NLC Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी मोठी बातमी!! नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये होणार 295 जागांवर भरती

करिअरनामा ऑनलाईन । नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये रिक्त (NLC Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 295 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन
भरले जाणारे पद – पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET)
पद संख्या – 295 पदे
भरतीचा तपशील –
1) मेकॅनिकल – 120 पदे
2) इलेक्ट्रिकल (EEE) – 109 पदे
3) सिव्हिल – 28 पदे
4) माइनिंग – 17 पदे
5) कॉम्प्युटर – 21 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NLC Recruitment 2023)
60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ कॉम्पुटर/IT/कॉम्पुटर सायन्स/माइनिंग इंजिनिअरिंग पदवी
SC/ST : 50% गुण GATE 2023
वय मर्यादा –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत असावे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षा फी –
जनरल/ओबीसी उमेदवारांसाठी ₹854/- रुपये
[SC/ST/PWD/ExSM: ₹354/-]
मिळणारे वेतन –
पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET) म्हणून सामील (NLC Recruitment 2023) होणारे उमेदवार एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षण घेतील. प्रशिक्षण कालावधी दरम्यान, GET ला INR.50, 000/- ते 1,60,000/- पर्यंतचे मूळ वेतन, लागू होणारा महागाई भत्ता आणि सामान्य भत्ता (मूलभूत वेतनाच्या 35%) प्रति महिना दिला जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nlcindia.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com