Home Blog Page 1068

वास्तुकला : सर्जनशील करीयर संधी

करिअर मंत्रा | आर्किटेक्चर म्हणजे वास्तुकला ही सर्व कलांची जननी मानली जाते. कारण मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक अशी ही कला असून त्यात प्रगती होत गेली. बंगले, अपार्टमेंट्स, दुकाने, ऑफिसेस, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, मंदिरे, बँका, इंडस्ट्रीज, कॉलनीज, बागा, वसतिगृहे, मॉल, मल्टिप्लेक्स, क्रीडा संकुल, विमानतळ, शोरूम्स या मानवनिर्मित स्थळांमध्ये या वास्तुकलेने मोठे चैतन्य भरले आहे. या वास्तुकलेमध्ये वास्तू सौंदर्य, हवा आणि प्रकाशाचा सुरेख संगम, अभिरुची, उपलब्ध साधनसामग्रीचा सुयोग्य वापर, मजबुती व टिकाऊपणा, सुसंबद्धता, पर्यावरणपूरकता, दळणवळण इत्यादी पैलूंचा अभ्यास करून मूर्त स्वरूप दिले जाते.

वास्तुकला ही कला आणि विज्ञान यांच्या संगमाने बहरत जाते. वास्तूंमध्ये कलात्मक चैतन्य भरण्याबरोबरच मजबूत बांधकाम शैली, सुयोग्य तंत्रज्ञान, साधनसामग्री अशा तांत्रिक बाबतीत असलेले नियोजनही वास्तुरचनाकाराकडून केले जाते. अशा प्रकाराच्या वास्तू निर्मितीतून वास्तुरचनाकारास उच्च प्रकाराचे मानसिक समाधान मिळत असते. त्याचबरोबर वापरकर्त्यांची धन्यवादाची पावतीही मिळत असते. फ्रँक लॉइड लाइट, वॉल्टर ग्रोपिअस, ला कार्बुझिए, मिज हँडर रोह, लुई कान्ह, लॉरी बेकर, चार्ल्स कोरिया यासह अनेक आर्किटेक्ट्स आपल्या प्रतिभासंपन्न वास्तू आाणि अवकाशनिर्मितीमुळे अजरामर झाले आहेत.

दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या , वाढत्या गरजा , वास्तू तथा अवकाशनिर्मितीबाबतची समाजातील वाढती जागरुकता यामुळे प्रतिभावंत आर्किटेक्ट्सची समाजातील गरज वाढतच चालली आहे. पण भारताची एकूण लोकसंख्या पाहता वास्तुकला क्षेत्रात कळकळीने काम करणारांची संख्या अतिशय कमी आहे. पण या क्षेत्रात करिअरच्या उत्तम अशा संधी आहेत. शिक्षणानंतर सुरुवातीच्या अनुभवानंतर वैयक्तिक अथवा भागीदाराबरोबर प्रॅक्टिस, चांगल्या फर्ममध्ये सेवा असे अनेक पर्याय आहेत. जगाच्या पाठीवर कोठेही शहर व खेड्यातही सेवेच्या संधी उपलब्ध आहेत.

आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम पाच वर्षांचा असतो. यात पहिली चार वर्षे शैक्षणिक व शेवटचे वर्ष प्रॅक्टिकल ट्रेनिंग असते. उत्तम वास्तू व अवकाश रचनेचे ज्ञान व्हावे यासाठी अभ्यासक्रमाची रचना असते. सौंदर्यशास्त्र, आरेखन, वास्तुकलेचा इतिहास, समकालीन वास्तुरचनाकार, बांधकाम कौशल्य, पर्यावरणशास्त्र, बांधकाम सामग्री, इंटेरिअर डिझाइन, लँडस्केप डिझाइन, नगर नियोजन अशा विषयांच्या आधारे अभ्यासक्रम पूर्ण होतो. शेवटच्या वर्षातील प्रॅक्टिकल ट्रेनिंगमुळे मिळालेल्या ज्ञानाचे व्यवहारातील प्रत्यक्ष उपयोग विद्यार्थ्यांना समजतात. तसेच शेवटच्या वर्षात यथायोग्य विद्यावेतनही दिले जाते. गणित विषयासह दहावी-बारावी किंवा तत्सम अभ्यासक्रम 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास आर्किटेक्चर साइडसाठी प्रवेश घेता येतो. मात्र अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट पास असणे बंधनकारक आहे. या परीक्षेद्वारे विद्यार्थ्याचा कल, वास्तुकलेविषयी त्याची अभिरुची तपासली जाते. अ‍ॅडमिशनच्या मेरिटसाठी दहावी आणि बारावीचे गुण, अ‍ॅप्टिट्यूड टेस्टचे गुण हे दोन्ही समप्रमाणात विचारात घेतले जातात. म्हणूनच सध्याच्या स्थितीत चांगल्या कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी बारावीबरोबरच अ‍ॅप्टिटयूड टेस्टमध्येही चांगले गुण मिळवणे महत्त्वाचे आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत १६९ पदे

पोटापाण्याची गोष्ट|
मुंबई
वैद्यकीय तज्ज्ञ – ०८ जागावैद्यकीय अधिकारी – १६१ जागा

शैक्षणिक पात्रता : पद क्र.१: डीएम/एमसीएच/एमएस/डीएनबी + अनुभव

पद क्र.२ : एमडी/एमएस/ बीडीएस/एमबीबीएस + अनुभव

वयोमर्यादा : ०१ जुलै २०१९ रोजी ३८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासन विभाग, आस्थापना शाखा क्र.१, तिसरा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भू.क्र.१, किल्ले गावठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर १५ A, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४ किंवा ईमेल: healthrecruitment२०१९@nmmconline.com

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : ०१ जुलै २०१९

सविस्तर माहितीसाठी : https://bit.ly/2wJYmcz आणि https://bit.ly/2wH8KSz

 

पुणे महानगरपालिकेअंतर्गत शिक्षकांच्या १९० जागा

पुणे|
पदाचे नाव :

१. प्राथमिक शिक्षक (अपदवीधर शिक्षक) – १०० पदे

पात्रता : १२ वी, डी.एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण तथा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण (इंग्रजी माध्यमास प्राधान्य)

२. उच्च प्राथमिक शिक्षक (पदवीधर शिक्षक) – ९० पदे

पात्रता : पदवी, डी.एड/बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण तथा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण (इंग्रजी माध्यमास प्राधान्य)

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2wSutXI

वयोमर्यादा : ३१ मे २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ०५ वर्षे सूट)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे – ४११ ००५

 

मँग्रोव्ह ॲण्ड मरीन बायोडायव्हरसिटी कन्व्हर्जन फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांची कंत्राटी पद्धतीने भरती

सहायक संचालक (१ जागा)
शैक्षणिक पात्रता :
नॅच्युरल सायन्स, समाज शास्त्रमधील पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षांचा अनुभवमानव संसाधन व्यवस्थापक (१ जागा)
शैक्षणिक पात्रता :
पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए आणि २ वर्षांचा अनुभव

जनसंपर्क अधिकारी (१ जागा)
शैक्षणिक पात्रता :
मास कम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका आणि २ वर्षांचा अनुभव

जीआयएस स्पेशालिस्ट (१ जागा)
शैक्षणिक पात्रता :
पदव्युत्तर पदवी किंवा जीओ-इन्फॉर्मेटीक्स, रिमोट सेंसिंग, मरिन बॉयोलॉजी, फॉरेस्ट्रीमधील पदव्युत्तर पदविका आणि २ वर्षांचा अनुभव

मँग्रोव्ह इकालॉजीस्ट (१ जागा)
शैक्षणिक पात्रता :
मरीन बायोलॉजीमधील पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षांचा अनुभव

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ५ जुलै २०१९

अधिक माहितीसाठी : https://tinyurl.com/ybh5dml2

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक, मँग्राव्ह फाऊंडेशन ॲण्ड एपीसीसीएफ, मँग्राव्ह सेल, ३०२, वेकफिल्ड हाऊस, ३ रा मजला, ब्रिटानीया आणि को.रेस्टॉरंट, बेलार्ड ईस्टेट, मुंबई-४०० ००१.

 

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदाच्या ५७१६ जागा

पोटापाण्याची गोष्ट|महाराष्ट्र आरोग्य समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या ५७१६ जागा ६ किंवा ८ महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या ५७१६ जागा
अमरावती ४५५ जागा, यवतमाळ ४०२ जागा, सिंधुदुर्ग २०१ जागा, ठाणे १४५ जागा, रायगड २०२ जागा, सातारा ३१७ जागा, पुणे ५०३ जागा, जळगाव ३२२ जागा, अहमदनगर ४४५ जागा, नाशिक ४२९ जागा, नंदुरबार ११७ जागा, लातूर १६८ जागा, नांदेड १९६ जागा, उस्मानाबाद १०७ जागा, नागपूर ३१९ जागा, भंडारा ८९ जागा, पालघर २३८ जागा, गोंदिया १६८ जागा, चंद्रपूर २२५ जागा, वर्धा ८५ जागा, गडचिरोली २६३ जागा आणि सांगली ३२० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार युनानी मेडिसिन पदवी/ आयुर्वेदिक मेडिसिन पदवी/ नर्सिंग पदवीधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

परीक्षा – दिनांक २१ जुलै २०१९ रोजी घेण्यात येईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप संचालक, आरोग्य सेवा (संबंधित जिल्हा)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – १ जुलै २०१९ आहे.

https://oac.co.in/wp-content/uploads/2019/06/NHM-MH-CHO-2019-Application.pdf

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना यांच्या आस्थापनेवर ५२७ जागा

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदांच्या एकूण ५२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध तांत्रिक पदांच्या एकूण ५२७ जागा
तांत्रिक डेटा असोसिएट पदाच्या १० जागा, व्यावसायिक सल्लागार पदाच्या ८ जागा, लेखा अधिकारी पदाच्या ७ जागा, पशुवैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा, अभियंता पदाच्या २ जागा, ग्रंथपाल पदाच्या २ जागा, टेक्निकल डेटा असोसिएट पदाच्या ५७ जागा, कायदेशीर सल्लागार पदाची १ जागा, डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या १३६ जागा, सिस्टम अनालिस्ट (आयटी) पदाच्या २ जागा, कार्यालय सहायक पदाच्या ३४ जागा, वरिष्ठ/ संशोधन शास्त्रज्ञ पदाच्या ३ जागा, वरिष्ठ तांत्रिक डेटा असोसिएट पदाच्या २० जागा, बायोस्टॅटियन पदाची १ जागा, लॅब सहाय्यक पदाच्या ३४ जागा, बेंच केमिस्ट पदाच्या १९३ जागा, सफाईगार पदाच्या ४ जागा, वरिष्ठ बेंच रसायनशास्त्रज्ञ पदाच्या ३ जागा आणि तांत्रिक डेटा असोसिएट्स पदाच्या ९ जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध पात्रता धारण केलेली असावी. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

अर्ज पाठविण्याचे ईमेल[email protected], [email protected], [email protected], [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जून २०१९ आहे.

गुण वाढले, पण गुणवत्तेचं काय ? – राजेंन्द्र मोहिते

करीयर मंत्रा|

नमस्कार, मी राजेंद्र मोहिते, १२ वी अकाउंटन्सी चे क्लासेस घेतो. तेही ग्रामीण भागात. पोरं प्राज्ञ भाषेत गावंढळ म्हणावी अशीच. पुढच्या वर्षी क्लासचा रौप्यमहोत्सव होईल. माझे विद्यार्थी अनेक उच्च पदांवर काम करताहेत. दोन, तीन सीए आहेत, काही मोठमोठ्या कंपन्यांत आहेत, उद्योगांत वेगवेगळ्या क्षेत्रांत आहेत, देशाच्या सीमेवर आणि सीमेपलीकडेही आहेत. मी पोरांवर (पोरं म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी) संस्कार करण्याचा माझ्या वकुबाप्रमाणे प्रयत्न केला, तो थोडाबहुत का होईना, पण यशस्वी झाल्याचं समाधान आज, मला मिळतंय खरं, पण पुढे मिळेल अशी गॅरंटी वाटत नाही.

पूर्वी साधी, फाटक्या फाटक्या पँटांतील मुलांची आणि सध्या सलवार कमीजच्या मुला-मुलींची जागा आता हाफ मॅनेला वुईथ जीन्स (दोघांनीही) घेतलीय. पूर्वी चालत किंवा सायकलवरून येणारी ही पोरं आता गाड्या ‘उडवत’ कलासवर येतात. (पूर्वीच्या शिकवणीची जागा आता क्लासनं घेतलीय म्हणा!) पिशव्यांची जागा आता ‘सॅक’ नी घेतलीय, डबा आता ‘टिफिन’झालाय, भाजी भाकरीच्या जाग्यावर आता नूडल्स आहेत. टाईमपास आठ आण्याच्या फुटण्याऐवजी एअरपॅक्ड कुरकुरे आलेत. पण ९ चा पाढा येत नाही, हेही तितकंच खरं. हातात असलेल्या फोनला ‘अँड्रॉईड पीस’ म्हणायचं हे त्यांना कळतं खरं पण त्या दोन्ही शब्दाचं स्पेल्लिंग नीट लिहिता येत नाही त्याला आपण काय म्हणणार, प्रगती की अधोगती?

मी फार जुन्या काळात जात नाही.पण माझे आई वडील दिडकी, पावकी चा पाढा सहज म्हणून दाखवायचे, अर्थात तो त्यांच्याएवढा मला येत नव्हता नव्हता आणि नाहीही. कारण ‘बीजगणित’ नावाचं भूत आमच्या मानगुटीवर कायम बसलेलं असायचं. (a+b) square = means what? उत्तर पुस्तकातील बघून लिहायचो खरा, पण प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग फक्त ‘डिग्री मिळून नोकरी आणि छोकरी’ साठी होतो, हा शोध खूप उशीरा (!) लागला. तीच गोष्ट भाषेची, संस्कृत बापजन्मात जमलं नाही, पुस्तकातल्या हिंदीपेक्षा सिनेमातली हिंदी जास्त कळायची. आपली वाटायची, अजूनही वाटते. इतिहास आवडायचा खरा पण त्यातल्या सनावळ्या पाठ करता करता गड किल्ले चढण्याइतकी दमछाक व्हायची. त्यातच इंग्रजीचं व्याकरण डोस्क्यावर बसलं पण डोक्यात काही गेलं नाही आणि भूमितीच्या बाबतीत तर वाटोळंच! पण आज बाजारात गेलं की कोणती वस्तू कितीला घ्यायची हे ग्यान माझ्या आईबापाने दिलं. आज हे ‘knowledge’ माझी मुलं त्यांच्या मम्मी पप्पांकडून घेऊ शकतात का?

मूळ प्रश्न असा आहे की ती बाजारात जातात का? ते तर बझारमध्ये जातात! तिथं सगळंच लेबल्ड (आणि या जंजाळात मी पप्पा आणि बायको मम्मी ) कधी झालो हे कळलंच नाही. माझा मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकतो. मोठ्या दोन्ही मुली मराठी माध्यमातून शिकल्या. तर इंग्लीश मिडीयमचा मुलगा ज्यावेळी ९ वी चा निकाल लागून १० वीत गेला (दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट) त्यावेळी कराडातील कलासवाल्यांचे फोन सुरू झाले.

अशाच एका ‘सरांनी’ मला फोन केला..

क्लासचे सर – अश्वमेध चे पप्पा का?

मी – होय, आपण कोण?

क्लासचे सर – मी xxxx कलासमधून बोलतोय ,xxxx सर

मी – हां बोला.

क्लासचे सर – अहो तुमचा मुलगा खुप छान आहे, तो दहावीत जाणार आहे, नववीला चांगले मार्क्स आहेत. अबाव 90%. त्याला थोडं मार्गदर्शन करायचं होतं.

मी – बरं. काय मार्गदर्शन करायचं आहे ?

क्लासचे सर – आम्ही कौन्सिलिंग घेतो, तुमचा मुलगा पुढे स्टार होईल, आमच्या fees नाममात्र आहेत. एकदा पाठवून तरी बघा.

मी – सर धन्यवाद. फक्त मला एक सांगा तुम्ही बाजारात गेला आणि कोबीचा दर ५ रूपये किलो असेल तर तीन पावशेरचे किती द्याल तुम्ही?

क्लासचे सर – अहो हा काय प्रश्न आहे?

मी – मग सांगा ना?

क्लासचे सर – थांबा. (please wait)… (फोन कट होतो)

आजपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही.

मग मला प्रकर्षाने प्रश्न पडतो की माझ्या पोरांची किंमत काय? लेबल्ड बझारची की रोकड्या बाजारची?

पोरगं बाजारात जायला पाहिजे…दुनियेच्या ओपन मार्केटमध्ये. तरच त्याला त्याची खरी किंमत (म्हणजे त्यानं स्वतःची लावलेली, त्याला लागलेली आणि लादलेली नव्हे!) कळेल. असं वाटायला लागलं. आणि तेच खरं आहे.

राजेंन्द्र मोहीते
(लेखक कराड तालुक्यामधील रेठरे गावात अकांउंटचे क्लासेस घेतात)

एमपीएससी मधील अपयशामुळे तरुणाची आत्महत्या

बातमी |एमपीएससी मधील सतत अपयशामुळे वर्षीय तरुणाची केदारेश्वर बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्या. रुपेश विष्णू बोऱ्हाडे रा. राजगुरुनगर असे आत्महत्या ग्रस्त तरुणाचे नाव आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश बोऱ्हाडे हा सुमारे तीन वर्षापासून एमपीएसीचा अभ्यास करत होता. तो परीक्षेचा अभ्यास करून चाकण येथील एमआयडीसीमधील एका कंपनीत नोकरी करत होता. परंतु,पूर्णवेळ अभ्यास करता यावा त्यामुळे रुपेश याने कंपनीतील नोकरी सोडून दिली होती. कंपनीतील नोकरी सोडून दिल्यापासून रुपेश पुन्हा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे येथे राहण्यास होता.सुमारे तीन ते चार महिन्यापूर्वी रुपेश यांनी दिलेल्या एमपीएससीच्या परीक्षेचा निकाल लागला होता. या परीक्षेत रुपेश नापास झाला होता. तेव्हापासून तो नाराज होता.सध्या तो अभ्यासासाठी रांजणगाव (ता. शिरुर ) सुरू येथे राहत होता.

मानसिकरित्या खचुन गेल्यामुळे रुपेश याने स्वत:च्या पाठीवरील बॅगमध्ये दहा किलोचा वजनाचा दगड टाकून शैक्षणिक कागदपत्रे यांच्यासह भीमानदीवरती असणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी १० वाजता नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात तरंगत असलेल्या बाहेर काढल्यावर  खिशात पासपोर्टवरील नावामुळे रुपेश ची ओळख पटली. नगर परिषदेच्या नगरसेविका रेखाताई श्रोत्रीय यांनी रुपेशच्या वडिलांना या घटनेची माहिती दिली.याबाबत रुपेशचे वडील विष्णू शिवराम बोऱ्हाडे (रा. तिन्हेवाडी रोड, राजगुरुनगर )यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे..

करीयरची निवड करत असताना

करीयर मंत्रा|

करीयरची निवड करणे हि आपल्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट असते, आपण आपल्या पूर्ण आयुष्यातील सर्वात मोठा काळ याच्यावर घालवणार असतो.करीयर किंवा व्यवसायाची निवड करणे सोप्पी गोष्ट नसते. आपला एक चुकीचा निर्णय आपल्या पूर्ण आयुष्यावर परिणाम करणार असतो.

एखादा विशिष्ट पेशा निवडताना किंवा करियर बदल करताना, आपल्या आवडी आणि महत्वाकांक्षा कशा आहेत हे काळजीपूर्वक शोधणे महत्वाचे आहे. आपण करियर ऍपिट्यूड टेस्टद्वारे हे करू शकता. अशा प्रकारचे परीक्षण आपल्याला आपल्या प्रतिभा आणि स्वारस्यांमधील स्पष्ट अंतर्दृष्टी देते. हे आपल्याला कोणत्या कौशल्याच्या क्षेत्रामध्ये आपल्याला कदाचित आपल्यासाठी उपयुक्त एक व्यवसाय सापडेल हे देखील सांगते.
व्यावसायिक करियरची निवड चाचणी घेण्याव्यतिरिक्त आपल्या पर्यायांबद्दल अधिक जाणून घेणे ही चांगली कल्पना आहे. तेथे कोणते व्यवसाय आहेत? ते कशासाठी उभे आहेत? लोकांना माहित आहे की त्यांचा व्यवसाय काय आहे आणि यात काय समाविष्ट आहे. त्यांना त्यांच्या नोकरीबद्दल काय आवडते आणि ते आपल्याला आवडेल असे काहीतरी आहे? इतरांच्या अनुभवामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायावर निर्णय घेण्यास मदत करू शकता. आपण करिअर मार्गदर्शन सल्लागार द्वारे व्यावसायिक सल्ला देखील मिळवू शकता.
आपण करियरची निवड करण्यास भाग पाडत नाही हे निश्चित करा.

 

लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०१९ जाहीर

नोकरी|संरक्षण विभागातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रथम शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त घेण्यात येणारी प्रवेश पूर्व परीक्षा (संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०१९) दिनांक ८ सप्टेंबर २०१९ रोजी घेण्यात येणार असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II)-२०१९
भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून मध्ये १०० जागा, भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला मध्ये ४५ जागा, हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद मध्ये ३२ जागा, ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई मध्ये २२५ जागा आणि ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई मध्ये १५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा अभियांत्रिकी पदवी किंवा पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह) उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९६ ते १ जुलै २००१ किंवा २ जुलै १९९५ ते १ जुलै २००१ दरम्यान झालेला असावा.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेद्वारांकरिता २००/- रुपये आणि (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

परीक्षा – दिनांक ८ सप्टेंबर २०१९ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जुलै २०१९ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

https://upsconline.nic.in/mainmenu2.php