Naval Command Recruitment : 10 वी उत्तीर्णांना मुंबईत नोकरीची नामी संधी; वेस्टर्न नेवल कमांडमध्ये भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। नौसेना वेस्टर्न नेवल कमांड, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (Naval Command Recruitment) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, लायब्ररी आणि माहिती सहाय्यक ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – नौसेना वेस्टर्न नेवल कमांड, मुंबई (Western Naval Command Mumbai)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022

भरले जाणारे पद –

  1. स्टाफ नर्स (Staff Nurse)
  2. सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (Civilian Motor Driver)
  3. लायब्ररी आणि माहिती सहाय्यक (Library & Information Assistant)

पद संख्या – 49 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Naval Command Recruitment)

  • स्टाफ नर्स (Staff Nurse) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10 वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे Nurse Training Certificate असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (Civilian Motor Driver) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10th पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

first line maintenance चं ज्ञान असणं आवश्यक आहे. (Naval Command Recruitment)

तसंच उमेदवारांकडे जड वाहनांचं लायसन्स असणं आवश्यक आहे.

  • लायब्ररी आणि माहिती सहाय्यक (Library & Information Assistant) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.Lib.Sc (Bachelor of Library Science) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड इस्टेट, टायगर गेट जवळ, मुंबई-400 001

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com