10 th and 12th Board Exam Results : मोठी बातमी!! ‘या’ तारखेला जाहीर होणार 10 वी/12 वी चा निकाल

करिअरनामा ऑनलाईन | यावर्षी 10वी आणि 12वीची परीक्षा (10 th and 12th Board Exam Results) कॉपीमुक्त होण्यासाठी बोर्डाने विशेष काळजी घेतली होती. यासाठी सगळ्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक करण्यात आले होते. आता याच पार्श्वभूमीवर जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वी-12वीच्या प्रत्येक परीक्षा केंद्राची तपासणी केली जाणार आहे. परीक्षा केंद्रावरचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत का? कॅमेऱ्यांना बॅकअप आहे का? याची पडताळणी देखील होणार आहे. जे परीक्षा केंद्र बोर्डाच्या आदेशानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार नाहीत; तेथील केंद्राची मान्यता देखील रद्द केली जाणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी होणार (10 th and 12th Board Exam Results)
यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणार आहेत. त्याचप्रमाणे जुलैपासून सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाही, याची देखील पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम कार्य करणार आहे. बोर्डाचे अधिकारी प्रत्येक केंद्राला भेट देऊन तेथील स्थितीचा अहवाल बोर्डाकडे सादर करणार आहेत.

कॉपी करण्याच्या प्रकाराला कायमस्वरूपी आळा बसणार
यावर्षी CBSE बोर्डाने देखील 10वीच्या परीक्षेसाठी Best of 5 ची पद्धत सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा फॉर्म्युला अवलंबला आहे. आता (10 th and 12th Board Exam Results) ओपनबुक परीक्षा पद्धत अंमल अवलंबण्याची CBSE बोर्डाची तयारी आहे. या नवीन पद्धतीमुळे कॉपी करण्याच्या प्रकाराला कायमस्वरूपी आळा बसणार आहे; असा विश्वास या निर्णयामागे असणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षांचे स्वरूप देखील बदलणार आहे. सेमिस्टर पद्धतीने ही परीक्षा होऊ शकते; असे शिक्षक तज्ञांनी सांगितले आहे.

85 टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण
इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर त्यांच्या उत्तर पत्रिकांची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत या दोन्ही वर्गाच्या 85 टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे (10 th and 12th Board Exam Results) प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण शाळांनी ऑनलाईन पद्धतीने बोर्डाला देखील पाठवलेले आहेत. दरवर्षी आपण पाहिले तर 12वीचा बोर्डाचा निकाल हा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. तर 10वीच्या बोर्डाचा निकाल हा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो. परंतु आता यावर्षी दहावी आणि बारावीचे निकाल हे 5 जून पूर्वीच लागणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com