जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका / नगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी अशी रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही नोकरी मिळवण्यासाठी पात्रता निकष आणि पदसंख्या यांची माहिती सविस्तर वाचा…

भरतीचा तपशील – (Government Job)
1. जिल्हा परिषद सदस्य – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
2. महानगरपालिका / नगरपालिका सदस्य – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
3. पंचायत समिती सदस्य – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
4. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
5. शाळा/कॉलेज प्रतिनिधी – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
6. वैद्यकीय व्यावसायिक प्रतिनिधी – या पदासाठी (Government Job) एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
7. व्यापार व उद्योग क्षेत्र – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
8. पेट्रोल आणि गॅस विक्रेते प्रतिनिधी – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
9. शेतकरी प्रतिनिधी – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
एकूण पद संख्या – 18 पदे

अधिकृत वेबसाईट – https://kolhapur.gov.in/
भरतीची अधिसूचना –https://cdn.s3waas.gov.in/s33d2d8ccb37df977cb6d9da15b76c3f3a/uploads/2024/03/2024031511.pdf

अर्ज प्रक्रिया –
1. वर दिलेल्या कोणत्याही पदासाठी अर्ज करताना उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवाराने अर्ज करताना फॉर्ममध्ये आपली संपूर्ण आणि अचूक माहिती भरावी.
3. अर्जातील माहिती अर्धवट (Government Job) किंवा अयोग्य असल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
4. अर्जाचा फॉर्म हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेला आहे.
5. नोकरीचा ऑफलाइन अर्ज पाठविण्यासाठी खालील पत्त्याचा वापर करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी नोकरीचा अर्ज हा अंतिम तारखेआधी पाठवणे आवश्यक आहे.
अर्जाची अंतिम तारीख – १५ एप्रिल २०२४ (Government Job)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com