NEET PG 2024 : NEET PG परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 6 मे पर्यंत करता येणार अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (NEET PG 2024) आनंदाची बातमी आहे. NEET PG परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील एम.डी, एम.एस., डी.एन.बी. यासारख्या पदव्युत्तर शिक्षणासाठी NEET PG प्रवेश परीक्षा घेतली जाते. एमबीबीएस (MBBS) पदवीधारकांसाठी विविध विषयातील शिक्षण घेण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. परीक्षेबाबतचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. या परीक्षेसाठी 6 मे 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे तर 17 जून 2024 पासून परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केले जातील. 23 जून 2024 रोजी NEET PG (NEET PG) परीक्षा घेतली जाणार आहे.

असं असतं परीक्षेचं स्वरूप
पदव्युत्तर शिक्षणासाठी केंद्रीय स्तरावर नीट पीजी ही एकमेव परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे (NTA) राबवण्यात येत असल्यामुळे परीक्षेत कोणताही गैरप्रकार (NEET PG 2024) घडत नाही. ही परीक्षा 800 गुणांची असते तर संगणक प्रणालीद्वारे ही परीक्षा राबवण्यात येते. यंदा ही परीक्षा २३ जून रोजी सकाळी ९ ते १२:३० या वेळेत घेतली जाणार आहे. उमेदवारांना अर्जातील त्रुटी दूर करता याव्या; यासाठी २६ मे ते ३ जून हा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत उमेदवारांना मुळ अर्जात बदल करता येणार आहे.

23 जूनला होणार परीक्षा (NEET PG 2024)
नीट-पीजीची परीक्षा देशभरातील 259 केंद्रावर एकाच दिवशी एकाच वेळेत 23 जून रोजी घेण्यात येणार आहे. एमबीबीएस नंतर आंतरवासीयता अभ्यासक्रम (Internship Course) पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. देशपातळीवरील तसेच राज्यपातळीवरील सर्व पदव्युत्तर जागांवरील प्रवेश हे या प्रवेश परीक्षेच्या गुणांच्या आधारावर दिले जातात. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा महत्वाची आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com