MUCBF Recruitment 2024 : कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी; महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन येथे भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स (MUCBF Recruitment 2024) फेडरेशन लि. अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लिपिक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदवीधर आणि संगणकाचे ज्ञान असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.
भरले जाणारे पद – कनिष्ठ लिपिक
पद संख्या – 07 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर, MS-CIT किंवा समतुल्य
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 मार्च 2024 रोजी 22 ते 35 वर्षे
मिळणारे वेतन – 10,000/- ते 13,200/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2024 (11:59 PM)

निवड प्रक्रिया – (MUCBF Recruitment 2024)
1. ऑफलाईन परीक्षा
2. कागदपत्रे पडताळणी
3. मुलाखत
ऑफलाईन परीक्षा –
1. कनिष्ठ लिपिक पदाकरिता १०० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ऑफलाईन पद्धतीने इंग्रजी माध्यमातून परीक्षा घेण्यात येईल.
2. बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांमध्ये गणित, इंग्रजी व्याकरण, संगणक आणि सहकार ज्ञान, बौधिक चाचणी, सामान्य ज्ञान आणि आर्थिक ज्ञान या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल. (MUCBF Recruitment 2024)
3. त्यानंतर १०० पैकी प्राप्त गुणांचे ९० च्या गुणोत्तरामध्ये रुपांतर करण्यात येईल.
नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://mucbf.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com