Home Blog Page 1069

बिकट वाट MPSC ची…

करीयर मंत्रा|सदर शोकांतिका का लिहावीशी वाटली… तर या चालू वर्षातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थातच Mpsc च्या निघालेल्या कमी जागा त्या म्हणजे राज्यसेवा, एसटीआय, पीएसआय, असिस्टंट यांच्या आणि या स्पर्धा परीक्षा दुनियेच्या स्वप्ननात रंगलेली लाखों मुले यांसाठी… मी 2011-12 ला Mpsc चा अभ्यास चालु केला, काय केलं या 6/7 वर्षात याचा मनात जरा विचार केला तर सगळं आयुष्य चेहऱ्यासमोरच आलं. जवळपास 6 वर्ष mobile वापरला नाही. सगळया मित्रांपासून अलिप्त झालो. माझा ड्रेस कोड हा ‘ट्रॅक पँट आणि टी शर्ट’ झाला, महिन्यात 25 दिवस सकाळी 7 ते रात्री 10 पुर्ण वेळ अभ्यास केला, असं करत करत वर्षामागुन वर्ष गेले. डोक्याचे निम्मे केस पांढरे झाले, टक्कल पडलं त्याची शोकांतिका तर वेगळीच.

हे करत असताना चांगले-वाईट अनुभव आलेत. तेवढी प्रगल्भताही आलीच. कोणत्याही गोष्टीचा विचार करताना 10 angle ने विचार करायला शिकलो. आपले सन्माननीय पंतप्रधान पण वेड्यात काढु शकत नाही, एवढा जास्त सगळ्या विषयांचा अभ्यास झाला. माझ्या बुद्धीची जाहिरात करत नाहीये, अगदी जे खरं तेच बोलतोय. परंतु बऱ्यापैकी जास्त वाईट अनुभव आलेत हया क्षेत्रात, जे लोक अगोदर भाऊ-भाऊ करायचे तेच लोक आता भु-भु करायला लागलेत. खुपच जास्त वाईट वाटतं ज्या लोकांसाठी, ज्यांना कधी काळी आपण अंगावरचे कपडे काढुन द्यायचो व इतर वाटेल जे करायलाही तयार व्हायचो. त्यांना मात्र आता त्याची किंमत राहीलेली नाही. घरच्यांचे तर बरेच जास्त उपकार झाल्यासारखे वाटतात. जे एवढे वर्ष अविरहितपणे पैशांचा पुरवठा करत राहिले. माझ्या सारख्या पोराला एवढे वर्ष पोसले, फक्त एकाच अपेक्षेवर की आपला पोरगा अधिकारी होईल. अजुनपण पैसे देण्यासाठी थकत नाहीत ते, कधी कधी तर खुप जास्त एकटं पडल्यासारखं वाटत.

एकटं असताना विचार येतो की, आपले सगळे मित्र किती निवांत आयुष्य जगतात. सगळे settle झाले आहेत, निवांत फिरतात, मज्जा करतात, पार्ट्या करतात, आता तर बऱ्याच जणांची लग्न झाली आहेत. याबाबतीत आपण कुठे आहोत तर आपण कुठेच नाही. काही लोक तर ‘सुजित पोकळे’ हे नावपण विसरले असतील. असो, हे सगळं आपल्यालापण करता आलं असत. पण हे फक्त एकाच गोष्टीमुळे करता नाही आलं ते म्हणजे Mpsc…mpsc आणि mpsc. काही वेळेस डोळ्यातुन पाणी सुद्धा येत. ही शोकांतिका मात्र कोणीच नाही समजु शकत. माझ्या मते तर एका दृषिकोनातून विचार केल्यास, जगातले जे काही शोषण होत असतील ते सगळे mpsc च्या मुलांवर होत असतील. Mpsc मध्ये फक्त क्लासवाले, library (अभ्यासिका) वाले, room वाले, mess वाले, चहावाले मोठे होतात. थोडे फारच (0.1%) लोक यशस्वी होतात. त्यांचचं आयुष्य चांगलं होतं, पण जे अपयशी होतात त्यांचं जगणं खुप अवघड आहे. जमलं तर सदाशिव पेठेमध्ये एकवेळ येऊन नक्की पहा…

नवीन तयारी करण्याऱ्या मुलांना खुप कळ-कळीची विनंती आहे. एकतर इकडे येऊच नका आणि जरी आले तरी 2-3 वर्षापेक्षा जास्त दिवस तयारी करू नका. जगात मोठे होण्यासाठी खुप पर्याय आहेत. अधिकारी होणं म्हणजेच सगळं जग नाही, त्यांच्यापेक्षासुद्धा जगात भारी लोक आहेत आणि सध्या बनतही आहे. ह्या class वाल्यांनी तर हया क्षेत्राला एक वलय (आभासी दिवास्वप्न दाखवून) प्राप्त करुन दिलय. क्लासवाले आणि फक्त हे क्लासवाले मस्तपैकी पुणे शहरात चांगले settle झाले आहेत. ते पण ग्रामीण भागातल्या कुटुंबाचं , त्यांच्या मुलांना खोटी स्वप्ने विकून त्यांचे आर्थिक शोषण करून. त्यामुळे Mpsc कडे वळणाऱ्या मुलांनी नीट या क्षेत्रातल्या लोकांशी ( म्हणजे व्यावसायिक उद्देश् नसलेल्या लोकांशी ) चर्चा करूनच इकडे या. नाहीतर Mpsc च्या अपयशी मुलांचं जगणं खुप जास्त अवघड असत. जे मी स्वतः अनुभवतो आहे. न कारे बाबांनो स्वतःचा आयुष्याचा खेळ करू, खुप पोट तिडकीने लिहलं आहे हे, लोकांना दुसऱ्याचा संघर्ष चांगला वाटतो. मला नव्हतं रे कोणी सांगायला नाहीतर कधीच आलों नसतो या दलदलीत…

समर्पित :- संपुर्ण Mpsc च्या मुलांना

Sujit Pokale

सुजीत पोकळे, जुन्नर

72 हजार नव्हे, दीड लाख पदं भरणार! मेगाभरतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे. विविध विभागांमध्ये दीड लाख पदं भरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. विशेष म्हणजे यापूर्वी 72 हजार पदं भरण्याचं जाहीर करण्यात आलं होतं, ज्याची भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यात वाढ करुन हा आकडा आता दीड लाखांवर नेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. प्रक्रिया सुरु असल्याने याविषयीची अधिक माहिती लवकरच जारी केली जाण्याची शक्यता आहे.
लाखो मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. पण जाहिरातच न आल्याने दरवर्षी अनेकांची निराशा होता, तर काही जणांचं वय पात्रतेपेक्षा अधिक होऊन जातं. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारी नोकरीकडे डोळे लावून बसलेल्या तरुणाईच्या अपेक्षा यापूर्वीच्या घोषणेमुळे जाग्या झाल्या होत्या. शिवाय ग्रामविकास विभागाकडूनही विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेनुसार भरती प्रक्रिया सुरु झाल्यास लाखो तरुणांचं सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी ज्या 72 हजार पदांच्या भरतीची घोषणा केली होती, त्याची प्रक्रिया याअगोदरच सुरु झालेली आहे. त्यामुळे नव्या घोषणेच्या अंमलबजावणीकडे आता लक्ष लागलंय. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची क्षेत्रीय स्तरावरील 72 हजार पदे भरण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीचा आढावा राज्याच्या मुख्य सचिवांकडून घेण्यात येत होता.

मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी..

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. सर्वात मोठ्या सेवा देणाऱ्या या क्षेत्रात वेगवेगळ्या खात्याच्या जागा दरवर्षी भरल्या जातात.

एकूण जागा – ४२

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

१) डायलिसिस टेक्निशिअन ०७
२) स्टाफ नर्स ३४
३) ऑडिओलॉजिस्ट-कम-स्पीच थेरेपिस्ट ०१

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.१ –

(१) बीएससी (२) हेमोडायलिसिस मध्ये डिप्लोमा किंवा ०२ वर्षे हेमोडायलिसिस कामाचे प्रशिक्षण/अनुभव

पद क्र.३ –
जीएनएम किंवा बीएससी (नर्सिंग)
पद क्र.३ –
(१) बीएससी (२) ऑडिओ आणि स्पीच थेरेपी डिप्लोमा (३ ) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट –
पद क्र.१ – २० ते ३३ वर्षे
पद क्र.२ – २० मे २० ते ४० वर्षे
पद क्र.३ – १८ ते ३३ वर्षे

०१ मे २०१९ रोजी, [एससी / एसटी – ५ वर्षे सूट , ओबीसी – ०३ वर्षे सूट
नोकरी ठिकाण – मुंबई

फी – नाही

पद क्र. पदाचे नाव , मुलाखतीची ,तारीख ,वेळ

१) डायलिसिस टेक्निशिअन २७ मे २०१९
स. १०:०० ते दु.१:००

२) स्टाफ नर्स २८ मे २०१९
३) ऑडिओलॉजिस्ट-कम-स्पीच थेरेपिस्ट २९ मे २०१९

मुलाखतीचे ठिकाण – रिक्रुटमेंट सेक्शन सेंट्रल रेल्वे,पर्सनल ब्रँच, डिव्हिजनल रेल्वे.
मॅनेजर ऑफिस,तिसरा मजला अनेक्स बिल्डिंग,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – ४०० – ००१

अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

एमपीएससी परिक्षेसाठी तारखा जाहीर..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परिक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात.

अ.क्र. परीक्षा आणि तारीख

१) वनरक्षक
तारीख – ०१ ते १२ जून २०१९

२) तलाठी
तारीख – १७ जून ते ०३ जुलै २०१९

३) पशुसंवर्धन विभाग
तारीख – ०५ जुलै ते २० जुलै २०१९

४) आरोग्य विभाग
तारीख – २५ जुलै ते १० ऑगस्ट २०१९

महाराष्ट्र ज्ञान महामंडळात प्रोजेक्ट ट्रेनी पदांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र ज्ञान महामंडळात प्रोजेक्ट पदांसाठी भरती सुरु आहे. शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीची तारीख व अधिक तपशील खाली दिली आहे.

एकूण जागा – ४५

पदाचे नाव – प्रोजेक्ट ट्रेनी

शैक्षणिक पात्रता – बी.इ/बी.टेक./एमसीए/एमसीएस/एमएससी( कॉम्प्यु.सायन्स ) २०१८ किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षातील उमेद्वार

नोकरी ठिकाण – पुणे

फी – नाही

परीक्षा ऑनलाइन – ०२ जून २०१९ सकाळी १०:०० ते दुपारी ४:००

वैयक्तिक मुलाखत – १७ ते २५ जून २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ मे २०१९

ऑनलाईन अर्ज – https://pt2019recruitmentapp.mkcl.org/#/

जर्नालिझम करायचंय तर हे गुण असावे लागतात अंगी..

करिअर मंत्रा | जर्नालिझम हे एक आजचं विस्तारलेलं क्षेत्र आहे. या क्षेत्रात आपण मोठं नाव करू शकता. या ५ वर्षात या क्षेत्रात तरुणांचा कल वाढायला लागला आहे. अनेक पदवीधर आणि एमबीए मार्केटिंग क्षेत्रात प्राविण्य मिळवणारी मंडळी आज पत्रकारितेत येऊन आपलं नशीब आजमवत आहेत. लोकांशी असलेली नाळ जोडण्यात अनेकांना आवडतं परंतु क्षेत्र वेगळं असल्याने अनेकांना थेट सामान्य नागरिकांशी संबंध येत नाही. पत्रकारितेत मात्र थेट नागरिकांशी संवाद साधण्यास सोप्प पडतं. या क्षेत्रात तुम्हाला वृत्तपत्र आणि नवोदय वेब पोर्टल्समध्ये इंटर्नशिपच्या माध्यमातून सुरुवात करू शकता.

राजकीय

महाराष्ट्र राजकारण आणि देशातील राजकारणाच्या घडामोडींवर नजर असायला हवी राजकीय सक्रीयता ही या क्षेत्रात महत्वाची मानली जाते. आणि लोकशाहीला धरून आपण लोकशाहीचा चौथा स्तंंभ म्हणून सदर विषयाला न्याय देण्यास प्रयत्न करायला हवा.

सामाजिक

पत्रकार म्हणून परिपक्व होत असताना सामाजिक अभ्यास सुद्धा असावा लागतो. महाराष्ट्रातील सामाजिक इतिहास देशाचा सामाजिक विषयांवर आपलं मत असलं पाहिजे आणि त्यावर चर्चा करता आली पाहिजे

मनोरंजन

मनोरंजन क्षेत्रातील उदा . बॉलिवूड ची माहिती अभिनेता अभिनेत्रीची नावे, सध्या चर्चेत असणाऱ्या चित्रपटांची नावे, त्यावर थोडं फार लिहिता यायला हवं.

तंत्रज्ञान

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या स्पर्धात्मक क्षेत्रात क्षेत्रात तांत्रिक बाबी हाताळता यायला हव्यात. उदा. ,संगणक ,टायपिंग, बातमी एडिट. मेल वापरायला यायला हवं. बातम्या साठवून ठेवता यायला हव्या.

लिखाण

बातम्या लिहीण्याचा प्रवाह बऱ्यापैकी असायला हवा.
प्रवास वर्णन, ब्लॉग, बातम्या लिहिताना घटनेचं स्थळ कुठे कधी केंव्हा घटनेचं कारण या नमुद असायला हव्यात.

राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करताय तर या गोष्टी लक्षात ठेवाच..

परीक्षा जवळ येते, तसे वेळेचे गणित त्रास द्यायला लागते. ‘माझे पेपर-दोनमध्ये साठच्यावर प्रश्न सुटत नाही किंवा जास्त सोडवण्याच्या नादात चुका जास्त होतात’, हे अगदी साधारणतः सगळयांना भेडसावणारे प्रश्न. या टिप्स नेहमी लक्षात ठेवा..

प्रश्नानुसार वेळ

समोरच्या व्यक्तीला जाणल्याशिवाय प्रेमात पडणे जसे व्यर्थ असते; तसेच ९० सेकंदांच्या प्रेमात थेट पडणे महागात पडू शकते. त्यामुळे आधीपासूनच त्या प्रयत्नात पडू नका. आधी तुम्ही तो प्रश्न सोडवण्याचा सराव करा. त्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती करून घ्या. याचा अर्थ तुम्ही घड्याळाकडे लक्ष द्यायचे नाही, असे नक्कीच नाही; पण जोपर्यंत तुम्हाला कोणत्या प्रश्नाला किती वेळ लागतो, तुमच्याकडून कोणता प्रश्न ९० सेकंदांमध्ये सुटू शकतो, याचा अंदाज तुम्हाला येत नाही, तोपर्यंत वेळेकडे लक्ष देऊ नये, असे मला वाटते. एकदा तुम्हाला समजले, की कोणत्या चेंडूवर एक रन काढायचा आहे आणि कशावर षटकार, की सामन्यात तुम्हीच बाजी मारणार.

काही प्रश्न अवघड असणार हे गृहीत धरून चाला..

यानंतर तुम्हाला ३० सेकंद झाल्यानंतरदेखील त्या प्रश्नाबद्दल काहीच सुचत नसेल, तर तो प्रश्न सोडून पुढच्या प्रश्नाकडे वळावे. एकाच प्रश्नाला वेळ जास्त दिल्याने तुम्हाला अचानक उत्तर येईल, असे काही नसते ; आणि तसेही पाच ते दहा प्रश्न तर अवघड असतात हे गृहीत धरून चाललेलं कधीही चांगलं.
तुम्हाला त्या प्रश्नात मार्ग सापडतो आहे, पण उत्तर नाही, अशी परिस्थिती असेल तर थोडा प्रयत्न करा परंतु एक मिनिटानंतरही प्रश्न सुटत नसेल, तर त्याला गोल करून लवकर पुढे जा. पुन्हा नंतर वेळ मिळाला, तर त्याकडे लक्ष द्या.

सोडून दिलेले प्रश्नांवर शेवटी काम करा

शेवटी काही वेळ मिळाला, तर जे प्रश्न वेळेअभावी सोडून दिले होते, त्यांना हात घालायला विसरू नका. पेपर देऊन निघून जाण्यापेक्षा शेवटच्या सेकंदापर्यंत टिच्चून खेळण कधीही चांगलं. सुटसुटीत कच्च्या कामाने नाहक चुका होण्याचे प्रमाणपण आपोआप कमी होतं.

वेळेला जवळचा मित्र बनवा

तुमच्या दैनंदिन आयुष्यात आणि परिक्षेच्या कालावधीत वेळेला महत्व द्या. गणिताचा आणि प्रश्नपत्रिका सोडवताना घडयाळ जवळ बाळगा आणि त्यानुसार प्रश्नाचं नियोजन करा. कोणता प्रश्न सोडवून कोणत्या दिशेने जायचंय ते डोक्यात ठेवा.
उदा. पक्ष्यांच्या डोक्यात जसा दिशादर्शक फिट असतो, तसं आपल्या डोक्यात वेळेचं गणित फिट झाले, की वेळ आपल्या इशाऱ्यावर आपल्या मागे येईल. तुमची वेळेमागे फरफट होणार नाही.

देवळाली केंटोमेन्ट बोर्ड मध्ये शिक्षकांच्या विविध जागा

पोटापाण्याची गोष्ट | देवळाली केंटोमेन्ट नाशिक मध्ये मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. या तारखेच्या आत करू शकता अर्ज.

एकूण जागा – २८

पदाचे नाव आणि तपशील –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१) सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम : इयत्ता १ ली ते ४ थी) ०६
२) सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम : इयत्ता ०५ ते १० वी) ०२
३) सहाय्यक शिक्षक (इंग्रजी माध्यम : इयत्ता ०५ ते १० वी) ०७
४) ड्राइंग शिक्षक ०१
५) संगणक प्रशिक्षक ०४
६) बालवाडी शिक्षक ०८

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.१ : (i) १२ वी उत्तीर्ण (ii) डी. एड ( मराठी )
पद क्र.२ : बीएससी. बीएड ( मॅथ्स आणि सायन्स )

पद क्र.३ : बीएससी/ एमएससी. बीएड ( फीजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स ) किंवा बीए. एमए (इंग्लिश, सोशल सायन्स ) किंवा एमएबीपीएड ( मराठी हिंदी )

पद क्र.४ : एटीडी किंवा एएम

पद क्र.५ : (१) पदवीधर (२) एमएससीआयटी

पद क्र.६ : (१) १० वी उत्तीर्ण (२) मोंटेसरी कोर्स उत्तीर्ण

वयाची अट: ०१एप्रिल २०१९ रोजी ५० वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण – देवळाली, नाशिक

फी – नाही

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ मे २०१९

ऑनलाइन अर्ज – www.canttboardrecruit.org

केथॉलिक सिरियन बँकात रिक्त जागा; आजच भरा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | केथॉलिक सिरियन बॅंकेत अनेक पदांसाठी रिक्त जागा आहेत.

एकूण जागा –  १२३

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

१) क्लस्टर हेड क्रेडिट (ऍग्री ) ०२
२) ॲग्री ऑपरेशन ऑफिसर ०५
३) ॲग्री क्रेडिट ऑफिसर ०१
४) रिलेशनशिप मॅनेजर (ऍग्री ) ०६
५) रीजनल ऑपरेशन्स मॅनेजर (टू व्हीलर लोन्स ) ०१
६) चीफ मॅनेजर/सिनिअर मॅनेजर (क्रेडिट Credit) ०१
७) सिनिअर मॅनेजर/मॅनेजर ( क्रेडिट ) ०१
८) सेल्स मॅनेजर ( टू व्हीलर लोन्स ) ०५
९) रिलेशनशिप एक्झिक्युटिव/रिलेशनशिप मॅनेजर ०२
१०) एरिया सेल्स मॅनेजर ( टू व्हीलर लोन्स )
०१
११) प्रोडक्ट मॅनेजर (रिटेल असेट्स
०१
१२) क्रेडिट मॅनेजर ( रिटेल असेट्स )
०२
१३) क्लस्टर सेल्स मॅनेजर (गोल्ड लोन)
०१
१४) असिस्टंट मॅनेजर/मॅनेजर/सिनिअर मॅनेजर (रिस्क ) ०१
१५) रिलेशनशिप मॅनेजर (टीएएससी आणि इन्स्टिट्युशनल बिसनेस ) ०३
१६) बिजनेस डेवलपमेंट एक्झिक्युटिव (गोल्ड लोन ) ४०
१७) बिजनेस डेवलपमेंट एक्झिक्युटिव (सीएएसए ) ५०

शैक्षणिक पात्रता – (१) पदवीधर/पदव्युत्तर पदवी (२) ०६ महिने ते १२ वर्षाचा अनुभव

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०१९ (अंदाजे)

ऑनलाइन अर्ज –  http:// online.csb.co.in

देहूरोड केंन्टोमेंट मध्ये नोकरीची संधी

पोटापाण्याची गोष्ट | देहूरोड केंन्टोमेन्ट मध्ये शिक्षक आणि आयांच्या जागा रिक्त आहेत. विशेष करून महिलांसाठी या जागा उपयुक्त आहेत.

एकूण जागा – १२

पदाचे नाव आणि तपशील –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१) बालवाडी शिक्षक ०७
२) बालवाडी आया ०५

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.१: (१)१० वी उत्तीर्ण (२) बालवाडी कोर्स (३) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.२ (१)१० वी उत्तीर्ण (ii) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट – किमान १८ वर्षे

नोकरी ठिकाण – देहू रोड

थेट मुलाखत –

०७ जून २०१९  (स. ०९ :०० )

मुलाखतीचे ठिकाण –

एम.बी. केंम्प शाळा (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ), देहू रोड, पुणे ४१२१०१

अधिकृत वेबसाईट –

http://www.cbdehuroad.org/