10th and 12th Board Exam Results : 10 वी/12 वी च्या निकालाबाबत मोठी अपडेट!! ‘या’ तारखेला जाहीर होणार निकाल

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक (10th and 12th Board Exam Results) व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात निकाल जाहीर होणार आहे. मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात बारावीचा, तर चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे; अशी माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी दिली आहे. मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अजून कोणतीही तारीख जाहिर करण्यात आली नाही.

उत्तरपत्रिका संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात
राज्यात 1 ते 26 मार्च दरम्यान 10 वी ची आणि 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान 12 वीची परीक्षा घेण्यात आली होती. निकाल लवकर लागण्यासाठी जलदगतीने तयारीला सुरुवात (10th and 12th Board Exam Results) झाली होती. दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असतानाच संबंधित विषयाची परीक्षा संपली की पेपर तपासणीचे काम सुरू करण्यात आले होते. पेपर तपासणी झाल्यानंतर संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी ठरावीक मुदत देण्यात आली होती. त्यानुसार उत्तरपत्रिका संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

नेहमीपेक्षा आधी निकाल लागणार (10th and 12th Board Exam Results)
दरवर्षी कोकण आणि मुंबई विभागाकडून उत्तरपत्रिका संकलनाची कामे उशिरापर्यंत सुरू असत. यंदा मात्र या दोन्ही विभागांचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय, एका ठराविक ठिकाणी उत्तरपत्रिका जमा करण्यात आल्यामुळे, यंदा उत्तरपत्रिका गोळा करण्याचा कालावधी कमी झाला आहे. परीक्षा झाली की विविध कारणांनी उत्तरपत्रिका तपासणीला उशीर होण्याचे प्रकार घडतात. यंदा मात्र असे कोणतेही प्रकार न घडल्यामुळे नेहमीपेक्षा आधी निकाल लागणार आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे वातावरण राहणार आहे. त्यामुळे देखील निकाल लवकर लावण्यावर राज्य मंडळाचा भर असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

असा पहा निकाल
विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन बघू शकतात. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे. यंदा दहावी आणि बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात लागू शकतो; मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अजून कोणतीही तारीख ही जाहिर करण्यात (10th and 12th Board Exam Results) आली नाही. यंदा लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहिर होण्या अगोदर दहावी आणि बारावीचे निकाल जाहिर होऊ शकतात.
यावर्षी दहावी आणि बारावीच्या तब्बल ३१ लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली आहे. एकूण ३ हजार ३२० परीक्षा केंद्रांवर बारावीच्या तर, ५ हजार ८६ केंद्रावर दहावीची परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मंडळाकडून या परीक्षेची जोरदार तयारी करण्यात आली. काॅपीमुक्त परीक्षा करण्यासाठी मंडळाने अगोदरच कंबर कसल्याचे देखील यंदा बघायला मिळाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com