एमपीएससी मधील अपयशामुळे तरुणाची आत्महत्या

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

बातमी |एमपीएससी मधील सतत अपयशामुळे वर्षीय तरुणाची केदारेश्वर बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्या. रुपेश विष्णू बोऱ्हाडे रा. राजगुरुनगर असे आत्महत्या ग्रस्त तरुणाचे नाव आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश बोऱ्हाडे हा सुमारे तीन वर्षापासून एमपीएसीचा अभ्यास करत होता. तो परीक्षेचा अभ्यास करून चाकण येथील एमआयडीसीमधील एका कंपनीत नोकरी करत होता. परंतु,पूर्णवेळ अभ्यास करता यावा त्यामुळे रुपेश याने कंपनीतील नोकरी सोडून दिली होती. कंपनीतील नोकरी सोडून दिल्यापासून रुपेश पुन्हा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे येथे राहण्यास होता.सुमारे तीन ते चार महिन्यापूर्वी रुपेश यांनी दिलेल्या एमपीएससीच्या परीक्षेचा निकाल लागला होता. या परीक्षेत रुपेश नापास झाला होता. तेव्हापासून तो नाराज होता.सध्या तो अभ्यासासाठी रांजणगाव (ता. शिरुर ) सुरू येथे राहत होता.

मानसिकरित्या खचुन गेल्यामुळे रुपेश याने स्वत:च्या पाठीवरील बॅगमध्ये दहा किलोचा वजनाचा दगड टाकून शैक्षणिक कागदपत्रे यांच्यासह भीमानदीवरती असणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी १० वाजता नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात तरंगत असलेल्या बाहेर काढल्यावर  खिशात पासपोर्टवरील नावामुळे रुपेश ची ओळख पटली. नगर परिषदेच्या नगरसेविका रेखाताई श्रोत्रीय यांनी रुपेशच्या वडिलांना या घटनेची माहिती दिली.याबाबत रुपेशचे वडील विष्णू शिवराम बोऱ्हाडे (रा. तिन्हेवाडी रोड, राजगुरुनगर )यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: