NVS Admission : जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु; अशी करा नाव नोंदणी

करिअरनामा ऑनलाईन । नवोदय विद्यालय समितीने इयत्ता 6 वी च्या प्रवेशासाठी (NVS Admission) प्रवेश परीक्षेची नोटीस जारी केली आहे. या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2023 घोषित करण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा येथे उपलब्ध थेट लिंकवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात.

जवाहर नवोदय विद्यालयाचे यश (NVS Admission)

जवाहर नवोदय विद्यालय भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नवोदय विद्यालय समितीद्वारे चालवली जातात. या शाळांमधील 75% जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. मुलींसाठी 33 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. 2022 मध्ये या विद्यालयातील 56% पेक्षा जास्त विद्यार्थी JEE MAINS मध्ये पात्र झाले आहेत आणि 78% विद्यार्थी NEET मध्ये पात्र झाले आहेत.

NVS मध्ये इयत्ता 6 वी च्या वर्गात प्रवेशासाठी अर्ज कसा करायचा?

1 मे 2011 ते 30 एप्रिल 2013 दरम्यान जन्मलेले विद्यार्थी. ज्यांनी 2022-23 या शैक्षणिक सत्रातील इयत्ता 5 वी च्या परीक्षेसाठी सरकारी शाळेतून किंवा सरकारने मान्यता (NVS Admission) दिलेल्या शाळेतून प्रवेश घेतला आहे आणि जे शिक्षण घेत आहेत असे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

पहा महत्वाच्या लिंक्स –

इयत्ता 6 वीच्या नोंदणीसाठी येथे CLICK करा – Registration

प्रॉस्पेक्टस पाहण्यासाठी येथे CLICK करा – Prospectus

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com