जर्नालिझम करायचंय तर हे गुण असावे लागतात अंगी..

करिअर मंत्रा | जर्नालिझम हे एक आजचं विस्तारलेलं क्षेत्र आहे. या क्षेत्रात आपण मोठं नाव करू शकता. या ५ वर्षात या क्षेत्रात तरुणांचा कल वाढायला लागला आहे. अनेक पदवीधर आणि एमबीए मार्केटिंग क्षेत्रात प्राविण्य मिळवणारी मंडळी आज पत्रकारितेत येऊन आपलं नशीब आजमवत आहेत. लोकांशी असलेली नाळ जोडण्यात अनेकांना आवडतं परंतु क्षेत्र वेगळं असल्याने अनेकांना थेट सामान्य नागरिकांशी संबंध येत नाही. पत्रकारितेत मात्र थेट नागरिकांशी संवाद साधण्यास सोप्प पडतं. या क्षेत्रात तुम्हाला वृत्तपत्र आणि नवोदय वेब पोर्टल्समध्ये इंटर्नशिपच्या माध्यमातून सुरुवात करू शकता.

राजकीय

महाराष्ट्र राजकारण आणि देशातील राजकारणाच्या घडामोडींवर नजर असायला हवी राजकीय सक्रीयता ही या क्षेत्रात महत्वाची मानली जाते. आणि लोकशाहीला धरून आपण लोकशाहीचा चौथा स्तंंभ म्हणून सदर विषयाला न्याय देण्यास प्रयत्न करायला हवा.

सामाजिक

पत्रकार म्हणून परिपक्व होत असताना सामाजिक अभ्यास सुद्धा असावा लागतो. महाराष्ट्रातील सामाजिक इतिहास देशाचा सामाजिक विषयांवर आपलं मत असलं पाहिजे आणि त्यावर चर्चा करता आली पाहिजे

मनोरंजन

मनोरंजन क्षेत्रातील उदा . बॉलिवूड ची माहिती अभिनेता अभिनेत्रीची नावे, सध्या चर्चेत असणाऱ्या चित्रपटांची नावे, त्यावर थोडं फार लिहिता यायला हवं.

तंत्रज्ञान

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या स्पर्धात्मक क्षेत्रात क्षेत्रात तांत्रिक बाबी हाताळता यायला हव्यात. उदा. ,संगणक ,टायपिंग, बातमी एडिट. मेल वापरायला यायला हवं. बातम्या साठवून ठेवता यायला हव्या.

लिखाण

बातम्या लिहीण्याचा प्रवाह बऱ्यापैकी असायला हवा.
प्रवास वर्णन, ब्लॉग, बातम्या लिहिताना घटनेचं स्थळ कुठे कधी केंव्हा घटनेचं कारण या नमुद असायला हव्यात.